Monday, 31 July 2023

आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या संचालकांचीदिलखुलास' कार्यक्रमात मुलाखत

 आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या संचालकांचीदिलखुलास' कार्यक्रमात मुलाखत

            मुंबई, दि. ३१ : आपत्ती व्यवस्थापन ही आज काळाची गरज झाली आहे. आपत्ती व्यवस्थापनात नागरिकांशी संवाद साधून जनजागृती करणे हे नियंत्रण आणि कार्यक्षम अंमलबजावणीत महत्त्वाचे आहे. यासाठी यंदाच्या पावसाळ्यात शासनस्तरावर कशा प्रकारे खबरदारी घेण्यात आली आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमातून राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक आप्पासाहेब धुळाज यांनी याविषयी माहिती दिली आहे.


            आपत्कालिन व्यवस्थापन हा आपत्ती व्यवस्थापनाचा प्रमुख भाग आहे. यामध्ये बचाव, शोध आणि शून्य मृत्यू हे महत्वाचे उद्दिष्ट आहे. आपत्ती पीडितांना आपत्तीमधून सोडविण्यासाठी, मदत करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन दलाकडून त्वरित प्रतिसाद देण्यात येतो. त्यांच्या पुनर्वसनासाठी विशेष कृती आराखडा तयार करण्यात येतो. शासन - प्रशासन यंत्रणेच्या जोडीने आपत्तीपूर्व, आपत्तीदरम्यान आणि आपत्ती पश्चात कोणकोणती कामे करावीत याचे सूक्ष्म नियोजन करण्यात येते. आपत्कालिन परिस्थितीत केंद्र सरकार, राज्य शासन आणि जिल्हा पातळीवर जिल्हा प्रशासनाची स्वतंत्र यंत्रणा कशा प्रकारे काम करीत आहे याबाबतची सविस्तर माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक श्री. धुळाज यांनी 'दिलखुलास' कार्यक्रमातून दिली आहे.


            माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत मंगळवार दि. 1 आणि बुधवार दि.2 ऑगस्ट, 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआर' या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. निवेदक रिताली तपासे यांनी ही मुलाखत घेतली आहे.


0000

पायाभूत सोयीसुविधांच्या अनुदानासाठी धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शाळांना आवाहन

 पायाभूत सोयीसुविधांच्या अनुदानासाठी

धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शाळांना आवाहन

 

            मुंबईदि.३१ : मुंबई उपनगर जिल्ह्यातील धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खासगी अनुदानितविना अनुदानितकायम विना अनुदानित शाळाकनिष्ठ महाविद्यालयेऔद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत  सुविधा पुरविण्यासाठी अल्पसंख्याक विभागामार्फत सन 2023-24 साठी अनुदान योजना राबविण्यात येत आहे.

            या योजनेंतर्गत शासनमान्य शाळांना अर्ज करण्यासाठी 10 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

            या अनुदान योजनेसाठी इच्छूक शाळांकडून दि. ऑक्टोबर, 2015 रोजीच्या शासन निर्णयामधील तरतुदीनुसार अटी व शर्तीची पूर्तता करणाऱ्या शाळांचे विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. संबंधित शाळाकनिष्ठ महाविद्यालयेऔद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये ७० टक्के व अपंग शाळामध्ये ५० टक्के विद्यार्थी हे अल्पसंख्याक समुदायातील असणे अनिवार्य आहे. या योजनेअंतर्गत पात्र होण्यासाठी संबंधित शाळाकनिष्ठ महाविद्यालय व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना शासनाकडून मान्यता मिळालेली असणे आवश्यक आहे.

            स्वयंअर्थसहाय्यित शाळा या योजनेसाठी पात्र असणार नाहीतअसे मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.


सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठीअर्ज सादर करण्याचे आवाहन

 सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठीअर्ज सादर करण्याचे आवाहन


      मुंबई, दि. ३१ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने समाजकल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक/ व्यक्तींना दरवर्षी विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. सन 2019-20, 2020-21, 2021-22 व 2022-23 या आर्थिक वर्षात देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार, शाहू, फुले, आंबेडकर पारितोषिक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्रावीण्य पुरस्कार या विविध पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.


            यापूर्वी अर्जदार/ संस्था ज्यांनी सन 2019-20, 2020-21 व 2021-22 या वित्तीय वर्षाकरीता अर्ज केला आहे, त्यांना नव्याने या पुरस्कारासाठी अर्ज करण्याची आवश्यकता नाही. त्यांनी ज्या वर्षाकरीता अर्ज केला आहे. त्या वर्षाकरीताचा चारित्र्य पडताळणी अहवाल सादर करावा. या कालावधीकरीता पूर्वी अर्ज केलेल्या व्यक्तींनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. ज्या वर्षासाठी व ज्या पुरस्काराकरीता अर्ज करण्यात येत आहे, त्या वर्षासाठी त्या पुरस्काराकरीता विहीत केलेल्या अटींची पूर्तता करणे आवश्यक राहील. समाजकल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या इच्छुकांनी या पुरस्कारासाठी १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत अर्ज नमूद करण्यात आलेल्या कागदपत्रांसह करावेत, असे आवाहन सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे व समाजकल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरीया यांनी केले आहे. या विविध पुरस्कारांची जाहिरात व अर्जाचा नमुना शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग https://sjsa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.


0000

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत राबविणारलोकशाहीर अण्णा भाऊ साठे बांबू शिल्प प्रशिक्षण कार्यक्रम'

 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत राबविणारलोकशाहीर अण्णा भाऊ साठे बांबू शिल्प प्रशिक्षण कार्यक्रम'


- मंगलप्रभात लोढा


            मुंबई, दि. 31 : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) लोकशाहीर अण्णा भाऊ साठे बांबू शिल्प प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येईल, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली आहे.


            या कार्यक्रमामार्फत तयार झालेल्या अभ्यासक्रमातून बांबूपासून शिल्प व वस्तू बनवण्याचे कौशल्य विद्यार्थ्यांना मिळेल तसेच अर्थार्जनासाठी या कौशल्याचा वापर कसा करावा याबाबतसुद्धा मार्गदर्शन मिळेल. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगाराच्या आणि स्वयं रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासन कार्यरत आहे.


            लोकशाहीर अण्णा भाऊ साठे हे सर्वांचेच प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या साहित्याचा वसा घेऊन आपण सर्वच महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी काम करत आहोत. त्यांच्या जयंतीनिमित्त सुरु करण्यात आलेल्या अभ्यासक्रमांचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा. तरुणांना कौशल्य विकासाचे शिक्षण देऊन आपल्या राज्याचा आर्थिक आणि सामाजिक विकास साधण्यासाठी आम्ही तत्पर आहोत, असेही मंत्री श्री. लोढा यांनी यावेळी सांगितले.


            यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह आणि राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगांबर दळवी उपस्थित होते.


****

श्रावणी अंडा मसाला शाकाहारी


 

ज्योती र लिगम्म दर्षणंम

 


पीक विमा भरण्यास तीन दिवसांची मुदतवाढ,आता तीन ऑगस्टपर्यंत पीक विमा भरता येणार

 पीक विमा भरण्यास तीन दिवसांची मुदतवाढ,आता तीन ऑगस्टपर्यंत पीक विमा भरता येणार


 - कृषिमंत्री धनंजय मुंडे


            मुंबई, दि. 31 : पीक विमा भरण्यासाठी काही ठिकाणी तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने राज्य शासनाने केंद्र सरकारकडे याबाबत विनंती केली असता, पीक विमा ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी आता आणखी तीन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून 3 ऑगस्टपर्यंत पीक विमा भरता येणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटद्वारे दिली आहे.


            प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी एक रुपयात पीक विमा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती.


            आजपर्यंत राज्यात तब्बल एक कोटी पन्नास लाख पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी एक रुपयात आपला विमा अर्ज नोंदवून सहभाग घेतला आहे. मागील चोवीस तासात 7 लाख 20 हजार शेतकऱ्यांनी विमा अर्ज भरला आहे. मात्र काही ठिकाणी सर्व्हर डाऊन होणे व तत्सम तांत्रिक अडचणी येत असल्याचा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार शेतकरी कोणत्याही तांत्रिक बाबींमुळे विमा भरण्यापासून वंचित राहू नये, यादृष्टीने 3 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. उर्वरित शेतकऱ्यांनी विहित वेळेत आपले विमा अर्ज नोंदवून घ्यावेत, असे आवाहन कृषिमंत्री श्री. मुंडे यांनी केले आहे.


००००


दत्तात्र

य कोकरे/व.स.सं


Featured post

Lakshvedhi