Wednesday, 26 July 2023

केळी खाल्ल्याने सर्दी होते का ?* *➖

 *➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖*

   *केळी खाल्ल्याने सर्दी होते का ?*

*➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖*


अजूनही केळे खाताना मला विचार पडतो सर्दी तर होणार नाही? लहानपणापासून आजी, मावशी, आई या सर्वांनी केळे खाऊ नको सर्दी होईल असे वारंवार सांगितल्याने ती भीती आज देखील वाटते. पण शास्त्रीय सत्य काय आहे?


सर्दी होण्याची दोन मुख्य कारणे म्हणजे विषाणूंचा संसर्ग व अ‍ॅलर्जी किंवा वावडे. वातावरणात बदल झाला की बर्‍याच जणांना ही सर्दी होते. म्हणूनच इंग्रजीत याला 'कॉमन कोल्ड' असे म्हणतात. ही सर्दी ६४ प्रकारच्या विषाणूंमुळे होऊ शकत असल्याने अनेक वेळा सर्दी होते व शरीर या विषाणूंच्या विरुद्ध परिणामकारक अशी रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करू शकत नाही. 


सर्दीवर उपाय नाही कारण विषाणूंना आपण मारू शकत नाही. गमतीने असे म्हणतात की, औषध नं घेतल्यास सर्दी बरी व्हायला सात दिवस लागतात पण उपचार घेतल्यावर ती एक आठवड्यात बरी होते. 


वाऱ्यामुळे होणारी सर्दी काही विशिष्ट काळातच होते. काही जणांना धूळ, पराग कण, एखादे विशिष्ट अत्तर इत्यादी संपर्कात आल्यावर सर्दी होते.


केळ्यामुळे विषाणू संसर्ग तर होत नाहीच पण काही जणांना वावडे असू शकेल. ज्यांना केळे खाल्ल्याने सर्दी होत असल्याचा अनुभव वारंवार आला असेल त्यांनी केळे न खाणे चांगले. पण केळी खाल्ल्याने सगळ्यांनाच सर्दी होईल हे मात्र चुकीचे आहे. 


अशा गैरसमजाने सर्वत्र उपलब्ध असलेले स्वस्त असे हे फळ लोक खाणार नाहीत व कार्बोदके प्राप्त करण्याचा हा सोपा मार्ग सोडून देतील. केळे खाल्ल्याने तुम्हाला सर्दी होते वा नाही हे तुम्हीच तपासू शकाल.


*डाॅ. अंजली दिक्षित व डाॅ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन* 


*संकलक - दिपक तरवडे*



*➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi