Saturday, 17 June 2023

आधिक मासाविषयी*वर्षी १८ जुलै ते १६ आॕगस्ट असा श्रावण महिना हा "अधिकमास" आला आहे.*

 *आधिक मासाविषयी*


*या वर्षी १८ जुलै ते १६ आॕगस्ट असा श्रावण महिना हा "अधिकमास" आला आहे.*

__________________

  

*अधिकमास म्हणजे काय? व त्याला एवढे महत्व कां?*


 *सण हे चंद्रावर अवलंबून आहेत.आणि ऋतू हे सूर्यावर अवलंबून आहेत.आपल्या कालगणनेत चांद्र आणि सौर पद्धतीचा उत्तम असा मेळ घातलेला आहे. या गणितावरुन येणारा जास्तचा जो महिना असतो तो म्हणजे "अधिक मास" व कमी झालेला जो महिना असतो त्याला "क्षयमास" असे म्हटले जाते.* 


 *सूर्य एका राशीमधे असताना. जर दोन चांद्र महिन्यांचा प्रारंभ झाला, तर पहिला येणारा महिना जो असतो तो अधिकमास असतो व दुसरा तोच असणारा महिना हा* 

*निजमास असतो.* 


 *ज्या चांद्रमहिन्यात सूर्याचा राशीबदल होत नाही तो अधिकमास .* 


*या आधिक मासात ३३ या संख्येला विशेष महत्व (प्राधान्य) आहे.*


*अधिक महिन्याचा आणि ३३ अंकांचा संबंध काय?*


*तर एका चांद्रवर्षात ३६० तिथी असतात.* 


*आणि एका सौर वर्षात ३७१ तिथी असतात.*


  *म्हणजेच प्रत्येक चांद्रवर्ष हे सौरवर्षापेक्षा ११ तिथीने लहान आहे.* 


 *आता प्रत्येक वर्षात ११ तिथी जर कमी झाल्या. तर ११ या संख्येप्रमाणे तिन वर्षात ३३ तिथी कमी* *होतात.*


*आणि ३३ तिथी ज्या कमी होतात. त्या कमी तिथींचा योग्य मेळ बसावा म्हणून एक महिना हा वाढीव धरण्यात येतो. आणि त्या वाढीव येणाऱ्या महिन्यालाच*

*अधिक महिना (अधिकमास, धोंडामास) म्हणतात.* 


*दोन अधिकमासात कमीतकमी २७ महिने व जास्तीतजास्त* 

*३४ महिने अंतर असते.* 


*आता अधिकमासात कोणती कर्मे करावीत ? कोणती कर्मे करू नयेत ?*


*तर अधिकमासात नित्य व नैमित्तिक कर्मे करावीत म्हणजेच नामकरण, अन्नप्राशन इत्यादी कर्मे करावी. परंतू देव प्रतिष्ठापना, चौल, उपनयन, विवाह, संन्यासग्रहण, वास्तुशांत, गृहारंभ इत्यादी कर्मे करू नयेत असे शास्त्रात सांगितले आहे.*


 *अधिकमासाला पुरुषोत्तममास असे का म्हणतात ?*


 *याविषयी एक कथा सांगितली जाते. अधिकमासाला धोंड्यामहिना,अथवा मलमास असेही म्हटले जाते.* 


*या महिन्यात शुभ कार्ये केली जात नाहीत. फक्त नैमित्तिक कार्येच होतात. याचे या अधिकमासाला खूप वाईट वाटले. म्हणून एकदा हताश, निराश,दु:खी*

 *झालेला अधिकमास हा श्रीविष्णूंकडे गेला*

*व आपली निराशा* *सांगितली*


*श्रीविष्णूने अधिकमासाला श्रीकृष्णाकडे पाठवले.*

 

*श्रीकृष्णाने मात्र अधिकमासाचे स्वागत करुन त्याचे "पुरुषोत्तम मास"*

*असे नांव ठेवले. आणि सांगितले हा सर्वोत्तम मास आहे. लोक या महिन्यात जास्त दानधर्म करतील. व त्या मुळे हा मास पुण्यकारक मास म्हणून ओळखला जाईल.* 


*म्हणून याला अधिकमास अथवा ‘ पुरुषोत्तममास ‘ असे नांव प्राप्त झाले.*


 *अधिकमासात ‘ विष्णूपूजनाला प्राधान्य आहे. तसेच अपूप दान ‘ देण्याची पद्धत आहे. अपूप म्हणजे जाळीदार पदार्थ. उदा.* 

*(अनारसे, बत्तासे, मेसूर)*


*वेदकालातही* 

 *"न पूयते विशीयंति" इति -अपूप ‘ असे वर्णन आहे.*


 *गहू किंवा तांदूळाच्या पिठात तूप व गूळ मिसळून केलेला विशेष पदार्थ (अपूप) म्हणजे "अनरसा"* 


*अधिकमासात ३३ अनरशांचा नैवेद्य विष्णूला अर्पण करावा. व ३३ अनरसे दान करावेत असे सांगण्यात आले आहे.*


*विवाह समारंभात कन्यादानाचे वेळी जावई व मुलगी यांना विष्णू व लक्ष्मी स्वरुप मानून माता,पिता त्यांना नमस्कार करतात. त्यामुळे जावई हा विष्णूसमानच असतो.*  


*म्हणून विष्णूरुपी जावयाला ३३ अनरसे दान देण्याची पद्धत पडली आहे.*


*किती महिने अधिक येतात?*

*सूर्याच्या भासमान गतीमुळे ठराविकच महिने अधिक येतात.* 


*चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक आणि फाल्गुन हे ९ महिने अधिक येतात.* 


 *मार्गशीर्ष व पौष हे २ महिने क्षयमास होतात.*


 *राहिला उर्वरीत माघ महिना. हा मात्र कधीच क्षय किंवा अधिक होत नाही.*


*आता क्षयमास म्हणजे काय?*

   

*(कधी कधी एका चांद्रमहिन्यात सूर्य दोन राशीत प्रवेश करतो. तो क्षयमास असतो.*  


 *आणि एक क्षयमास आला की त्यावर्षी दोन अधिकमास येतात.)*  

 __________________

*संदर्भ– श्री दा. कृ. सोमण, पंचांगकर्ते, खगोलअभ्यासक.*

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi