Sunday, 16 July 2023

तेल खावे की तूप ?* 📙 ********

 📙 *तेल खावे की तूप ?* 📙

**************************

कोणाला तेल आवडते, तर कोणाला तूप; स्वयंपाकात तेल व तुप नसेल तर तो किती बेचव लागेल. पण पोषणाच्या दृष्टीने विचार केला तर तेल व तूप हे दोन स्निग्ध पदार्थाचेच प्रकार आहेत. सर्वसामान्य वातावरणात, तापमानात द्रवस्थितीत असणाऱ्या स्निग्ध पदार्थाला तेल; तर घनस्थितीत असणाऱ्या स्निग्ध पदार्थाला तूप असे म्हणतात. स्निग्ध पदार्थ शरीराला ऊर्जा पुरविण्याचे कार्य करतात. शरीरातील हृदय, मूत्रपिंडासारख्या अवयवांचे हादर्‍यांपासुन रक्षण करण्याचे कार्यही मेदाच्या आवरणामुळे होते. १ ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून ९ किलोकॅलरी इतकी ऊर्जा मिळते.

तेल व तूप या दोन मध्ये मूलभूत घटक म्हणजे मेदाम्ले (fat acid). तेलात असंपृक्त (Unsaturated) मेदाम्ले मोठ्या प्रमाणावर असतात. करडईच्या तेलात ७३ टक्के तर शेंगदाण्याच्या तेलात ३८ टक्के इतकी असंपृक्त मेदाम्ले असतात. याउलट वनस्पती वा गाईच्या तुपात असंपृक्त मेदाम्ले ५ टक्क्यांहूनही कमी असतात.

तेल व तूप खूप जास्त प्रमाणात खाल्ले, तर लठ्ठपणाचा त्रास होईल. जेवणात ४० टक्क्यांहून अधिक ऊर्जा स्निग्ध पदार्थापासून मिळत असेल तर कालांतराने हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. काही संशोधनात असे सिद्ध झाले आहे की जास्त स्निग्ध पदार्थ खाणाऱ्या लोकांमध्ये मोठ्या आतड्याचा व स्तनाचा कर्करोग होण्याचे प्रमाण जास्त आहे. संपृक्त मेदाम्ले असलेल्या स्निग्ध पदार्थांमुळे (तेलांमुळे) हृदयविकारांची शक्यता कमी होते. तसेच फ्रेनोडर्मा नावाचा त्वचारोगही होत नाही. त्यामुळे आहारात तुपापेक्षा तेलच चांगले. आपल्याला लागणाऱ्या एकूण ऊर्जेच्या २० ते २५ टक्के ऊर्जा स्निग्ध पदार्थापासून मिळवायला काहीच हरकत नाही. मात्र त्यासाठी शक्यतो तेलच खावे. त्यातही करडई, सूर्यफूल वा सोयाबीनचे तेल चांगले. "खाईन तर तुपाशी. . ." असे म्हणण्याऐवजी "खाईन तर तेलाशी. . ." असे म्हणायला पाहिजे !

तीळ, मोहरी व शेंगदाणा तेल समप्रमाणात एकत्र करून ते वापरावे. हृदयरोग्यांसाठी ते हितकर आहे.


*डाॅ. अंजली दिक्षित व डाॅ. जगन्नाथ दिक्षित*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


_*(

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi