*मच्छर, माशा,चिलट,झुरळ यांचा त्रास होतोय. मग हे करून पहा.*
*कडूलिंबाच चुर्ण शंभर ग्रॅम, तमालपत्र शंभरग्रॅम, कांद्याची साले साधारण पाव किलो, पन्नास ग्रॅम भिमसेनकापूर एकत्र करून मिक्सरमध्ये फिरवून घ्या चुर्ण करा रात्री हा धुप दिवे लावतात तेव्हा घरात फिरवा या मुळे रात्री मच्छर किडे माशाचा त्रास कमी होईल तसेच श्वसनाचे आजार ही कमी होतील.
* लसूण कांदा व काळी मिरी समप्रमाणात घेऊन पेस्ट बनवा ही पेस्ट पाण्यात मिक्स करून घरात फवारा जिथे जिथे झुरळ आहेत तिथे ती गायब होतील
*लिंब अर्धा किलो मिक्सरमध्ये कापून साला सगट फिरवून घ्या त्यात नेपथीलीन बाँलचे(डांबर गोळी) साधारण मध्यम आकाराचे पाकीट पावडर करून मिक्स करा मग हे लिक्विड गाळून चांगले पिळून रस काढून घ्या ते घरात सगळीकडे पोछा ने पुसून घ्या किंवा स्प्रे करून घरात उडवा माशांचा त्रास कमी होईल, चिलट, किडे, पिसवा कमी चावतील.
No comments:
Post a Comment