Saturday, 17 June 2023

रत्नागिरी वैद्यकीय महाविद्यालयासाठी ४४८ पदनिर्मितीसह १०५.७८ कोटी खर्चासही मान्यता

 रत्नागिरी वैद्यकीय महाविद्यालयासाठी ४४८ पदनिर्मितीसह १०५.७८ कोटी खर्चासही मान्यता


- वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांची माहिती


 


            मुंबई, दि. १७ : रत्नागिरी येथे १०० विद्यार्थी क्षमतेसह संलग्नीत ४३० खाटांचे रुग्णालय सुरु करण्यास मागील वर्षी मान्यता देण्यात आली होती. आता रत्नागिरी वैद्यकीय महाविद्यालयासाठी ४४८ पदनिर्मितीस मान्यता देण्यात आली असून याकरीता रु. १०५.७८ कोटी खर्चासही मान्यता देण्यात आली असल्याची माहिती ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण आणि क्रीडा मंत्री गिरीष महाजन यांनी माहिती दिली.


            मंत्री गिरीष महाजन म्हणाले की,युती शासनाचा मागील ०९ वर्षात १० शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरु करण्यात आले आहेत. रत्नागिरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या तसेच सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास संलग्नित ५०० रुग्णखाटांच्या रुग्णालयाच्या रुपात कोकणवासीयांना शासनाने दुहेरी आरोग्यदायी भेट दिली असल्याचे त्यांनी सांगितले.


दरवर्षी हजारो नवीन डॉक्टर्स निर्माण होणार


मंत्री गिरीष महाजन म्हणाले, स्वातंत्र्यानंतर मागील जवळपास ६० वर्षात केवळ ११ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरु करण्यात आली आहेत. तर सन २०१४ पासून २०२३ पर्यंत ०९ वर्षात १० वैद्यकीय महाविद्यालये राज्याच्या सुरु करण्यात आली आहेत. त्यामुळे दरवर्षी हजारो नवीन डॉक्टर्स निर्माण होवून राज्यभर आरोग्य सेवेचा विस्तार होणार आहे.


मागील ०९ वर्षातील १० वे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु


रत्नागिरी येथील नवीन वैद्यकीय महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला असून मागील ०९ वर्षातील १० वे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु झाले आहे. तसेच ज्या जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालये नाहीत, अशा ०९ जिल्ह्यांमध्ये नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरु करण्याच्या प्रस्तावास लवकरच मान्यता देण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी यावेळी सांगितले.


रत्नागिरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या शैक्षणिक वर्षापासून प्रथम वर्षाचे प्रवेश सुरु होणार


  रत्नागिरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सन २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्यास केंद्राचा हिरवा कंदील मिळाला असून या शैक्षणिक वर्षापासून प्रथम वर्षाचे प्रवेश सुरु होणार असल्याचे मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले.


सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित ५०० रुग्णखाटांच्या रुग्णालयाकरीता १०८६ पद निर्मीतीस मान्यता


याच बरोबर सिंधुदुर्ग येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित ५०० रुग्णखाटांच्या रुग्णालयाकरीता आवश्यक एकूण १०८६ पदनिर्मीतीसही मान्यतेचा शासन निर्णय काढण्यात आला असून त्यापोटी १०९.१९ कोटी रुपयांचा भार शासनाच्या तिजोरीवर पडणार आहे. सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यापूर्वीच सुरु झाले आहे.


रत्नागिरी येथील १०० विद्यार्थी क्षमतेचे नवीन शासकीय महाविद्यालय व सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित ५०० रुग्णखाटांचे रुग्णालय सुरु झाल्याने कोकणवासीयांना वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांच्याकडून दूहेरी भेटच मिळाली आहे.


कोकणातील ग्रामीण भागातील नागरीकांना आरोग्य विषयक चांगल्या सोयीसुविधा मिळणार


            त्यामुळे कोकणातील सर्वसामान्य नागरिकांना विशेषोपचार आरोग्य सुविधा माफक दरात उपलब्‍ध होणार आहेत. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरील खर्चात बचत होणार आहे. कोकणातील आसपासच्या ग्रामीण भागातील नागरीकांना आरोग्य विषयक चांगल्या सोयीसुविधा मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून या महत्त्वपूर्ण निर्णयाचे सामान्य नागरिकांतून स्वागत केले जात आहे.


000000

भारतीय जनता पार्टी, कांदिवली पूर्व विधानसभेच्या वतीने 'मोदी @ ९' च्या पार्शवभूमीवर

 भारतीय जनता पार्टी, कांदिवली पूर्व विधानसभेच्या वतीने 'मोदी @ ९' च्या पार्शवभूमीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, १८ जून रोजी हे कार्यक्रम पार पडणार आहेत. या कार्यक्रमासाठी भाजपचे राष्ट्रीय महासचिव सी. टी. रवी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाल्याची माहिती भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी दिली. भाजपचे राष्ट्रीय महासचिव तसेच महाराष्ट्राचे प्रभारी सी. टी. रवी या कार्यक्रमांसाठी उपस्थित राहणार आहेत.


दुपारी १२.३० वाजता मालाड पूर्व मधील पारेख हॉल येथे 'टिफिन बैठक' होणार आहे. २.३० वाजता विशेष व्यक्ती संपर्क, ३.३० वाजता महिला बचत गट आणि लाभार्थी संमेलन महिला आधार भवन, हनुमान नगर येथे होणार आहे. सायंकाळी ५ वाजता लोखंडवाला कॉम्प्लेक्स येथे प्रभावशाली व्यक्ती संमेलन होणार आहे. सायंकाळी ६ वाजता कॅन्सर रुग्ण सेवा केंद्र, लोखंडवाला कॉम्प्लेक्स आणि आकुर्ली रोड येथील रोटी बँक येथे विकासतीर्थ संपर्क अभियान होणार आहे. ६.६० वाजता पायोनियर स्कूल येथे बुद्धीजिवी संमेलन होणार आहे.


या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर तयारी पूर्ण झाली असून कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टी, कांदिवली पूर्व विधानसभेच्या वतीने करण्यात आले आहे.


 

निगडी येथे महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

 



निगडी येथे महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण


महात्मा बसवेश्वरांकडून १२ व्या शतकात संसदीय लोकशाहीची पायाभरणी


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


            पुणे, दि. १६: महात्मा बसवेश्वर यांनी १२ व्या शतकातच ‘अनुभवमंटप’ च्या माध्यमातून संसदीय लोकशाहीची पायाभरणी केली. जातीभेदाच्या भिंती तोडून टाकण्यासाठी त्यांनी स्वत:पासून सुरुवात केली, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले.


            निगडी येथे उभारण्यात आलेल्या महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. याप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, महेश लांडगे, अश्विनी जगताप, अण्णा बनसोडे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आयुक्त राहुल महिवाल, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आदी उपस्थित होते.


            मुख्यमंत्री म्हणाले, बसवेश्वरांनी समाजाप्रती आस्था, बांधिलकी दाखवून दिली. इंग्लंडमधील मॅग्नाकार्टा या संसदीय प्रणालीच्या आधीच त्यांनी ‘अनुभवमंटप’च्या माध्यमातून लोकशाही प्रणालीची व्यवस्था निर्माण केली. स्त्री-पुरुष, धर्म, जात- पात, पंथ भेदाच्या पलिकडे जाऊन कोणीही ‘अनुभवमंटप’ मध्ये आपले अनुभव मांडू शकत होते. श्रम हीच पूजा आणि श्रमाधारित व्यवस्था इतके साधे सोपे तत्त्वज्ञान महात्मा बसवेश्वरांनी सरळ सोप्या भाषेत मांडले.


            देवाशी म्हणजे शिवाशी जोडण्यासाठी मध्यस्थाची गरज नाही अशी मांडणी त्यांनी केली. त्यांच्या तत्वज्ञानाची जगभरातील विद्यापीठांनी दखल घेतली. महात्मा बसवेश्वर यांनी खऱ्या अर्थाने समता, बंधुता या तत्त्वांचा पुरस्कार केला. महापुरुषांचे समाजासाठी योगदान मोठे आहे. त्यांच्या विचारांवर चालत सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम आपण करत असतो. महात्मा बसवेश्वरांनी समता, बंधुतेच्या तत्त्वांसाठी कोणतीही तडजोड केली नाही.


            महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा हे प्रेरणास्थळ, ऊर्जास्थळ आहे. त्यांचा लंडन येथेही पुतळा उभारण्यात आला आहे. हे महापुरुष आपल्याला आदर्श देऊन गेले आहेत. निगडी येथील पुतळा लोकवर्गणी लोकसहभागातून केला याला जास्त महत्त्व आहे. त्यांचा त्याग, आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आपण हे मोठे काम केले आहे, असे श्री.शिंदे म्हणाले. यापुढेही पुतळा परिसर सुशोभिकरणासंबंधित आवश्यक कामासाठी पैसे कमी पडणार नाहीत. या परिसरातील दफनभूमीचा प्रश्नही सोडविण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिली.


            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, हे वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांचे ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्याचे वर्ष आहे. हीदेखील आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेऊन शासन काम करत आहे.


            प्रास्ताविकात आयुक्त शेखर सिंह यांनी पुतळा उभारणीमागची संकल्पना स्पष्ट केली. समतावादी मुल्ये रुजविण्यासाठी महात्मा बसेवश्वरांनी प्रयत्न केले. त्यांनी न्याय, बंधूता आणि एकतेची शिकवण दिली. समाजातील सर्व घटकांना एकत्र आणण्याचे कार्य त्यांनी केले. त्यांचे विचार मानवी जीवनाला प्रगत करणारे होते. महापुरुषांच्या अशा विचारांमुळे नव्या पिढीला दिशा मिळते, असे त्यांनी सांगितले.


            पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने निगडी प्राधिकरण येथे श्री महात्मा बसवेश्वर महाराज यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. सुमारे ३ हजार १५० चौरस मीटर क्षेत्र परिसरात पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे. या पुतळ्यासमोरील जागेचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. पुतळ्याभोवती २२५ मीटर लांबीची सीमाभिंत बांधण्यात 

आली आहे.


0000


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना योजना, सेवांच्या लाभाचे वाटप

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील

नागरिकांना योजना, सेवांच्या लाभाचे वाटप






शेवटच्या लाभार्थ्याला लाभ मिळेपर्यंत 'शासन आपल्या दारी' अभियान सुरू राहील


- मुख्यमंत्री


            पुणे, दि. 16 : 'शासन आपल्या दारी' या उपक्रमाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यत शासकीय योजना पोहचविण्यासाठी शासन व प्रशासन प्रयत्नशील असून शेवटच्या नागरिकाला विविध योजनांचा लाभ मिळेपर्यंत हे अभियान सुरू राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.


पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते शासकीय योजना व विविध सेवांच्या लाभाचे प्रातिनिधीक स्वरुपात वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, महेश लांडगे, अश्विनी जगताप, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आयुक्त राहुल महिवाल, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आदी उपस्थित होते.


मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, ‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या माध्यमातून प्रशासकीय यंत्रणा गतीमान करण्यात आली आहे. 1 एप्रिलपासून या अभियानाची सुरुवात करण्यात आली. पुणे जिल्ह्यात 2 लाख 86 हजार 278 लाभार्थ्यांना लाभाचे वाटप करण्यात आले. आतापर्यंत राज्यात 35 लाख नागरिकांपर्यंत शासन पोहोचले आहे. 104 शिबिराच्या माध्यमातून 286 कोटी रुपयांचा लाभ नागरिकांना देण्यात आला आहे. या अभियानामुळे कोणीही लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही.


मंत्रिमंडळाच्या माध्यमातून अनेक जनहिताचे निर्णय


            मंत्रिमंडळाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. शेतकरी, कष्टकरी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग बांधव, महिला भगिनींसाठी महत्वाचे निर्णय घेतले. ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी प्रवास मोफत व महिलांसाठी प्रवास शुल्कात 50 टक्के सवलत देण्यात आली आहे. शासनाच्या निर्णयांचा सर्वसामान्य जनतेला लाभ होत आहे.


‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेनुसार राज्य शासनही 6 हजार रुपये भर घालणार असल्याने 12 हजार इतका वार्षिक लाभ पात्र शेतकरी कुटुंबांना मिळणार आहे. राज्यातील 18 हजार कोटी रुपयांच्या 29 सिंचन प्रकल्पांना मान्यता देण्यात आली, त्यामुळे 6 ते 7 लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून एनडीआरएफच्या निकषांच्या दुप्पट निधी देण्याचा आणि सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई देता यावी यासाठी 1 हजार 500 कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


पिंपरी चिंचवड परिसर विकासासाठी महत्वाचे निर्णय


            पिंपरी चिंचवड विकासासाठी अनेक निर्णय घेतले. 2018 ते 2023 पर्यंतचे विकास आणि बांधकामाचे अतिरिक्त विकास शुल्क 100 टक्के माफ करण्याचा निर्णय. एप्रिल 2023 पासून क्षेत्रनिहाय तपासून आकारणीचा निर्णय घेण्यात आला आहे. मोशी येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी अडीच एकर जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. पिंपरी चिंचवड हद्दीतील अनधिकृत बांधकामासाठीचा 460 कोटी रुपयांचा शास्तीकर माफ करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड नवनगर प्राधिकरणाच्या भूसंपादनामुळे बाधित झालेल्या भूमिपूत्रांचा प्रश्न सोडविण्यात येईल, असेही ते म्हणाले.


जिल्ह्याच्या विकासाला गती


            पालखी मार्ग आणि पुणे-मिरज रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. चांदणी चौकातील कामही पूर्ण होत आहे. जेजुरी तीर्थक्षेत्र विकास आणि वढू बुद्रुक येथे संभाजी महाराज स्मारक काम लवकरच सुरू करण्यात येईल. यशवंतराव चव्हाण स्मारकासाठी 5 कोटी रुपये देण्यात येतील. पुण्यातील नद्यांमधील पाणी निर्मळ राहावे यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून जलशुद्धीकरणासाठी निधी देण्यात आला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.


महिला सक्षमीकरणासाठी महत्वाची पाऊले


            ‘लेक लाडकी लखपती’ ही योजना महिला व मुलींच्या विकासासाठी सुरु करण्यात आली आहे. महिलांना सक्षम करण्यासाठी महिला बचत गटाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहे. प्रशासनाने बचत गटाच्या उत्पादनांना बाजार उपलब्ध करून देण्याचा आणि फिरता निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात येईल. राज्यात 2 कोटी पेक्षा अधिक महिलांना शासनाच्या योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न आहे. संजय गांधी निराधार योजनेसाठी उत्पन्नाच्या दाखल्याची मुदत 5 वर्ष करण्यात येईल, असेही श्री.शिंदे यांनी सांगितले.


राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना


            लोकांचे जीवन सुखी, आनंदी करणे आणि त्यांच्या आयुष्यात अनुकूल बदल घडवून आणणे हे शासनाचे उद्दीष्ट आहे. म्हणूनच सर्वसामान्य जनतेला केंद्रस्थानी घेवून त्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात येत आहेत. राज्यात पायाभूत सुविधांचे अनेक मोठे प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र प्रथम स्थानावर असून गेल्या सुमारे 11 महिन्यात 1 लाख 18 हजार कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात आणल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.


शिबिरांतर्गत नागरिकांना विविध योजना आणि सेवांचा लाभ


            मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्या हस्ते ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाअंतर्गत प्रातिनिधीक स्वरुपात शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना लाभाचे वाटप, महापालिकेच्या समाजविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनेअंतर्गत लाभांचे वितरण तसेच विविध दाखल्यांचे मोफत वाटप करण्यात आले. जेएनएनयुआरएम योजनेअंतर्गत महापालिकेच्यावतीने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या घरकुल योजनेतील सहा इमारतींमधील 252 सदनिकांचे वाटप यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात करण्यात आले. कोविड संकटाच्या काळात महानगरपालिकेमार्फत नियुक्त केलेल्या मयत कामगारांच्या वारसांना कोरोना विषाणू विमा कवच योजनेच्या प्रत्येकी 25 लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला. शेवटी कृषि यांत्रिकीकरण योजनेंतर्गत शेतकरी लाभार्थ्यांना ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले.


शिबिरात विविध योजनांची माहिती


            या कार्यक्रमासाठी थेरगाव येथील पदमजी पेपर मिलजवळ भव्य मंडपात विविध कक्ष तयार करण्यात आले होते. नागरिकांना याठिकाणी विविध योजनांची माहिती देण्यात आली. उत्पन्नाचा दाखला, नवीन मतदार नोंदणी, रहिवासी दाखला, सातबारा, आठ अ, हवेली तालुक्यातील रहिवाशांकरिता जातीचा दाखला, वय, अधिवास आणि राष्ट्रीयत्व दाखला, 33 टक्के महिला आरक्षण दाखला, ज्येष्ठ नागरिकत्वाचा दाखला देण्याची सुविधा करण्यात आली होती. आधार कार्डमधील नवीन दुरूस्ती व अद्यावत करणे, मतदार कार्ड आधार कार्डशी लिंक करणे, शिधापित्रकेवरील नाव कमी करणे, रेशनकार्डवरील नाव वाढविणे, संजय गांधी निराधार अनुदान योजना, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीचा दाखला, नॉन क्रिमीलिअर, उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचा दाखला देणे आदी सेवाही यावेळी देण्यात आल्या.


****



 

वालचंद हिराचंद यांचे जीवन प्रेरणादायी: लोकसभा अध्यक्ष ओम बिरला

 वालचंद हिराचंद यांचे जीवन प्रेरणादायी: लोकसभा अध्यक्ष ओम बिरला


वालचंद हिराचंद यांनी तिन्ही लोकात भारताचा झेंडा रोवला: राज्यपाल रमेश बैस


राज्यपालांच्या हस्ते नूतन अध्यक्ष ललित गांधी, वरिष्ठ उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा यांचा दिमाखदार पदग्रहण सोहळा संपन्न


मुंबई : भारत ही संत, शूरवीर योद्धे आणि समाज सुधारकांची जशी भूमी आहे, तशीच ती महान उद्योजकांची देखील भूमी आहे. वालचंद हिराचंद यांनी बिकट परिस्थितीत उद्योग उभारणीसह नवीनता व संशोधनाचे काम केले. उद्योग विकासाची दूरदृष्टी असलेल्या वालचंद हिराचंद यांचे जीवन प्रेरणादायी असल्याचे उद्गार ओम बिरला यांनी याप्रसंगी काढले.


महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’चे संस्थापक शेठ वालचंद हिराचंद यांच्या स्मृती व्याख्यानाचे सुवर्णमहोत्सवी पुष्प शुक्रवारी राजभवनातील दरबार हॉलमध्ये गुंफण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. लोकसभा अध्यक्ष ओम बिरला आणि राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स,इंडस्ट्री, अ‍ॅग्रीकल्चरचे नवनिर्वाचित अध्यक्ष ललित गांधी आणि वरिष्ठ उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा यांचा सन्मानपूर्वक पदग्रहण समारंभ झाला.

लोकसभा अध्यक्ष ओमजी बिरला म्हणाले, आज देश स्वातंत्र्याच्या अमृतकाळातून प्रवास करीत असताना भारत प्रत्येक क्षेत्रात नवीनता व संशोधन करीत आहे. कोविड लसीकरण मात्रा जगाला उपलब्ध करुन भारताने जगाला वाचवण्याचे काम केले आहे. तंत्रज्ञान व जागतिक हवामान बदल आदी क्षेत्रांमध्ये देखील भारत जगाला दिशा देण्याचे काम करीत असल्याचे सांगून सामूहिक प्रयत्न केल्यास विकसित भारताचे स्वप्न साकार होईल.  

राज्यपाल रमेश बैस म्हणाले, स्वयंचलित वाहन निर्मिती, विमान निर्मिती, जहाज निर्मिती यांसह अनेक पायाभूत क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे उद्योगपती वालचंद हिराचंद यांनी पृथ्वी, जल, आकाश अश्या तिन्ही लोकात भारताचा झेंडा रोवला. देश पारतंत्र्यात असताना प्रतिकूल परिस्थितीत उद्योगविश्व निर्माण करणाऱ्या हिराचंद यांचे योगदान सुवर्णाक्षरांनी लिहावे इतके मोठे आहे.

आपण शाळेत असताना 'मेड इन जर्मनी'च्या वस्तूंचा बोलबाला होता; पेनाची निब सुद्धा जर्मनीची असायची. कालांतराने 'मेड इन जपान'चा काळ आला व अलीकडे 'मेड इन चायना'चे दिवस आले. परंतु एकविसावे शतक 'मेड इन इंडिया'चे असेल असा विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला. आज भारत आत्म-निर्भर देश होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे, त्याचे मोठे श्रेय वालचंद हिराचंद यांचेकडे जाते, असे राज्यपालांनी सांगितले. वालचंद हिराचंद यांनी जहाज वाहतूक क्षेत्राला संजीवनी दिली. त्यांनी सुरु केलेल्या महाराष्ट्र चेंबरने उद्योग व वाणिज्य या शिवाय कृषिक्षेत्राला महत्व दिले असे सांगून चेंबरने फलोत्पादन, फुलशेती, भरडधान्य शेती यांसह सेंद्रिय शेतीला चालना द्यावी असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.    

महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी म्हणाले, शेठ वालचंद हिराचंद यांच्या कार्याचा आढावा घेतला. देशाच्या उद्योग, व्यापार वाढीसाठी आणि तरुणांना व्यावसायिक बनण्याकडे प्रोत्साहन देत आहे.

शेठ वालचंद हिराचंद यांच्या कुटुंबातील सदस्य हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन को. लि. चे अध्यक्ष अजित गुलाबचंद, प्रिमिअर ऑटो इलेक्ट्रीक लि. चे माजी अध्यक्ष अरविंद दोशी, वालचंदनगर इंडस्टीज लि. चे कार्यकारी संचालक व सीईओ चिराग दोशी, पद्मश्री सरयु दोशी, पल्लवी झा यांचा सत्कार करण्यात आला. दि शिपींग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. चे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक कॅप. बिनेशकुमार त्यागी, अतिरीक्त मुख्य सचिव आणि मुख्य प्रोटोकॉल अधिकारी मनिषा म्हैसकर, महाराष्ट्र सर्कल चे मुख्य पोस्ट मास्टर जनरल किशन कुमार शर्मा, कौन्सिल दि रॉयल कॉन्सुलेट जनरल ऑफ सौदी अरेबियाचे सुलेमान इद एस अल्ताइबी, कौन्सिल जनरल कॉन्सुलेट जनरल ऑफ मलेशियाचे अहमद झुआरी युसुफ, कौन्सुल जनरल ऑफ कॉन्सुलेट जनरल ऑफ बेलारूसचे अन्टॉन पशकोव्ह, चार्ज डी अफेअर्स दि कॉन्सुलेट जनरल युएई चे हमीद अलधाभाई यांचाही सत्कार झाला. दरम्यान मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे पेट्रोन मेंबर्स नितिन धूत, रमाकांत मालू, संगिता पाटील, प्रकाश शहा, मुकेश राध्येशाम खाबणी यांचा सन्मानपूर्वक सत्कार झाला.

दरम्यान महाराष्ट्र चेंबरच्या वतीने नाशिक येथे 6 ते 9 ऑक्टोबर, 2023 रोजी होत असलेल्या ‘मायटेक्स एक्स्पो या औद्योगिक प्रदर्शनाच्या लोगोचे अनावरणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. चेंबरचे ट्रस्ट बोर्ड चे चेअरमन आशिष पेडणेकर, उपाध्यक्ष करूणाकर शेट्टी, उपाध्यक्षा शुभांगी तिरोडकर, उपाध्यक्ष रविंद माणगावे, उपाध्यक्ष तनसुख झांबड, उत्तर महाराष्ट्र चेअरमन कांतीलाल चोपडा, सेक्रेटरी जनरल सागर नागरे आदींनी संयोजन केले. मानसी सोनटक्के यांनी सूत्रसंचालन केले. अरविंद दोशी यांनी आभार मानले.

पंचाम्रुताचे फायदे

 💢..... पंचाम्रुताचे फायदे...

१) स्मरणशक्ति वाढते

२) शरिर निरोगी राहते

३) अँसिडिटि साठि उत्तम उपाय

४) शक्तिवर्धक आहे.

       ------

     घटक

 साखर १ चमचा

  मध १ चमचा 

 ताजे दहि २ चमचे 

 साजूक तूप २ चमचे

 कोमट दूध ५ चमचे

( वरिल प्रमाणात आणि वरील क्रमाने)

  हे रोझ घेतल्यास शरिर शक्ति, स्फूर्ति, स्मरणशक्ति वाढते. , कांति उजळते, ह्रुदय, मेंदू यांचे पोषण होते.

..... वात, पित्त, कफ, ह्या त्रिदोषांचे संतुलन होते.

  या पंचाम्रुत मध्ये चिमुटभर केशर घातल्यास अजून फायदेशिर.. केशर रक्तधातू वाढवणारे आणि रक्तशुद्वि करणारे आहेत.

   * पंचाम्रूत* 

 पंचाम्रूत म्हणजे दहि, दूध, तूप, मध, आणि साखर अथवा गूळ समप्रमाणात एकत्र घेणे. फक्त तूप किंवा मध समप्रमाणात घेउ नये. दोहोंपैकि एकाचे प्रमाण थोडेसे जास्त घ्यावे.

    ##दूधः  

 गाईचे दूध सर्वात श्रेष्ठ. ते पचायला हलके, गोड, पित्ताचा नाश करणारे, बळ देणारे आहे. शेळिचे दूध हे हि पथ्यकर आहे., म्हशिचे दूध पचायला हलके असते.

  दूध तापवून प्यावे. दूध कुठल्याहि आंबट फळाबरोबर, मासे, खार्या पदार्थांसोबत, घेउ नये. त्यामूळे शरिरात विषारि घटक उत्पन्न होतात.

       ##दहीः

 दहि खातांना थंड असले तरि पचल्यानंतर उष्ण गुणाचे होते, गोड, व्यवस्थित लागलेले दहि पुष्टिकर असते. अर्धवट लागलेले दही किंवा आंबट दहि रक्त दूषित करून त्वचाविकार निर्माण करते. सूज वाढवते.

 -- दहि गरम करू नये......- दहि रात्रि खाउ नये.....

-- सर्दि, खोकला, असतांना दहि खाउ नये....

      ##तूपः

 तूप भूक वाढवणारे, स्म्रूती, बुद्धि वर्धक, त्वचेचे कांतिवर्धन करणारे असते. डोळ्यांचि आग होणे, दुखणे, 

 चष्म्याचा नंबर यासाठी उपयुक्त.

 -- अजिर्ण असताना खाउ नये..

 -- पोट साफ होण्यासाठि रात्रि झोपताना गरमदूध+ तूप घ्यावे..

  -- नाक लाल होउन रक्त येत असेल तर नाकात तूप सोडावे..

   -- डोळ्यांसाठी तूप, मध, साखर रोज खाल्याने फायदा होतो..

      ##मधः

  मध गोड, रूक्ष, कफावर कार्य करणारा आहे.

 -- मध गरम करून अथवा उष्ण पदार्थासह खाऊ नये.

 -- डोळ्यात मध घातल्यास डोळ्यांना फायदा होतो.

 -- मध पाण्याने वारंवार लागणारी तहान शमते.

 -- तोंड आले असता मध घालून पाण्याच्या गुळण्या कराव्या.

     ##साखरः

 साखर/ गुळ. तहान कमि होते.

 खडिसाखर सर्वश्रेष्ठ असते.

  * पंचाम्रुताचे फायदे*

  -- शरिर पुष्ट करते

  -- पोटात आग पडणे, जळजळ थांबवते.

   -- मानसिक शांति देते.

   -- मनावरचा ताण कमि होतो.

   -- बुद्धिवर्धक

   -- वजन वाढवते

   -- सकाळि उठल्याबरोबर घेतले अधिक चांगले फायदे मिळतात.....

...........💢💢💢......


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*




कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी "बीटरूट" उत्तम !!*

 *कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी "बीटरूट" उत्तम !!* 


बीटरूट ही प्रत्येक हंगामात उपलब्ध असलेली भाजी आहे. लोक ते सॅलड किंवा ज्यूसच्या स्वरूपात खातात. त्यात फोलेट आणि मॅंगनीज मुबलक प्रमाणात असते, जे आपले हृदय निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक असतात. तर फोलेट आपल्या मेंदूसाठी फायदेशीर आहे. याशिवाय बीटरूटमध्ये अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात, जे तुमच्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर असतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही आजपर्यंत या भाजीचे सेवन केले नसेल तर आजच या भाजीचा आहारात समावेश करा. आम्ही तुम्हाला इथे सांगतो की बीटरूट खाण्याचे आपल्या आरोग्यासाठी कोणते फायदे आहेत ?


◼️ *बीटरूट खाण्याचे फायदे :-


*मेंदूला तीक्ष्ण बनवते :* 


बीटरूटमध्ये नायट्रेट्स असतात जे वाढलेले रक्तदाब कमी करण्यास मदत करतात. एवढेच नाही तर रोज बीटरूटचे सेवन केल्यास हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका कमी होतो. दुसरीकडे, बीटरूट खाल्ल्याने मेंदू निरोगी राहतो आणि तीक्ष्ण बनतो.


*रक्ताची पातळी शरीरात ठीक राहते :* 


बीटरूटमध्ये लोह आणि खनिजे आढळतात, जे शरीरातील अशक्तपणा दूर करण्यास मदत करतात. दुसरीकडे, जर तुम्ही दररोज बीटरूटचे सेवन केले तर हिमोग्लोबिनची कमतरता नाही. ज्यामुळे तुमची ऑक्सिजनची पातळी आणि रक्ताची पातळी शरीरात ठीक राहते.


*कोलेस्टेरॉल :* 


बीटचा ज्यूस रोज प्यायल्याने खराब कोलेस्टेरॉल निघून जाते, त्यामुळे ते रक्तवाहिन्यांमध्ये जमा होत नाही आणि लठ्ठपणा, हृदयाशी संबंधित समस्यांपासून वाचतो.


*चेहऱ्यावर ग्लो येतो :* 


दररोज बीटरूटचा रस प्यायल्याने त्वचा निरोगी होते. एवढेच नाही तर चेहऱ्यावर ग्लो येतो.


संकलन-

डॉ. प्रमोद ढेरे,


_*

Featured post

Lakshvedhi