Wednesday, 26 July 2023

शासकीय वसाहतीतील रहिवाशांना मालकी हक्कानेघरे देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ

 शासकीय वसाहतीतील रहिवाशांना मालकी हक्कानेघरे देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ


- सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण


            मुंबई, दि. २५ : शासकीय वसाहत वांद्रे (पूर्व) येथील उपलब्ध जागेच्या पुनर्विकासासंदर्भात कृती आराखडा तयार करण्यासाठी कोरियन कंपनीसोबत करार करण्यात आला आहे. येथील रहिवाशांना मालकी हक्काने घरे देणे हा धोरणात्मक विषय असून कृती आराखडा आल्यानंतर याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधान परिषदेत सांगितले.


            सदस्य ॲड.अनिल परब यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती.


            मंत्री श्री.चव्हाण म्हणाले की, या शासकीय वसाहतीच्या जागेचा पुनर्विकास करण्यात येत आहे. यासाठी उपलब्ध असलेली जागा विचारात घेऊन पुनर्विकासाचा आराखडा तयार केला जात आहे. हा आराखडा ऑक्टोबरपर्यंत तयार होणे अपेक्षित असून त्यानंतर पुढील अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन रहिवाशांच्या मागणीबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. रहिवाशांना घरे देण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असल्याचेही त्यांनी सांगितले. सध्या नादुरूस्त असलेल्या सदनिकांची पाहणी करून त्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.


            या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री भाई गिरकर, सचिन अहीर, प्रवीण दरेकर यांनी सहभाग घेतला.


0000

पत्रकारांकरिता कल्याणकारी योजना राबविण्यासाठीउच्चस्तरीय अभ्यासगट

 पत्रकारांकरिता कल्याणकारी योजना राबविण्यासाठीउच्चस्तरीय अभ्यासगट


- मंत्री शंभूराज देसाई


            मुंबई, दि. २५ : राज्यातील पत्रकारांकरिता कल्याणकारी योजना राबविण्यासाठी उच्चस्तरीय अभ्यासगट स्थापन करण्यात येईल, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत सांगितले.


            सदस्य धीरज लिंगाडे यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित करून पत्रकारांसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याबाबतची मागणी केली होती.


            उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी अभ्यासगटाचा अहवाल डिसेंबरच्या अधिवेशनापूर्वी घ्यावा, बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेतील पत्रकारांची संख्या वाढवावी, 60 वर्षे वयापूर्वी असाध्य आजार झाल्यास त्यांचा या योजनेत समावेश करावा, अधिस्वीकृतीसाठी संपादकांच्या शिफारशींची आवश्यकता शिथिल करावी आदी सूचना केल्या.


            शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत माहिती देताना मंत्री श्री.देसाई म्हणाले की, पत्रकार संरक्षण कायदा लागू करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. अधिस्वीकृती पत्रिकाधारक पत्रकारांसाठी शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येतात. पत्रकारांना दुर्धर आजार, अपघात झाल्यास किंवा आकस्मिक मृत्यू झाल्यास त्यांना किंवा कुटुंबीयांस ‘शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी’ अंतर्गत आर्थिक मदत दिली जाते. यासाठी 50 कोटी रुपये इतका निधी राष्ट्रीयकृत बँकेत ठेव म्हणून ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यावरील व्याजाच्या रकमेतून ही मदत दिली जाते.


            ‘शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी योजनेच्या विश्वस्त मंडळामार्फत आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. या अंतर्गत सध्या 154 पात्र ज्येष्ठ पत्रकारांना मासिक 11 हजार रुपये इतका सन्मान निधी दिला जातो, अशी माहिती मंत्री श्री.देसाई यांनी दिली. या व्यतिरिक्त एसटी प्रवासाठी 100 टक्के सवलत, शासकीय रूग्णालयातून विनाशुल्क आरोग्य सेवेचा लाभ, त्याचप्रमाणे महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेमध्ये अधिस्वीकृती धारक पत्रकारांचा समावेश, कुटुंबातील व्यक्तींना दुर्धर आजार झाल्यास आर्थिक मदत अशा विविध प्रकारच्या सोयीसवलती व सुविधा दिल्या जातात. पत्रकारांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याची सध्या गरज भासत नाही, असेही मंत्री श्री.देसाई यांनी यावेळी स्पष्ट केले.


            पत्रकारांसाठीच्या विविध मागण्यांसंदर्भात अभ्यास गटामार्फत पडताळणी केली जाईल. तसेच या गटाचा अहवाल आल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे बैठक आयोजित करून याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री श्री.देसाई यांनी सांगितले.


            याअनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री सचिन अहीर, अभिजित वंजारी, शशिकांत शिंदे, गोपीचंद पडळकर, महादेव जानकर, जयंत पाटील, राजेश राठोड, सुनील शिंदे, निलय नाईक, डॉ.मनीषा कायंदे आदींनी सहभाग घेतला.


0000

मुंबईतील अनधिकृत ठरविलेल्या शाळांना अटी शर्तींच्या अधीन राहून मान्यता देण्याबाबत शासन सकारात्मक

 मुंबईतील अनधिकृत ठरविलेल्या शाळांना

अटी शर्तींच्या अधीन राहून मान्यता देण्याबाबत शासन सकारात्मक


- मंत्री उदय सामंत


            मुंबई, दि. 25 : बृहन्मुंबई महानगरपालिका परिक्षेत्रातील प्रामुख्याने झोपडपट्टीतील 269 खाजगी शाळा शासनाची अथवा महानगरपालिकेची मान्यता नसल्याने अनधिकृत ठरविण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी या शाळांवरील कारवाई रद्द करून स्वयं अर्थसहाय्यित कायद्यांतर्गत अटी व शर्तींच्या अधीन राहून शाळांना मान्यता देण्याबाबत शालेय शिक्षण मंत्र्यांनी बैठक घेऊन शासनाकडे प्रस्ताव पाठविल्याची माहिती, मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. याबाबत शासन सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले.


            सदस्य कपिल पाटील यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती.


            मंत्री श्री.सामंत म्हणाले, मुंबईतील शिक्षण संस्थांना महानगरपालिकेमार्फत जल जोडणी देण्यात आली आहे. त्यासाठी नियमानुसार पाणीपट्टी कर आकारण्यात येत आहे. महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना 27 वस्तु महानगरपालिकेच्या निधीतून देण्यात येतात. झोपडपट्टी क्षेत्रातील मान्यताप्राप्त खाजगी प्राथमिक अनुदानित शाळांनी ऐच्छिक मागणी केल्यास त्यांना या वस्तू देण्याबाबत विचार करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.


            या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री अभिजित वंजारी, विलास पोतनीस, सत्यजित तांबे, सुनील शिंदे यांनी सहभाग घेतला.


0

वसंतराव नाईक तांडा - वस्ती सुधार योजनेतीललोकसंख्येचा निकष बदलण्यासंदर्भात लवकरच बैठक

 वसंतराव नाईक तांडा - वस्ती सुधार योजनेतीललोकसंख्येचा निकष बदलण्यासंदर्भात लवकरच बैठक


- मंत्री अतुल सावे


            मुंबई, दि. 25 : वसंतराव नाईक तांडा - वस्ती सुधार योजनेतील लोकसंख्येचा निकष बदलण्याची मागणी होत आहे. त्या अनुषंगाने या अधिवेशनाच्या कालावधीत बैठक घेण्यात येईल, अशी माहिती इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत दिली.


            सदस्य योगेश कदम यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला मंत्री श्री. सावे यांनी उत्तर दिले.


            ते म्हणाले की, राज्यातील ग्रामीण भागातील विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग यांच्या तांडे/ वाडी/ वस्त्यांना प्राथमिक सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी दलित वस्ती सुधार योजनेच्या धर्तीवर सन २००३-०४ या वित्तीय वर्षांपासून "वसंतराव नाईक तांडा / वस्ती सुधार योजना सुरु करण्यात आली आहे.


            या योजनेंतर्गत पंचवार्षिक आराखड्यात समाविष्ट असलेल्या कामांचा प्राधान्यक्रम व निकड विचारात घेऊन विकास कामांची निवड केली जाते. तांडा/ वस्त्यांच्या विकासासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जातो. या योजनेंतर्गत तांडा / वस्तीमध्ये विद्युतीकरण (हायमेक्स, पथदिवे, एलईडी बसविणे), पिण्याचे पाणी, अंतर्गत रस्ते, गटारे, शौचालये तसेच समाज मंदिर/वाचनालये व शक्य असेल तेथे मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्यांची कामे, सभागृह / समाजमंदिर या पायाभूत सुविधांची कामे करण्यात येतात. मात्र, या कामामध्ये लोकसंख्येचा निकष ही अडचण असेल, तर ती बदलण्याच्या अनुषंगाने बैठक घेऊन प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर करण्यात येईल, अशी माहिती, मंत्री श्री. सावे यांनी यावेळी दिली.


            सदस्य नितेश राणे, रोहित पवार यांनी यावेळी चर्चेत भाग घेतला.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गअपघात कमी करण्यासाठी सुविधांची संख्या वाढविणार

 हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गअपघात कमी करण्यासाठी सुविधांची संख्या वाढविणार


- मंत्री दादाजी भुसे


            मुंबई, दि. २५ : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षिततेकरिता अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. याशिवाय येणाऱ्या काळात महामार्गावरील सुविधांची संख्या वाढविण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी आज विधानसभेत दिली.


            सदस्य सुनील केदार यांनी, या महामार्गावर झालेल्या अपघातासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला मंत्री श्री. भुसे यांनी उत्तर दिले.


            ते म्हणाले की, समृद्धी महामार्गाचे दोन टप्पे आता कार्यान्वित झाले आहेत. या मार्गावर दररोज किमान १७-१८ हजार वाहने प्रवास करतात. आतापर्यंत ३३ लाखांहून अधिक वाहनांनी या मार्गावरून प्रवास केला आहे. अजून दोन टप्पे बाकी असून त्यातील एक टप्पा सप्टेंबर २०२३ पर्यंत आणि शेवटचा टप्पा मे -२०२४ पर्यंत कार्यान्वित होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.


            मंत्री श्री. भुसे म्हणाले की, या महामार्गावर जे अपघात झाले त्यामध्ये विहीत मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहने चालवणे, वाहन चालविताना दोन वाहनांमध्ये सुरक्षित अंतर न ठेवणे, चुकीच्या पद्धतीने ओव्हर टेकिंग करणे, लेन शिस्त न पाळणे, सुस्थितीत वाहने नसणे, वाहन अवैधरित्या पार्क करणे, वाहतूक सुरक्षततेविषयी काळजी न घेणे तसेच ड्रायव्हिंग करताना चालक सतर्क नसणे, वाहनामध्ये तांत्रिक बिघाड होणे, टायर फुटणे, वाहन चालकाचा डोळा लागणे, वाहनावरचे नियंत्रण सुटणे, व्यसन करून वाहन चालविणे, आग लागणे, मागून दुसऱ्या वाहनाने धक्का मारणे, वाहनाचा तोल जाऊन उलटणे ही अपघात होण्याची प्रमुख कारणे असल्याचे ते म्हणाले.


            मंत्री श्री. भुसे म्हणाले की, हा महामार्ग इंडियन रोड काँग्रेसच्या संबंधित मार्गदर्शक तत्वानुसारच संकल्पित केला असून वाहनांसाठी वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तसेच, महामार्ग पोलिसांमार्फत व आर.टी.ओ. मार्फत अपघात होऊ नये यादृष्टीने वाहन चालकांना वेळोवेळी समुपदेशन केले जात आहे. वेग मर्यादा न पाळणाऱ्या वाहन चालकांवर दंड आकारणी करण्यात येत आहे. आवश्यक दिशादर्शक चिन्हे, सूचना फलके, माहिती फलके, वेगमर्यादा दर्शक फलके लावणे, लेन मार्किंग करणे, क्रॅटआईज व डेलिनेटर्स लावण्याच्या उपाययोजना केलेल्या आहेत. वन्य प्राण्यांची व मोकाट जनावरांची ये-जा होऊ नये म्हणून क्रॅश बॅरिअरच्या बाजूने चेन लिंक फेन्सिंग उभारण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.


            समृध्दी महामार्गावर वाहनांचे टायर तपासणी करिता पथकर नाक्यांवर आर.टी.ओ विभागास जागा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या महामार्गावर रहदारी आणि घटना नियंत्रणासाठी इंटेलिजेंट ट्रान्सपोर्टेशन सिस्ट‍िम (ITS) स्थापित केली जाणार असल्याची माहितीही मंत्री श्री. भुसे यांनी दिली.


            सुरक्षिततेच्या अनुषंगाने आणि अपघातग्रस्तांना तातडीने सहाय्य करण्यासाठी अत्याधुनिक शीघ्र प्रतिसाद वाहने, रुग्णवाहिका, गस्त वाहने, क्रेन, उपलब्ध करून दिल्याचेही त्यांनी सांगितले.


            सदस्य संजय गायकवाड, ज्ञानराज चौगुले आदींनी यावेळी चर्चेत भा

केळी खाल्ल्याने सर्दी होते का ?* *➖

 *➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖*

   *केळी खाल्ल्याने सर्दी होते का ?*

*➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖*


अजूनही केळे खाताना मला विचार पडतो सर्दी तर होणार नाही? लहानपणापासून आजी, मावशी, आई या सर्वांनी केळे खाऊ नको सर्दी होईल असे वारंवार सांगितल्याने ती भीती आज देखील वाटते. पण शास्त्रीय सत्य काय आहे?


सर्दी होण्याची दोन मुख्य कारणे म्हणजे विषाणूंचा संसर्ग व अ‍ॅलर्जी किंवा वावडे. वातावरणात बदल झाला की बर्‍याच जणांना ही सर्दी होते. म्हणूनच इंग्रजीत याला 'कॉमन कोल्ड' असे म्हणतात. ही सर्दी ६४ प्रकारच्या विषाणूंमुळे होऊ शकत असल्याने अनेक वेळा सर्दी होते व शरीर या विषाणूंच्या विरुद्ध परिणामकारक अशी रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करू शकत नाही. 


सर्दीवर उपाय नाही कारण विषाणूंना आपण मारू शकत नाही. गमतीने असे म्हणतात की, औषध नं घेतल्यास सर्दी बरी व्हायला सात दिवस लागतात पण उपचार घेतल्यावर ती एक आठवड्यात बरी होते. 


वाऱ्यामुळे होणारी सर्दी काही विशिष्ट काळातच होते. काही जणांना धूळ, पराग कण, एखादे विशिष्ट अत्तर इत्यादी संपर्कात आल्यावर सर्दी होते.


केळ्यामुळे विषाणू संसर्ग तर होत नाहीच पण काही जणांना वावडे असू शकेल. ज्यांना केळे खाल्ल्याने सर्दी होत असल्याचा अनुभव वारंवार आला असेल त्यांनी केळे न खाणे चांगले. पण केळी खाल्ल्याने सगळ्यांनाच सर्दी होईल हे मात्र चुकीचे आहे. 


अशा गैरसमजाने सर्वत्र उपलब्ध असलेले स्वस्त असे हे फळ लोक खाणार नाहीत व कार्बोदके प्राप्त करण्याचा हा सोपा मार्ग सोडून देतील. केळे खाल्ल्याने तुम्हाला सर्दी होते वा नाही हे तुम्हीच तपासू शकाल.


*डाॅ. अंजली दिक्षित व डाॅ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन* 


*संकलक - दिपक तरवडे*



*➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


रायगड जिल्हा परिषद विविध विभाग कार्यालय बदल

 *रायगड जिल्हा परिषद ची ईमारत धोकादायक घोषित केल्या मुळे विविध विभाग आता स्थलांतरित झाले आहेत , अनेकांना आप आपल्या कामाकरिता जिल्हा परिषदेत जायला लागते अशा सर्व ग्रुप सदस्यांच्या माहिती करिता*


Featured post

Lakshvedhi