स्वातंत्र्यदिनानिमित्त चित्र प्रदर्शनाचे आयोजन
मुंबई दि.16 : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर दि. 14 आणि 15 ऑगस्ट रोजी भारतीय वन सेवेतील अधिकारी व चित्रकार प्रदीप वाहुळे यांच्या 'स्पिरिट ऑफ इंडिया' या चित्र प्रदर्शनाचे आयोजन मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात करण्यात आले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहणानंतर या प्रदर्शनाला भेट दिली व चित्रकार श्री. वाहुळे यांचे कौतुक केले.
'स्पिरिट ऑफ इंडिया' या चित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडत आहे. मंत्रालयातील आयोजनानंतर हे प्रदर्शन आता वरळीच्या नेहरू सेंटर आर्ट गॅलरी येथे दि. 21 ऑगस्टपर्यंत सकाळी 11.00 ते सायं. 7.00 या वेळेत सर्वांसाठी खुले आहे.
No comments:
Post a Comment