Sunday, 18 June 2023

मीठ

 *मीठ


जगभरातील मानवी समाजांत स्वयंपाकासाठी व अन्नप्रक्रियांसाठी फार पुरातन काळापासून वापरला जाणारा आहारातील एक महत्त्वाचा घटक , क्षार आहे . हे एक प्रकारचे लवण आहे . हे स्फटिक रूपात आढळते नमक (Common Salt) ने साधारणतः आहारात प्रयुक्त होणाऱ्या मीठाचा बोध होताे . रासायनिक दृष्टिकोनातून हे सोडियम क्लोराइड (NaCl) आहे , ज्याचे क्रिस्टल पारदर्शक आणि घन रूपात असतात . शुद्ध मीठ रंगहीन असते परंतु लोहमय अपद्रव्यामुळे याचा रंग पिवळा किंवा लाल होतो. समुद्राच्या खारेपणासाठी यात मुख्यत: सोडियम क्लोराइड ती उपस्थिति हे कारण होते . 

 *खडे मीठ* :- समुद्राच्या पाण्यापासून मिळवलेले नैसर्गिक समुद्र मीठ . हे कुटले की साधे बारीक मीठ बनते .

 *साधे मीठ किंवा बारीक मीठ* :- हे खडे मिठापासून बनते. हे मॅग्नेशियम क्लोराईडचा थोडा अंश असलेले सोडियम क्लोराईड असते . याला हवेतील ओलाव्यामुळे पाणी सुटू शकते . मिठाच्या भांड्यात थोडेसे तांदुळाचे दाणे टाकल्यास मीठ पाघळत नाही .

 *शेंदेलोण ऊर्फ सैंधव* :- याचे खडक असतात . हे मीठ अन्नपचनाला मदत करते . बडीशेप , ओवा , अळशीच्या कुटलेल्या बिया यांच्यात हे मीठ मिसळून उत्तम मुखवास बनतो .

 *पादेलोण ऊर्फ सौवर्चल (संचळ) मीठ* :- हे जमिनीतून मिळवले जाणारे खनिज आहे . पादेलोणाचे खडे असतात . याचा रंग फिकट गुलाबीसर असतो .

 *टेबल सॉल्ट* :- अतिशय बारीक केलेले शुद्ध सोडियम क्लोराईड . याला हवेतील ओलाव्यानेसुद्धा पाणी सुटत नाही . हे जेवणाच्या मेजावर बारीक भोके असलेल्या कुप्यांमध्ये भरून ठेवलेले असते , आणि लागेल तेव्हा हातातल्या खाद्यपदार्थावर शिंपडता येते .

 *हिमालयन पिंक साॅल्ट* :- हे मिठाचे सर्वात शुद्ध रूप आहे . ते हिमालयाच्या पायथ्याशी सापडते . यालाच काळे मीठ म्हणतात . हे अतिशय चवि़ष्ठ असते . यात कॅल्शियम , पोटॅशियम , सोडियम व लोह असते . 


https://chat.whatsapp.com/D4l65sV1RCf4opa92N9fhm

आयुर्वेदात या नेहमीच्या मिठाप्रमाणेच नैसर्गिक (जमीन उकरून मिळवलेले मीठ) , बीड (बिडलोण) , रोमक (जयपूरजवळच्या सांभर तलावातील पाण्यापासून बनलेले मीठ) , पांसुज (fossil salt) वगैरे नावांची मिठे वापरली जातात . या शिवाय फ्रेंच ग्रे सॉल्ट , ज्वालामुखीमुळे भाजल्या गेलेल्या मातीतून मिळणारं हवाईयन रेड सी सॉल्ट , ब्राझिलियन शुद्ध मीठ , अतिशय जुने मिठ , प्रदूषणविरहित असल्यानं गुलाबी दिसणारे शुद्ध स्वरूपातील हिमालयातील सैंधव मीठ असे मिठाचे काही प्रकार आहेत . इतर प्रकारांमध्ये -पेपर सॉल्ट मिठात विशिष्ट मिरची टाकली जाते . भारतीय काळे मीठ , एक्स्प्रेसो सॉल्ट , इराणच्या सॉल्ट लेक्समध्ये मिळणारं पर्शिअन ब्लू सॉल्ट असे विविध प्रकार जगभर वापरात आहेत .

अल्प प्रमाणातील मीठ प्राणिजीवनास आवश्यक असते , मात्र अति प्रमाणातील मीठ हानिकारक असते . हा क्षार शरीराच्या सर्व भागात आढळतो . शरिरातील चयापचयासाठी व वितरणासाठी हा आवश्यक घटक आहे . जठरातील रस व पित्त बनवण्यास मदत करतो या क्षारामुळे शरीरातील आम्ल संतुलित राहते व मज्जारज्जू व मासपेशींचे कार्य व्यवस्थित चालते . शरीरातील या क्षाराचे प्रमाण कमी झाल्यास अशक्तपणा येतो , त्वचा ढिली पडते , पोटऱ्यांमध्ये गोळे येतात . वजन कमी होते , डोळे खोल जातात , मानसिक दुर्बलता जाणवते , हदयाच्या कार्यात फरक पडतो . याउलट अधिक खाल्यामुळे पित्त वाढते , रक्ताच्या गतीमध्ये वाढ होते (रक्तदाब वाढतो) , तहान लागते , मूर्च्छा येते , हाडे कमकुवत होतात , चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात , केस पांढरे होतात , मूत्रपिंडाचे काम वाढते हात , पाय , चेहरा व पोट यांवर सूज येते . आहारात मिठाचे प्रमाण चवीपुरतेच असावे .

आपल्याला शरीराला गरजेच्या असणाऱ्या सोडियमपैकी 90 टक्के वाटा नेहमीच्या वापरातील साध्या मीठातून मिळतो. 

लोकांनी रोज तीन ते पाच ग्रॅमहून कमी नमक खायला हवं , असा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे . म्हणजे साधारणतः एक चमचाभरच मीठ आपल्या शरीराला गरजेचं असतं .

पण भारतातील सरकारी आकडेवारीनुसार , सर्वसामान्य व्यक्ती लोक 11 ग्रॅमपर्यंत मीठ खाते .

समुद्री मीठ स्वाभाविकपणे समुद्रातील खाऱ्या पाण्याचं बाष्पीभवन करून तयार केलं जातं . हे मीठ शुद्ध नसतं आणि त्यात जास्त प्रमाणात खनिज-लवण असतं . शिवाय, त्यात बरंच आयोडिनसुद्धा असतं , ते आपल्या शरीरासाठी चांगलं असतं . समुद्री मिठामध्ये शुद्ध मिठाच्या तुलनेत 10 टक्के कमी सोडियम असतं .

हिमालयातून काढल्या जाणाऱ्या गुलाबी मिठातसुद्धा सोडियमचं प्रमाण कमी असतं आणि त्यात मॅग्नेशियम व पोटेशियम यांसारखी खनिजं असतात .

सेल्टिक सॉल्ट किंवा राखाडी मिठामध्येसुद्धा सोडियमचं प्रमाण कमी असतं आणि इतर खनिजं जास्त प्रमाणात असतात . हे मीठ नैसर्गिक असतं , त्यात कोणताही बाहेरचा पदार्थ मिसळला जात नाही .



No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi