Sunday, 16 July 2023

वजन कमी करण्यासाठी डाएट चार्ट*

 *वजन कमी करण्यासाठी डाएट चार्ट*


वजन कमी करण्या साठी आदर्श डाएट चार्ट :

1) रोज पहाटे उठावे

उठल्यावर 1ग्लास कोमट लिम्बु पानी त्यात थोडा मध टाकावा 

शेन्देलोण मीठ 1चमचा असे प्यावे

नंतरथोडा व्यायाम करावा 

इनडोअर व्यायाम केला तरि चालेल 

त्रिकोणासन कटीमन्थन तसेच काही warm-up व्यायाम असावा


2) जेवण साधे असावे 

मैदा साखर शेंगदाणे,साबूदाना, वांग, सीमलामिर्ची जास्त तेल ,दुधची साय ,fast food बेसन मसालेदारपदार्थ,बेकरीपदार्थ मिठाई सम्पुर्ण बंद करावी  


नाश्ता - यातील कहितरी एक

        दलिया चे उपिट (गहु चा दलिया बाजारात सहज उपलब्धआहे )

           1 फळ खावे

          मटकी किव्वा मुग चे मोड़ 1वाटि


        3)   

दुपारचे जेवण

चपाती1 किंवा 2 फुलके नुसार

2 वाटि ओलि भाजी पालेभाजी

1 वाटि कोर्डी भाजी 

तिखट चव हवी असेल तर मिर्ची चा थेचा चालेल 

भाजी कमी तेलात मसाला न वापरता करावी

जेवणात पालेभाजी जास्त प्यावी ,चपातीभाकरी जास्त

खाऊ नये .  

       4)


4 वाजता गुळ टाकून चहा घ्यावा (चहा बंद करावा पण सवय असेल तर गुळ टाकून प्यावा )


   5) रात्री जेवणात दुपार प्रमाणेच पदार्थ समाविष्ट करावेत फक्त रात्री थोडे कमी जेवावे


6) गाईचे तुप रोज एक चमचा प्रत्येकाने खावे .

* वड़ापाव पावभाजी बाहेर तळलेले. पदार्थ खाऊ नये 

* आपण जितके खातो त्या तुलनेत व्यायाम जास्त करावा नाहीतर वजन वाढत जाईल.



तेल खावे की तूप ?* 📙 ********

 📙 *तेल खावे की तूप ?* 📙

**************************

कोणाला तेल आवडते, तर कोणाला तूप; स्वयंपाकात तेल व तुप नसेल तर तो किती बेचव लागेल. पण पोषणाच्या दृष्टीने विचार केला तर तेल व तूप हे दोन स्निग्ध पदार्थाचेच प्रकार आहेत. सर्वसामान्य वातावरणात, तापमानात द्रवस्थितीत असणाऱ्या स्निग्ध पदार्थाला तेल; तर घनस्थितीत असणाऱ्या स्निग्ध पदार्थाला तूप असे म्हणतात. स्निग्ध पदार्थ शरीराला ऊर्जा पुरविण्याचे कार्य करतात. शरीरातील हृदय, मूत्रपिंडासारख्या अवयवांचे हादर्‍यांपासुन रक्षण करण्याचे कार्यही मेदाच्या आवरणामुळे होते. १ ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून ९ किलोकॅलरी इतकी ऊर्जा मिळते.

तेल व तूप या दोन मध्ये मूलभूत घटक म्हणजे मेदाम्ले (fat acid). तेलात असंपृक्त (Unsaturated) मेदाम्ले मोठ्या प्रमाणावर असतात. करडईच्या तेलात ७३ टक्के तर शेंगदाण्याच्या तेलात ३८ टक्के इतकी असंपृक्त मेदाम्ले असतात. याउलट वनस्पती वा गाईच्या तुपात असंपृक्त मेदाम्ले ५ टक्क्यांहूनही कमी असतात.

तेल व तूप खूप जास्त प्रमाणात खाल्ले, तर लठ्ठपणाचा त्रास होईल. जेवणात ४० टक्क्यांहून अधिक ऊर्जा स्निग्ध पदार्थापासून मिळत असेल तर कालांतराने हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. काही संशोधनात असे सिद्ध झाले आहे की जास्त स्निग्ध पदार्थ खाणाऱ्या लोकांमध्ये मोठ्या आतड्याचा व स्तनाचा कर्करोग होण्याचे प्रमाण जास्त आहे. संपृक्त मेदाम्ले असलेल्या स्निग्ध पदार्थांमुळे (तेलांमुळे) हृदयविकारांची शक्यता कमी होते. तसेच फ्रेनोडर्मा नावाचा त्वचारोगही होत नाही. त्यामुळे आहारात तुपापेक्षा तेलच चांगले. आपल्याला लागणाऱ्या एकूण ऊर्जेच्या २० ते २५ टक्के ऊर्जा स्निग्ध पदार्थापासून मिळवायला काहीच हरकत नाही. मात्र त्यासाठी शक्यतो तेलच खावे. त्यातही करडई, सूर्यफूल वा सोयाबीनचे तेल चांगले. "खाईन तर तुपाशी. . ." असे म्हणण्याऐवजी "खाईन तर तेलाशी. . ." असे म्हणायला पाहिजे !

तीळ, मोहरी व शेंगदाणा तेल समप्रमाणात एकत्र करून ते वापरावे. हृदयरोग्यांसाठी ते हितकर आहे.


*डाॅ. अंजली दिक्षित व डाॅ. जगन्नाथ दिक्षित*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


_*(

वजन कमी करण्यासाठी डाएट चार्ट*

 *वजन कमी करण्यासाठी डाएट चार्ट*


वजन कमी करण्या साठी आदर्श डाएट चार्ट :

1) रोज पहाटे उठावे

उठल्यावर 1ग्लास कोमट लिम्बु पानी त्यात थोडा मध टाकावा 

शेन्देलोण मीठ 1चमचा असे प्यावे

नंतरथोडा व्यायाम करावा 

इनडोअर व्यायाम केला तरि चालेल 

त्रिकोणासन कटीमन्थन तसेच काही warm-up व्यायाम असावा


2) जेवण साधे असावे 

मैदा साखर शेंगदाणे,साबूदाना, वांग, सीमलामिर्ची जास्त तेल ,दुधची साय ,fast food बेसन मसालेदारपदार्थ,बेकरीपदार्थ मिठाई सम्पुर्ण बंद करावी  


नाश्ता - यातील कहितरी एक

        दलिया चे उपिट (गहु चा दलिया बाजारात सहज उपलब्धआहे )

           1 फळ खावे

          मटकी किव्वा मुग चे मोड़ 1वाटि


        3)   

दुपारचे जेवण

चपाती1 किंवा 2 फुलके नुसार

2 वाटि ओलि भाजी पालेभाजी

1 वाटि कोर्डी भाजी 

तिखट चव हवी असेल तर मिर्ची चा थेचा चालेल 

भाजी कमी तेलात मसाला न वापरता करावी

जेवणात पालेभाजी जास्त प्यावी ,चपातीभाकरी जास्त

खाऊ नये .  

       4)


4 वाजता गुळ टाकून चहा घ्यावा (चहा बंद करावा पण सवय असेल तर गुळ टाकून प्यावा )


   5) रात्री जेवणात दुपार प्रमाणेच पदार्थ समाविष्ट करावेत फक्त रात्री थोडे कमी जेवावे


6) गाईचे तुप रोज एक चमचा प्रत्येकाने खावे .

* वड़ापाव पावभाजी बाहेर तळलेले. पदार्थ खाऊ नये 

* आपण जितके खातो त्या तुलनेत व्यायाम जास्त करावा नाहीतर वजन वाढत जाईल.


कृषि विभागातील 'मागेल त्याला योजनां'मध्ये अर्ज केलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला लाभ द्यावा

 कृषि विभागातील 'मागेल त्याला योजनां'मध्ये अर्ज केलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला लाभ द्यावा

- कृषी मंत्री धनंजय मुंडे

            मुंबई, दि. 15: महाडीबीच्या माध्यमातून सर्व 'मागेल त्याला' अशा स्वरूपातील योजनांमध्ये लॉटरी पद्धत बंद झाली पाहिजे. अर्ज केलेल्या पात्र शेतकऱ्याला लाभ मिळाला पाहिजे. त्याचवेळी शासनाचा 'मागेल त्याला' लाभ देण्याचा उद्देश यशस्वी होईल. मागेल त्याला शेततळे, मागेल त्याला ठिबक सिंचन संच अशा योजनांचा अर्ज केलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला लाभ देण्यात यावा. त्यासाठी अर्ज प्रक्रिया कमी कालावधीची व सोपी करावी, अशी सूचना कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज दिली. 


            कृषी मंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर श्री. मुंडे यांनी मंत्रालयात कृषी विभागाची आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये आढावा घेताना ते बोलत होते. बैठकीला प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, सहसचिव सरिता बांदेकर आदींसह कृषी विभागाचे संचालक उपस्थित होते. 


            कृषी पीक विमा योजनेत शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त सहभाग वाढविण्याच्या सूचना देत मंत्री श्री. मुंडे म्हणाले, की एक रुपया भरून शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभागी होता येणार आहे. शेतकऱ्याचा विमा हप्ता राज्य शासन भरणार आहे. त्यासाठी अंतिम मुदतीची प्रतीक्षा करू नये, शेतकऱ्यांनी सध्याची परिस्थिती बघता जास्तीत जास्त संख्येने अर्ज करावे. शेतकरी संख्या वाढविण्यासाठी विभागाने युद्ध पातळीवर प्रयत्न करणे गरजेचे आहे. जनजागृतीची मोहीम राबवून शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभागी करून घ्यावे. 


     मंत्री श्री. मुंडे पुढे म्हणाले, की राज्यातील पर्जन्यमानाचे परिस्थिती बघता काही भागात दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता आहे. विभागाने तालुकानिहाय दुबार पेरणीचा अहवाल तयार ठेवावा. तसेच पीक पेरणीची माहितीही तालुकानिहाय द्यावी. दुबार पेरणीच्या संकटासाठी विभागाने सज्ज असावे. राज्याच्या उत्पन्नात कृषीचा वाटा वाढून दरडोई उत्पन्न वाढले पाहिजे. त्यासाठी दीर्घकालीन उपाय योजना करण्याचा मनोदय कृषीमंत्र्यांनी व्यक्त केला.  


            नमो शेतकरी महा सन्मान योजना राज्य शासन सहा हजार रुपये देणार आहे. केंद्र व राज्याचे १२ हजार रुपये शेतकऱ्यांना प्रतिवर्षी मिळणार आहेत. यामध्ये राज्याच्या हिस्स्याचे खरीप हंगामापूर्वी तीन व रब्बी हंगामापूर्वी तीन हजार रुपये अशा दोन टप्प्यात देण्यासाठी प्रस्ताव तयार करावा. विभागाअंतर्गत १३ योजना १०० टक्के केंद्र पुरस्कृत राबविल्या जातात. केंद्र पुरस्कृत योजनांमधील लाभार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करावे. जेणेकरून केंद्र शासनाचा अधिकाधिक निधी राज्याला प्राप्त होवून शेतकऱ्यांना लाभ देता येणे शक्य होईल.


            बैठकीत पीक पेरणी व पर्जन्यमानावर चर्चा करण्यात आली. ऑगस्ट महिन्यातील पर्जन्यमानाचा आढावा घेण्यात आला. तसेच सद्य परिस्थितीत शेती पुढील आव्हाने, व भविष्यात शेतीसाठी राबवायचे उपक्रम याविषयी विस्तृत चर्चा करण्यात आली


०००००


महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनांसाठी विशेष शिबिरे आयोजित करावी

 महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनांसाठी विशेष शिबिरे आयोजित करावी    


                                       -राष्ट्रीय सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष एम वेंकटेशन  


            मुंबई, दि.15 : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या माध्यमातून सफाई कामगारांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी व्यापक स्तरावर प्रचार प्रसिद्धी करण्यात यावी. तसेच योजनांचा लाभ देण्यासाठी विशेष शिबिरे आयोजित करावीत, असे निर्देश राष्ट्रीय सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष एम वेंकटेशन यांनी दिले आहेत. राज्यात सामाजिक न्याय विभागाने सफाई कामगारांना प्लास्टिक क्रेडिट चा लाभ मिळण्यासाठी हिंदुस्तान ऍग्रो या कंपनीच्यावतीने अभिनव संकल्पना राबविण्याचे निश्चित केले आहे.


            राज्यातील सफाई कामगार यांचे विविध प्रश्न व अडचणींबाबत राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष एम. वेंकटेशन व सदस्य पी.पी.वावा यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी निर्देश दिले.


            राज्य शासनाच्या विविध विभागाच्या वतीने सफाई कामगार यांच्यासाठी राबविण्यात येणाऱ्या स्वयंरोजगाराच्या योजना, अनुकंपावरील वारसांना नोकरी देणे, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या महाप्रित कंपनीच्या योजना, 'नमस्ते' मोहिम, त्याचबरोबर हाताने मैला उचलणाऱ्या कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध करणे व पुनर्वसन करणे या अधिनियमानुसार कामगारांना आधुनिक यंत्रसामग्री, साधनसामग्री पुरवणे याबाबत आढावा घेण्यात आला.


            तज्ञांच्या सल्ल्याने प्लास्टिक क्रेडिटचे फायदे हे सफाई कर्मचारी यांच्यापर्यंत पोहचविण्याबाबत चर्चा झाली. प्लास्टिक क्रेडिट, कार्बन क्रेडिट आणि इतर प्रकारचे क्रेडिट अशा संकल्पना आहेत, ज्यामुळे प्लास्टिक कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याबरोबरच पर्यावरणालाही फायदा होणार आहे. सफाई कामगारांनी जमा केलेल्या या प्लास्टिक कचऱ्याच्या मोबदल्यातून आर्थिक उत्पन देखील मिळणार आहे. या योजनेचे सादरीकरण हिंदुस्तान ऍग्रो चे डॉ. भरत ढोकणे-पाटील यांनी यावेळी केले.


            याप्रसंगी बृहन्मुंबई मनपा चे आयुक्त आय एस चहल, बेस्ट चे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी मुंबईत सफाई कामगारांकरिता करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती आयोगास दिली. राज्यात आज अखेर हाताने मैला साफ करणाऱ्या व दुर्दैवाने मृत्यू झालेल्या 73 कामगारांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची नुकसान भरपाई वारसांना राज्य शासनाच्यावतीने देण्यात आल्याची माहिती यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी दिली.


            महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाकडून यावेळी विविध योजनांचे सादरीकरण करण्यात आले.


            बैठकीस राज्य शासनाच्या महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बिपिन श्रीमाळी, सामाजिक न्याय विभागाचे सह सचिव दिनेश डिंगळे, सह सचिव सो.ना.बागुल, उपसचिव रवींद्र गोरवे, हिंदुस्तान ऍग्रो चे कन्सल्टंट गौरव सोमवंशी, अनिल चोप्रा, समाज कल्याण मुंबई विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे, सहाय्यक आयुक्त प्रसाद खैरनार, लंडनच्या 'सिर्क्युलॅरिटी इनोव्हेशन हब'चे संचालक जोएल मायकल, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे अधिकारी, समाज कल्याण विभागाचे अधिकारी, राज्यातील सफाई कामगारांसाठी काम करणाऱ्या विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


                                                                       ००००           

मुलींसाठी सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्था देशासाठी आदर्शवत ठरेल

 मुलींसाठी सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्था देशासाठी आदर्शवत ठरेल


                                           :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


दर्जेदार शिक्षणातून ध्येयपूर्ती साध्य होते


                                       : उपमुख्यमंत्री अजित पवार

नाशिक, दि. 15 जुलै (जिमाका वृत्तसेवा): राज्य शासनाने मुलींसाठी सुरू केलेली सैनिक सेवापूर्व प्रशिक्षण संस्था ही देशासाठी आदर्शवत ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज व्यक्त केला. येथील सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्थेच्या उदघाटन प्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.


            व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ. ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, उद्योगमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार नरेंद्र दराडे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्ट. कमांडर ओंकार कापले, अर्जून पुरस्कार प्राप्त खेळाडू कविता राऊत, संस्थेच्या संचालिका मेजर (निवृत्त) सईदा फिरासत आदि मान्यवर उपस्थित होते.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, महाराष्ट्रात मुलींसाठी अशा प्रकारची संस्था सुरू होणे ही गौरवास्पद बाब आहे. पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या प्रयत्नातून व पाठपुराव्यातून आज ही सैनिकी प्रशिक्षण संस्था उभी राहिली आहे. या संस्थेच्या माध्यमातून मुली देशसेवेसाठी सैन्यात दाखल होऊन त्यांना अधिकारी पदापर्यंत पोहचण्याची संधी प्राप्त होणार आहे. या मुलींना दर्जेदार सैनिकी प्रशिक्षण अनुषंगिक सेवासुविधा प्राप्त होण्यासाठी शासनाकडून निधीची कमतरता भासणार नाही. या संस्थेच्या मागे शासन खंबीरपणे उभे राहील, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सैनिकी शाळेच्या विद्यार्थिनींशी संवाद साधला.


दर्जेदार शिक्षणातून ध्येयपूर्ती साध्य होते


                                                               : उपमुख्यमंत्री अजित पवार


            उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, दर्जेदार शिक्षणातून आपली ध्येयपूर्ती सिद्ध करण्यासाठी या संस्थेतून नक्कीच वाव मिळेल यात शंका नाही. आज मुली कोणत्याही क्षेत्रात मागे नाही. देशभक्तीची भावना मनात ठेवून मुलींनी या संस्थेत प्रवेश घेतला आहे, ही बाब सर्वांसाठी अभिमानास्पद आहे. महाराष्ट्राला स्त्रीशक्तीचा वारसा लाभला आहे. हाच वारसा या मुली पुढे घेऊन जातील. कोणत्याही क्षेत्रात शैक्षणिक गुणवत्ता असेल तर यशप्राप्ती नक्कीच होते. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून संस्थेला सर्वतोपरी मदत उपलब्ध करून दिली जाईल, असे श्री. पवार यांनी यावेळी सांगितले.


            सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादाजी भुसे म्हणाले, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये मुलींना प्रवेश देण्यासाठी नाशिक येथे देशातील पहिले मुलींचे सैनिकपूर्व प्रशिक्षण सुरू झाले. ही राज्यासाठी अभिमानाची बाब आहे.


            कार्यक्रमाचे प्रस्ताविकात संस्थेच्या संचालिका मेजर (निवृत्त) सईदा फिरासत म्हणाल्या, मुलींच्या सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्थेत प्रवेशासाठी महाराष्ट्रातून 4 हजार अर्ज प्राप्त झाले होते. त्यातून लेखी परीक्षेतून 150 मुलींच्या मुलाखतीतून अंतिम 30 मुलींची निवड झाली आहे. त्या मुली आज या संस्थेत प्रशिक्षण घेत आहेत. कार्यक्रमाला माजी सैनिक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लर्निंग 2.0 या अभिनव उपक्रमाचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते उदघाटन

 लर्निंग 2.0 या अभिनव उपक्रमाचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते उदघाटन

            मुंबई दि.15 - बृहन्मुंबई महानगरपालिका आणि प्रोजेक्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने व महाराष्ट्र शासनाच्या सहयोगाने रिड मुंबई, ग्रीन स्कुल-टेरेस फार्मिंग, विद्यार्थ्यांचे डिजिटल /रोबोटीक स्किलिंग,द स्मायलिंग स्कुल प्रोजेक्ट, समावेशक शिक्षण व बीएमसी डॅशबोर्डचा समावेश असलेल्या लर्निंग 2.0 या अभिनव उपक्रमाचे उदघाटन शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले.  

            वुलन मिल, मनपा एमपीएस शाळा, दादर येथे शनिवारी झाला.

            बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त श्रीमती आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली बृहन्मुंबई महानगरपालिकेचा शिक्षण विभाग विविध उपक्रम हाती घेत आहे. त्याचाच एक भाग म्हणून रिड मुंबई, ग्रीन स्कुल-टेरेस फार्मिंग, विद्यार्थ्यांचे डिजिटल /रोबोटीक स्किलिंग,द स्मायलिंग स्कुल प्रोजेक्ट, समावेशक शिक्षण व बीएमसी डॅशबोर्डचा समावेश असलेल्या लर्निंग 2.0 असे अभिनव उपक्रम सध्या राबविले जात आहे.

            यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सह आयुक्त (शिक्षण) अजित कुंभार, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजू तडवी, प्रोजेक्ट मुंबईचे संस्थापक सदस्य व संचालक श्री शिशिर जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. 

            इमारतीच्या टेरेसवर बनविलेले किचन गार्डन प्रकल्प, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम लॅब, रिड मुंबई लायब्ररी यांचे उदघाटन मंत्री श्री. केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले.




            सह आयुक्त (शिक्षण ) श्री. कुंभार व प्रोजेक्ट मुंबईचे शिशिर जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी श्री. कंकाळ यांनी केले. या सर्व अभिनव प्रोजेक्टच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेणाऱ्या संस्था व व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्या

त आला.




 






---


Featured post

Lakshvedhi