Saturday, 22 July 2023

आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखालीइरशाळगडाचे बचावकार्य युध्दपातळीवर सुरु

 आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखालीइरशाळगडाचे बचावकार्य युध्दपातळीवर सुरु

            नवी मुंबई, दि.21:- रायगड जिल्ह्यातील खालापूर जवळ दुर्गम भागात असलेल्या इरशाळगडाच्या पायथ्याशी आदिवासी पाड्यांवर दरड कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत अनेक कुटुंब मातीच्या ढिगाऱ्याखाली गाढले गेले आहेत. ही घटना घडल्याचे कळताच कोंकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी तातडीने प्रशासकीय यंत्रणांना बचाव कार्यासाठी आदेश दिले. डॉ. महेंद्र कल्याणकर हे स्वत: 19 जुलै रोजी रात्री दीड वाजता घटना स्थळी प्रत्यक्षात पोहोचले. आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, उपविभागीय अधिकारी अजित नैराळे. खालापूर तहसिलदार अयुब तांबोळी यांनी रात्री परिस्थितीचा अंदाज घेत, बचावकार्यासाठी आवश्यक साधन सामग्री, मनुष्यबळाची तयारी केली.  


            डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी तातडीने सर्व प्रशासकीय यंत्रणांना आदेश दिल्याने बचाव कार्य त्वरीत व वेगाने सुरु झाले. एनडीआरएफचे जवान घटनास्थळी पोहोचले. इरशाळवाडी पर्यंत पोहचण्याचा मार्ग सोपा नाही. निमुळता रस्ता तोही धड मातीचा नाही की धड दगडाचा नाही. डोंगरमाथ्यावरुन वेगाने येणारे पावसाचे पाणी, पायवाटेच्या खाली उतार अशा परिस्थितीत आयुक्त कल्याणकर स्वत: घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह बचाव कार्याचे नेतृत्व केले. 24 तासाहून अधिक काळ आयुक्त डॉ. कल्याणकर आणि महसूल यंत्रणेसह इतर खात्याचे अधिकारी व कर्मचारी त्याठिकाणी कार्यरत आहेत. दुर्घटनास्थळी वाहने पोहोचण्यात अडचण असल्याने मदत कार्य थांबू नये यासाठी माहिती असलेल्या स्थानिकांची व संस्थांची मदत घेतली जात आहे. यामध्ये युवा संघटना, महाराष्ट्र सह्याद्री ट्रेकर ग्रुप्स, यशवंती हॅकर्स, विविध ट्रेकर्सचा देखील सहभाग आहे.


            आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी प्रशासन आणि खासगी यंत्रणांमार्फत युध्दपातळीवर बचावकार्य सुरु आहे. एनडीआरएफच्या 4 तुकड्या एकूण 100 जवान , टीडीआरएफ चे 80 जवान, इमॅजीका कंपनीचे 82 कामगार तर सिडकोचे 460 कामगार बाचाव कार्यात सहभागी झाले आहेत. त्याचबरोबर चौक, वरोसे, खोपोली येथील ग्रामस्थ, वेगवेगळ्या एनजीओ, ट्रेकर ग्रूप मधून एकूण 900 पेक्षा अधिक लोक बचावकार्यात सहभागी झाले आहेत. रात्रीच्यावेळी बचावकार्य चालू ठेवण्यासाठी फ्लूड लाईट्स लावण्यात आले आहेत. 5000 फूड पॅकेट्सचे वाटप करण्यात आले आहे. या दूर्घटनेत वाचलेल्या लोकांच्या निवाऱ्यासाठी 60 कंटेनर मागविण्यात आले असून त्यापैकी 30 ते 40 कंटेनर आज घटनास्थळी पोहचले आहेत. त्यांच्या राहण्याची तात्पूरती व्यवस्था या कंटेनरमध्ये करण्यात आली आहे. तसेच 20 तात्पूरती शौचालये आणि 20 तात्पूरती स्नानगृहे तयार करण्यात आली आहेत. वेगवेगळ्या माध्यमांतून बचावकार्यासाठी लागणाऱ्या आधुनिक यंत्रसामग्री मागविण्यात आल्या आहेत. मात्र घटनास्थळ डोंगर माथ्यावर असल्याने या यंत्रसामग्री घटनास्थळापर्यंत नेण्यास अडचणी येत आहेत. आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर हे स्वत: संपूर्ण बचावकार्यावर लक्ष देत आहेत.


            या दरड प्रलयात इरशाळवाडीतील रहिवाशांचे जनजीवन विस्कळीत होवून पशुधनाचे व खाजगी मालमत्तांचे नुकसान झाले आहे. अशावेळी त्यांना आधार देवून आयुष्यात पुन्हा उभारी घेण्यासाठी समाजातील सामाजिक संस्था/ट्रस्ट/फाऊंडेशन्स/सीएसआर/दानशूर व्यक्ती यांच्याकडून आर्थिक मदत व साहित्याच्या स्वरुपात मदत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पुढील खाते नंबर व पत्ता उपलब्ध करुन देण्यात येत आहे.


            ज्यांना आर्थिक स्वरुपात मदत करावयाची आहे त्यांनी खात्याचे नाव :- जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधी (District Disaster Response Fund), • बँकचे नाव :- स्टेट बँक ऑफ इंडिया, मुख्य शाखा,अलिबाग (State Bank of India, Alibag), बँक खात्याचा नंबर:-38222872300, IFSC Code:-SBIN0000308या बँक खात्यामध्ये निधी जमा करावा.


ज्यांना साहित्य स्वरुपात मदत करावयाची आहे त्यांनी उपविभागीय अधिकारी, कर्जत श्री.अजित नैराळे,मो.8390090040, खालापूर तहसिलदार श्री.आयुब तांबोळी, मो.क्र.9975751076 यांच्याशी संपर्क करुन ठिकाणी मदत पोहोच करावी. लोकप्रतिनिधी, नागरिकांनी पुढे येऊन मोठ्या संख्येने मदत करावी, असे आवाहन कोकण विभागीय आयुक्‍त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे.  


0000

देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताहास उत्साहात प्रारंभ

 देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताहास उत्साहात प्रारंभ


कांदिवली पूर्व विधानसभेत रक्तदान शिबीर, आमदार अतुल भातखळकर यांचे आयोजन




मुंबई : भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा सप्ताहाला कांदिवली पूर्व विधानसभेत उत्साहात सुरुवात झाली. आमदार अतुल भातखळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हनुमाननगर येथील अटलबिहारी वाजपेयी सभागृहात रक्तदान शिबीर आयोजित करून सेवा सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. प्रारंभी आमदार भातखळकर यांच्या हस्ते लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले.


यावेळी बोलताना आमदार भातखळकर म्हणाले, सेवा आणि संघटन हे भारतीय जनता पक्षाचे वैशिष्ट्य आहे. सेवेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणे, त्यांचे प्रश्न समजावून घेऊन ते सोडवणे अशी विविध कामे आपण भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून करत असतो. आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने आयोजित सेवा सप्ताहात हे शिबीर पार पडत आहे. त्यातच देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रतिष्ठेचा लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर झाला आहे. उद्या लोकमान्य टिळक यांची जयंतीही आहे आणि हा कार्यक्रम अटलबिहारी वाजपेयी सभागृहात पार पडत आहे, हा दुग्धशर्करा योग आहे.


यावेळी आमदार भातखळकर यांच्या हस्ते रक्तदान केलेल्या रक्तदात्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. शिबिरात सहभागी झालेल्या सर्व रक्तदाते आणि आयोजकांचेही आमदार भातखळकर यांनी अभिनंदन के

ले. 


 



महिलेच्या मृत्युप्रकरणी वैद्यकीय निष्काळजीपणाबाबत चौकशी

                        महिलेच्या मृत्युप्रकरणी वैद्यकीय निष्काळजीपणाबाबत चौकशी


                                                                       -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


 


मुंबई, दि. 21 – मुंबई येथील एका खासगी धर्मादाय रुग्णालयात एका महिलेचा वेळीच उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याप्रकरणी वैद्यकीय निष्काळजीपणा झाला आहे काय, याबाबत चौकशी करण्यात येईल आणि याप्रकरणी पोलीसांनी तक्रार दाखल करुन घेण्यास नकार दिला असेल, तर त्याची निश्चितपणे चौकशी करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.


सदस्य यामिनी जाधव यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी उत्तर दिले.


ते म्हणाले की, संबंधित महिलेच्या नातेवाईकांची तक्रार भायखळा पोलीस स्टेशन येथे नोंदविण्यात आली. मात्र, त्यापूर्वी पायधुनी पोलीस ठाण्यात गेले असता तक्रार नोंदविण्यात आली नसल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. याबाबत वस्तुस्थिती तपासण्यात येईल.


तसेच संबंधित महिलेवर उपचार करताना वैद्यकीय प्रोटोकॉल पाळला गेला किंवा नाही याची चौकशी करण्यासाठी जे.जे. रुग्णालयातील तज्ज्ञांची समिती नेमली आहे. या समितीकडे हे सर्व प्रकरण पाठविले आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर यासंदर्भातील कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी 

सांगितले.  


वीज बील थकबाकी भरण्याबाबतची योजना भिवंडी क्षेत्रालालागू करण्याबाबत शासन सकारात्मक

 वीज बील थकबाकी भरण्याबाबतची योजना भिवंडी क्षेत्रालालागू करण्याबाबत शासन सकारात्मक  


                                                                       -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


मुंबई, दि. 21 - कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडीत केलेल्या वीज ग्राहकाने संपूर्ण थकबाकीपैकी मूळ थकबाकी रकमेच्या 110 टक्के रक्कम भरल्यास उर्वरीत थकबाकी माफ होऊन नवीन वीज जोडणी देण्याची तरतूद शीळ, मुंब्रा, कळवा क्षेत्रात वितरण फ्रेंचाईजी करारात करण्यात आली आहे. ही योजना भिवंडीला देखील लागू करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत याबाबतच्या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले. फ्रेंचाईजीविरूद्ध तक्रारी असतील तर त्या त्रयस्थ पद्धतीने ऐकण्यासाठी व्यवस्था उभारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. भिवंडी येथे समस्या निवारणासाठी महावितरणचे नोडल अधिकारी दर बुधवारी आणि गुरूवारी उपस्थित राहतील. मुंब्रा येथे देखील अशी व्यवस्था करण्यात येईल, असेही ते म्हणाले.


सद्यस्थितीत राज्यातील महावितरणच्या कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडीत केलेल्या ग्राहकाने थकबाकीची मूळ रक्कम एक रकमी भरल्यास थकबाकीवरील 50 टक्के व्याज महावितरणमार्फत माफ करण्याची योजना सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.


सदस्य सर्वश्री रईस शेख, अबू आजमी यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.


उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, ज्या विभागात वीज गळतीचे प्रमाण जास्त आहे, वीजबील वसुलीचे प्रमाण कमी आहे तसेच वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे, अशा व इतर सर्वसमावेशक बाबींचा विचार करून असे विभाग फ्रेंचाईजी तत्वावर खाजगी कंपनीस ठराविक कालावधीकरीता देण्याचा धोरणात्मक निर्णय महावितरणने घेतला आहे. त्यानुसार महावितरणच्या भिवंडी मंडळांतर्गतची विद्युत वितरण व देखभाल व्यवस्था 26 जानेवारी 2007 पासून टोरंट पॉवर लिमिटेडला वितरण फ्रेंचाईजी म्हणून हस्तांतरीत करण्यात आलेली आहे. त्यांनी तेथे एक हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. यानंतर वीज वितरण हानीमध्ये 41.85 टक्क्यांवरून 10.61 टक्क्यांपर्यंत घट झाली असून वसुली क्षमता 68 टक्क्यांवरून 99 टक्क्यांवर गेली असल्याने लाभ झाला आहे. तसेच पायाभूत सुविधांवरची गुंतवणूक 1016 कोटी रूपये झाली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी दिली. एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करण्याची सरकारी कंपनीची क्षमता मर्यादित असते. फ्रेंचाईजी दिल्यामुळे गुंतवणूक तर होतेच त्याचबरोबर पायाभूत सुविधा तयार होते असेही त्यांनी सांगितले.


श्री.फडणवीस म्हणाले, भिवंडीचा भाग पॉवरलूम आणि उद्योगांचा भाग आहे. येथे मोठ्या प्रमाणात सबसिडी दिली जाते. 20 किलोवॅट किंवा 27 एचपी पेक्षा कमी युनिट असणाऱ्यांना 3.77 रूपयांची तर त्यापेक्षा जास्त युनिट असणाऱ्यांना 3.40 रूपयांची सबसिडी दिली जाते. वसुली टोरेंट मार्फत होत असली तरी सबसिडी राज्य शासनामार्फत दिली जाते. वीज दरांबाबत राज्य सरकारकडे अधिकार राहिलेला नसून सर्व बाबी तपासून एमईआरसी याबाबतचा निर्णय घेत असल्याची माहिती श्री.फडणवीस यांनी यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान दिली.


मुंब्रा क्षेत्रात एमईआरसीने निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक बिल येत आहे का, मीटरसोबत छेडछाड झाली आहे का हे तपासून पाहू. यासाठी टेस्ट केस म्हणून 15-20 बिलांची तपासणी करून असे आढळल्यास त्यावर कारवाई करू, असेही श्री.फडणवीस यांनी स्पष्ट केले. याबाबत जास्तीत जास्त सामंजस्याने मार्ग काढण्याबाबत टोरंटला सांगण्यात येईल, असेही त्यां

नी सांगितले.


World most amazing,motiveionsl song तर ऐकाच

 गरजा विचारात घेऊन वैशिष्ट्यपूर्ण अत्याधुनिक सुविधा केलेल्या जगातील वेगवेगळ्या आश्चर्यकारक वहानांचे आविष्कार या एकाच क्लिपमधून पहाण्याचा आनंद उचला...!


काळा पैसा कमवण्याचे मार्ग बंद झाले पाहिजेत...

 *काळा पैसा कमवण्याचे मार्ग बंद झाले पाहिजेत...

 मी डॉक्टर आहे, म्हणूनच

 मी सर्व प्रामाणिक डॉक्टरांची माफी मागतो.

हृदयविकाराचा झटका आला

डॉक्टर म्हणतात - स्ट्रेप्टोकिनेज इंजेक्शन द्या... 9,000/= रु. इंजेक्शनची खरी किंमत रु. ७००/ ते ९००/= रु., तर MRP रु. ९,०००/=! तू काय करशील 

हृदयात ब्लॉकेज झाले स्टेंट टाकायचा द्या 150000,,200000,,,,

स्टेंट ची खरी किंमत 24000,,

29000, 35000 ,,,,,


तु काय करशील??

टायफॉइड झाला डॉक्टरांनी लिहिले. एकूण 14 मोनोसेफ घ्या! घाऊक किंमत रु. 25/= हॉस्पिटल केमिस्ट रु. 53/= देतात. तुम्ही काय करता??

    • ............,,,, किडनी निकामी होणे .तीन दिवसातून एकदा डायलिसिस केले जाते.. डायलिसिस केले जाते आणि इंजेक्शन दिले जाते. MRP 1800 रु.

 तुला वाटेल मी ते घाऊक बाजारातून उचलेन...! भारतभर शोधतोय पण कुठेच सापडत नाही... का?

कंपनी फक्त डॉक्टरांना पुरवते!!

इंजेक्शनची मूळ किंमत 500/= आहे, परंतु त्याच्या हॉस्पिटलमधील डॉक्टरांची MRP 1,800/= आहे.

तुम्ही काय करता??

संसर्ग झाला आहे. डॉक्टरांनी लिहून दिलेले प्रतिजैविक रु. ५४०/=

150/= त्याच इतर कंपनीकडून आणि जेनेरिक रु 45/=

पण केमिस्टने नकार दिला. आम्ही कोणतेही जेनेरिक देत नाही.., फक्त डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन... म्हणजे 540/ = तुम्ही काय कराल...??

बाजारात अल्ट्रासाऊंड चाचणीसाठी रु. ७५०/=, ट्रस्ट फार्मसी रु. 240/= रु.750 डॉक्टरांच्या कमिशन पैकी 300/= रु.....!

MRI वर डॉक्टरांचे कमिशन रु. 2,000/= ते 3,000/=

 डॉक्टर आणि रुग्णालयांची ही लूट, बेधडक, बेधडक, बेधडक भारत देशात सुरू आहे...!

 औषध कंपन्यांची लॉबी इतकी मजबूत आहे की त्यांनी थेट देशाला ओलीस ठेवले आहे....!

डॉक्टर आणि औषध कंपन्यांचा सहभाग! दोघेही सरकारला ब्लॅकमेल करत आहेत...!!

मोठा प्रश्न...

माध्यमे दिवसरात्र काय दाखवतात?

खड्ड्यात पडलेला राजकुमार, ड्रायव्हर नसलेली गाडी, रॉकी सावंत, बिग बॉस, सासू, क्राईम रिपोर्ट, क्रिकेटरची मैत्रीण हे सगळं दाखवा...

पण डॉक्टर कंपन्या, हॉस्पिटल आणि औषध कंपन्या त्याचा स्पष्ट दरोडा का दाखवत नाहीत?

समाजाच्या मदतीला मीडियाच येत नसेल तर कोण करणार?

मेडिकल लॉबीची क्रूरता कशी थांबवायची?

 ही लॉबी सरकारला खाली आणत आहे का?

मीडिया गप्प का?

20 रुपये जास्त मागितल्यास ऑटोरिक्षा चालकाला फटका... तुम्ही डॉक्टरसाठी काय करता???


जर तुम्हाला हे खरे वाटत असेल तर सर्वांपर्यंत पाठवा! जागरूकता आणा आणि जनजागृतीसाठी तुमचा पाठिंबा द्या....

   


    पाच जणांना पाठवलं तर ते पाच लोक पुढच्या पाच जणांना नक्की पाठवतील! प्रत्येकाने असे पाठवले तर राष्ट्र ते पाहील आणि संघटित होईल.


    https://www.facebook.com/DrPardeep-Aggarwal-381141815344043/


    मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो

    किमान पाच गटांसाठी

    पाठवा .

मच्छर, माशा,चिलट,झुरळ यांचा त्रास होतोय. मग हे करून पहा.*

 *मच्छर, माशा,चिलट,झुरळ यांचा त्रास होतोय. मग हे करून पहा.*



*कडूलिंबाच चुर्ण शंभर ग्रॅम, तमालपत्र शंभरग्रॅम, कांद्याची साले साधारण पाव किलो, पन्नास ग्रॅम भिमसेनकापूर एकत्र करून मिक्सरमध्ये फिरवून घ्या चुर्ण करा रात्री हा धुप दिवे लावतात तेव्हा घरात फिरवा या मुळे रात्री मच्छर किडे माशाचा त्रास कमी होईल तसेच श्वसनाचे आजार ही कमी होतील.

* लसूण कांदा व काळी मिरी समप्रमाणात घेऊन पेस्ट बनवा ही पेस्ट पाण्यात मिक्स करून घरात फवारा जिथे जिथे झुरळ आहेत तिथे ती गायब होतील


*लिंब अर्धा किलो मिक्सरमध्ये कापून साला सगट फिरवून घ्या त्यात नेपथीलीन बाँलचे(डांबर गोळी) साधारण मध्यम आकाराचे पाकीट पावडर करून मिक्स करा मग हे लिक्विड गाळून चांगले पिळून रस काढून घ्या ते घरात सगळीकडे पोछा ने पुसून घ्या किंवा स्प्रे करून घरात उडवा माशांचा त्रास कमी होईल, चिलट, किडे, पिसवा कमी चावतील.



Featured post

Lakshvedhi