Tuesday, 11 July 2023

कच्ची पपयी.*

 *कच्ची पपयी.*



काही आवश्यक माहिती. शरीरातील वाढतं युरिक अ‍ॅसिड कमी करण्यासाठी कोणत्याही औषधापेक्षा कच्ची पपई हा रामबाण उपाय ठरतो. हा नैसर्गिक उपाय असल्याने कच्ची पपई खाल्ल्याने कुठलेच साईड इफेक्ट्स होत नाहीत.शरीरात युरिक अ‍ॅसिड वाढल्याने विविध आजारांना आणि दुखण्यांना सामोरं जावं लागतं. संधिवात म्हणजेच अर्थरायटिस सारखं गंभीर दुखणं कोणत्याही वयात होऊ शकतं. यासाठीच युरिक अ‍ॅसिड आणि इतर अ‍ॅसिडयुक्त पदार्थांचं शरीरातील वाढणारं प्रमाण नियंत्रणात राखणं गरजेचं आहे. संधिवात हा आजार बहुतांशपणे ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत दिसून येणारा आजार आहे. या आजाराची लागण होऊ नये यासाठी आहारात कच्च्या पपईचा वापर अनिवार्य ठरतो. संधिवात झालेल्या व्यक्तींना उठणं, बसणं, फिरणं या साध्या हालचाली करताना अत्यंतिक वेदना होतात.शरीसाठी आवश्यक अँटिऑक्सिडंटचं आणि खनिजांचं, जीवनसत्त्वांचं प्रमाण कच्च्या पपईत भरपूर प्रमाणात आढळून येतं. कच्च्या पपईत कॅलरीजचं प्रमाणही अतिशय कमी असतं तर व्हिटॅमिन सी, फोलेट अर्थात व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन ई यांचं प्रमाण मुबलक असतं. या तीन व्हिटॅमिन्समुळे शरीरातील युरिक अ‍ॅसिड नियंत्रणात राहतं, पर्यायाने संधिवाताच्या पेशंट्सच्या तब्येतीला आराम पडतो.शरीरातील युरिक अ‍ॅसिड नियंत्रणात राहण्यासाठी दररोज सकाळी कच्च्या पपईचा ज्युस घेणं गुणकारी आहे. या ज्युसमध्ये लिंबू किंवा मध घालून सेवन केल्यास तो शरीराला विपुल प्रमाणात आवश्यक ते पोषक घटक देतो. हा ज्युस सकाळी उठल्यावर अनुशापोटी घेतल्यास निश्चितच खूप फायदा होतो. इतकंच नाही तर वजन घटवण्यासाठी ही कच्ची पपई वरदानच ठरते. यासोबतच दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात कच्च्या पपईच्या भाजीचा नियमितपणे समावेश केल्यास तब्येतीसाठी गुणकारी ठरतं. फक्त कच्च्या पपईच्या भाजीला थोडीशी मेथी आणि हिंग यांची फोडणी देऊन हळद आणि मीठ घालून शिजवून घ्यावी. म्हणूनच शरीरात युरिक अ‍ॅसिडचं प्रमाण वाढल्यास अँन्टिबायोटिक् घेण्याऐवजी नैसर्गिक अशा कच्च्या पपयांचा आहारातला समावेश विविध आजारांना रोखतोच, पण तब्येतही तंदुरूस्त ठेवतो.        प्रमोद पाठक.




नेदरलँडचे कार्यकारी महावाणिज्यदूत चिअरी हेल्डन यांची उप सभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या समवेत सदिच्छा भेट

 नेदरलँडचे कार्यकारी महावाणिज्यदूत चिअरी हेल्डन यांची




प सभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या समवेत सदिच्छा भेट

मुंबई ११: भारत आणि नेदरलॅंड देशांमध्ये मैत्रिसंबंध दृढ असून आगामी काळात कृषी, फलोत्पादन, पशुसंवर्धन, मेरीटाईम, जलव्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन इत्यादी क्षेत्रात आणखी सहकार्य, तंत्रज्ञान विषयक आदान-प्रदान व्हावे यादृष्टीने विपुल संधी उपलब्ध आहेत, असे मत विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि नेदरलँडचे मुंबईतील कार्यकारी महावाणिज्यदूत चिअरी हेल्डन यांनी व्यक्त केले.


श्री. हेल्डन यांनी आज विधानभवनातील उप सभापती यांच्या दालनात त्यांची सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी श्री. हेल्डन यांच्यासमवेत नेदरलँड उच्चायुक्तालयातील वरिष्ठ अधिकारी सौरभ सांगळे हे देखील उपस्थित होते.


युरोपीय देशांमधील संसद, संसदीय समित्या, महिलांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, महिला संरक्षण विषयक कायदे, ज्येष्ठांसाठीचे कायदे, बाल आणि महिलांची तस्करी रोखण्यासाठीच्या उपाययोजना इत्यादी संदर्भात दोन्ही देशांच्या लोकप्रतिनिधींसाठी चर्चा-अभ्यासभेटींचे आयोजन करण्यात येणार आहे. नेदरलँडमध्येदेखील अभ्यासभेटींचे आयोजन करण्यात आले आहे. नेदरलँडमधील आगामी अभ्यासभेटीसंदर्भातील नियोजन यादृष्टीने यावेळी चर्चा करण्यात आली. भारत आणि नेदरलँडचे संबंध व्यापार आणि सामाजिक दृष्टीने अधिक दृढ व्हावेत अशी अपेक्षा श्री. हेल्डन यांनी व्यक्त केली. त्याचप्रमाणे आरोग्य, कृत्रीम बुद्धीमत्ता, माहिती व तंत्रज्ञान, घनकचरा व्यवस्थापन या क्षेत्रात आणखी करारमदार व्हावेत अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.


उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महाराष्ट्रात नगरपालिकास्तरापर्यंत घनकचरा व्यवस्थापनासाठी सामजंस्य कराराच्या माध्यमातून काम सुरू व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करत वातावरणीय बदल, प्रदूषण, महिलांचे सामाजिक प्रश्न, स्त्री-पुरूष समानता यासंदर्भात विचार मांडले. 13 सप्टेंबर, 2023 रोजी जागतिक महिला धोरणासंदर्भात परिषद होत आहे. त्यात नेदरलँडचे प्रतिनिधी म्हणून सहभागी व्हावे, असे निमंत्रण उप सभापती यांनी श्री. हेल्डन यांना 

दिले.


0000


टक्कल पडत चाललय, केस गळतायत मग हे करून पहा.*

 *टक्कल पडत चाललय, केस गळतायत मग हे करून पहा.*


*भिमसेन कापूर, लसूण ठेचलेली, आवळा पेस्ट, आणि तुरटीची पावडर, आणि कलोंजी तेल, भिमसेन कापूर, एरंडेल तेल, ऑलिव्ह ऑईल, ऑलिव्ह ऑईल, खोबरेल तेल, लसूण ठेचलेली, आवळा पेस्ट, आणि तुरटीची पावडर, आणि कलोंजी तेल एकत्र करून आँईल तयार करा घरीच फक्त सर्व समप्रमाणात घेऊन अर्धा तास उकळून घ्या यातील लसूण काळी झाली की तेल तयार झाले समजा हे तेल रोज डोक्यावर लावण्यापूर्वी टक्कल पडलेला भाग स्वच्छ धुवून घ्या त्यावर कांद्याचाचमचाभर आधी रस चोळून ठेवा म्हणजे केसरंध्र मोकळी होतील हे तेल रोज रात्री लावत जा. टक्कलावर हळूहळू केस येतील.


* सोबत केराटीन प्रोटीन, लोह, बायोटिन तसेच व्हिटॅमिन डी व्यतिरिक्त, व्हिटॅमीन बी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी (बी7 आणि बी9) आणि व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे केस गळतात हे लक्षात घेऊन आपल्या आहारातून या गोष्टी कशा मिळतील यासाठी प्रयत्न करा म्हणजे शंभर टक्के रिझल्ट येईलच.


वैद्य गजानन


वैद्यकीय शिक्षणाबरोबरच आरोग्य सेवेचे सक्षमीकरण

 वैद्यकीय शिक्षणाबरोबरच आरोग्य सेवेचे सक्षमीकरण

            स्वातंत्र्यानंतर मागील जवळपास 60 वर्षात केवळ 11 शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरु करण्यात आली होती. सन 2014 पासून 2023 पर्यंत 9 वर्षात 10 वैद्यकीय महाविद्यालये राज्यात सुरु करण्यात आली आहेत. त्यामुळे दरवर्षी शेकडो नवीन डॉक्टर निर्माण होवून राज्यभर आरोग्य सेवेचा मोठ्या प्रमाणात विस्तार होणार आहे.


            सार्वजनिक आरोग्य ही सुराज्याच्या कल्पनेची एक महत्वाची बाब आहे. राज्यात प्राथमिक आरोग्य सुविधा पुरविण्याची जबाबदारी सार्वजनिक आरोग्य विभागाची असली, तरी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून केवळ ॲलोपॅथी (Allopathy) तथा आधुनिक विज्ञान (modern science) या चिकित्सा पद्धतीद्वारे उपचार केले जातात.


             वैद्यकीय शिक्षण, आयुष (AYUSH) (आयुर्वेद, योग, युनानी, सिद्ध व होमिओपॅथी चिकित्सापध्दत) आणि अन्न व औषध प्रशासन या उपविभागाकडून राज्यातील जनतेस प्राथमिक आरोग्यासह औषधोपचार, विशेषोपचार व अतिविशेषोपचार सेवा देण्यात येते.


            वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अधिनस्त वैद्यकीय सेवा व व्यवसाय या संदर्भातील कायद्याची अंमलबजावणी करणे, मानवी जीवनाच्या प्रक्रियेमध्ये मानवाच्या शारीरिक, मानसिक, जन्मत: निर्माण होणारे आजार, अपघात, हवामानातील होणाऱ्या बदलामुळे निर्माण होणारे संसर्गजन्य रोग इ. निर्माण होणाऱ्या आजारांवर मात करुन मानवी जीवनाचा दर्जा उंचावण्यासाठी वैद्यकीय क्षेत्राशी निगडित संशोधन, उपाययोजना, वैद्यकीय शिक्षण, औषध निर्मिती व अनुषंगिक कायदे, या प्रयोजनार्थ आवश्यक वैद्यकीय क्षेत्रातील मनुष्यबळ निर्माण करणे तसेच राज्यात वैद्यक शास्त्रात समतोल विकास साधणे व वैद्यक शाखेतील विविध अभ्यासक्रमात एकरुपता आणणे इ. संदर्भातील धोरणात्मक निर्णय घेतले आहेत.


नऊ जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय


            प्रत्येक नागरिकांस उच्च दर्जाच्या वैद्यकीय सेवा देण्याकरिता प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचे धोरण ठरविण्यात आले आहे. त्यानुसार या शैक्षणिक वर्षापासून रत्नागिरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होत आहे. परभणी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला असून नाशिक येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात येत आहे. नऊ जिल्ह्यात (पालघर, गडचिरोली, अमरावती, वाशिम, जालना, बुलढाणा, अंबरनाथ, भंडारा, आणि वर्धा) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचे प्रस्तावित असून ती लवकरच सुरू करण्यात येणार आहेत.


निवासी वैद्यकीय अधिकारी यांची 1432 पदे निर्माण


            भारतीय वैद्यकीय आयोगाच्या मानकांनुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आवश्यक निवासी वैद्यकीय अधिकारी यांची 1,432 पदे निर्माण करण्यात आली. त्यामुळे तेवढे डॉक्टर जास्तीचे उपलब्ध होतील.


शासकीय महाविद्यालयांचे श्रेणीवर्धन व नव्याने प्रस्तावित


शासकीय वैद्यकीय महाविद्यालये उभारण्याची कार्यवाही


            राज्यातील कार्यरत शासकीय महाविद्यालयांचे श्रेणीवर्धन करणे व नव्याने प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालये उभारण्याकरिता आशियायी विकास बँक (ADB) संस्थेकडून सुमारे 4 हजार कोटी व जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी (JICA) या संस्थेकडून सुमारे 5500 कोटीचे कर्ज घेण्याचे प्रस्तावित आहे. त्याबाबतची कार्यवाही युद्धपातळीवर सुरु आहे.


वैद्यकीय महाविद्यालयास जोडून वाढीव 157 नर्सिंग महाविद्यालयांना मान्यता


            देश पातळीवर नर्सेसचे प्रमाण वाढावे याकरिता वैद्यकीय महाविद्यालयास जोडून वाढीव 157 नर्सिंग महाविद्यालयांना मान्यता देण्याबाबत सन 2023-2024 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना जोडून बीएसस्सी (Bsc) नर्सिंग अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.


जळगाव येथे “मेडीकल हब”


            जळगाव येथे “मेडीकल हब” निर्माण करण्यात आले असून त्यानुसार शासकीय वैद्यकीय , दंत, आयुर्वेद, होमिओपॅथी व भौतिकोपचार महाविद्यालये उभारण्यात येणार आहेत. त्यानुसार तेथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय सुरू झाले आहे. तर राज्यातील पहिले शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय जळगांव येथे सन 2022-23 या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात आले आहे.


विविध अभियाने, मिशनमार्फत आरोग्य सेवा समाजाच्या प्रत्येक घटकांपर्यंत पोहचणार


            शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमार्फत रक्तदान मोहीम, स्थूलपणा जनजागृती व उपचार अभियान, स्तन कर्करोग जनजागृती व उपचार अभियान, ‍स्वच्छ मुख अभियान, थायरॉईड जनजागृती व उपचार अभियान आणि अवयव दान जनजागृती अभियाने सुरू करण्यात आली असून सातत्याने सुरू ठेवण्यात येणार आहेत. सदर अभियाने,मिशनमार्फत आरोग्य सेवा समाजाच्या प्रत्येक घटकांपर्यंत पोहचविण्यात येत आहेत.


परिचर्या, तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील एकूण 5182 पदे भरण्याबाबतच्या प्रक्रियेला सुरुवात


            शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच रूग्णालयातील परिचर्या, तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील एकूण 5182 पदे भरण्याबाबतची प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सदर भरती टी.सी.एस. या नामांकित कंपनीकडून ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे.


रत्नागिरी येथे 100 विद्यार्थी क्षमतेसह संलग्नित 430 खाटांचे रुग्णालय सुरु


            रत्नागिरी येथे 100 विद्यार्थी क्षमतेसह संलग्नित 430 खाटांचे रुग्णालय सुरु करण्यास मागील वर्षी मान्यता देण्यात आली होती. आता रत्नागिरी वैद्यकीय महाविद्यालयासाठी 448 पदनिर्मितीस मान्यता देण्यात आली असून याकरीता रु. 105.78 कोटी खर्चासही मान्यता देण्यात आली आहे.


सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित 500 रुग्णखाटांच्या रुग्णालयाकरीता 1086 पद निर्मीतीस मान्यता


            याच बरोबर सिंधुदुर्ग येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित 500 रुग्ण खाटांच्या रुग्णालयाकरीता आवश्यक एकूण 1086 पद निर्मीतीसही मान्यता देण्यात आली असून त्यापोटी 109.19 कोटी रुपयांचा भार शासनाच्या तिजोरीवर पडणार आहे. सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यापूर्वीच सुरु झाले आहे.


            प्रत्येक नागरिकाला आरोग्यासाठी प्राधान्य देणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून एकात्मिक प्राथमिक आरोग्य सेवा प्रदान करण्यावर भर दिला आहे. आजारांवर उपचार करण्याबरोबरच प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच बालके आणि स्त्रियांच्या आरोग्यविषयक समस्यांचे निराकरण करण्यासाठीही विशेष प्रयत्न केले आहेत.


            ग्रामीण आणि दुर्लक्षित क्षेत्रांमध्ये आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी प्रशिक्षित वैद्यकीय व्यावसायिकांच्या सहभागाला सहाय्यभूत ठरणारे धोरण अंमलात आणले आहे. दर्जेदार आरोग्य यंत्रणा विकसित करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.


गिरीष महाजन

मंत्री, वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य


कॅशलेस व्यवहाराकडे वाटचाल करतानामुद्रा शास्त्रीय ठेवा जतन करणे आवश्यक

 कॅशलेस व्यवहाराकडे वाटचाल करतानामुद्रा शास्त्रीय ठेवा जतन करणे आवश्यक

- राज्यपाल रमेश बैस

राज्यपालांच्या हस्ते मुंबई व नोएडा टांकसाळीतील नाण्यांवरील पुस्तके प्रकाशित


            मुंबई, दि. 10 : वेगवेगळ्या राजवटीत जारी केलेले चलनी शिक्के त्या - त्या काळातील घटनांवर व इतिहासावर प्रकाश टाकतात. भारताचा मुद्रा शास्त्रीय ठेवा देशाइतकाच प्राचीन आहे. आज देश कॅशलेस व्यवहारांकडे वाटचाल करताना देशाचा मुद्रा शास्त्रीय ठेवा जतन करणे आवश्यक आहे. इतिहास जाणून घेण्याच्या दृष्टीने प्राचीन नाण्यांचे दस्तऐवजीकरण करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी येथे केले.     


            राज्यपाल श्री. बैस यांच्या हस्ते नाणे शास्त्रज्ञ व संग्राहक डॉ. दिलीप राजगोर यांनी लिहिलेल्या 'कॉइन्स ऑफ मुंबई मिंट: १९४७ ते २०२३' व 'कॉइन्स ऑफ नोएडा मिंट : १९८८ ते २०२३' या दोन पुस्तकांचे सोमवारी (दि. १०) राजभवन मुंबई येथे प्रकाशन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.


            भारतात ५५० पेक्षा अधिक संस्थाने होती व अनेकांची आपापली नाणी होती. छत्रपती शिवाजी महाराजांची टाकसाळ होती, तसेच मुघल, पोर्तुगाल, डच, फ्रेंच व ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी शासकांची देखील आपापली नाणी होती, असे राज्यपालांनी सांगितले. आपल्या वैयक्तिक संग्रहामध्ये व्हिक्टोरिया राणी, राजे पंचम जॉर्ज व षष्ठम जॉर्ज यांचे चित्र असलेली नाणी असून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण वापरतो, अशी माहिती राज्यपालांनी यावेळी दिली.


            डॉ. राजगोर हे नाणेशास्त्र या विषयावर लिखाण, ब्लॉग व यू ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रबोधन करीत असतात. त्यांच्या मुंबई व नॉईडा टांकसाळीत नाण्यांच्या पुस्तकामधून अनेक दुर्मिळ नाण्यांची माहिती मिळते, असे नाणे संग्राहक डॉ. प्रकाश कोठारी यांनी यावेळी सांगितले.


            प्रकाशन सोहळ्याला लेखक डॉ. राजगोर, अशोकसिंग ठाकूर आणि डॉ. राजगोर यांचे कुटुंबीय उपस्थित होते.


**


Maharashtra Governor release books on Coins of Mumbai & NOIDA Mints


      Maharashtra Governor Ramesh Bais released the books 'Coins of Mumbai Mint: 1947 - 2023' and 'Coins of NOIDA Mint : 1988 - 2023' at Raj Bhavan, Mumbai on Mon (10 July). The books have been authored by Numismatist and Coin Collector Dr Dilip Rajgor  


      Speaking on the occasion, the Governor said coins of various rulers reflect the events and history of the era in which they were minted. He expressed the need to document all the old coins urgently, especially since the world is moving towards a cashless economy.


      Coin Collector Dr Prakash Kothari, Ashok Singh Thakur and family members of Dr. Rajgor were present.


**



 

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांसाठी31 ऑगस्टपर्यंत प्रस्ताव सादर करावेत

 प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांसाठी31 ऑगस्टपर्यंत प्रस्ताव सादर करावेत


            नवी दिल्ली, 10 : प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांसाठीची मुदतवाढ 31 ऑगस्ट 2023 पर्यंत करण्यात आलेली आहे.


            केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाच्यावतीने प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान केला जातो. यासाठी अर्ज पाठविण्याची तारीख ही 31 जुलै 2023 पर्यंतची होती, ती आता वाढवून 31 ऑगस्ट 2023 पर्यंत करण्यात आलेली आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय पुरस्कार (पीएमआरबीपी), 2024 करिता अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेची संपूर्ण माहिती https://awards.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 


            असामान्य धाडस, क्रीडा, समाजसेवा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण, कला आणि संस्कृती तसेच नवोन्मेष या क्षेत्रातील अतुलनीय कार्याला राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवून देण्याच्या उद्देशाने या पुरस्कारांची सुरुवात करण्यात आली आहे.


            भारताचे नागरिकत्व आणि रहिवासी असलेले मुल, मुली ज्यांचे वय 18 वर्षांहून अधिक नाही असे या पुरस्कारांसाठी अर्ज करू शकतात. अथवा कोणीही भारतीय नागरिक देखील पुरस्कारासाठी पात्र असणाऱ्या मुला - मुलींचे नामांकन करू शकते. या पुरस्कारांसाठीचे अर्ज विहित केलेल्या https://awards.gov.in या संकेतस्थळाच्या माध्यमातूनच स्वीकारण्यात येतील. 


00000000000

उच्च रक्तदाबावर प्रभावी उपाय*

 *उच्च रक्तदाबावर प्रभावी उपाय*


1)दोन चमचे अर्जुनरिष्ट काढा चार चमचे पाण्यात मिसळून जेवणानंतर दिवसातून दोनदा घ्या.


2) मुक्तावटी गोळी जेवणानंतर दिवसातून दोन वेळा घ्यावी.


3) अश्वगंधा पावडर रोज देशी गाईच्या तुपात अर्धा चमचा पावडर घ्यावी.


4) लसणाच्या पाकळ्या देशी गायीच्या तुपात तळून सकाळी रिकाम्या पोटी पाण्यासोबत सेवन करा.


5) दुधी भोपळ्याचा रस काढून रोज नाश्त्यात घ्या.


6) जवसाची पावडर भाजून रोज एक चमचा जेवणानंतर घ्या.


7) दररोज दुपारी ३ नंतर एक डाळिंब किंवा डाळिंबाचा रस घ्या.


8) प्राणायाम आणि अनुलोम रोज करावेत.


9) रोज ओमॖ चा उच्चारण वीस वेळा करावे.


वरील उपाय केल्याने उच्च रक्तदाब नक्कीच आटोक्यात येईल.

 

डॉ. प्रमोद ढेरे,



Featured post

Lakshvedhi