Saturday, 17 June 2023

मूड चांगला राहण्यासाठी काही उपाय*

 *मूड चांगला राहण्यासाठी काही उपाय*


*उदास आहात का ?


मग serotonin या हार्मोनच्या अगदी थोड्या प्रमाणामुळे देखील चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलेल. कारण या हार्मोनमुळे चिंता कमी होऊन मूड चांगला होण्यास मदत होते, भूकेवर नियंत्रित येतं व आनंदी राहण्याचं उत्तेजन मिळतं. म्हणून जर उदास वाटत असेल तर मेंदूत हा हॅपी हार्मोन स्त्रवण्यासाठी खालील उपाय नक्की ट्राय करा.


*मसाज-* मसाज घेतल्याने खूप मोकळं वाटतं. त्यामुळे प्रत्येकालाच मसाज घेणे आवडते. तसेच मसाज घेतल्याने serotonin च्या वाढीस चालना मिळते व त्यामुळे दुःख दूर होऊन प्रसन्न वाटतं, असे अभ्यासातून सिद्ध झाले आहे.


*दूध-* दूधपिण्याचे अनेक फायदे आहेत. त्यापैकी एक म्हणजे दुधात असलेल्या α-lactalbumin मुळे serotonin ची निर्मिती होते. α-lactalbumin युक्त कोणत्याही आहाराने मूड सुधारण्यास मदत होते.


*झोप-* अपुरी झोप घेऊ नका. अभ्यासावरून असे सिद्ध झाले आहे, झोपेचा व serotonin चा संबंध असतो. त्यामुळे मूड चांगला ठेवण्यासाठी शांत आणि पुरेशी झोप घ्या.


*हळद-* यामध्ये असलेल्या Curcumin यात अँटीडिप्रेसन्ट गुणधर्म असतात. म्हणून कोमट दुधात हळद घालून घेतल्याने चटकन मूड सुधारतो.


*काळामिरी-* यामध्ये Piperin नावाचे ऍक्टिव्ह कंपाऊंड असते. ते serotonin च्या निर्मितीस अडथळा आणणारे एंझ्याइम्स ब्रेक करते.


*व्यायाम-* serotonin स्त्रवण्याचा उत्तम उपाय म्हणजे व्यायाम करणे. म्हणून नियमित व्यायाम करा आणि प्रसन्न रहा.


*डॉ. प्रमोद ढेरे*


*माहिती आवडल्यास शेअर करायला विसरू नका. धन्यवाद 🙏🏻*



आधिक मासाविषयी*वर्षी १८ जुलै ते १६ आॕगस्ट असा श्रावण महिना हा "अधिकमास" आला आहे.*

 *आधिक मासाविषयी*


*या वर्षी १८ जुलै ते १६ आॕगस्ट असा श्रावण महिना हा "अधिकमास" आला आहे.*

__________________

  

*अधिकमास म्हणजे काय? व त्याला एवढे महत्व कां?*


 *सण हे चंद्रावर अवलंबून आहेत.आणि ऋतू हे सूर्यावर अवलंबून आहेत.आपल्या कालगणनेत चांद्र आणि सौर पद्धतीचा उत्तम असा मेळ घातलेला आहे. या गणितावरुन येणारा जास्तचा जो महिना असतो तो म्हणजे "अधिक मास" व कमी झालेला जो महिना असतो त्याला "क्षयमास" असे म्हटले जाते.* 


 *सूर्य एका राशीमधे असताना. जर दोन चांद्र महिन्यांचा प्रारंभ झाला, तर पहिला येणारा महिना जो असतो तो अधिकमास असतो व दुसरा तोच असणारा महिना हा* 

*निजमास असतो.* 


 *ज्या चांद्रमहिन्यात सूर्याचा राशीबदल होत नाही तो अधिकमास .* 


*या आधिक मासात ३३ या संख्येला विशेष महत्व (प्राधान्य) आहे.*


*अधिक महिन्याचा आणि ३३ अंकांचा संबंध काय?*


*तर एका चांद्रवर्षात ३६० तिथी असतात.* 


*आणि एका सौर वर्षात ३७१ तिथी असतात.*


  *म्हणजेच प्रत्येक चांद्रवर्ष हे सौरवर्षापेक्षा ११ तिथीने लहान आहे.* 


 *आता प्रत्येक वर्षात ११ तिथी जर कमी झाल्या. तर ११ या संख्येप्रमाणे तिन वर्षात ३३ तिथी कमी* *होतात.*


*आणि ३३ तिथी ज्या कमी होतात. त्या कमी तिथींचा योग्य मेळ बसावा म्हणून एक महिना हा वाढीव धरण्यात येतो. आणि त्या वाढीव येणाऱ्या महिन्यालाच*

*अधिक महिना (अधिकमास, धोंडामास) म्हणतात.* 


*दोन अधिकमासात कमीतकमी २७ महिने व जास्तीतजास्त* 

*३४ महिने अंतर असते.* 


*आता अधिकमासात कोणती कर्मे करावीत ? कोणती कर्मे करू नयेत ?*


*तर अधिकमासात नित्य व नैमित्तिक कर्मे करावीत म्हणजेच नामकरण, अन्नप्राशन इत्यादी कर्मे करावी. परंतू देव प्रतिष्ठापना, चौल, उपनयन, विवाह, संन्यासग्रहण, वास्तुशांत, गृहारंभ इत्यादी कर्मे करू नयेत असे शास्त्रात सांगितले आहे.*


 *अधिकमासाला पुरुषोत्तममास असे का म्हणतात ?*


 *याविषयी एक कथा सांगितली जाते. अधिकमासाला धोंड्यामहिना,अथवा मलमास असेही म्हटले जाते.* 


*या महिन्यात शुभ कार्ये केली जात नाहीत. फक्त नैमित्तिक कार्येच होतात. याचे या अधिकमासाला खूप वाईट वाटले. म्हणून एकदा हताश, निराश,दु:खी*

 *झालेला अधिकमास हा श्रीविष्णूंकडे गेला*

*व आपली निराशा* *सांगितली*


*श्रीविष्णूने अधिकमासाला श्रीकृष्णाकडे पाठवले.*

 

*श्रीकृष्णाने मात्र अधिकमासाचे स्वागत करुन त्याचे "पुरुषोत्तम मास"*

*असे नांव ठेवले. आणि सांगितले हा सर्वोत्तम मास आहे. लोक या महिन्यात जास्त दानधर्म करतील. व त्या मुळे हा मास पुण्यकारक मास म्हणून ओळखला जाईल.* 


*म्हणून याला अधिकमास अथवा ‘ पुरुषोत्तममास ‘ असे नांव प्राप्त झाले.*


 *अधिकमासात ‘ विष्णूपूजनाला प्राधान्य आहे. तसेच अपूप दान ‘ देण्याची पद्धत आहे. अपूप म्हणजे जाळीदार पदार्थ. उदा.* 

*(अनारसे, बत्तासे, मेसूर)*


*वेदकालातही* 

 *"न पूयते विशीयंति" इति -अपूप ‘ असे वर्णन आहे.*


 *गहू किंवा तांदूळाच्या पिठात तूप व गूळ मिसळून केलेला विशेष पदार्थ (अपूप) म्हणजे "अनरसा"* 


*अधिकमासात ३३ अनरशांचा नैवेद्य विष्णूला अर्पण करावा. व ३३ अनरसे दान करावेत असे सांगण्यात आले आहे.*


*विवाह समारंभात कन्यादानाचे वेळी जावई व मुलगी यांना विष्णू व लक्ष्मी स्वरुप मानून माता,पिता त्यांना नमस्कार करतात. त्यामुळे जावई हा विष्णूसमानच असतो.*  


*म्हणून विष्णूरुपी जावयाला ३३ अनरसे दान देण्याची पद्धत पडली आहे.*


*किती महिने अधिक येतात?*

*सूर्याच्या भासमान गतीमुळे ठराविकच महिने अधिक येतात.* 


*चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक आणि फाल्गुन हे ९ महिने अधिक येतात.* 


 *मार्गशीर्ष व पौष हे २ महिने क्षयमास होतात.*


 *राहिला उर्वरीत माघ महिना. हा मात्र कधीच क्षय किंवा अधिक होत नाही.*


*आता क्षयमास म्हणजे काय?*

   

*(कधी कधी एका चांद्रमहिन्यात सूर्य दोन राशीत प्रवेश करतो. तो क्षयमास असतो.*  


 *आणि एक क्षयमास आला की त्यावर्षी दोन अधिकमास येतात.)*  

 __________________

*संदर्भ– श्री दा. कृ. सोमण, पंचांगकर्ते, खगोलअभ्यासक.*

प्रौढ मूकबधिर प्रशिक्षणार्थींसाठी सन २०२३-२४ या वर्षाकरिताप्रवेश प्रक्रिया सुरु

 प्रौढ मूकबधिर प्रशिक्षणार्थींसाठी सन २०२३-२४ या वर्षाकरिताप्रवेश प्रक्रिया सुरु


 


            मुंबई, दि. १६ : शासकीय प्रौढ मूकबधीर प्रशिक्षणकेंद्र उल्हासनगर-५, जि. ठाणे या संस्थेत सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाकरीता प्रौढ मूकबधिर प्रशिक्षणार्थींना प्रवेश देण्यात येणार आहेत. इच्छुकांनी २० जुलै २०२३ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन अधीक्षक शासकीय प्रौढ मूकबधिर प्रशिक्षण केंद्र उल्हासनगर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.


              दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे अंतर्गत असलेल्या शासकीय प्रौढ मूकबधिर प्रशिक्षणकेंद्र उल्हासनगर-५, जि. ठाणे या संस्थेत १६ ते ४५ वर्ष या वयोगटातील, इयत्ता ६ वी (वरिष्ठ) उत्तीर्ण, कोणताही गंभीर आजार नसलेले व जिल्हा शल्य चिकित्सक यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र, किमान ४० टक्के कर्णबधीर असलेल्या मुलांना औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या धर्तीवर सुतारकाम, जोडारी, तारतंत्री यासंबंधी एक वर्षीय प्रशिक्षण विभागांमध्ये देण्यात येते.


            प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क वगळता निवास, भोजन व शैक्षणिक साहित्य विनामूल्य पुरविण्यात येते.


            प्रवेश अर्जाचे वाटप कामकाजाचे दिवशी शासकीय सुट्ट्या वगळून कार्यालयीन वेळेत शासकीय प्रौढ मूकबधिर प्रशिक्षण केंद्र, शांती भवन, निजधाम आश्रम समोर, तहसिल कार्यालयाजवळ, गांधीरोड ५. उल्हासनगर, जि. ठाणे या कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहेत. टपालाने अर्ज मागवावयाचे असल्यास वरील पत्त्यावर रु.१०/- चे पोस्टाचे तिकीट लावलेले व स्वतःचा संपूर्ण पत्ता असलेला (पिनकोडसह) लिफाफा पाठवावा. अर्ज व्यक्तिशः किंवा टपालाद्वारे दिले जातील. असे अधीक्षक शासकीय प्रौढ मूकबधिर प्रशिक्षण केंद्र उल्हासनगर- ५ यांनी कळविले आहे. (संपर्कासाठी भ्रमणध्वनी क्रमांक- ९२८४९३७८१३, ९०२१४०३९३८, ८६०००११४८९)


*****

Friday, 16 June 2023

पुरेशी झोप अतिशय महत्त्वाची आहे.*

 *पुरेशी झोप अतिशय महत्त्वाची आहे.* 


निरोगी आरोग्यासाठी झोप का महत्वाची आहे ते पाहूया. यासाठी झोपलेल्या अवस्थेत शरीरात कोणती कार्ये होत असतात याची माहिती घेऊया.


१. झोपेत शरीरातील ऊर्जेचे संवर्धन होते. या अवस्थेत शरीराच्या हालचाली अत्यल्प असल्यामुळे ऊर्जेची बचत होते. अभ्यासक सांगतात ८ तासाच्या झोपेमुळे ३५% टक्के ऊर्जेची बचत होते. यामुळेच शांत झोपून उठल्यावर आपण ताजेतवाने होतो.


२. दिवसभरात ग्रहण केलेल्या माहिती पैकी उपयुक्त माहिती दीर्घकाळासाठी स्मरणात ठेवण्यासाठी ती योग्य ठिकाणी साठवली जाते आणि अनावश्यक माहितीचा कचरा मेंदूतून काढून टाकला जातो. त्यामुळे झोपून उठल्यावर मेंदू तरतरीत आणि ग्रहणक्षम बनतो.


३. दिवसभरात पेशींची मोडतोड किंवा झीज होते. पेशींच्या दुरुस्तीचे आणि पुनरुज्जीवनाचे कार्य झोपेतच होते. त्यामुळेच झोप पूर्ण झाली असेल तर शरीर पुढील दिवसासाठी सक्षम होते.


४. रोगप्रतिकारक शक्ती बळकट बनविणे, इन्सुलिनचा योग्य वापर करणे आणि हृदयावरचा भार कमी करण्याचे कार्यही झोपेतच होते.


५. झोपेत आपण काही खात नाही म्हणूनच भुकेचे जे दोन हार्मोन्स आहेत ghrelin आणि leptin यांचे नियंत्रण योग्य प्रकारे होते. त्यामुळे वजनाचे संतुलन राखण्यास मदत होते.


तर मित्रहो किमान सहा ते आठ तास शांत झोप घेण्याचा प्रयत्न अवश्य करा.


*संकलन-* 

*डॉ. प्रमोद ढेरे,*


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*




रेड स्व स्तिक सोसायटी,संभाजीनगर शाखेच्या वतीने श्री.संत एकनाथ महाराजदिंडीतील पायी चालणा-या भाविकांना

 रेड स्व स्तिक सोसायटी,संभाजीनगर शाखेच्या वतीने श्री.संत एकनाथ महाराजदिंडीतील पायी चालणा-या भाविकांना आरोग्यव सेवा देण्याकसाठीरूग्णयवाहिकेसह आरोग्य पथक रवाना - - -

आज दिनांक १५-०६-२०२३ रोजी संस्थेपचे कार्यालय साईनगर एन -६ सिडको येथूनसंध्याे ५.०० वाजता श्री.संत एकनाथ महाराज दिंडीतील पायी चालणा-याभाविकांना आरोग्यि सेवा देण्यानसाठी रूग्णसवाहिका,औषधी व डॉक्टरसह रेड

स्वस्तिक सोसायटी,संभाजीनगर शाखेचे आरोग्यि पथक रवाना करण्यात आले.

   संस्थे्चे “एक आरोग्यं अभियान” उपक्रमातंर्गत दरवर्षी भाविकांच्या सेवेसाठी औषधी,डॉक्टकर व एक रूग्णयवाहिका गेल्याव १५ वर्षापासून सेवा देतआहे.

    आरोग्य पथक रवानगी कार्यक्रमाप्रसंगी मा.श्री.स्वरप्नीचल मोरे(उपविभागीय अधिकारी महसूल उपविभाग पैठण/फूलंब्री).श्री.उज्वलशिदें(सन्मानइंडस्ट्रीजचे,मूख्यावधिकारी),श्री.दत्तप्रसादपवार(उपविभागीय व्यवस्थापक एस.बी.आय.बॅक) यांच्याश हस्ते आरोग्यपथकाचे स्वाोगत करून रवाना करण्याहत आले. यावेळी संस्थेाचे राष्ट्रीय स्तरावरील कार्याध्यक्ष श्री भगवान राउत, श्री.हेमंत गोरे(अध्य क्षमहाराष्ट्रव राज्यू रेड स्व स्तिक सोसायटी ),श्री.के.बी.गवळी, (जिल्हाअध्यक्ष रेड स्व‍स्तिक सोसायटी,संभाजीनगर),डॉ.श्री.अभिजीत सपकाळ,

श्री.सूर्यकांत सूवर्णकार(उपाध्यक्ष,प्रशासन, रेड स्वस्तिक 

सोसायटीसंभाजीनगर)

श्री.सूधाकर ढवळे(सहसीचिव,रेड स्वस्तिकसोसायटी,संभाजीनगर),श्री.झंवर(चार्टडअकाउंटन्ट),

श्री.धीरज वर्मा, श्रीकृष्णी डिस्ट्रीब्यूटर तसेचरेड स्वस्तिक

सोसायटीचे संचालक श्री.प्रशांत सारडा,श्री.वसंतराव हंद्राळे,श्री प्रमोदगौरकर,समन्व्यक नंदकिशोर राउत यांची उपस्थिती होती.या प्रसंगी गेल्यास १५वर्षापासून या अॅम्बूहलन्सं सोबत वारकयांना सतत आरोग्य‍ सेवा देणारेडॉ.सकपाळ यांचा विशेष सत्कार करण्यारत आला.

     या कार्याक्रमाचे प्रस्तावविक श्री.के.बी.गवळी यांनी केले. तर

श्री.झंवर, यांनी वारीतील लोकांना सेवा देण्याचा आनंद काय असतोयाबाबतचा त्यां्चा अनूभव उपस्थितांना सांगितला. तसेच प्रमूख पाहूणेश्री.स्वप्नींल मोरे यांनी रेड स्व स्तिक सोसायटीच्यां या अरोग्यंसेवेच्याष उपक्रमाचे कौतूक करून भविष्यात अशाचप्रकारे गोरगरीब व गरंजूचीसेवा संस्थेकच्यां मार्फत होत राहो असे व्यक्त केले व वारीतीलभाविकांना सेवा देणा-या पथकास शुभेच्छा दिल्याी. हा कार्यक्रम यशस्वी

करण्यासाठी श्री गणेश कूलकर्णी, दत्तूक तूपे, अफझल पटेल इ.यांनीप्रयत्न केले तसेच आभार प्रदर्शन श्री.हेमंत गोरे (रेड स्वस्तिकसोसायटी राज्यााध्यपक्ष)यांनी केले.

                        आपला स्ने हांकित


                (के.बी.गवळी)

                अध्यकक्ष

                रेड स्वसस्तिक सोसायटी शाखा संभाजीनगर

सावित्रीदेवी फुले शासकीय वसतिगृहातीलमृत विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत

 सावित्रीदेवी फुले शासकीय वसतिगृहातीलमृत विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत


वसतिगृहाच्या अधिक्षिकेचे निलंबन

            मुंबई, दि. 16 : सावित्रीदेवी फुले शासकीय वसतिगृहामध्ये घडलेल्या घटनेच्या तपासासाठी गठीत केलेल्या समितीच्या प्राथमिक अहवालानुसार या वसतिगृहाच्या अधीक्षिकेचे निलंबन करण्यात येत आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.


            मंत्री श्री. पाटील यांनी आज मृत विद्यार्थीनीच्या कुटुंबीयांची दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे भेट घेतली. त्यांचे सांत्वन करून न्याय देण्याचे आश्वासन यावेळी मंत्री श्री. पाटील यांनी दिले.


            मंत्री श्री. पाटील म्हणाले, “या घटनेची शासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे. त्याच्या सखोल चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली असून समितीच्या प्राथमिक अहवालानुसार वसतिगृहाच्या अधीक्षिका यांचे निलंबन करण्यात येत आहे.


            यावेळी मंत्री श्री. पाटील यांनी कुटुंबीयांना तपासाची सविस्तर माहिती दिली. तसेच पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. कुटुंबीयांनी खचून जाऊ नये, त्यांना मदत व्हावी म्हणून त्यांच्या मुलाला कंत्राटी पद्धतीने तात्पुरती नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले. उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारितील सर्व शासकीय वसतिगृहांच्या सुरक्षेचा सखोल आढावा घेऊन महिला सुरक्षा रक्षक देण्यात येतील, असेही यावेळी त्यांनी सांगितले. रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर, मृत विद्यार्थीनीचे नातेवाईक यावेळी उपस्थित होते.

साखर कारखाना उभारणीसाठी हवाई अंतर अटीबाबत समिती

 साखर कारखाना उभारणीसाठी हवाई अंतर अटीबाबत समिती


शेतकरी कंपन्यांच्या इथेनॉल निर्मितीसाठी उद्योग विभाग धोरण आणणार


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय


 


            मुंबई, दि. १५ :- साखर कारखाना उभारणीसाठी २५ किलोमीटर हवाई अंतराची अट शिथील करण्याबाबत समिती नियुक्त करण्यात येईल. तसेच शेतकरी कंपन्यांना इथेनॉल निर्मितीसाठी परवानगी देण्याबाबत उद्योग विभागाकडून धोरण निश्चित करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.


            राज्यातील शेतकरी, ऊस वाहतूकदार तसेच सरपंच परिषद यांच्या विविध मागण्यांबाबत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते.


            बैठकीस ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे, आमदार प्रवीण दरेकर, आमदार राजेंद्र पाटील - यड्रावकर, आमदार सुरेश धस, मुख्य सचिव मनोज सौनिक, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, सहकार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेशकुमार, कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनुपकुमार तसेच शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्यासह, ऊस वाहतूकदार संघटनेचे पदाधिकारी, सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे आदी उपस्थित होते.


            बैठकीत उपस्थित झालेल्या मुद्द्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी निर्देश दिले की, संत शिरोमणी सावता माळी आठवडी बाजार ही योजना पुन्हा सुरू करण्यात यावी. या माध्यमातून शेतकऱ्यांचा भाजीपाला, शेतमाल शहरात आणि विविध परिसरात सहजपणे पोहचतो. नागरिकांनाही चांगल्या गोष्टी उपलब्ध होतात. त्यामुळे यातून शेतकऱ्यांना फायदा झाला पाहिजे यासाठी, वाहतूक परवाना आणि अनुषंगिक बाबींसाठी पणन विभागाने समन्वयाने कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले.


            बैठकीत श्री. खोत यांनी शेतकरी, ऊस उत्पादक आणि ऊस वाहतूकदार यांच्या विविध समस्यांबाबत मांडणी केली. त्यावर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले की, साखर कारखाना उभारणीसाठी हवाई अंतराची अट शिथील करण्याबाबत समिती नियुक्त करण्यात येईल. शेती पूरक व्यवसायाला 'सिबील' निकष लावू नये याबाबत राज्यस्तरीय बँकर्स समिती एसएलबीसी बैठकीत विषय घेतला जाईल. खेड तालुक्यातील काही गावांतील शेत जमीनीवर कालव्यासाठीच्या नोंदी रद्द करण्यासाठी जलसंपदा आणि मदत व पुनर्वसन विभाग समन्वयाने कार्यवाही करतील. खेड-शिरूर येथील सेझसाठी संपादीत जमीन औद्योगिक विकास महामंडळाने घेण्याबाबत कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले.


            बैठकीत ऊस वाहतूकदारांची ऊसतोड मजूर पुरवठादार मुकादमाकडून होणाऱ्या फसवणूकीच्या प्रकरणांवर गांभीर्याने चर्चा झाली. राज्यात अशा सुमारे दहा हजार प्रकरणात चारशे ते पाचशे कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती देण्यात आली. यावर गुन्हे दाखल झालेल्या प्रकरणात कठोर कारवाई करण्यात यावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. अशा फसवणुकीच्या प्रकरणात कारखाने नामानिराळे राहतात. वाहतूकदार भरडला जातो. काही प्रकरणांमध्ये मुकादम आणि मजूर यांनाही त्रास होतो, असे मुद्दे पुढे आले. याबाबत साखर आयुक्त, सहकार आणि कामगार विभाग यांना समन्वयाने मार्ग काढावा लागेल. प्रसंगी कायदा करावा लागेल. यासाठी समिती नियुक्त केली जाईल असेही बैठकीत सांगण्यात आले.


            कोकणातील शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत स्वतंत्र बैठक घेण्याचे, तसेच सरपंच परिषदेच्या मागण्यांबाबत ग्रामविकास मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र बैठक घेण्यात येईल असे निश्चित करण्यात आले.


            खाद्य तेल आयातीवर शुल्क वाढविण्यासाठी आणि कापूस निर्यातीबाबत केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे सांगण्यात आले.

Featured post

Lakshvedhi