*आयुर्वेद आणि स्वास्थ्य.*
आयुर्वेदात सर्व आजार होण्याची महत्त्वाची दोन (सिद्धांत) कारणे सांगितलेली आहे. रोगा सर्वेपि मंदाग्नौ (भूक मंदावणे, अन्न पचनासंबंधीचे आजार), रोगा सर्वेपि जायन्ते वैगोदीरणधारणै (मलमूत्र इत्यादी वेग धारण केल्यामुळे).
रोगा सर्वेपि मंदाग्नौ (भूक मंदावणे, अन्न पचनासंबंधीचे आजार)-आयुर्वेदाने सामान्यात: सर्व आजाराचे महत्त्वाचे कारण हे “अग्नी मंद असणे” हे सांगितले आहे. आजाराच्या प्रमुख कारणापैकी एक महत्त्वाचे कारण म्हणजे भूक न लागणे, भूक नसताना वेळ झाली म्हणून पिशवीत सामान कोंबतो तसे पोटात काहीतरी टाकणे तर याउलट भूक लागली असताना वेळ नाही म्हणून (व्यवसाय, मिटींग इत्यादी) जेवण न घेणे किंवा त्याऐवजी वडापाव, कचोरी, समोसा व इतर काही चटकमटक खाद्यपदार्थ खाणे. आहार हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आहार संभवं वस्तु रोगश्चाहारसंभव! अर्थात आहारापासून शरीराचे पोषण होते व याच्या अयोग्य सेवनाने विविध आजार होतात. तच्च नित्यं प्रयुजिंत स्वास्थ येनानुवर्तते! अजातानां विकारणां अनुत्पन्त्तिकरं यत! अर्थात ज्यामुळे आपले आरोग्य संवर्धन होईल व संभाव्य आजार टाळले जातील, अशा प्रकारचे भोजन घ्यावे. हे भोजन उष्ण, स्निग्ध व योग्य मात्रेत घ्यावे. अतिघाईने, अति हळूहळू, बडबड करीत, खूप हसत जेवन करू नये थोडक्यात मन लावून जेवावे, टीव्ही समोर बसून जेवण टाळावे.
आपल्याला बऱ्याच वेळा भूक लागल्यासारखे वाटते आपण जेवणपण घेतो पण ती भूक खोटी असते. भूक नसताना सवयीने वेळ झाली म्हणून आपण जेवन करतो, हे चुकीचे आहे. पोट जड वाटणे, अंग जड पडणे, सुस्ती वाटणे, आळस येणे, तोंडाला पाणी सुटणे, तंद्रा येणे, मन प्रसन्न नसणे, सतत चिंता असणे, उत्साह न वाटणे इत्यादी लक्षणे असताना भूक लागल्यासारखी वाटली तरी जेवण घेऊ नये ही लक्षणे कमी झाल्यानंतरच भोजन घ्यावे. तरच ते पचते. अन्यथा अनेक आजाराला आमंत्रण दिल्यासारखे आहे. थोडक्यात पचायला हलका, बलवर्धक असा आहार आयुर्वेद तज्ञाच्या सल्ल्याने घेणे अधिक चांगले आहे.
आयुर्वेदाच्यादृष्टीने पाणी देखील जेवढी तहान आहे तेवढेच प्यावे. “पिबेंत् स्वस्थोपि अल्पश: अर्थात निरोगी व्यक्तीने देखील पाणी कमी प्रमाणात प्यावे. अत्यम्बुपान अर्थात अति पाणी पिणे हे आरोग्यास हानीकारक ठरते. शरीरातील अग्नीला अन्नाप्रमाणे पाणी पण पचवावे लागते. याबाबत बरेच मतमतांतरे असली तरी आपण स्वत: प्रत्यक्ष याची अनुभूती घ्यावी.
रोगा सर्वेपि जायन्ते वैगोदीरणधारणै (मलमुत्र इत्यादी वेग धारण केल्यामुळे)- सर्वसामान्य रोग होण्याचे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे वेगाने लघवी येणे, शौचास येणे, अधोवायु, उलटी, शिंक, ढेकर, भूक, तहान, रडू येणे, झोप इत्यादी बाबी शरीरात निर्माण झाल्यावर त्यांना थांबवून थोपवून ठेवू नये. या वेगाचा अवरोध केल्यामुळे अनेक आजार उद्भवतात. म्हणून याचा अवरोध करू नये.
https://chat.whatsapp.com/G6dpqL1eDIH4pqpcCtbd3w
निदान परिवर्जन अर्थात ज्या कारणामुळे आजार होतात त्या कारणाचा त्याग करणे मानसिक ताण तणाव, व्यायाम न करणे, अजीर्ण अपचन हे रक्तदाब ,मधुमेह, लठ्ठपणा इत्यादी आजार वाढविण्यासाठीची महत्त्वाची कारणे आहेत. ही कारणे दूर करणे आजार टाळण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
आयुर्वेदात “नि:सुखत्वं सुखायच !” हा महत्त्वाचा सिद्धांत सांगितलेला आहे. याचा अर्थ सुखकारक गोष्टीचा त्याग करणे म्हणजेच अंग मेहनतीची कामे व्यायाम चालणे, परिश्रम (शरीरातून घाम येईपर्यंत) इत्यादी गोष्टी सुखी जीवनासाठी आवश्यक आहेत. सध्या श्रमाच्या तुलनेत गरजेपेक्षा जास्त आहार घेतला जातो. सध्या जीवनशैलीत शारीरिक परिश्रमाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहेत. गाडीचा वापर जास्त असल्याने पायी चालणे होत नाही घरात देखील सर्व गोष्टी रिमोटद्वारे (टीव्ही, एसी) केल्या जातात. वॉशिंग मशीन, कुकर, फुड प्रोसेसर, कनिक मळण्याचे यंत्र, पोळी तयार करण्याचे यंत्र इत्यादीचा वापर होत असल्याने शरीर सुखवस्तू बनत चालले आहे व त्यासोबत आपला ताणतणाव वाढत आहे. त्यामुळे वजन वाढणे, डायबिटीज, रक्तदाब इत्यादी आजाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
जर तुमची चयापचय प्रक्रिया चांगली असेल, तर तुम्ही शक्य तितक्या लवकर तुमच्या फिटनेस पथ्येचे परिणाम मिळवू शकता. गुडुची सारख्या आयुर्वेदिक औषधी वनस्पती तुमच्या आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. हे आपले चांगले आतड्यांसंबंधी मायक्रोबायोम वाढवते आणि शरीरातील चरबीच्या साठ्याचे नियमन करण्यास मदत करते. तसेच रक्तातील साखरेची पातळी सामान्य ठेवण्यास मदत करते.
दालचिनीसारखे मसाले तुमच्या शरीरात चरबीच्या पेशी तयार होण्यापासून रोखू शकतात, तर हळदीमध्ये असलेले कर्क्यूमिन चरबीच्या पेशी प्रभावीपणे बर्न करण्यास आणि शरीरातील चयापचय वाढवण्यास मदत करते.
आयुर्वेद ही एक प्राचीन आणि अत्यंत महत्वाची प्रणाली आहे जी आपल्याला निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यास मदत करते. तुमच्या मेंदूच्या आरोग्यापासून ते पोटापर्यंत आणि त्वचेच्या आरोग्यापासून ते हाडांपर्यंत, आयुर्वेदामध्ये तुमच्या एकूण आरोग्यासाठी अनेक रहस्ये आहेत. आयुर्वेदिक टिप्स तुम्हाला तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यास मदत करू शकतात.
जर तुम्ही नियमितता, संतुलन आणि स्थिरता राखली तर काही आयुर्वेदिक उपायांनी तुम्ही तुमच्या आरोग्याच्या अनेक समस्या दूर करू शकता. वैद्यकीय सल्लागार डॉ. दिपेश महेंद्र वाघमारे यांनी आयुर्वेदातील काही खास रहस्ये सांगितली आहेत ज्यामुळे तुम्ही फिट आणि हेल्दी राहू शकता.
अश्वगंधा, ब्राह्मी आणि तुळशी यांसारख्या आयुर्वेदिक औषधी वनस्पती तुमच्या शरीराला शारीरिक आणि मानसिक तणावासाठी लवचिक बनवतात आणि तुमची ऊर्जा वाढवू शकतात ज्यामुळे तुम्हाला दिवसभर फिट आणि उत्साही वाटू शकते.
स्टॅमिना वाढवण्यासाठी
जर तुम्हाला व्यायाम करताना खूप थकल्यासारखे वाटत असेल, तर कदाचित तुमचा स्टॅमिना वेगाने कमी होत आहे. मानसिक तणावामुळे तुमच्या शारीरिक हालचालींवरही परिणाम होऊ शकतो. म्हणूनच, हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की स्टॅमिना कमी होण्याचे कारण तणाव असू शकतो.
आयुर्वेदिक औषधी वनस्पती जसे अश्वगंधा, ब्राह्मी आणि शतावरी शक्ती वाढवतात. हे तुमच्या स्नायूंना ऑक्सिजनचा पुरवठा वाढवून तुमची मूळ ऊर्जा पातळी वाढविण्यास मदत करतात. त्यामुळे मानसिक आरामही मिळतो.
मेटाबॉलिज्म वाढविण्यासाठी
जर तुमची चयापचय प्रक्रिया चांगली असेल, तर तुम्ही शक्य तितक्या लवकर तुमच्या फिटनेस पथ्येचे परिणाम मिळवू शकता. गुडुची सारख्या आयुर्वेदिक औषधी वनस्पती तुमच्या आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. हे आपले चांगले आतड्यांसंबंधी मायक्रोबायोम वाढवते आणि शरीरातील चरबीच्या साठ्याचे नियमन करण्यास मदत करते. तसेच रक्तातील साखरेची पातळी सामान्य ठेवण्यास मदत करते. प्रमोद पाठक.
No comments:
Post a Comment