Friday, 16 June 2023

शासन आपल्या दारी’

 शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गतराज्यातील 35 लाख लाभार्थ्यांना लाभ


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


पालघर जिल्ह्यामध्ये 2 लाखांपेक्षा अधिक लाभार्थी


 


पालघर दि. 15 : ‘शासन आपल्या दारी’ या अभियानामध्ये रोजगार मेळावा देखील घेण्यात आला आहे. 2 ते 3 हजार तरुणांना रोजगारही उपलब्ध होणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून राज्यातील 35 लाख लाभार्थ्यांपर्यंत विविध योजना पोहोचविल्या आहेत. राज्य शासनाने वर्षभरात सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. कोणालाही वैयक्त‍िक लाभ होईल असा निर्णय या शासनाने घेतला नाही. शेतकरी, कामगार, महिला, विद्यार्थी, तरुण वर्ग यांना केंद्रबिंदू मानून राज्य शासन काम करत आहे. पालघर जिल्ह्यामध्ये 2 लाख 12 हजार 683 लाभार्थ्यांना 212 कोटी रुपयांचा लाभ ‘शासन आपल्या दारी’ या अभियानांतर्गत देण्यात आला असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.


पालघर जिल्ह्यातील कोळगाव येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत हाते


यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, खासदार राजेंद्र गावित, आमदार हितेंद्र ठाकूर, श्रीनिवास वनगा, क्षितीज ठाकूर, विवेक पंडित, निरंजन डावखरे, रविंद्र फाटक, विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानूदास पालवे, वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त अनिल पवार, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, पालघरच्या नगरध्यक्ष उज्वला काळे, डहाणूचे नगराध्यक्ष भरत राजपूत तसेच विविध विभागाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि लाभार्थी उपस्थित होते.


पालघर जिल्ह्यासाठी रुग्णालयाचे भूमीपूजन, जलजीवन मिशनचे ई-भूमीपूजन करण्यात आले. सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये बदल घडविणे, त्याच्या आयुष्यात चांगले दिवस आणणे, सकारात्मक अमुलाग्र बदल घडविणे हाच उद्देश शासनाचा आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी राज्य शासनाने जवळपास चारशे निर्णय घेतले आहेत. अनेक लोकाभिमुख प्रकल्प होताहेत, उद्योग वाढीसाठी अनेक निर्णय घेतले आहेत. आदिवासी समाजाचे राहणीमान उंचावले पाहिजे. इतर सर्वसामान्य जनतेच्या जीवनमानात देखील बदल घडविण्याचा उद्देश शासनाचा आहे. बांद्रा-वर्सोवा हा प्रकल्प पुढे नेण्यात येणार आहे. विरार ते पालघर हा प्रकल्प देखील सुरु करण्यात येणार आहे. पूर्वी रखडलेले सर्व प्रकल्प या शासनाने सुरु केले आहेत.


मुंबईसह राज्यात सर्व पायाभूत सुविधांचे प्रकल्प सुरु आहेत. मागील 11 महिन्यामध्ये परदेशी थेट गुंतवणुकीत महाराष्ट्र अग्रेसर आहे. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सततच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसानासाठी 1500 कोटी रुपये देण्याचा निर्णय पहिल्यांदाच घेण्यात आला. अर्थसंकल्पामध्ये मच्छीमार बांधवासाठी तरतूद करण्यात आली. पंचामृत अर्थसंकल्पामध्ये सर्वसमावेशक विकास साधण्याचा प्रयत्न केला आहे.


जिल्ह्यातील पोलीस विभागाने देखील रोजगार मेळावा घेतला. यात दहा हजार तरुणांनी सहभाग नोंदविला होता, या रोजगार मेळाव्यात 1 हजार 850 तरुणांना रोजगार मिळाला आहे. पोलीस दलाने कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केले आहे.


            महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करण्यावर भर देण्यात येत आहे. ‘लेक लाडकी लखपती’ या योजनेअंतर्गत मुलगी जन्माला आल्याबरोबर एक लाख रुपयाचे अनुदान जाहीर करण्यात आले. शेतकरी वर्गासाठी केंद्र सरकार 6 हजार अनुदान देते तर राज्य शासन 6 हजार असे एकूण 12 हजार रुपयांचे अनुदान शेतकरी बाधवांना देण्यात येत आहे. केंद्र सरकारचा भक्कम पाठींबा राज्य शासनाला असल्यामुळे सर्व महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रगतीपथावर आहेत, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.


 पालघर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांनी सुचविलेले प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे. एमएमआरडीएची व्याप्ती देखील संपूर्ण जिल्ह्यात करण्यात येणार आहे. पालघर जिल्हा मुख्यालय हे देशात सर्वात प्रशस्त इमारत असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.


यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले.


तळागळापर्यंत विविध योजनांचा लाभ पोहोचविणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


पालघर जिल्ह्यात शासन आपल्या दारी या अभियानाच्या माध्यमातून एका छताखाली सर्व योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील किमान 75 हजार लाभार्थ्यांना लाभ देण्याचे निश्चित करण्यात आले होते परंतू पालघर जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक लाभार्थ्यांना लाभ देवून प्रशासनाने हे अभियान यशस्वी केले आहे.


राज्य शासन सामान्यांच्या जीवनात गुणात्मक बदलासाठी काम करत आहे. जो पर्यंत योजनांचा लाभ तळागळातील जनतेपर्यंत पोहोचणार नाही, तोपर्यंत सर्व यंत्रणा कार्यरत राहणार असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘नमो शेतकरी’ या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पिक विमा योजनेचा लाभ मिळवून दिला. पालघरमध्ये जिल्हा रुग्णालयाचे भूमीपूजन करण्यात आले. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य योजनेच्या माध्यमातून राज्याला 5 हजार कोटी रुपयाचा निधी देण्यात आला. या निधीच्या माध्यमातून जिल्ह्यात रुग्णालय उभी केली जात आहेत. त्याचबरोबर महात्मा फुले जनआरोग्य योजनअंतर्गत दीड लाखांपर्यंत उपचार मोफत दिले जात होते. परंतू आता 5 लाखांपर्यंतचा उपचार मोफत केला जाणार आहे. त्यामुळे कोणताही गरजू लाभार्थी उपचाराविना राहणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिली. प्रत्येक व्यक्तीला आपल्या हक्काचे घर मिळावे म्हणून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आदिवासी बांधवांसाठी पाच लाख घरे बांधण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील एकही व्यक्ती बेघर राहणार नाही. याची संबंधीत अधिकाऱ्यांनी काळजी घेण्याची सूचना देखील यावेळी त्यांनी केली. केवळ आदिवासी बांधवांसाठीच नाही तर इतर मागास वर्गातील बांधवांसाठी देखील प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत बांधवांसाठी 10 लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी सांगितले.


            केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील म्हणाले की, राज्याच्या विकासासाठी विविध योजना मैलाचा दगड ठरत आहेत. ‘शासन आपल्या दारी’ या योजनेच्या शुभारंभाकरिता जनतेची उपस्थिती ही योजनेची यशस्वीता दर्शविते. 


‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या माध्यमातून दोन लाख गरजू लाभार्थ्यांना लाभ मिळण्याकरिता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी पाहिलेले ‘शासन आपल्या दारी’ हे स्वप्न पूर्ण करण्याकरिता राबत असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे कौतुक पालकमंत्री रविं

द्र चव्हाण यांनी केले.


*******


राज्यातील ऊस तोड कामगार आणि शेतमजुरांचीई श्रम पोर्टलवर नोंदणीची मोहिम हाती घ्यावी

 मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतली ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत बैठक


राज्यातील ऊस तोड कामगार आणि शेतमजुरांचीई श्रम पोर्टलवर नोंदणीची मोहिम हाती घ्यावी


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश


            मुंबई, दि. 15 : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात राज्य सरकार सकारात्मक असून राज्यातील ऊस तोड कामगार आणि शेतमजुरांची ई श्रम पोर्टलवर नोंदणी करण्याची मोहिम हाती घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.


            सह्याद्री अतिथीगृह येथे ऊस दर नियंत्रण समिती व शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत बैठक झाली. बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे, माजी खासदार राजू शेट्टी, मुख्य सचिव मनोज सौनिक आदी यावेळी उपस्थित होते.


            मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ऊस नियंत्रण मंडळाची स्थापना करण्यात आली असून त्यावर अशासकीय सदस्यांची तातडीने नेमणूक करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रकमी एफआरपी देण्याचे राज्य शासनाचे धोरण असून त्याप्रमाणे कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.


            बैठकीत ऊस वाहतूकदारांची ऊसतोड मजूर पुरवठादार मुकादमाकडून होणाऱ्या फसवणूकीच्या प्रकरणांवर चर्चा झाली. गुन्हे दाखल झालेल्या प्रकरणात कठोर कारवाई करण्यात यावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. यासाठी पोलिसांनी समन्वय अधिकारी नेमावा, असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुकादम पैसे घेऊन पळून जातात असे यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी सांगितले. त्यावर ऊस तोड मजूर असंघटीत क्षेत्रात येण्यासाठी त्यांची ई श्रम पोर्टल वर नोंदणी करावी, जेणेकरून त्यांना राज्य आणि केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ मिळेल त्याच बरोबर शेतमजुरांची देखील या पोर्टलवर नोंदणी करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.


            राज्यात २०२१- २२ मध्ये ९९.८८ टक्के एफआरपी अदा केली असून यावर्षी ३१ मे पर्यंत ९६.५५ टक्के एफआरपी अदा केल्याचे साखर आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी यावेळी सांगितले.


            बैठकीस वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ नितीन करीर,महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, सहकार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेशकुमार, कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनुपकुमार यांच्यासह शेतकरी संघटनांचे प्रतिनि

धी उपस्थित होते.


शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचीदिलखुलास’ कार्यक्रमात मुलाखत

 शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचीदिलखुलास’ कार्यक्रमात मुलाखत


 


            मुंबई, दि. 16 : राज्यात 15 जून पासून यंदाच्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे. या शैक्षणिक वर्षात राज्य शासन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी 'दिलखुलास' या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिली आहेत.


            ही विशेष मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमातून ही मुलाखत शनिवार, दि. 17 जून 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआर' या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. निवेदक विवेक भावसार यांनी ही मुलाखत घेतली आहे.


000

आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातच मिळणार रहिवासी दाखला

 आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातच मिळणार रहिवासी दाखला


- आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित


        मुंबई दि. १६ : अनुसूचित क्षेत्रातील अधिसूचित १७ संवर्गातील सरळसेवेची पदे स्थानिक आदिवासींमधून भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सरळसेवेच्या पद भरतीसाठी अर्ज करणाऱ्या अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) रहिवासी दाखला हा संबंधित एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात विहित मुदतीत उपलब्ध होणार असल्याचे, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले.


            मंत्री डॉ. गावित म्हणाले, मा. राज्यपाल यांच्या दि.२९.०८.२०१९ च्या अधिसूचनेनुसार अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) १७ संवर्गातील सरळसेवेची पदे भरण्याची मान्यता मिळाली आहे. राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील ज्या गावांमध्ये आदिवासींची लोकसंख्या ५० टक्के पेक्षा अधिक आहे, अशा सर्व गावांमध्ये १७ संवर्गातील सरळसेवेची १०० टक्के पदे स्थानिक आदिवासींमधून भरण्याचा निर्णय झालेला आहे. सरळसेवेच्या पद भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना प्रकल्प कार्यालयात रहिवासी दाखला मिळणार आहे. याबाबतचे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


0000

राष्ट्रीय आमदार संमेलनात नावीन्यपूर्ण माहितीच्या प्रदर्शनाचेओम बिर्ला यांच्या हस्ते उद्घाटन

 राष्ट्रीय आमदार संमेलनात नावीन्यपूर्ण माहितीच्या प्रदर्शनाचेओम बिर्ला यांच्या हस्ते उद्घाटन


 


            मुंबई, दि. १६ : देशातील विधानपरिषदांचे सभापती आणि विधानसभांचे अध्यक्ष, लोकप्रतिनिधी यांच्या राष्ट्रीय आमदार संमेलनात आयोजित नावीन्यपूर्ण माहितीच्या प्रदर्शनाचे उद्घाटन लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते करण्यात आले.


            एमआयटीच्यावतीने जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, वांद्रे येथे आयोजित पहिल्या राष्ट्रीय आमदार संमेलन प्रदर्शन कार्यक्रमाला विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण व संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, पद्मविभूषण तथा जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, पद्मश्री अनिल गुप्ता, एमआयटीचे विश्वनाथ कराड आदी मान्यवर उपस्थिती होते.


            संमेलनात डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सामाजिक नावीन्यपूर्ण प्रदर्शनात सर्वोत्कृष्ट काम केलेल्या देशभरातील ७५ मंत्री, आमदारांच्या कामाची माहिती, उत्कृष्ट ७५ स्टार्ट अप, जगभरातील लोकशाही देशांची माहिती आणि भारतीय छात्र संसद याबाबतची माहिती देण्यात आली. या प्रदर्शनाची पाहणी मान्यवरांनी केली.


माती आणि पाण्याच्या उपक्रमाचे श्री बिर्ला यांच्याकडून कौतुक


            देशभरातून विविध मान्यवरांनी आणलेल्या माती आणि पाणी यांची पाहणी मान्यवरांनी केली. देशातील ५० आमदारांनी युथ पार्लमेंट स्थापन करणार असल्याचे यावेळी सांगितले. या उपक्रमाचे लोकसभा अध्यक्ष श्री. बिर्ला यांनी कौतुक केले. १५ जून ते १७ जून या कालावधीत आयोजित या संमेलनात अनेक मान्यवर आपले विचार मांडणार आहेत. यात राज्यातील विकासकामांबद्दल चर्चा, अनुभव, कल्पना आणि विविध योजना या विषयांवर विचारमंथन होणार आहेत. तसेच महत्त्वाच्या विषयांवर परिसंवाद होणार आहेत.


000

जनहिताची जपणूक करत लोकशाही बळकट करावी

 जनहिताची जपणूक करत लोकशाही बळकट करावी

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राष्ट्रीय विधायक संमेलन भारत 2023


            मुंबई, दि. 16 :- जनहिताची जपणूक करण्याची राज्यघटनेने दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडत भारतीय लोकशाही अधिक बळकट करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.


            'एमआयटी'च्यावतीने जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे देशातील विधानसभा आणि विधानपरिषदेचे लोकप्रतिनिधी यांचे राष्ट्रीय विधायक संमेलन भारत 2023 चे आयोजन करण्यात आले. यावेळी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, लोकसभेचे माजी अध्यक्ष शिवराज पाटील चाकूरकर, सुमित्रा महाजन, मीरा कुमार, शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, पद्मश्री अनिल गुप्ता, 'एमआयटी'चे विश्वनाथ कराड, देशातील विधानमंडळांचे पीठासन अधिकारी व अन्य मान्यवर उपस्थित होते.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, आपल्या भारतीय संस्कृतीला हजारो वर्षांची समृद्ध परंपरा आहे. लोकशाहीची मूल्ये भारतीयांच्या मनात घट्टपणे रुजली आहेत. भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी आणि सर्वात भक्कम अशी लोकशाही पद्धती मानली जाते. ही आपणा सर्वांसाठीच अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. लोककल्याणकारी राज्यासाठी आवश्यक असलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिलेली राज्यघटना ही जगातील सर्वोत्तम राज्यघटना आहे. या अमृत काळात भारताची लोकशाही अधिक मजबूत होत आहे. देश सर्वार्थाने विकसित होत आहे. संसदीय लोकशाहीत विविध विचारधारा असू शकतात, मार्ग वेगळे असू शकतात मात्र आपल्या सगळ्यांचे अंतिम उद्दिष्ट मात्र एकच आहे. ते म्हणजे भारतीय लोकशाही मजबूत करणे, समृद्ध करणे. आपल्याकडे उभारण्यात आलेल्या यंत्रणा आणि व्यवस्था अतिशय उत्तम आणि पारदर्शक आहेत. सर्व व्यवस्थांच्या भूमिका आणि मर्यादा अगदी सुस्पष्ट आहेत. एवढ्या मोठ्या खंडप्राय देशात निवडणूका अतिशय निर्भय, निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने होतात. समाजातील तळागाळातील लोकांच्या इच्छा-आकांक्षा विधिमंडळात प्रतिबिंबित होत असतात. कोणत्याही सरकारला विधानमंडळात विधेयक मांडल्याशिवाय कोणताही खर्च करता येत नाही, ही आपणास लोकशाहीने दिलेली अमूल्य भेटच आहे. आपण सर्वजण जनतेला उत्तरदायी आहोत ही भावना आपण नेहमी जपली पाहिजे.


            विधिमंडळात सर्व पक्षांनी विधेयकावर सांगोपांग चर्चा केलीच पाहिजे. त्यानंतरच सर्वाच्या विचाराने, एकमताने जनहिताचे कायदे तयार केले पाहिजेत. राष्ट्रीय विधायक संमेलन या उपक्रमाच्या माध्यमातून भारतीय लोकशाही अधिक बळकट होण्यासंदर्भात सखोल विचारमंथन होईल, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.


            विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर म्हणाले, देशातील विधानमंडळांच्या पीठासीन अधिकाऱ्यांसाठी आयोजित हे संमेलन अतिशय उपयुक्त ठरेल. संसदीय लोकशाही परंपरा अधिक समृद्ध करण्याची उज्वल परंपरा याव्दारे कायम राहील. भारतीय लोकशाही बळकट करण्यात सर्वच देशवासीयांचे अमूल्य योगदान असून विश्वस्त भावनेतूनच ही परंपरा पुढे नेण्याची गरज असल्याचे अॅड. नार्वेकर यांनी सांगितले.


            लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन म्हणाल्या, 'वसुधैव कुटुंबकम्' ही आपली संस्कृती आहे. ती आपण जपली पाहिजे. आपल्याला राजमाता जिजाऊ आणि अहिल्याबाई यांचा वारसा लाभला आहे. लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदारसंघातील प्रश्नांचा सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे. तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून सगळ्यांना सोबत घेऊनच जनहिताची कामे केली पाहिजेत. समाजाला योग्य मार्गावर पुढे नेणारा म्हणजे नेता. महिला कुटुंबाचा सर्वार्थाने विकास करतात. समतोल साधण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणांमुळे महिला राजकारणात अधिक यशस्वी होऊ शकतात. विविध राज्यांतील चांगल्या प्रथा-परंपरांचे अनुसरण, आदानप्रदान आपण करणे गरजेचे आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणाच्या प्रयत्नांत आपण सर्वांनी मिळून योगदान दिले पाहिजे, असेही श्रीमती महाजन यांनी सांगितले.


            भारतभरातून विधिमंडळ सदस्यांनी आणलेल्या जलकुंभाची आणि मृत्तिकाघटाची पाहणी मान्यवरांनी केली. लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रतिकात्मक स्वरूपात सर्व मान्यवरांच्या हस्ते लोकशाहीच्या घंटेचा निनाद यावेळी करण्यात आला‌.


            या संमेलनात देशभरातील सुमारे दोन हजार मंत्री,आमदार सहभागी झाले आहेत.


-----000-------

आयुर्वेद आणि स्वास्थ्य.*

 *आयुर्वेद आणि स्वास्थ्य.*


आयुर्वेदात सर्व आजार होण्याची महत्त्वाची दोन (सिद्धांत) कारणे सांगितलेली आहे. रोगा सर्वेपि मंदाग्नौ (भूक मंदावणे, अन्न पचनासंबंधीचे आजार), रोगा सर्वेपि जायन्ते वैगोदीरणधारणै (मलमूत्र इत्यादी वेग धारण केल्यामुळे).


रोगा सर्वेपि मंदाग्नौ (भूक मंदावणे, अन्न पचनासंबंधीचे आजार)-आयुर्वेदाने सामान्यात: सर्व आजाराचे महत्त्वाचे कारण हे “अग्नी मंद असणे” हे सांगितले आहे. आजाराच्या प्रमुख कारणापैकी एक महत्त्वाचे कारण म्हणजे भूक न लागणे, भूक नसताना वेळ झाली म्हणून पिशवीत सामान कोंबतो तसे पोटात काहीतरी टाकणे तर याउलट भूक लागली असताना वेळ नाही म्हणून (व्यवसाय, मिटींग इत्यादी) जेवण न घेणे किंवा त्याऐवजी वडापाव, कचोरी, समोसा व इतर काही चटकमटक खाद्यपदार्थ खाणे. आहार हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आहार संभवं वस्तु रोगश्चाहारसंभव! अर्थात आहारापासून शरीराचे पोषण होते व याच्या अयोग्य सेवनाने विविध आजार होतात. तच्च नित्यं प्रयुजिंत स्वास्थ येनानुवर्तते! अजातानां विकारणां अनुत्पन्त्तिकरं यत! अर्थात ज्यामुळे आपले आरोग्य संवर्धन होईल व संभाव्य आजार टाळले जातील, अशा प्रकारचे भोजन घ्यावे. हे भोजन उष्ण, स्निग्ध व योग्य मात्रेत घ्यावे. अतिघाईने, अति हळूहळू, बडबड करीत, खूप हसत जेवन करू नये थोडक्यात मन लावून जेवावे, टीव्ही समोर बसून जेवण टाळावे.


आपल्याला बऱ्याच वेळा भूक लागल्यासारखे वाटते आपण जेवणपण घेतो पण ती भूक खोटी असते. भूक नसताना सवयीने वेळ झाली म्हणून आपण जेवन करतो, हे चुकीचे आहे. पोट जड वाटणे, अंग जड पडणे, सुस्ती वाटणे, आळस येणे, तोंडाला पाणी सुटणे, तंद्रा येणे, मन प्रसन्न नसणे, सतत चिंता असणे, उत्साह न वाटणे इत्यादी लक्षणे असताना भूक लागल्यासारखी वाटली तरी जेवण घेऊ नये ही लक्षणे कमी झाल्यानंतरच भोजन घ्यावे. तरच ते पचते. अन्यथा अनेक आजाराला आमंत्रण दिल्यासारखे आहे. थोडक्यात पचायला हलका, बलवर्धक असा आहार आयुर्वेद तज्ञाच्या सल्ल्याने घेणे अधिक चांगले आहे.

आयुर्वेदाच्यादृष्टीने पाणी देखील जेवढी तहान आहे तेवढेच प्यावे. “पिबेंत् स्वस्थोपि अल्पश: अर्थात निरोगी व्यक्तीने देखील पाणी कमी प्रमाणात प्यावे. अत्यम्बुपान अर्थात अति पाणी पिणे हे आरोग्यास हानीकारक ठरते. शरीरातील अग्नीला अन्नाप्रमाणे पाणी पण पचवावे लागते. याबाबत बरेच मतमतांतरे असली तरी आपण स्वत: प्रत्यक्ष याची अनुभूती घ्यावी.


रोगा सर्वेपि जायन्ते वैगोदीरणधारणै (मलमुत्र इत्यादी वेग धारण केल्यामुळे)- सर्वसामान्य रोग होण्याचे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे वेगाने लघवी येणे, शौचास येणे, अधोवायु, उलटी, शिंक, ढेकर, भूक, तहान, रडू येणे, झोप इत्यादी बाबी शरीरात निर्माण झाल्यावर त्यांना थांबवून थोपवून ठेवू नये. या वेगाचा अवरोध केल्यामुळे अनेक आजार उद्भवतात. म्हणून याचा अवरोध करू नये.

https://chat.whatsapp.com/G6dpqL1eDIH4pqpcCtbd3w

निदान परिवर्जन अर्थात ज्या कारणामुळे आजार होतात त्या कारणाचा त्याग करणे मानसिक ताण तणाव, व्यायाम न करणे, अजीर्ण अपचन हे रक्तदाब ,मधुमेह, लठ्ठपणा इत्यादी आजार वाढविण्यासाठीची महत्त्वाची कारणे आहेत. ही कारणे दूर करणे आजार टाळण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.


आयुर्वेदात “नि:सुखत्वं सुखायच !” हा महत्त्वाचा सिद्धांत सांगितलेला आहे. याचा अर्थ सुखकारक गोष्टीचा त्याग करणे म्हणजेच अंग मेहनतीची कामे व्यायाम चालणे, परिश्रम (शरीरातून घाम येईपर्यंत) इत्यादी गोष्टी सुखी जीवनासाठी आवश्यक आहेत. सध्या श्रमाच्या तुलनेत गरजेपेक्षा जास्त आहार घेतला जातो. सध्या जीवनशैलीत शारीरिक परिश्रमाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहेत. गाडीचा वापर जास्त असल्याने पायी चालणे होत नाही घरात देखील सर्व गोष्टी रिमोटद्वारे (टीव्ही, एसी) केल्या जातात. वॉशिंग मशीन, कुकर, फुड प्रोसेसर, कनिक मळण्याचे यंत्र, पोळी तयार करण्याचे यंत्र इत्यादीचा वापर होत असल्याने शरीर सुखवस्तू बनत चालले आहे व त्यासोबत आपला ताणतणाव वाढत आहे. त्यामुळे वजन वाढणे, डायबिटीज, रक्तदाब इत्यादी आजाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

जर तुमची चयापचय प्रक्रिया चांगली असेल, तर तुम्ही शक्य तितक्या लवकर तुमच्या फिटनेस पथ्येचे परिणाम मिळवू शकता. गुडुची सारख्या आयुर्वेदिक औषधी वनस्पती तुमच्या आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. हे आपले चांगले आतड्यांसंबंधी मायक्रोबायोम वाढवते आणि शरीरातील चरबीच्या साठ्याचे नियमन करण्यास मदत करते. तसेच रक्तातील साखरेची पातळी सामान्य ठेवण्यास मदत करते.


दालचिनीसारखे मसाले तुमच्या शरीरात चरबीच्या पेशी तयार होण्यापासून रोखू शकतात, तर हळदीमध्ये असलेले कर्क्यूमिन चरबीच्या पेशी प्रभावीपणे बर्न करण्यास आणि शरीरातील चयापचय वाढवण्यास मदत करते.


आयुर्वेद ही एक प्राचीन आणि अत्यंत महत्वाची प्रणाली आहे जी आपल्याला निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यास मदत करते. तुमच्या मेंदूच्या आरोग्यापासून ते पोटापर्यंत आणि त्वचेच्या आरोग्यापासून ते हाडांपर्यंत, आयुर्वेदामध्ये तुमच्या एकूण आरोग्यासाठी अनेक रहस्ये आहेत. आयुर्वेदिक टिप्स तुम्हाला तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यास मदत करू शकतात.


जर तुम्ही नियमितता, संतुलन आणि स्थिरता राखली तर काही आयुर्वेदिक उपायांनी तुम्ही तुमच्या आरोग्याच्या अनेक समस्या दूर करू शकता. वैद्यकीय सल्लागार डॉ. दिपेश महेंद्र वाघमारे यांनी आयुर्वेदातील काही खास रहस्ये सांगितली आहेत ज्यामुळे तुम्ही फिट आणि हेल्दी राहू शकता. 

अश्वगंधा, ब्राह्मी आणि तुळशी यांसारख्या आयुर्वेदिक औषधी वनस्पती तुमच्या शरीराला शारीरिक आणि मानसिक तणावासाठी लवचिक बनवतात आणि तुमची ऊर्जा वाढवू शकतात ज्यामुळे तुम्हाला दिवसभर फिट आणि उत्साही वाटू शकते.


स्टॅमिना वाढवण्यासाठी 


जर तुम्हाला व्यायाम करताना खूप थकल्यासारखे वाटत असेल, तर कदाचित तुमचा स्टॅमिना वेगाने कमी होत आहे. मानसिक तणावामुळे तुमच्या शारीरिक हालचालींवरही परिणाम होऊ शकतो. म्हणूनच, हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की स्टॅमिना कमी होण्याचे कारण तणाव असू शकतो.


आयुर्वेदिक औषधी वनस्पती जसे अश्वगंधा, ब्राह्मी आणि शतावरी शक्ती वाढवतात. हे तुमच्या स्नायूंना ऑक्सिजनचा पुरवठा वाढवून तुमची मूळ ऊर्जा पातळी वाढविण्यास मदत करतात. त्यामुळे मानसिक आरामही मिळतो.


मेटाबॉलिज्म वाढविण्यासाठी


जर तुमची चयापचय प्रक्रिया चांगली असेल, तर तुम्ही शक्य तितक्या लवकर तुमच्या फिटनेस पथ्येचे परिणाम मिळवू शकता. गुडुची सारख्या आयुर्वेदिक औषधी वनस्पती तुमच्या आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. हे आपले चांगले आतड्यांसंबंधी मायक्रोबायोम वाढवते आणि शरीरातील चरबीच्या साठ्याचे नियमन करण्यास मदत करते. तसेच रक्तातील साखरेची पातळी सामान्य ठेवण्यास मदत करते. प्रमोद पाठक.



Featured post

Lakshvedhi