Sunday, 9 July 2023

परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास केंद्राची मान्यता

 परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास केंद्राची मान्यता

            मुंबई दि.08 : परभणी येथील 100 विद्यार्थी क्षमतेच्या नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या 430 रुग्णखाटांच्या रुग्णालयास केंद्र शासनाची मान्यता मिळाली असून या शैक्षणिक वर्षांपासून प्रवेश सुरू होणार आहे. राज्यातील हे 25 वे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले असल्याची माहिती ग्रामविकास व पंचायत राज, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन यांनी दिली.


            वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. गिरीष महाजन म्हणाले, स्वातंत्र्यानंतर मागील जवळपास 60 वर्षात केवळ 11 शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरु करण्यात आली होती. तर 2014 ते 2023 पर्यंत 9 वर्षात 10 शासकीय वैद्यकीय महाविद्यालये राज्यात सुरु करण्यात आली आहेत. त्यामुळे दरवर्षी हजारो नवीन डॉक्टर्स तयार होवून राज्यभर आरोग्य सेवेचा विस्तार होणार आहे. परभणी येथील वैद्यकीय शैक्षणिक प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला असून मागील 9 वर्षातील 11 वे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु झाले आहे. तसेच ज्या जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालये नाहीत अशा 9 जिल्हांमध्ये नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरु करण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याने प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरू होणार आहेत.


            मागील 09 वर्षात 11 नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरु करण्याचा अनोखा उपक्रम शासनाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. सध्या जागतिक आरोग्य संघटनेच्या मानंकानानुसार 1000 लोकसंख्येमागे एक डॉक्टर आवश्यक आहे. मात्र सद्यस्थितीत राज्यात लोकसंख्येच्या प्रमाणात डॉक्टरांचे प्रमाण कमी आहे तरीही प्रत्येक नागरीकाला चांगली आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.


            वैद्यकीय शिक्षण विभागातील तसेच सार्वजनिक आरोग्य विभागातील बहुतांश डॉक्टरांची पदे रिक्त असल्याने राज्यातील निमशहरी, ग्रामीण, दुर्गम, तसेच अतिदुर्गम भागातील लोकांना आरोग्य विषयक प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येत आहेत. त्यामुळे दरवर्षी नवीन 100 प्रशिक्षित डॉक्टर राज्यामध्ये वैद्यकीय सेवा देण्यासाठी तयार होतील. परभणी येथे 430 रुग्णखाटांचे रुग्णालय सुरू झाल्यामुळे आसपासच्या ग्रामीण भागातील लोकांना आरोग्य विषयक चांगल्या सोईसुविधा मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून या महत्त्वपूर्ण निर्णयाचे सामान्य नागरिकांतून स्वागत केले जात असल्याचे मंत्री श्री महाजन यांनी यावेळी सांगितले.


 

स्ट्रेच मार्क*

 *स्ट्रेच मार्क*


* अर्धा चमचा बदाम पावडर, चमचाभर खोबरेल


तेल, चमचाभर काँफी पावडर याच मिश्रण करून या प्रमाणात फ्रीजमध्ये स्क्रब तयार करून ठेवा हे फक्त स्ट्रेच मार्कवर नाहीतर जिथे जिथे त्वचा टॅन दिसते तिथे लावा फरक आठ दिवसात जाणवेलच. *एक चमचा ऑरेंज पावडर, एक चमचा मध घालून स्ट्रेच मार्कवर स्क्रब करा फरक दिसायला


लागेलच.


*एरंडेल तेल चमचाभर बटाट्याचा रस चमचाभर, चिमूटभर हळद घालून स्ट्रेच मार्क वर लावा. गायबच व्हायला लागतील * बेकिंग सोडा, बदामाचे तेल, आणि चमचाभर लिंबाचा रस घालून पेस्ट करा ही हलकेच मसाज करून चोळा.


*ट्री ट्री ऑईल बदाम ऑईल व कोरफडीच जेल एकत्र करून लावा फरक आठ दिवसात जाणवेल.

वैद्य गजानन


_*(

Saturday, 8 July 2023

Blod cancer

 


काळा हरभरा खाल्ल्याने डायबिटिज खरेच नियंत्रणात येतो का? तज्ज्ञ सांगतात काय खरं काय खोटं.....*

 *काळा हरभरा खाल्ल्याने डायबिटिज खरेच नियंत्रणात येतो का? तज्ज्ञ सांगतात काय खरं काय खोटं.....*


मधुमेह किंवा डायबिटिज हा रोग धोकादायक मानला जातो. मधुमेह झालेल्या व्यक्तीच्या रक्तातील साखरेची पातळी अनियंत्रित होते, त्यामुळे पीडित व्यक्तीचे शरीर अशक्त, सुस्त होऊन वेगवेगळ्या रोगांचे घर बनते. भारतात मधुमेहग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे, ज्यामुळे भारताला मधुमेहाची राजधानी म्हटली जाते.


मधुमेहग्रस्त रुग्णांना निरोगी आहार, यासह शारीरिकदृष्ट्या सक्रीय राहण्याचा सल्ला दिला जातो. पण आहारात काय खावं काय टाळावं याची कवचितच माहिती रुग्णांना असते. डायबिटिस रुग्णांना नेहमी कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. व साखरयुक्त पदार्थ खाण्यास टाळायला सांगतात. आपण आहारात काळा हरभऱ्याचा समावेश करून, रक्तातील साखरेवर नियंत्रण मिळवू शकता.


यासंदर्भात, फॅट टू स्लिमच्या डायरेक्टर न्यूट्रिशनिस्ट आणि डायटीशियन शिखा अग्रवाल शर्मा सांगतात, ''असे अनेक पदार्थ आहेत जे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतात आणि त्यापैकी एक म्हणजे काळा हरभरा.'' डायबिटिज नियंत्रणात ठेवण्यासाठी याचे सेवन कसे करावे?, काळा हरभरा डायबिटिजवर नियंत्रण कसे ठेवेल?, कोणत्या वेळेत हरभरा खावा?, याची माहिती त्यांनी दिली आहे.


*चण्याचे जीआय मूल्य आणि इतर पोषक घटक...*

चण्याचा ग्लायसेमिक इंडेक्स ४३ आहे. जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी योग्य अन्न आहे. फायबरयुक्त समृद्ध असल्याने, ते रक्तामध्ये हळूहळू पोषकद्रव्ये शोषून घेते. रक्तातील ग्लुकोजचे उत्सर्जन कमी करते. चणे देखील प्रथिनांचा एक चांगला स्रोत आहे.


*मधुमेहग्रस्त रुग्णांसाठी चणे फायदेशीर...*

चण्यामध्ये १४ ग्राम फायबर असते. जे रक्तातील ग्लुकोज नियंत्रणात राखते. त्यात विरघळणारे आणि अघुलनशील फायबर दोन्ही असतात. मधुमेहव्यतिरिक्त, काळे हरभरे कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते. ज्यामुळे वजन कमी होते.


*मधुमेहग्रस्त रुग्णांनी चणे कसे खावे...?*

चणे अनेक प्रकारे खाल्ले जाते, याचा वापर इतर भाज्यांमध्ये देखील होतो. चणे उकळून, भिजवून, भाजी बनवता येते. यासह चाट आणि सॅलडमध्ये देखील होतो. ते खाण्याचा उत्तम मार्ग म्हणजे चाट बनवणे. टोमॅटो, कांदे, काकडी, धणे, लिंबू आणि हिरवी मिरचीचे छोटे तुकडे करून एक कप उकडलेल्या काळ्या हरभऱ्यात मिसळून खाऊ शकता.


*काळे चणे कधी खावे...?*

सकाळचा नाश्ता खूप महत्वाचा असतो. सकाळी पौष्टीक नाश्ता करावा. मधुमेह रुग्णांनी नाश्ता कधीही वगळू नये. कारण यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. काळा हरभरा खाण्याची उत्तम वेळ म्हणजे नाश्ता आहे.


*काळ्या हरभराचे इतर फायदे...*

अँटिऑक्सिडेंट समृद्ध काळा हरभरा हृदयाच्या आरोग्यास प्रोत्साहन देते, ज्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. काळ्या हरभऱ्यात लोह असल्यामुळे अॅनिमिया टाळता येते. काळ्या चण्यात फायबर अधिक प्रमाणावर आढळते. ज्यामुळे पचनशक्ती सुधारते. व वजन कमी होण्यास मदत होते.


*कुमार चोप्रा,*

*डॉ. सुनील इनामदार.*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺

तणावमुक्त जगा.....*

 *तणावमुक्त जगा.....*


सध्याच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या आयुष्यात प्रत्येक माणूस ताण तणावा खाली जगताना दिसून येत आहे. या ताणतणावाचा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत असतो. आपल्या रोजच्या आयुष्यातील घटना, काम, कामांचा दबाव, वैयक्तिक बाबी यामुळे मनावर सतत दाब येत असतो. ताण ही क्रियेची प्रतिक्रिया असली, तरी अनेकांच्या बाबतीत ताण ही कायमस्वरूपी समस्या बनू शकते. 


भय म्हणून आपल्यासमोर आलेल्या कशाचाही सामना करण्यासाठीची यंत्रणा म्हणजे तणाव! आपल्या कर्तबगारीच्या किंवा मानसिक आरोग्याच्या सीमा आणि क्षमता जाणून घेण्यासाठी काही प्रमाणात तणाव आवश्यकही असतो. तथापि अतिरिक्त ताणतणाव त्रासदायक ठरू शकतो.


तणावाची लक्षणे व्यक्तिगणिक भिन्न असतात व तणावाच्या प्रकारावर; तसेच व्यक्ती कोणत्या स्तरावर आहे, त्यावर अवलंबून असतात. खूप राग येणे, नैराश्य, पोटाचे विकार, स्नायूंच्या समस्या, खूप घाम येणे, हात-पाय गारठणे, आक्रमकता, नकारात्मकता, अधीरता, शत्रुत्वाची भावना, न संपणारी भीती, मायग्रेन, हिंसक वृत्ती अशी अनेक प्राथमिक ते गंभीर स्वरूपाची लक्षणे असू शकतात. आपले वैयक्तिक आयुष्य असो किंवा व्यावसायिक आयुष्य वेगवेगळे ताणतणाव आपल्यासमोर उभे राहणारच. त्यांना सामोरे जायला शिकले पाहिजे. व्यक्तिमत्त्वविकासात ताणतणावाचे व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचे आहे.


*ताणतणाव व्यवस्थापनासाठी काही महत्त्वाच्या टिप्स…*

*१.* कोणत्याही कामाची प्राथमिकता ओळखता यायला हवी. आजच्या युगात कोणतेही काम असेल, ते तुम्ही नीट व्यवस्थापन करून पूर्ण केले तर ते वेळेत तर पूर्ण होतेच आणि तुम्हाला त्या कामाच्या चिंतेपासून निर्माण होणाऱ्या तणावापासून दूर ठेवत.


*२.* एकसलग काम केल्याने शरीरावर व मनावर ताण येतो, त्यासाठी कामातून छोटा ब्रेक घेऊन निसर्गाच्या सान्निध्यात थोडा वेळ घालवावा. ताण जाणवत असल्यास थोडा वेळ आपल्या आवडीचे काम करावे. अर्थातच आपल्या आवडीच्या कामात आपण मनापासून रमून जातो आणि ताण कमी होण्यास मदत होते.


*३.* कामासाठी योग्य वेळ, कुटुंब, नातेसंबंध, योग्य विश्रांती, पुरेशी झोप याचा संतुलित जीवनाचे अंतिम ध्येय साध्य करण्यात मदत करते.


*४.* वाचन, मनन, चिंतन... रुचिसंपन कार्यक्रमांचा आस्वाद घेणे, योग्य व्यायाम, संतुलित आहार आणि बागकाम, संगीत, कला असे आवडीचे छंद जोपासणे यानेही तणाव कमी होण्यास मदत होते.


*५.* प्राप्त करण्यास योग्य अशा यथार्थवादी उद्दिष्टांची निश्चिती केल्यास सिद्धीची भावना येते व तणावदेखील कमी होतो.


*६.* गंभीर स्वरूपातील ताणतणावांसाठी औषधोपचार, गरज असल्यास समुपदेशन, वैकल्पिक उपचार, काही वेळाची सक्तीची विश्रांती, आधारगट यांची गरज असते.


एकूणच आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवून आयुष्याचा प्रवास आखला, की ताणतणावांना उत्तमरित्या सामोरे जाण्याची ऊर्मी येते.


*मीनल ठिपसे,*

*सुनील इनामदार.*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺

साथरोग परिस्थितीच्या प्रभावी नियंत्रणासाठी आरोग्य विभाग सज्ज

 साथरोग परिस्थितीच्या प्रभावी नियंत्रणासाठी आरोग्य विभाग सज्ज

             मुंबई, दि. 6 : राज्यात पावसाळा सुरुवात झाली आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये कमी - अधिक प्रमाणात पाऊस होत आहे. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथ रोगांवर प्रभावी नियंत्रणासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला आहे साथरोग नियंत्रणासाठी विविध उपाययोजना आरोग्य विभागाने केल्या आहेत.

               गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये हिवताप तसेच विदर्भातील अन्य जिल्ह्यांमध्ये जपानी मेंदूज्वर, चंडीपुरा मेंदूज्वर, तर कोकणात लेप्टो स्पायरोसिस, शहरी भागात डेंग्यू अशा विविध आजारांच्य साथी पसरतात. विभागाने प्रत्येक जिल्ह्यात जोखीमग्रस्त गावांची निवड करून त्यांची यादी तयार केली आहे. जिल्हा व तालुकास्तरावर शीघ्र प्रतिसाद पथकांची स्थापना करण्यात आली आहे. या शीघ्र प्रतिसाद पथकातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण घेण्यात आले आहे. या पथकांमध्ये राज्यात 4 हजार 180 वैद्यकीय अधिकारी व 19 हजार 171 कर्मचारी असणार आहेत. राज्यात 4 हजार 67 गावे जोखीमग्रस्त असून राज्यात सर्वात जास्त कोल्हापूर जिल्ह्यात 411 गावे जोखीमग्रस्त आहेत. तर धुळे, मुंबई जिल्ह्यात एकही गाव जोखीमग्रस्त नाही.

              प्रत्येक आरोग्य कर्मचाऱ्यांचे पंधरवडा सर्वेक्षण कॅलेंडर तयार करण्यात आले आहे. दैनंदिन सर्वेक्षणासाठी करावयाच्या गृहभेटीच्या वेळी जलजन्य व कीटकजन्य आजारांच्या रुग्णांचा शोध घेण्यात येतो. जिल्ह्यातील आश्रमशाळा, वसतिगृह, वृद्धाश्रम अशा संस्थांना वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी नियमित भेटी देतात. जलजन्य आजारांच्या प्रभावी प्रतिबंधासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील पाणी स्त्रोतांचे प्रभावी गुणवत्ता नियंत्रण करण्यात येत आहे. विरंजक चुर्णाचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आला आहे. राज्यात 76 हजार 867 पाणी नमुने तपासण्यात आले असून त्यामध्ये 3580 पाणी नमुने दूषित आढळले आहे.

            दरवर्षी मान्सूनपूर्व सर्व पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचा सॅनिटरी सर्वे करण्यात येतो. त्यानुसार प्रत्येक गावाला हिरवे, पिवळे व लाल कार्ड दिले जाते. त्यानुसार राज्यात 27 हजार 853 गावांचा सर्वे करण्यात आला आहे. यामध्ये हिरवे कार्ड दिलेली गावे 24 हजार 139 असून पिवळे कार्ड दिलेली गावे 3 हजार 675 आणि लाल कार्ड दिलेली गाव 39 आहेत. साथरोग निदानासाठी प्रत्येक जिल्ह्यात प्रयोगशाळा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. पावसाळ्यातील विविध आजारांवर उपचार करण्यासाठी आवश्यक औषधांचा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. डासोत्पत्ती स्थाने नष्ट करणे, जोखमीच्या भागात कीटकनाशक फवारणी, अळीनाशकांचा वापर, डास उत्पत्ती स्थानांमध्ये गप्पी मासे सोडणे तसेच वैयक्तिक संरक्षणासाठी मच्छरदाण्या, खिडक्यांना जाळ्या बसविणे व डास प्रतिरोधक क्रीम आदी एकात्मिक कीटक व्यवस्थापन कार्यक्रम आरोग्य विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे.




--

व्हिटॅमीन डी ची कमी आहे

 व्हिटॅमीन डी ची कमी आहे


मग हे उपाय करा. * हिवाळ्यात तुपाचे सेवन केल्याने व्हिटॅमिन Sीची कमतरता दूर होते. तुपात व्हिटॅमिन डी आढळते.


* सूर्यफुलाच्या बियांचे सेवन केले जाऊ शकते.


एक चमचाभर पावडर करून ती कपभर। पाण्यात उकळून प्यावी. *सकाळी उठून शेवग्याच्या शेंगाचे (ड्रमस्टिक)


चे पाणी प्यावे किंवा सूप प्यावे.


* तुम्ही सकाळी मेथीच्या दाण्यांचे पाणी देखील घेऊ शकता.


*काजूची पेस्ट बनवून तीच पाव कप या प्रमाणात आठवड्यात तीनदा सेवन करा.


* दह्याचे सेवन करावे. दह्याचे सेवन केल्याने व्हिटॅमिन डीच्या कमतरतेवर मात करता येते. *संत्र्याचा ज्यूस रोज घेतला तरीही व्हिटॅमीन डी वाढते



 वैद्य गजानन


Featured post

Lakshvedhi