Sunday, 2 July 2023

आहार सेवनाविषयीचे नियम 📌

 📌 आहार सेवनाविषयीचे नियम 📌


🍎अन्न नेहमी ताजे व गरम जेवावे.असे अन्न स्वादिष्ट तर असतेच शिवाय लवकर व चांगले पचते.फारच थंड वा फारच गरम अन्न मात्र कधीच खाऊ नये.


🍎अगदी कोरडे अन्न वा तेलातुपाने नुसते माखलेले अन्न खाऊ नये.अगदी कोरडे अन्न म्हणजे रुक्ष अन्न खावयास तर त्रास होतोच पण पचावयास देखील त्रास होतो.


🍎अन्नाचे प्रमाण भूक व पचनशक्ती यांच्या अनुमानाने योग्य तेवढे जर ठेवले तर त्रिदोषांना कोठेही न बिघडवता तीनही दोषांचे योग्य असे पोषण करण्यास ते सक्षम ठरते.


🍎भूक लागल्याशिवाय जेवू नये.भूक लागणे हे आधीचे जेवण पचले आहे असे समजण्याचे साधन आहे.


🍎आधी खाल्लेले अन्न नीट पचल्याखेरीज जेवू नये.अन्यथा अन्नपाचक रसांना,आतड्यांना ताण येतो व पचनसंस्था बिघडते.


🍎दोन परस्परविरोधी अशा प्रकारचे अन्न एकाच वेळी व एकामागून एक असे खाऊ नये.अशाने रोगाला आमंत्रण मिळते.


🍎अस्वच्छ जागी बसून जेवू नये.याने जंतुसंसर्ग वाढतो.


🍎खूप भराभर असे जेवू नये.अशाने ठसका लागण्याचा संभव निर्माण होतो व अन्नाचा तिटकारा वाटण्याची शक्यता निर्माण होते.


🍎अति सावकाश रेंगाळत देखील जेवू नये.असे केल्यास जेवण तर गार होतेच शिवाय पचन मंदावते,भूक नीट भागत नाही व जेवणाचे समाधान होत नाही.


🍎जेवताना टीव्ही, मोबाईल,लॅपटॉप,व्हिडीओ गेम्स हे काटेकोरपणे टाळावे.यामुळे जेवणात लक्ष राहत नाही.


🍎यासाठी जेवणासारखी अत्यंत महत्वाची गोष्ट पूर्णपणे लक्ष देऊन स्वतःसाठी काय योग्य आणि काय अयोग्य याचा विचार करून प्रसन्न मनाने करावी.


📚संदर्भ-- डॉक्टर मी काय खाऊ?


📝माहिती संकलन👇

डॉ.स्वाती पाटील

होमिओपॅथ|बॅच फ्लॉवर रेमेडी थेरपिस्ट|आहारतज्ज्ञ.



*सर्व ग्रुप मेंबर ना विनंती,* 

*तुम्ही ज्या दुसऱ्या इतर ग्रुप वर कार्यरत आसाल,* 

 *त्या सर्व ग्रुप वर आरोग्य विषयक माहिती फॉरवर्ड करा 🙏🏻*


_*

पांढरे केस काळे करूया*

 *पांढरे केस काळे करूया* 


काल पासून आपण केस विषयावर चर्चा करत आहोत. आज आपण केस का पिकतात, अकाली पांढरे का होतात.याचे नेमके कारण समजून घेऊया. व केस परत नँचरल काळे करायचे असतील तर काय उपाययोजना यांचा अभ्यास करुया.चला तर मंडळी सुरू करुया.

अनेक लोकांना माहिती नसते केस पांढरे का होतात.आणि एकदा का हे केस पांढरे झाले की मग निरनिराळे उद्योग लोक सुरू करतात. मग अनेक कलर,डाय चोपडून त्या केसांना काळे केले जाते कलर केले जातात. पण मुळ समस्येच्या मुळाचा शोधच कुणी घेत नाही परिणाम स्वरूप हळूहळू सारेच केस पांढरे होतात डाय लावले जातात व केस झडणे,गळणे या समस्या जन्म घेतात.

१)मेलानीन,मेलांजीन-केस काळे राहण्यासाठी रक्तात मेलानीन नांवाचे एक रसायन असते.ज्याचे प्रमाण कमी झाले की केस पिकतात. यासाठी शंभर ग्रँम बदाम, शंभर ग्रँम मनुके,दहा ग्रँम मिरी एकत्रित करून मिक्सरमध्ये फिरवून गोळ्या करा.रोज सकाळी चार संध्याकाळी चार रात्री चार खात जा.याने बल,विर्य,पुष्टी सह केस पिकायचे थांबतील.

२)आहारात गाजरज्युस,टाँमँटो ज्युस,अंड्यातील पिवळा बलक,स्ट्राँबेरी, रासबेरी,स्पिरुलिना म्हणजे खाण्यायोग्य शेवाळ अथवा याची कँप्सुल याचा समावेश करा.मेलानीन च प्रमाण नियंत्रित राहून केस पांढरे होणं कमी होईल.

३)रोज चमचा भर काळेतीळ व काळा गुळ खात जा.केसांसाठी ची रंगद्रव्य टिकून राहतात.

आता पाहू काळे करण्याचे पर्याय.

१) केस धुताना तुरटी लावावी डोक्यावर.अथवा थंड अथवा कफ कारक प्रकृती वाल्या मंडळींनी तिळाच्या तेलात तुरटीची पावडर मिक्स करून केसांना लावावी.तर गरम उष्ण प्रकृती वाल्या मंडळींनी खोबरेल तेलात मिक्स करून लावावी.

२)आवळ्याच्या गराची पेस्ट केसांच्या मुळांपासून डाय सारखी लावावी.

३)वरचेवर खोबरेल तेलात लिंबू पिळून लावत जावे यातील बायोटीनीन केसात शुष्कता न येऊन देता ओलावा निर्माण करतं व केस पांढरे होणे कमी होते.

४)आठवड्यात दोन वेळा कढीपत्त्याची पाने पावडर करुन खोबरेल तेलात मिक्स करून माँलीश करुन लावा.

५)चमचा भर चहापावडर व चमचाभर नँचरल काँफी एकत्र करून कपभर पाण्यात उकळून ते पाव कप होईपर्यंत आटवून आठवड्यात एकदा ते दोनदा माँलीश करून चोळा.केस नँचरल काळे व्हायला लागतील सुकल्यानंतर धुवून टाका.

६)पांढऱ्या कांद्याची पेस्ट करून केसांच्या मुळाशी लावत जा केसांना चोळत जा.माँलीश करा.

७)आयुर्वेदिक दुकानात मिळणारी नँचरल मेहंदीपावडर,तमालपत्र एकत्रित कपभर पाण्यात उकळून केसांना डायप्रमाणे पेस्ट करून लावा केस काळे राहतील

८)शिकेकाई रात्री भिजवून सकाळी उकळून गार झाल्यावर केसांना पेस्ट प्रमाणे लावा.

वरील उपाय आलटून पालटून करा 


केस धुण्यासाठी तुम्ही केमिकल विरहित नँचरल शांपू वापरू शकता. उद्याच्या भागात आपण केसांच्या विविध समस्या व त्यावरील आयुर्वेदिक औषधे या वर काय आहेत ते पाहू.

वैद्य. गजानन




Saturday, 1 July 2023

Contact आणि Connection*....मध्ये नेमका काय फरक ?

 *★परत,परत,परत,परत*

*वाचण्यासारखा अतिशय छान मेसेज★*


*Contact आणि Connection*....मध्ये नेमका काय फरक ?


घटना न्यूयार्कमधील आहे. एका भारतीय साधूचे तिथे व्याख्यान झाले. 


त्यानंतर पत्रकारांनी त्यांना गाठले. 


त्यातील एकाने साधूला विचारलं, 

"साधू महाराज, तुम्ही आताच्या व्याख्यानात संपर्क (Contact) आणि लगाव (Connection) यावर बोलला. 


पण ते गोंधळात टाकणार आहे. या दोन्हीमध्ये फरक काय ?"


साधुने मंद स्मित केले अन उत्तर देण्याऐवजी वेगळेच प्रश्न त्यांनी त्या पत्रकाराला विचारणे सुरु केले. 


साधू : "तुम्ही न्यूयार्कचे रहिवासी का ?"


पत्रकार : "येस !! का हो ?"


साधू : "घरी कोण कोण असत?"


आपल्या प्रश्नाचे उत्तर टाळण्यासाठी साधूबाबा असं काहीतरी वेगळं विचारत आहेत असं त्या पत्रकाराला वाटलं.


कारण त्याचा प्रश्न सार्वजनिक होता अन साधू तर खाजगी काहीतरी विचारत होते.

 

तरी मूळ प्रश्नाचे "उत्तर" मिळण्याच्या आशेने तो पत्रकार उत्तर देत गेला. 


तो म्हणाला : "माझी आई आता नाहीये. वडील व आम्ही तिघे भाऊ बहीण !


सगळ्यांची लग्न झाली आहेत. सेपरेट बंगले असून सर्व सेटल आहेत."


साधू : "तुम्ही तुमच्या वडिलांशी बोलत असता का ?"


(आता मात्र त्या पत्रकाराला थोडा राग यायला लागला.)


साधू : "तुमच्या वडिलांशी शेवटचे तुम्ही कधी बोलला ? काही आठवतंय का ?"


पत्रकाराने राग आवरत सांगितलं

 : "बहुतेक एक महिना झाला असावा.


साधू : "तुमच्या बहीण भावाशी नेहमी भेटीगाठी करता का ?


एक कुटुंबीय म्हणून शेवटचे तुम्ही कधी एकत्र भेटले?"


(आता पत्रकाराच्या कपाळावर घाम यायला लागला, की मुलाखत कोण कुणाची घेतेय?)


तरी त्याने उत्तर दिले : "गेल्या वर्षीच्या ख्रिसमसमध्ये भेटलो"


साधू : "त्यावेळी किती दिवस एकत्र होता?"


पत्रकार (हळवा होत) : "तीन दिवस होतो"


साधू : "तुम्ही बहीण भावांनी त्या काळात किती वेळ वडिलांच्या अगदी जवळ बसून घालवला ?"


(पत्रकार आता थोडा लाजिरवाणा होऊन, मान खाली घालून कागदावर काहीतरी रेघोट्या मारत बसला.)


साधू : "तुम्ही तुमच्या वडिलांसोबत नाश्ता, दुपारचं जेवण किंवा रात्रीचे जेवण केले का ?"


वडिलांना विचारलं का ? की कसे आहात?

आईच्या निधनानंतर ते एकटे जगत होते तर वेळ कसा घालवला?"


(असं म्हणत त्या साधूने पत्रकाराला आपुलकीने जवळ घेतलं).


साधू : "बेटा, नाराज होऊ नको, लाजिरवाणा पण होऊ नको.


तुला असं नकळत दुखावल्याबद्दल उलट मी माफी मागतो. पण तुझ्या मूळ प्रश्नाचे उत्तर यात होते. 


*Contact आणि Connection !!*cp


तू तुझ्या वडिलांच्या फक्त Contact मध्ये आहेस. मात्र तुझं त्यांच्याशी कोणतेही

Connection नाहीय. 


You are not connected to him.


आणि वडील संपर्कात असणं वेगळं अन त्यांच्याशी "लगावं" असणं वेगळं. 


कारण Connection हे नेहमी आत्म्याचे आत्म्याशी होत असते. 


एकत्र बसणे, भोजन सहवास, एकमेकांची काळजी घेणं, डोळ्यांनी संपर्कात नव्हे तर डोळ्याची भाषा ओळखून त्यानुसार प्रतिसाद देणे,


*आपुलकीचा स्पर्श, हात हातात घेणं.... हे सगळं Connection मध्ये येत. Contact मध्ये नाही*


तुम्ही तुमची भावंडं, वडील यांच्या Contact मध्ये आहात पण कोणतेच Connection आपसात नाही.


आता पत्रकाराच्या डोळ्यात पाणी आलं. 


एक चांगला धडा गिरवून दिल्याबद्दल आभार मानून, पत्रकार त्यांना नमस्कार करून निघाला. 


*आज आपल्या भोवताली बहुतेक असंच दिसतयं..आपण आपले सख्खे नातेवाईक,आपले मित्र,आपले शेजारी,सहकारी,समाज..सर्व फक्त contact मधे ठेवतो आणी गरज पडली की लगेच connection जोडतो..*.


सर्व एकमेकांच्या Contact मध्ये आहेत पण कुणाशी Connection (लगाव असा) काही नाही..कसला संवाद नाही. कसल्या चर्चा नाहीत. सगळे स्वमग्न झालेत..!


आपण वरचेवर बदलत चाललोय..हेच खरं आहे..!


इतक्या वर्षाचे आपले संस्कार, आईवडील गुरुजींनी शिकवलेले ते सगळं विसरलं जातंय....


*कुणाला जवळ करायचं,कधी जवळ करायचं,हे चांगलच समजायला लागलयं.. प्राधान्य कशाला द्यायचं हा भावनिक व्यवहार आपण चांगलाच अंगीकारला आहे..गरज पडेल तेव्हा बघू ही वृत्ती आपण चांगलीच जोपासली आहे..वाटलं तर प्रतिसाद द्यायचा नाहीतर मोबाईल सायलेंटवर होता म्हणून सोयीचं व ठेवणीतलं ऊत्तर तयार ठेवायचं..!*


*दाहक असलं ..तरी सत्य हेच आहे..*


*संपर्क,संवाद वाढवणं,एकमेकांना समजून घेणं,जाणून घेणं म्हणजेच connection..*


वरील घटनेतील "साधू" म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून आपले

 *स्वामी विवेकानंद होते.*

समृद्धी महामार्गावरील अपघातांचा तज्ज्ञांमार्फत अभ्यास करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 समृद्धी महामार्गावरील अपघातांचा तज्ज्ञांमार्फत अभ्यास करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे




देऊळगाव राजा ग्रामीण रुग्णालयात जखमींची विचारपूस




            बुलढाणा, दि 1 : समृद्धी महामार्गावरील प्रवास सुरक्षित होण्यासाठी तज्ज्ञांमार्फत अभ्यास करण्यात येईल. त्यांच्या सूचनांनुसार उपाययोजना प्राधान्याने अंमलात आणण्यात येतील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.




            समृद्धी महामार्गावरील देऊळगाव राजानजीक खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसचा शुक्रवारी (३० जून) रात्री दोन वाजता अपघात झाला. या अपघातात 26 जणांचा मृत्यू, तर आठ जण जखमी झाले आहेत. या अपघातस्थळाला मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत आज दुपारी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास व पंचायत राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन, रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय रायमूलकर, आकाश फुंडकर, श्वेता महाले, विभागीय आयुक्त निधी पांडेय, विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड, पोलीस अधीक्षक सुनील कडासने आदी उपस्थित होते.




            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, समृद्धी मार्गावरील अपघात हा दुर्दैवी आहे. समृद्धी महामार्गावरील अपघात अतिवेग आणि चालकांना झोपेची डुलकी आदी कारणांमुळे घडतात. असे अपघात घडू नयेत म्हणून दक्षता घेणे गरजेचे आहे. अपघात रोखण्यासाठी आवश्यक त्या उपायोजना शासन स्तरावरून गांभीर्यपूर्वक व प्राधान्याने करण्यात येतील.




            अपघाताच्या पार्श्वभूमीवर स्थानिक यंत्रणा तातडीने अपघातस्थळी पोचली. बसचा मुख्य दरवाजा बंद असल्यामुळे प्रवाशांना बाहेर येता आले नाही. त्यामुळे मृतांच्या संख्येत वाढ झाली. खासगी बसमध्ये जादा प्रवासी वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. 




            समृद्धी महामार्गावरील वाहतूक नियंत्रणासाठी यंत्रणा कार्यान्वित आहे. महामार्गावर प्रवेश देण्याआधी वाहनांची तपासणी केली जाते. तसेच वाहनचालकाचे समुपदेशन केले जाते. वाहन किंवा वाहनचालक योग्य पात्रतेचे नसल्यास त्यांना परत पाठवले जाते. यामुळे प्रवाशांची आणि वाहन चालकांची नाराजी होते. मात्र, सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून नियमांचे काटेकोर पालन करून वाहतूक नियंत्रण केले जात आहे, असेही त्यांनी सांगितले.




            अपघातस्थळाला भेट दिल्यानंतर श्री. शिंदे आणि श्री. फडणवीस यांनी देऊळगाव राजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या आठ जखमींची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. तसेच जखमींवर योग्य ते उपचार करण्याच्या सूचना त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.




000

स्वागत मान्सूनचे, कर्तव्य जलपुनर्भरणाचे...

 स्वागत मान्सूनचे, कर्तव्य जलपुनर्भरणाचे...


डॉ. प्रवीण महाजन



--

Regards,


Pravin Mahajan

181, Gotmare Complex,

Bazar Road,

Dharampeth Extn. Nagpur-10.

email- pravin5858@gmail.com


पाणी वाचवा माणूस जगवा

झाडे वाचवा पर्यावरण जगवा


SAVE PAPER SA



VE TREE SAVE LIFE

चामखिळ, मस, वार्ट

 चामखिळ, मस, वार्ट

 मुख्यतः रक्तात दोष उत्पन्न झाला, व्हिटमीन ई चि कमतरता झालि कि. त्वचेवर वेगवेगळी लक्षणे दिसू लागतात. कोणाला, त्वचारोग, कुणाला गाठि, कुणाला मस दिसू लागतात.

१) आंब्याच्या पानाचा रस व कडुलिंबाचा रस लावला कि जातात.

२) हळद, आणि चूना लावला कि जातात.

३) व्हिटामिन ई चे तेल लावणे.

४) रोज रात्री चमचाभर मेथिचे दाणे

 भिजवून सकाळि पाणि पिणे.

५) होमिओपँथि च्या थूजा ३० दोन दोन गोळ्यि तीन वेळा घेणे. तसेच वार्टोसन्स मलम लावणे.

६) चूना त्या जागेवर पाण्यात मिक्स करून पातळ लावणे.

७) आणि हे परत कधीच येउ नये वाटत असेल तर वरील उपायांबरोबरच रोज दोन वेळा २-२ चमचे रक्तदोषांतक तिन महिने घेणे.

        


 वैद्य. गजानन.


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*





बलशाली भारताच्या निर्मितीचा मार्गवस्तू व सेवा करामुळे होणार सुलभ

 बलशाली भारताच्या निर्मितीचा मार्गवस्तू व सेवा करामुळे होणार सुलभ


-राज्यपाल रमेश बैस


केंद्रीय वस्तू व सेवा कर दिनाच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम


 


            मुंबई, दि. १ : देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वस्तू व सेवा कराचे ‘गुड ॲण्ड सिम्पल टॅक्स’ असे वर्णन केलेले आहे. हा कर प्रामाणिकपणे अंमलबजावणी करणाऱ्यांना बक्षीस देतो, तर अप्रामाणिकांना शिक्षा करतो. या करामुळे बलशाली आणि आत्मनिर्भर भारताचा मार्ग सुलभ बनेल, असे उद्गार राज्यपाल रमेश बैस यांनी येथे काढले.


            केंद्रीय वस्तू व सेवा कर कायद्याच्या सहाव्या वर्धापन दिनाचा सोहळा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात आज सकाळी राज्यपाल श्री. बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. यावेळी केंद्रीय वस्तू सेवा कर (सीजीएसटी) मुंबई विभागाचे प्रधान मुख्य आयुक्त प्रमोद अग्रवाल, माजी आयुक्त डॉ. व्ही. के. श्रीनिवासन व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी राज्यपाल श्री. बैस यांच्या हस्ते प्रमुख करदात्यांचे प्रतिनिधी, केंद्रीय वस्तू व सेवा कराच्या मुंबई विभागात उत्कृष्ट कार्य करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला.


            राज्यपाल श्री. बैस म्हणाले की, पूर्वी देशातील प्रत्येक राज्यात वेगवेगळे कर होते. वस्तू व सेवा कर एकात्मिक कर प्रणाली असून जुन्या प्रणालीतील उणिवा दूर केल्या आहेत. या कर प्रणालीने सकारात्मक आणि क्रांतिकारी बदल घडवून आणला आहे. त्यामुळे व्यावसायिकांना कर भरणा करणे सुलभ झाले आहे. पूर्वी देशात ६० लाख व्यावसायिकांनी नोंदणी केली होती. या करामुळे ही नोंदणी एक कोटी ५० लाखांपर्यंत पोहोचली आहे.


            सहा वर्षांपासून ही कर प्रणाली संगणकीकृत पद्धतीने आपले काम करीत आहे. त्याचा परिणाम म्हणून कर संकलन वाढले आहे. या वर्षी एप्रिल महिन्यात सर्वोच्च कर संकलन झाले आहे. तसेच मुंबई विभागातील कर संकलन ३२ हजार कोटी रुपयांवरून ८७ हजार ५०० कोटीपर्यंत पोहोचले आहे. ही निश्चितच समाधानाची बाब आहे. राज्याने २०१७- २०१८ मध्ये ४१ हजार ४६२ कोटी रुपयांचे कर संकलन केले होते. ते आता १ लाख ४ हजार कोटींपर्यंत पोहोचले आहे. तसेच नोंदणी करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे.


            या कर प्रणालीचा लाभ केवळ देशाची अर्थव्यवस्था आणि समाजालाच नाही तर सर्व स्तरातील नागरिकांना झाला आहे. त्यामुळे दैनंदिन वापरातील वस्तूंचे दरही कमी झाले आहेत. यासोबतच शासनाचे उत्पन्न वाढल्याने शिक्षण, आरोग्य, वाहतूक आदी सेवांमध्ये सुधारणा झाली आहे, असेही राज्यपाल श्री. बैस यांनी सांगितले.


            वस्तू व सेवा कर ही एक गतिमान आणि विकसित होत असलेली करप्रणाली आहे. तीत बदलत्या आर्थिक परिस्थितीमुळे उद्भवणाऱ्या आव्हानांना आणि संधींना सामोरे जाण्यासाठी सातत्याने सुधारणा केली जात आहे. त्यासाठी नवनवीन आणि अत्याधुनिक संकल्पनांचा वापर केला जात आहे. वस्तू व सेवा कर परिषदेच्या दर, नियम आणि प्रक्रियांचे पुनरावलोकन आणि सुधारणा करण्यासाठी नियमितपणे बैठका होतात.


            केंद्र आणि राज्य सरकार मिळून लघुउद्योग आणि उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी व्यावसायिक सवलती देत आहेत. कर चोरी कमी करून जागतिक बाजारपेठेत देशाची उत्पादने आणि सेवांची स्पर्धात्मकता वाढवली आहे. जीएसटीने जीवनावश्यक वस्तू आणि सेवांवरील कर दर कमी करून समाजातील गरीब आणि दुर्बल घटकांना दिलासा दिला आहे. या कर प्रणालीच्या माध्यमातून ‘एक कर- एक राष्ट्र’ म्हणून आपली मूल्ये आणि आकांक्षा प्रतिबिंबित करतो, असेही राज्यपाल श्री. बैस म्हणाले.


            केंद्रीय वस्तू व सेवा कर मुंबई विभागाचे आयुक्त श्री. अग्रवाल म्हणाले की, गेल्या सहा वर्षांपासून वस्तू व सेवा कर प्रणालीची यशस्वीपणे अंमलबजावणी सुरू आहे. या माध्यमातून करदात्यांशी वचनबद्धता, सहकार्य करण्यात येत आहे. ही कर प्रणाली तंत्रज्ञानाचा वापर करून संपूर्णपणे संगणकीकृत केलेली आहे. वस्तू व सेवा कर विभाग आणि व्यावसायिकांमधील संवाद वृद्धिंगत झाला आहे. त्याचा परिणाम कर संकलन वाढण्यात झाला आहे. मुंबई विभागाचे कर संकलन ३२ हजार कोटी रुपयांवरून ८७ हजार कोटी रुपयापर्यंत पोहोचले आहे. ते आणखी वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहू, असेही त्यांनी सांगितले. ‘असोचेम’चे चेअरमन शंतनु भटकमकर, “महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स” चे अध्यक्ष ललित गांधी, यू. एन. रंजन, डॉ. श्रीनिवासन, आयसीआयसीआय बँकेचे अमित दवे यांनी मनोगत व्यक्त केले.


००००


 

Featured post

Lakshvedhi