Sunday, 2 July 2023

पांढरे केस काळे करूया*

 *पांढरे केस काळे करूया* 


काल पासून आपण केस विषयावर चर्चा करत आहोत. आज आपण केस का पिकतात, अकाली पांढरे का होतात.याचे नेमके कारण समजून घेऊया. व केस परत नँचरल काळे करायचे असतील तर काय उपाययोजना यांचा अभ्यास करुया.चला तर मंडळी सुरू करुया.

अनेक लोकांना माहिती नसते केस पांढरे का होतात.आणि एकदा का हे केस पांढरे झाले की मग निरनिराळे उद्योग लोक सुरू करतात. मग अनेक कलर,डाय चोपडून त्या केसांना काळे केले जाते कलर केले जातात. पण मुळ समस्येच्या मुळाचा शोधच कुणी घेत नाही परिणाम स्वरूप हळूहळू सारेच केस पांढरे होतात डाय लावले जातात व केस झडणे,गळणे या समस्या जन्म घेतात.

१)मेलानीन,मेलांजीन-केस काळे राहण्यासाठी रक्तात मेलानीन नांवाचे एक रसायन असते.ज्याचे प्रमाण कमी झाले की केस पिकतात. यासाठी शंभर ग्रँम बदाम, शंभर ग्रँम मनुके,दहा ग्रँम मिरी एकत्रित करून मिक्सरमध्ये फिरवून गोळ्या करा.रोज सकाळी चार संध्याकाळी चार रात्री चार खात जा.याने बल,विर्य,पुष्टी सह केस पिकायचे थांबतील.

२)आहारात गाजरज्युस,टाँमँटो ज्युस,अंड्यातील पिवळा बलक,स्ट्राँबेरी, रासबेरी,स्पिरुलिना म्हणजे खाण्यायोग्य शेवाळ अथवा याची कँप्सुल याचा समावेश करा.मेलानीन च प्रमाण नियंत्रित राहून केस पांढरे होणं कमी होईल.

३)रोज चमचा भर काळेतीळ व काळा गुळ खात जा.केसांसाठी ची रंगद्रव्य टिकून राहतात.

आता पाहू काळे करण्याचे पर्याय.

१) केस धुताना तुरटी लावावी डोक्यावर.अथवा थंड अथवा कफ कारक प्रकृती वाल्या मंडळींनी तिळाच्या तेलात तुरटीची पावडर मिक्स करून केसांना लावावी.तर गरम उष्ण प्रकृती वाल्या मंडळींनी खोबरेल तेलात मिक्स करून लावावी.

२)आवळ्याच्या गराची पेस्ट केसांच्या मुळांपासून डाय सारखी लावावी.

३)वरचेवर खोबरेल तेलात लिंबू पिळून लावत जावे यातील बायोटीनीन केसात शुष्कता न येऊन देता ओलावा निर्माण करतं व केस पांढरे होणे कमी होते.

४)आठवड्यात दोन वेळा कढीपत्त्याची पाने पावडर करुन खोबरेल तेलात मिक्स करून माँलीश करुन लावा.

५)चमचा भर चहापावडर व चमचाभर नँचरल काँफी एकत्र करून कपभर पाण्यात उकळून ते पाव कप होईपर्यंत आटवून आठवड्यात एकदा ते दोनदा माँलीश करून चोळा.केस नँचरल काळे व्हायला लागतील सुकल्यानंतर धुवून टाका.

६)पांढऱ्या कांद्याची पेस्ट करून केसांच्या मुळाशी लावत जा केसांना चोळत जा.माँलीश करा.

७)आयुर्वेदिक दुकानात मिळणारी नँचरल मेहंदीपावडर,तमालपत्र एकत्रित कपभर पाण्यात उकळून केसांना डायप्रमाणे पेस्ट करून लावा केस काळे राहतील

८)शिकेकाई रात्री भिजवून सकाळी उकळून गार झाल्यावर केसांना पेस्ट प्रमाणे लावा.

वरील उपाय आलटून पालटून करा 


केस धुण्यासाठी तुम्ही केमिकल विरहित नँचरल शांपू वापरू शकता. उद्याच्या भागात आपण केसांच्या विविध समस्या व त्यावरील आयुर्वेदिक औषधे या वर काय आहेत ते पाहू.

वैद्य. गजानन




No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi