Sunday, 18 June 2023

करपट ढेकरा सारख्या येतात.* *मग हे करून पहा*

 *करपट ढेकरा सारख्या येतात.*

 *मग हे करून पहा*


१) विकारात सोडा पिणे फायदेशीर आहे. सोडा असॅडिक असल्यामुळे गॅसपासून मुक्ती मिळते.

 

 २)काही न मिसळता ताज्या लिंबाचे रस प्यावं.

 

 ३)आल्याचा चहा पिण्याने किंवा आल्याचा रस मध मिसळून पिण्याने फायदा होतो.

 

 ४)सतत ढेकर येत असल्यास तोंडात एक लवंग ठेवून चोखावी.

*निरामय आयुर्वेद प्रचार.तुमच्या आरोग्यासाठी निस्वार्थी सेवा.*

 

५)उचकी किंवा ढेकर येत असल्यास गार दूध पिण्याने फायदा होतो.

६)ढेकर येत असल्यास कोथिंबीरची दंडी चावावी.


 ७)सतत ढेकर येत असल्यास घुट घुट गार पाणी प्यावं.


८)सुतशेखर रस दोन गोळ्या घ्या ढेकरा येणे थांबेलच.


निरामय आयुर्वेद प्रचार


वैद्य. गजानन



*_📍हिमोग्लोबिन_* *_🎯

 *_📍हिमोग्लोबिन_*


*_🎯हिमोग्लोबिन म्हणजे काय :_*


_हिमोग्लोबिन हे तांबड्या पेशींमधील प्रोटीन Molecule असून ते फुफ्फुसांकडून ऑक्सिजन शरीरातील उतींना पुरवण्याचे आणि उतींकडील कार्बनडॉय ऑक्साईड पुन्हा फुफ्फुसांकडे पोहचवण्याचे महत्वत्वपुर्ण कार्य करतात. पोषकतत्त्वांच्या कमतरतेमुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते. खाण्यात लोहाची कमतरता असल्यामुळे हे प्रमाण कमी होते. हिमोग्लोबिन हा रक्तातील अतिशय महत्त्वाचा घटक असून, तो आयर्न (लोह) आणि प्रोटीन (प्रथिने) यापासून बनलेला असतो._


*_🎯हिमोग्लोबिन टेस्ट – HB test in Marathi :_*


_रक्त परिक्षणाद्वारे हिमोग्लोबिनची तपासणी केली जाते. 10 ते 15 मिनिटात HB Test पूर्ण होते. हिमोग्लोबिन कमी झाल्यास रक्तातील ऑक्सीजनच्या वहनाची क्षमता कमी होते. ज्यामुळे लाल रक्त-कणिकांची (RBC रक्तातील लाल पेशींची) संख्या कमी होते आणि अनीमिया होतो. जर शरीरात हिमोग्लोबिनचा स्तर भरपूर कमी असेल तर किडनी रोग, रक्ताची कमतरता, कँसर, पक्षाघात यासारखे आजार होऊ शकता. हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे चक्कर येणे, त्वचा पिवळी पडणे, सुस्ती येणे अशा समस्या येऊ निर्माण होतात._


*_🎯कोणकोणत्या कारणांमुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते..? :_*

_*☞* अयोग्य आहाराच्या सेवनामुळे, पोषणतत्वांच्या कमतरतेमुळे मुख्यतः आहारातील लोह, ब-12 जीवनसत्व, फॉलिक एसिडच्या कमतरतेमुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते._

_*☞* जास्त प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने. उदा. अपघातामुळे, शस्त्रक्रियेवेळी रक्तस्त्राव होणे, मुळव्याध किंवा मलाशयाचा कैन्सर, पोटाचा कैन्सर या विकारात रक्तस्त्राव झाल्यामुळे,_

_*☞* किमोथेरपी औषधांच्या दुष्पपरिणामातून,_

_*☞* किडन्यांचे विकार उद्भवल्याने, किडन्या निकामी झाल्याने रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते._



*_🎯हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी काय खावे व घरगुती उपाय :_*


_हिमोग्लोबिन कसे वाढवावे याची माहिती आत्ता जाणून घेऊया. हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी बीट, काळ्या मनुका, खजूर, आंबा, पेरू, सफरचंद ही फळे खावीत. यामध्ये मोठ्या प्रमाणात लोह असते. हे रक्तातील हीमोग्लोबीनची निर्मीती करते आणि लाल रक्तकणांच्या सक्रियतेला वाढवते._


*_🎯रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठीचा आहार :_*


_*☞* हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी जास्तीत जास्त हिरव्या भाज्या खाल्या पाहिजे. या व्यतिरिक्त तीळ, पालक, दूध व दुधाचे पदार्थ, अंडी, नारळ, शेंगदाणे, गुळ, मोड आलेल्या धान्यांचा रोजच्या आहारात समावेश करा यांमुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढेल._

*_🖊️Written By : डॉ. सतीश उपळकर_*



महाराष्ट्राला ३ राष्ट्रीय जल पुरस्कार

 


महाराष्ट्राला ३ राष्ट्रीय जल पुरस्कार


साताऱ्यातील मलकापूर नगरपरिषद, जालन्यातील कडेगाव ग्रामपंचायतीसह भारतीय जैन संघटनेस पुरस्कार


 नवी दिल्ली, दि. १८ : पाणी व्यवस्थापन, संवर्धन आणि पाण्याचा पुर्नवापर उत्कृष्ट पद्धतीने केल्याबद्दल सातारा जिल्ह्यातील मलकापूर नगरपरिषदेस, जालना जिल्ह्यातील कडेगाव ग्रामपंचायतीला आणि भारतीय जैन संघटनेस उपराष्ट्रपती जगदीप धनखड़ यांच्या उपस्थितीत आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते ४ थ्या राष्ट्रीय जल पुरस्काराने गौरविण्यात आले.


येथील विज्ञान भवनात केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने ४ थ्या राष्ट्रीय जल पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय जल शक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल आणि विश्वेश्वर टुडू, केंद्रीय सचिव पंकज कुमार आदी उपस्थित होते.


कार्यक्रमात विविध श्रेणीत प्रथम आलेल्या राज्यांना, शहरांना, महानगरपालिकांना, नगरपालिकांना, ग्रामपंचायतींना उपराष्ट्रपती यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. द्वितीय आणि तृतीय क्रमांकांचे पुरस्कार केंद्रीय मंत्री श्री. शेखावत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे.


उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार या श्रेणीमध्ये जालना जिल्ह्यातील कडेगाव ग्रामपंचायतीला तिसरा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार सरपंच दत्तु निबांळकर, माजी सरपंच भीमराव जाधव आणि खरपूडी येथील कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ.एस.व्ही. सोनुने यांनी स्वीकारला. हा पुरस्कार मेघालय राज्यातील री भोई जिल्हा येथील मावकिर्देप या ग्रामपंचायती सोबत विभागून मिळालेला आहे.


 


कडेगावचा झाला असा कायापालट


कडेगाव हे खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राच्या अंतर्गत येते. राष्ट्रीय नाविन्यपूर्ण हवामान लवचिक कृषी कार्यक्रम (NICRA- National Innovative Climate Resilient Agriculture program) प्रकल्पा अंतर्गत 2015-16 मध्ये कडेगावाला दत्तक घेण्यात आले. या गावात भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या मार्गदर्शनानुसार विविध हवामान अनुकूल उपक्रम राबविण्यात आले आहेत. त्यापैकी नैसर्गिक साधनसंपत्ती व्यवस्थापन या घटका अंतर्गत गावात सिमेंट नाल्याचे बांधकाम, बांधामधील गाळ काढणे, पाझर तलावातील गाळ काढणे, भूमिगत प्लास्टिक बंधारा बांधणे, कृत्रिम विहीर पुनर्भरण करणे, शेततळ्यातील गाळ काढणे, वाळूच्या गोण्या दाबून चेकडॅम बनविणे, भूमिगत प्लास्टिक बंधारे बांधणे असे उपक्रम हाती घेण्यात आले.


            यासह कमी पाण्यावर येणारी पिके जसे तुती (रेशीम उद्योग), गव्हाऐवजी कमी पाण्यावर येणारी ज्वारी, हरभरा या पिकांना प्रोत्साहन देण्यात आले. कापूस आणि मूग, सोयाबीन आणि तूर अशा आंतरपीक पद्धतींना प्रोत्साहन देण्यात आले. सोयाबीन आणि हरभरा पिकांसाठी बीबीएफचा वापर करण्यात आला. कापूस पिकात ठिंबक सिंचनाचा वापर करण्यात आला. पाणलोट क्षेत्र आधारित उपक्रम-नवीन शेततळी, शेतीचे यांत्रिकीकरण याशिवाय विविध उपक्रमांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या क्षमता वाढविण्यात आल्या. या सर्व उपाय योजनांमुळे गावातील पाणी टंचाईवर पुर्णपूणे मात करण्यात आली. हा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे कडेगावाची मोहर राष्ट्रीय पातळीवर उमटली आहे.


सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यामधील मलकापूर या नगरपरिषदेस उत्कृष्ट नागरी स्थानिक संस्था या श्रेणीत तिसरा राष्ट्रीय पुरस्कार केंद्रीय मंत्री श्री. शेखावत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार नगराध्यक्ष निलम येडगे आणि उपनगराध्यक्ष, पाणीपुरवठा जलनिस्सारण व आरोग्य सभापती मनोहर शिंदे यांनी स्वीकारला. हा पुरस्कार सुरत महानगरपालिकेसह विभागून देण्यात आला.


 


मलकापूर नगर परिषदेतील 24X7 नळ पाणीपुरवठा ठरला पथदर्शी प्रकल्प


             मलकापूर नगरपरिषदेने वर्ष 2009 पासून 24X7 नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली होती. सलग 15 वर्षे अखंडितपणे ही योजना सुरु आहे. यामुळे मलकापूर शहरातील नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा केला जातो. 24X7 नळ पाणीपुरवठा योजनेस वर्ष-2011 चा नॅशनल अर्बन वॉटर ॲवार्ड व पंतप्रधान पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.


ही योजना देशभरातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी पथदर्शी प्रकल्प ठरली आहे. 24 तास पाणी मीटरद्वारे देण्यात येते. यामध्ये जे स्थाननिक नागरिक दर महिन्याच्या 15 तारखेच्या आत पाणीपट्टी कर भरतात त्यांना 10 टक्के सवलत दिली जात असल्याने 90 टक्के नागरिक पाणीपट्टी कर भरतात, अशी माहिती उपनगराध्यक्ष श्री. शिंदे यांनी दिली.


            24X7 नळ पाणीपुरवठा योजनेसाठी कोयना नदीच्या पात्रातून जॅकवेल मधून रॉ-वॉटर घेऊन त्याच्यावर 24X7 फिल्टर प्लांटद्वारे आधुनिक तंत्रज्ञानाने प्रक्रिया केली जाते. डी.आय व एचडीपीई बंद नलिकेद्वारे एएमआर मीटरचा वापर करुन संपूर्ण शहराला पाणीपुरवठा केला जातो. 


         मलकापूर नगरपरिषद 24X7 नळ पाणीपुरवठा योजने बरोबरच मलकापूर नगरपरिषदेने सांडपाणी प्रक्रिया योजना राबविली आहे. या अंतर्गत पाण्याचा पुर्नवापर अतिशय नियोजनबद्दरित्या केला जात आहे. हे पुर्नवापर केलेले पाणी शेतीसाठी वापरण्यात येत आहे. मलकापूर नगरपरिषदेच्या एकूण कार्याचा गौरव राजधानी दिल्लीत करण्यात आला.


स्वयंसेवी सामाजिक संस्था या श्रेणीत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पुणे येथील ‘भारतीय जैन संघटनेस’ (बीजेएस) तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार केंद्रीय मंत्री श्री. शेखावत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. संस्थेचे प्रमुख शांतीलाल मुथा आणि सहायक संचालक स्वप्ना पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला. बीजेएस ही संस्था मागील 37 वर्षांपासून जलस्त्रोत विकास, मुल्य आधारित शालेय शिक्षण, आपत्ती प्रतिसाद व व्यवस्थापन या विषयांवर अविरत काम करीत आहे. 2013 पासून जलसंधारणावर सातत्याने संस्थेचे कार्य सुरू आहे. महाराष्ट्रातील 24 जिल्ह्यांमध्ये पाण्याचे व्यवस्थापन, जलाशयांचे व तलावांचे पुनरुज्जीवन, त्यातून निघणारी माती शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येत असल्यामुळे नापीक झालेली जमीन सुपीक होत आहे. प्रकल्पाच्या एकूण खर्चापैकी साधारण 65% खर्च हा गाळ शेतात नेऊन टाकण्याचा असतो तो शेतकरी स्वत: उचलतात, हे विशेष. राज्यातील बुलढाणा जिल्ह्याला जलपर्याप्त करण्याचे महत्त्वाचे नियोजन कार्य बीजेएस संस्थेच्या माध्यमातून झालेले आहे. आता संस्था राज्य सरकारची ‘गाळ-मुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ योजना प्रभावीपणे राबवण्यात सरकारी यंत्रणेला संपूर्ण सहकार्य करत आहे.


0000


 


                                             


 


 

राष्ट्रीय विधायक संमेलन लोकशाहीला समृद्ध करणारे*

 राष्ट्रीय विधायक संमेलन लोकशाहीला समृद्ध करणारे*


*- राज्यपाल रमेश बैस*


*राष्ट्रीय विधायक संमेलन भारत २०२३ समारोप*


            मुंबई, दि. १७: देशात पहिल्यांदाच सर्व विधायक एकाच ठिकाणी एकत्र आले आहेत. राष्ट्रीय विधायक संमेलनाच्या आयोजनामुळे ही संधी उपलब्ध झाली आहे. अशा प्रकारच्या संमेलनांच्या आयोजनांमुळे देशात लोकशाही समृद्ध व सक्षम होईल. त्यामुळे हे संमेलन निश्चितच लोकशाहीला समृद्ध करणारे ठरले आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज केले. 


     वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स मधील जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथील जास्मिन सभागृहात ‘राष्ट्रीय विधायक संमेलन भारत 2023’ चे आयोजन करण्यात आले. या संमेलनाचा समारोपीय कार्यक्रम आज पार पडला. कार्यक्रमाप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, कर्नाटक विधानसभा अध्यक्ष यु. टी खादर, लोकसभेचे माजी अध्यक्ष मीरा कुमार, शिवराज पाटील तसेच विश्वनाथ कराड, सी.पी जोशी, श्री. सेलम, सतीश महाना आदी उपस्थित होते. 


  कायदे मंडळाच्या कार्यवाहीत डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याची आवश्यकता असल्याचे सांगत राज्यपाल श्री. बैस म्हणाले, की कायदे मंडळाचे कामकाज पेपरलेस झाले पाहिजे. सध्या बऱ्याच विधानसभांमध्ये अर्थसंकल्पीय कामकाज पेपरलेस झाले आहे. देशात नवीन निवडून आलेल्या विधायकाला किमान तीन महिने प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. त्यामुळे कायदे मंडळाची संपूर्ण कार्यवाही त्याला माहिती होईल. विधानसभांमध्ये पारित होणारे विधेयके, कायदे यामुळे समाजावर दूरगामी परिणाम होतात. त्यामुळे विधेयक विधानसभेत विस्तृत चर्चा करूनच पारित झाले पाहिजे. तसेच विधानसभांच्या कामकाजांचे दिवसही निश्चित असावेत. 


निवडणुकांच्या राजकारणापेक्षा प्रत्येक विधायकाने देश हिताला प्राधान्य द्यावे


 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


            देशात विविध पक्ष कार्यरत आहे. प्रत्येक पक्षाचे विधायक विविध राज्यांतील विधानसभांमध्ये आहेत. तरी निवडणुकांच्या राजकारणापेक्षा देशाचे हित, सार्वभौमत्वाला प्रत्येक विधायकाने प्राधान्य दिले पाहिजे. त्यामुळेच लोकशाही सक्षम होऊन संपूर्ण भारत विकसित राष्ट्र होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज व्यक्त केला. 


   राष्ट्रीय विधायक संमेलन भारत 2023 च्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. मुख्यमंत्री श्री. शिंदे पुढे म्हणाले, की संपूर्ण भारतातील विधायक एकच ठिकाणी आले आहे. महाराष्ट्रात या संमेलनाची सुरुवात होणे, ही राज्याच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. कायदेमंडळात जनता आपल्याला निवडून देते. तेथे आल्यानंतर राज्याच्या विकासाचे काम आपल्या हातून होणे आवश्यक आहे. देशात लोकशाही जिवंत राहिली पाहिजे. जरी विधायक वेगवेगळ्या पक्षांचे असले तरी त्यांचे अंतिम ध्येय राज्याचा, देशाचा विकास हेच असले पाहिजे. 


   मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, की देशात वेगवेगळ्या विचारसरणीचे पक्ष आहेत. पक्षांनी आपआपले विचार बाजूला ठेवून देशासाठी संरचनात्मक काम केले पाहिजे. प्रत्येक विधायकाने वैयक्तिक भल्याचा विचार न करता राज्याच्या विकासाचा विचार करावा. दिल्लीत नुकतेच नवीन संसदेचे उद्घाटन करण्यात आले. हे ऐतिहासिक काम कमी कालावधीत पूर्ण करण्यात आले आहे. संसद हे लोकशाहीचे पवित्र मंदिर आहे. लोकशाहीचा दिवा सतत तेवत ठेवण्यासाठी अशा संमेलनाची आवश्यकता आहे. पुढील संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी शेजारी असलेल्या गोवा राज्याने घेतली आहे, हा चांगला पायंडा देशात सुरू झालेला आहे. 


     विधानसभेचे अध्यक्ष श्री. नार्वेकर यावेळी म्हणाले, की विधानसभेच्या कामकाजांमध्ये जगातील सर्वोत्तम संसदीय पद्धतींचा अवलंब झाला पाहिजे. अशा संमेलनांमधून सर्वोत्तम संसदीय पद्धतींची माहिती विधायकांना होत आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या संमेलनाचे आयोजन भविष्यात नियमितरित्या झाले पाहिजे. 


  विधान परिषद उपसभापती श्रीमती गोऱ्हे म्हणाल्या, की अशा ऐतिहासिक संमेलनाची सुरुवात महाराष्ट्रातून झाली आहे. देशातील विधायक एकत्र येवून त्यांचे अनुभव, संसदीय आयुधांचा प्रभावी उपयोग आदी माहितीचे आदान प्रदान झाले. हे सशक्त लोकशाहीचे लक्षण आहे. राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी यावेळी विचार व्यक्त केले. त्यांनी देशापुढील आव्हाने लक्षात घेऊन संसदीय कामकाजात बदल करण्याचे प्रतिपादन केले. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दुसऱ्या विधायक संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी गोव्याला मिळाल्याबद्दल आभार मानले. 


  दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुढील आयोजन गोवा राज्यात होणार असल्यामुळे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना राजदंड देण्यात आला. तिसऱ्या संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी कर्नाटक राज्याने घेतल्यामुळे कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष यु. टी खादर यांचा सत्कारही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी केला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकशाहीचा घंटानाद करण्यात येवून दीप प्रज्वलन करण्यात आले. आभार प्रदर्शन राहुल कराड यांनी केले. कार्यक्रमाला विविध विधानसभांचे अध्यक्ष, सभापती, उपसभापती, उपाध्यक्ष व देशातून आलेले विधायक उपस्थित

 होते.


0000


मीठ

 *मीठ


जगभरातील मानवी समाजांत स्वयंपाकासाठी व अन्नप्रक्रियांसाठी फार पुरातन काळापासून वापरला जाणारा आहारातील एक महत्त्वाचा घटक , क्षार आहे . हे एक प्रकारचे लवण आहे . हे स्फटिक रूपात आढळते नमक (Common Salt) ने साधारणतः आहारात प्रयुक्त होणाऱ्या मीठाचा बोध होताे . रासायनिक दृष्टिकोनातून हे सोडियम क्लोराइड (NaCl) आहे , ज्याचे क्रिस्टल पारदर्शक आणि घन रूपात असतात . शुद्ध मीठ रंगहीन असते परंतु लोहमय अपद्रव्यामुळे याचा रंग पिवळा किंवा लाल होतो. समुद्राच्या खारेपणासाठी यात मुख्यत: सोडियम क्लोराइड ती उपस्थिति हे कारण होते . 

 *खडे मीठ* :- समुद्राच्या पाण्यापासून मिळवलेले नैसर्गिक समुद्र मीठ . हे कुटले की साधे बारीक मीठ बनते .

 *साधे मीठ किंवा बारीक मीठ* :- हे खडे मिठापासून बनते. हे मॅग्नेशियम क्लोराईडचा थोडा अंश असलेले सोडियम क्लोराईड असते . याला हवेतील ओलाव्यामुळे पाणी सुटू शकते . मिठाच्या भांड्यात थोडेसे तांदुळाचे दाणे टाकल्यास मीठ पाघळत नाही .

 *शेंदेलोण ऊर्फ सैंधव* :- याचे खडक असतात . हे मीठ अन्नपचनाला मदत करते . बडीशेप , ओवा , अळशीच्या कुटलेल्या बिया यांच्यात हे मीठ मिसळून उत्तम मुखवास बनतो .

 *पादेलोण ऊर्फ सौवर्चल (संचळ) मीठ* :- हे जमिनीतून मिळवले जाणारे खनिज आहे . पादेलोणाचे खडे असतात . याचा रंग फिकट गुलाबीसर असतो .

 *टेबल सॉल्ट* :- अतिशय बारीक केलेले शुद्ध सोडियम क्लोराईड . याला हवेतील ओलाव्यानेसुद्धा पाणी सुटत नाही . हे जेवणाच्या मेजावर बारीक भोके असलेल्या कुप्यांमध्ये भरून ठेवलेले असते , आणि लागेल तेव्हा हातातल्या खाद्यपदार्थावर शिंपडता येते .

 *हिमालयन पिंक साॅल्ट* :- हे मिठाचे सर्वात शुद्ध रूप आहे . ते हिमालयाच्या पायथ्याशी सापडते . यालाच काळे मीठ म्हणतात . हे अतिशय चवि़ष्ठ असते . यात कॅल्शियम , पोटॅशियम , सोडियम व लोह असते . 


https://chat.whatsapp.com/D4l65sV1RCf4opa92N9fhm

आयुर्वेदात या नेहमीच्या मिठाप्रमाणेच नैसर्गिक (जमीन उकरून मिळवलेले मीठ) , बीड (बिडलोण) , रोमक (जयपूरजवळच्या सांभर तलावातील पाण्यापासून बनलेले मीठ) , पांसुज (fossil salt) वगैरे नावांची मिठे वापरली जातात . या शिवाय फ्रेंच ग्रे सॉल्ट , ज्वालामुखीमुळे भाजल्या गेलेल्या मातीतून मिळणारं हवाईयन रेड सी सॉल्ट , ब्राझिलियन शुद्ध मीठ , अतिशय जुने मिठ , प्रदूषणविरहित असल्यानं गुलाबी दिसणारे शुद्ध स्वरूपातील हिमालयातील सैंधव मीठ असे मिठाचे काही प्रकार आहेत . इतर प्रकारांमध्ये -पेपर सॉल्ट मिठात विशिष्ट मिरची टाकली जाते . भारतीय काळे मीठ , एक्स्प्रेसो सॉल्ट , इराणच्या सॉल्ट लेक्समध्ये मिळणारं पर्शिअन ब्लू सॉल्ट असे विविध प्रकार जगभर वापरात आहेत .

अल्प प्रमाणातील मीठ प्राणिजीवनास आवश्यक असते , मात्र अति प्रमाणातील मीठ हानिकारक असते . हा क्षार शरीराच्या सर्व भागात आढळतो . शरिरातील चयापचयासाठी व वितरणासाठी हा आवश्यक घटक आहे . जठरातील रस व पित्त बनवण्यास मदत करतो या क्षारामुळे शरीरातील आम्ल संतुलित राहते व मज्जारज्जू व मासपेशींचे कार्य व्यवस्थित चालते . शरीरातील या क्षाराचे प्रमाण कमी झाल्यास अशक्तपणा येतो , त्वचा ढिली पडते , पोटऱ्यांमध्ये गोळे येतात . वजन कमी होते , डोळे खोल जातात , मानसिक दुर्बलता जाणवते , हदयाच्या कार्यात फरक पडतो . याउलट अधिक खाल्यामुळे पित्त वाढते , रक्ताच्या गतीमध्ये वाढ होते (रक्तदाब वाढतो) , तहान लागते , मूर्च्छा येते , हाडे कमकुवत होतात , चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात , केस पांढरे होतात , मूत्रपिंडाचे काम वाढते हात , पाय , चेहरा व पोट यांवर सूज येते . आहारात मिठाचे प्रमाण चवीपुरतेच असावे .

आपल्याला शरीराला गरजेच्या असणाऱ्या सोडियमपैकी 90 टक्के वाटा नेहमीच्या वापरातील साध्या मीठातून मिळतो. 

लोकांनी रोज तीन ते पाच ग्रॅमहून कमी नमक खायला हवं , असा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे . म्हणजे साधारणतः एक चमचाभरच मीठ आपल्या शरीराला गरजेचं असतं .

पण भारतातील सरकारी आकडेवारीनुसार , सर्वसामान्य व्यक्ती लोक 11 ग्रॅमपर्यंत मीठ खाते .

समुद्री मीठ स्वाभाविकपणे समुद्रातील खाऱ्या पाण्याचं बाष्पीभवन करून तयार केलं जातं . हे मीठ शुद्ध नसतं आणि त्यात जास्त प्रमाणात खनिज-लवण असतं . शिवाय, त्यात बरंच आयोडिनसुद्धा असतं , ते आपल्या शरीरासाठी चांगलं असतं . समुद्री मिठामध्ये शुद्ध मिठाच्या तुलनेत 10 टक्के कमी सोडियम असतं .

हिमालयातून काढल्या जाणाऱ्या गुलाबी मिठातसुद्धा सोडियमचं प्रमाण कमी असतं आणि त्यात मॅग्नेशियम व पोटेशियम यांसारखी खनिजं असतात .

सेल्टिक सॉल्ट किंवा राखाडी मिठामध्येसुद्धा सोडियमचं प्रमाण कमी असतं आणि इतर खनिजं जास्त प्रमाणात असतात . हे मीठ नैसर्गिक असतं , त्यात कोणताही बाहेरचा पदार्थ मिसळला जात नाही .



Saturday, 17 June 2023

बकरीद की पार्श्वभूमि पर

 


बकरीद की पार्श्वभूमि पर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ने की बैठकगृह विभाग को योजना बनाने के निर्देश

             मुंबई, दि. 17:- आगामी बकरीद पर्व की योजना बनाने के लिए मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की अध्यक्षता में उपमुख्यमंत्री एवं गृह मंत्री देवेंद्र फडणवीस की उपस्थिति में बैठक हुई.


             सह्याद्री अतिथीगृह में हुई बैठक में मुंबई शहर के जिला पालक मंत्री दीपक केसरकर, ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन, कृषि मंत्री अब्दुल सत्तार, विधायक अबू आजमी, विधायक रईस शेख, मुख्य सचिव मनोज सौनिक, अतिरिक्त मुख्य सचिव गृह विभाग सुजाता सौनिक, पुलिस महानिदेशक रजनीश सेठ, मुंबई पुलिस आयुक्त विवेक फनसालकर, मुंबई नगर आयुक्त और प्रशासक डॉ. आई एस चहल, जमात उलेमा के प्रदेश अध्यक्ष नदीम सिद्दीकी, विभिन्न जिलों के मुस्लिम मौलवी और सामुदायिक संगठनों के प्रतिनिधि मौजूद थे. बकरीद के लिए हेल्पलाइन शुरू की जाएगी. मार्केट कमेटियों के बाहर बकरों की बिक्री की अनुमति होगी. पशु चिकित्सा परीक्षा शुल्क पूर्व की भांति वसूले जाने के निर्देश दिये जायेंगे, ऐसे निर्णय बैठक में लिए गए.


             मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे ने कहा कि सरकार ने हमेशा सभी धार्मिक त्योहारों की तरह बकरीद के त्योहार की भी योजना बनाई है. महाराष्ट्र राज्य के त्योहारों में कानून व्यवस्था की मिसाल हमेशा दी जाती है. हमारे सभी त्यौहार हमेशा सभी धर्मों के भाइयों और बहनों द्वारा एकत्रित रुप से मिलजुलकर मनाए जाते हैं. हमारे गृह विभाग की ओर से गणेश चतुर्थी, नवरात्रि चतुर्थी, दीवाली जैसे ही ईद की योजना बनाई जाती हैं. कानून और सुव्यवस्था बनाए रखना सभी धर्मों की जिम्मेदारी है. हमें अपने सभी भाई-बहनों के साथ अमन और चैन से आगे बढ़ना है, ऐसा मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे ने कहा.


       

आंतरराष्ट्रीय योगदिनी विधान भवनाच्या प्रांगणातमान्यवरांच्या सहभागात योगासनांची प्रात्यक्षिके

 आंतरराष्ट्रीय योगदिनी विधान भवनाच्या प्रांगणातमान्यवरांच्या सहभागात योगासनांची प्रात्यक्षिके


        मुंबई, दि. १७ : यंदाच्या वर्षी आंतरराष्ट्रीय योगदिनी म्हणजेच बुधवार, दिनांक २१ जून, २०२३ रोजी प्रात:काली विधान भवनाच्या प्रांगणात योग प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम माननीय विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला आहे. सन्माननीय विधिमंडळ सदस्यांसह सुमारे २००० योगप्रेमी याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. सकाळी ७ ते ९.०० यावेळेत II योगप्रभात @ विधान भवन II हा कार्यक्रम होईल. यावेळी विशेष अतिथी म्हणून माननीय राज्यपाल श्री. रमेश बैस, माननीय मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, माननीय उप मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. विधानपरिषदेच्या माननीय उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे माननीय उपाध्यक्ष श्री. नरहरी झिरवाळ यांची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती लाभेल तसेच विशेष निमंत्रित म्हणून सर्व मंत्रीगण, माननीय विधानपरिषद विरोधी पक्षनेते श्री. अंबादास दानवे, माननीय विधानसभा विरोधी पक्षनेते श्री. अजित पवार हे उपस्थित राहतील.


            योगविद्या आणि ध्यानधारणा ही आपल्या भारतीय संस्कृतीकडून अखिल विश्वाला लाभलेली अनमोल देणगी आहे. २१ जून हा दिवस "आंतरराष्ट्रीय योग दिवस" म्हणून साजरा करण्यात येणे ही सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद अशी घटना आहे. भारताचे पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेनुसार जगातील सर्वच देशांमध्ये या दिवशी सामूहिक योगासनांचे कार्यक्रम आयोजित केले जातात आणि आरोग्यसंपन्न जीवनशैलीसाठी योगाचे महत्व अधोरेखित केले जाते. याच पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम यंदा विधान भवन, मुंबई येथे आयोजित करण्यात आल्याचे माननीय विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले. अधिकाधिक सन्माननीय सदस्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले आहे. योगप्रसार कार्यात उल्लेखनीय योगदान देत असलेल्या शतकमहोत्सवी कैवल्यधाम, मुंबई या संस्थेचा विशेष सहभाग या उपक्रमासाठी लाभला आहे. 


                                                                               

Featured post

Lakshvedhi