*काळा हरभरा खाल्ल्याने डायबिटिज खरेच नियंत्रणात येतो का? तज्ज्ञ सांगतात काय खरं काय खोटं.....*
मधुमेह किंवा डायबिटिज हा रोग धोकादायक मानला जातो. मधुमेह झालेल्या व्यक्तीच्या रक्तातील साखरेची पातळी अनियंत्रित होते, त्यामुळे पीडित व्यक्तीचे शरीर अशक्त, सुस्त होऊन वेगवेगळ्या रोगांचे घर बनते. भारतात मधुमेहग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे, ज्यामुळे भारताला मधुमेहाची राजधानी म्हटली जाते.
मधुमेहग्रस्त रुग्णांना निरोगी आहार, यासह शारीरिकदृष्ट्या सक्रीय राहण्याचा सल्ला दिला जातो. पण आहारात काय खावं काय टाळावं याची कवचितच माहिती रुग्णांना असते. डायबिटिस रुग्णांना नेहमी कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. व साखरयुक्त पदार्थ खाण्यास टाळायला सांगतात. आपण आहारात काळा हरभऱ्याचा समावेश करून, रक्तातील साखरेवर नियंत्रण मिळवू शकता.
यासंदर्भात, फॅट टू स्लिमच्या डायरेक्टर न्यूट्रिशनिस्ट आणि डायटीशियन शिखा अग्रवाल शर्मा सांगतात, ''असे अनेक पदार्थ आहेत जे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतात आणि त्यापैकी एक म्हणजे काळा हरभरा.'' डायबिटिज नियंत्रणात ठेवण्यासाठी याचे सेवन कसे करावे?, काळा हरभरा डायबिटिजवर नियंत्रण कसे ठेवेल?, कोणत्या वेळेत हरभरा खावा?, याची माहिती त्यांनी दिली आहे.
*चण्याचे जीआय मूल्य आणि इतर पोषक घटक...*
चण्याचा ग्लायसेमिक इंडेक्स ४३ आहे. जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी योग्य अन्न आहे. फायबरयुक्त समृद्ध असल्याने, ते रक्तामध्ये हळूहळू पोषकद्रव्ये शोषून घेते. रक्तातील ग्लुकोजचे उत्सर्जन कमी करते. चणे देखील प्रथिनांचा एक चांगला स्रोत आहे.
*मधुमेहग्रस्त रुग्णांसाठी चणे फायदेशीर...*
चण्यामध्ये १४ ग्राम फायबर असते. जे रक्तातील ग्लुकोज नियंत्रणात राखते. त्यात विरघळणारे आणि अघुलनशील फायबर दोन्ही असतात. मधुमेहव्यतिरिक्त, काळे हरभरे कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते. ज्यामुळे वजन कमी होते.
*मधुमेहग्रस्त रुग्णांनी चणे कसे खावे...?*
चणे अनेक प्रकारे खाल्ले जाते, याचा वापर इतर भाज्यांमध्ये देखील होतो. चणे उकळून, भिजवून, भाजी बनवता येते. यासह चाट आणि सॅलडमध्ये देखील होतो. ते खाण्याचा उत्तम मार्ग म्हणजे चाट बनवणे. टोमॅटो, कांदे, काकडी, धणे, लिंबू आणि हिरवी मिरचीचे छोटे तुकडे करून एक कप उकडलेल्या काळ्या हरभऱ्यात मिसळून खाऊ शकता.
*काळे चणे कधी खावे...?*
सकाळचा नाश्ता खूप महत्वाचा असतो. सकाळी पौष्टीक नाश्ता करावा. मधुमेह रुग्णांनी नाश्ता कधीही वगळू नये. कारण यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. काळा हरभरा खाण्याची उत्तम वेळ म्हणजे नाश्ता आहे.
*काळ्या हरभराचे इतर फायदे...*
अँटिऑक्सिडेंट समृद्ध काळा हरभरा हृदयाच्या आरोग्यास प्रोत्साहन देते, ज्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. काळ्या हरभऱ्यात लोह असल्यामुळे अॅनिमिया टाळता येते. काळ्या चण्यात फायबर अधिक प्रमाणावर आढळते. ज्यामुळे पचनशक्ती सुधारते. व वजन कमी होण्यास मदत होते.
*कुमार चोप्रा,*
*डॉ. सुनील इनामदार.*
🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺
No comments:
Post a Comment