Tuesday, 30 May 2023

उष्माघात*_*उन्हामुळे मृत्यू का होतो* ?

 _*उष्माघात*_*उन्हामुळे मृत्यू का होतो* ?


आपण सगळेच उन्हात फिरतो. पण काही जणांचाच उन्हात गेल्यामुळे अचानक मृत्यू का होतो?


*आपल्या शरीराचं तापमान नेहमी ३७° अंश सेल्सियस असतं, या तापमानातच शरीरातले सर्व अवयव नीट काम करू शकतात*.


घामाच्या रुपाने पाणी बाहेर काढून शरीर ३७° अंश सेल्सियस तापमान कायम राखतं, *सतत घाम निघत असताना पाणी पीत राहाणं अत्यंत गरजेचं आणि अत्यावश्यक* आहे.


पाणी शरीरात इतरही अधिक महत्त्वाची कामं करतं, त्यामुळे शरीरातला पाण्याचा साठा कमी झाला, तर शरीर घामाच्या रूपाने पाणी बाहेर टाकणं टाळतं.


- जेव्हा बाहेरचं तापमान ४५°अंशाच्या पुढे जातं आणि शरीरातली कुलिंग व्यवस्था पाण्याच्या अभावाने ठप्प होते, तेव्हा शरीराचं तापमान ३७°च्या पुढे जाऊ लागतं.


*शरीराचं तापमान जेव्हा ४२° डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचतं, तेव्हा रक्त तापू लागतं आणि रक्तातलं प्रोटिन अक्षरशः शिजू लागतं* (उकळत्या पाण्यात अंड उकडतं तसं!)


- *स्नायू कडक होऊ लागतात, त्यात श्वास घेण्यासाठी लागणारे स्नायू ही निकामी होतात*.


*रक्तातलं पाणी कमी झाल्या* मुळे *रक्त घट्ट होतं, ब्लडप्रेशर अत्यंत कमी होतं, महत्त्वाच्या अवयवांना* (विशेषतः मेंदूला) रक्त पुरवठा थांबतो.

- माणूस कोमात जातो आणि त्याचे एक-एक अवयव अवघ्या काही क्षणांत बंद पडतात आणि त्याचा मृत्यू ओढावतो.


उन्हाळ्यात असे अनर्थ टाळण्यासाठी सतत थोडे थोडे पाणी पित रहावे, व *आपल्या शरीराचे तापमान 37° अंशच कसे राहिल याकडे लक्ष द्यावे*..


*ऊष्माघात टाळा*.


*उन्हाचा पारा चढत आहे*.. त्यामुळे *उष्माघात टाळण्या* साठी खालील उपाययोजना करा..

शेतातील कामे सकाळी ६ ते ११ व दुपारी ४ते ६.३० या कालावधीत करा.


- *काम करत असताना मध्ये मध्ये थोडावेळ थांबुन पाणी प्या*.


शक्यतो सुती (काँटन) व पांढऱ्या रंगाचे कपडे वापरा.


- *डोक्यावर रुमाल टोपी इत्यादीचा वापर करा*.


- आहारात ताक दही इत्यादीचा वापर करा. तिखट, तेलकट, मसालेदार पदार्थ, मद्यपान व मांसाहार टाळा.


- कोल्ड्रींक ऐवजी लिंबु सरबत, नारळपाणी याचा वापर करा.


*दुपारी ११ ते ४ पर्यंत काम, प्रवास टाळा*.


- लहान मुलांना, गरोदर मातांना, आजारी व्यक्तींना दुपारच्या वेळी बाहेर पडु देऊ नका.


*अशक्तपणा,थकवा, ताप-उलट्या इ. लक्षणे आढळल्यास* तत्काळ डाॕक्टरांचा सल्ला घ्या.


ही पोस्ट फक्त पंधरा नव्हे तर हजारो लोकांना पाठवा. फक्त चांगली बातमी येईल याची अपेक्षा न करता चांगल्या बातम्या तयार करा

🙏🙏🙏🙏



_*

शूगर झालेल्या लोकांनी मरेपर्यंत allopathi गोळ्या खाण्यापेक्षा एक वेळ नक्की आपल्या संस्थेचा Antox D व Antox tea हा

 *शूगर झालेल्या लोकांनी मरेपर्यंत allopathi गोळ्या खाण्यापेक्षा एक वेळ नक्की आपल्या संस्थेचा Antox D व Antox tea हा फॉर्मूला वापरा.*


*100 % result no side effects*


*बरेच लोक पैशाचा विचार करून आयुर्वेदिक चांगली औषध घेण्याचे टाळतात व allopathic गोळ्या खात राहतात. पन याच गोळ्या भविष्यात आपले अवयव निकामी करतात. व नंतर यांना बरे करण्यासाठी परत आपले लाखो रुपये दवाखान्यात जातात.*


*ज्यांना आपली शूगर नॉर्मल होताना पहायचे आहे त्यांनी नक्की आपल्या संस्थेचा Antox D व Antox tea हा फॉर्मूला वापरा.*


*व ज्यांना फॉर्मूला घेणे possible नाही आहे. त्यांनी स्वतः च्या घरी नियमित पणे काढे करून घ्यावे. व प्रयत्न हाच करावा की allopathic गोळी कमी कशी करता येईल.*


समर्थ सोशल फौंडेशन, जनरल हॉस्पिटल कोल्हापूर 


*Contact - 7875481853*


धन्यवाद. 🙏🙏

जिवन गाणे गात रहावे.

🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 गर्जा महाराष्ट्र माझा*तुमच्या सारखी किंवा तुमच्या पेक्षा जास्त चांगली असलेली माणसे तुम्हाला कधीच नावे ठेवणार नाहीत, नावे तीच माणसे ठेवतील ज्यांना खात्री असते की ती तुमच्या एवढी चांगली होऊ शकत नाहीत.*

😊

🙏

*शुभ सकाळ*जो व्यक्ती स्पष्ट, साफ, सिधी बात करता हैं उसकी वाणी तीव्र और कठोर जरूर होती हैं किंतू ऐसा व्यक्ती कभी किसी को धोखा नही देता......

आपका दीन मंगलमय हो 🙏माणसाने “शिक्षणा”आधी “संस्कार”, ”व्यापारा” आधी “व्यवहार”आणि ”देवा”आधी “आईवडीलांना” समजुन घेतले तर, “जीवनात” कोणतीच अडचण येणार नाही !*


*🍁🍁🍁🍁**जब तक किस्मत का सिक्का हवा में है, तब तक खुद के बारे में फैसला कर लो....*

*क्योंकि जब वो नीचे आएगा, तब अपना फैसला खुद सुनाएगा....!!*


🙏🙏🙏🙏🙏


ज्यांना आपले विचार पटत नसतील त्यांना प्रत्युत्तर देत बसू कारण गढूळ पाण्याला नका... ढवळत बसण्यापेक्षा त्याला शांत राहू दया. गाळ आपोआप खाली बसते...... *जीवन में हमेंशा राय लेने की जरुरत नहीं होती हैं! कभी कभी सम्भाल लेने वाले हाथ, सुन के लेने वाले कान और समझ के लेने वाले दिल की भी जरुरत होती हैं!*

       *सुप्रभात*चुकीच्या दिशेने वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिसेने हळुहळु जाणे केव्हाही चांगले..

🚩🚩 🚩🚩: *समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो,काहीजण त्यातुन मोती उचलतात,काहीजण त्यातुन मासे घेतात तर काहीजण फक्त आपले पाय ओले करतात,हे विश्व पण सर्वांसाठी सारखेच आहे फक्त तुम्ही त्यातुन काय घेता ते महत्वाचे...!!!*

🌹💐🙏


 🙏Shri Swami Samarth 🙏

शासनाच्या स्वच्छ मुख अभियानाचेभारतरत्न सचिन तेंडुलकर होणार सदिच्छादूत

 राज्य शासनाच्या स्वच्छ मुख अभियानाचेभारतरत्न सचिन तेंडुलकर होणार सदिच्छादूत


— वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन


            मुंबई, दि. 29 : प्रसिद्ध क्रिकेटपटू, भारतरत्न सचिन तेंडुलकर आता राज्य शासनाच्या ‘स्वच्छ मुख अभियाना’चे सदिच्छादूत (ब्रँड ॲम्बेसेडर) होणार आहेत. राज्य शासनाच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या या अभियानासाठी सदिच्छादूत म्हणून लोकांमध्ये जनजागृतीची महत्त्वाची जबाबदारी पार पाडण्यास श्री. तेंडुलकर यांनी सहमती दर्शवली असून उद्या त्यांच्यासोबत याबाबतचा सामंजस्य करार करण्यात येणार असल्याची माहिती, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी दिली.


            सचिन तेंडुलकर यांनी या अभियानाचे ‘स्माइल ॲम्बेसेडर’ म्हणून पुढील पाच वर्षे नियुक्त राहण्याची सहमती दर्शवली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत, सचिन तेंडुलकर आणि वैद्यकिय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग यांच्यामध्ये ‘स्वच्छ मुख अभियाना’साठी उद्या दि. ३० मे २०२३ रोजी सामंजस्य करार स्वाक्षरी कार्यक्रम होईल. सचिन तेंडुलकर यांनी या अभियानाचे सदिच्छादूत पद स्वीकारल्यामुळे या अभियानाची सर्वदूर व्याप्ती पसरुन चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वासही मंत्री श्री. महाजन यांनी व्यक्त केला.


            राज्यात वाढत्या मौखिक आजारांवर नियंत्रण आणण्यासाठी राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत शिफारस करण्यात आलेल्या आणि जागतिक आरोग्य संघटनेने नमूद केलेल्या मौखिक आरोग्याबाबत कृती योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने या वर्षापासून 'महाराष्ट्र मौखिक आरोग्य अभियान' म्हणजेच 'स्वच्छ मुख अभियान' राबविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाच्या वतीने हे अभियान जानेवारी २०२३ पासून सुरू करण्यात आले आहे. कॅलेंडर, कॅम्प आणि कॅम्पेन या त्रिसूत्रीच्या माध्यमातून समाजात मौखिक आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अभियान राबवले जात आहे.

Monday, 29 May 2023

स्काऊटस आणि गाइडसचे कामकाजजुन्या नियमानुसार चालण्यासाठी सकारात्मक चर्चा

 स्काऊटस आणि गाइडसचे कामकाजजुन्या नियमानुसार चालण्यासाठी सकारात्मक चर्चा


- मंत्री गिरीश महाजन


            मुंबई, दि. 29 : महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस आणि गाइडस या संस्थेचे जुन्या नियमानुसार कामकाज करण्यासाठी सकारात्मक चर्चा करण्यात आली असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.


            सह्याद्री अतिथीगृहात महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस आणि गाईडस या संस्थेच्या राज्य मुख्य आयुक्त पदाची निवडणूक घेण्याबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार चंद्रशेखर बावनकुळे, क्रीडा व युवक कल्याण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, आयुक्त सुहास दिवसे यांची उपस्थिती होती.


            मंत्री श्री. महाजन म्हणाले की, महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस आणि गाइडस या संस्थेची नव्याने तयार करण्यात आलेली नियमावली मंजुरीसाठी शासनास पाठविण्यात आली आणि त्यास शालेय शिक्षण व क्रीडा विभागाद्वारे मान्यता प्रदान करण्यात आली आहे. ही नियमावली भारत स्काऊटस आणि गाइडस राष्ट्रीय कार्यालय, नवी दिल्ली यांना पाठविण्यात आली आहे.


            आमदार श्री. बावनकुळे यांच्या शिष्टमंडळाने जुन्या नियमावलीनुसार कामकाज सुरू ठेवण्याची विनंती केली असल्याने त्याबद्दल सकारात्मक चर्चा करण्यात आली. या बैठकीला राज्यातील स्काऊटस आणि गाइडसचे पदाधिकारी उपस्थित होते.


0000

पाणंद रस्त्यांचे ग्रामीण मार्गात रुपांतरासाठीसकारात्मक विचार करणार

 पाणंद रस्त्यांचे ग्रामीण मार्गात रुपांतरासाठीसकारात्मक विचार करणार


- ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन


 


            मुंबई, दि. 29 : राज्यातील पाणंद रस्ते शेतकऱ्यांना शेतीमाल वाहतुकीसाठी गरजेचे आहेत. या पाणंद रस्त्यांना ग्रामीण मार्गात रुपांतर करण्यासाठी सकारात्मक विचार करणार असल्याचे ग्राम विकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.


            सह्याद्री अतिथीगृहात राज्यातील पाणंद रस्त्यांना ग्रामीण मार्गात रुपांतर करण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव स.अं.साळुंखे, प्रधानमंत्री ग्रामीण रस्ते विभागाचे सचिव ख.तु. पाटील, रोजगार हमी योजना विभागाच्या उपसचिव संजना खोपडे यांच्यासह मंत्रालयीन वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.


            मंत्री श्री. महाजन म्हणाले, शेत/पाणंद रस्ते हे अवर्गीकृत स्वरुपाचे रस्ते आहेत. या रस्त्यांना दर्जोन्नत करून ग्रामीण मार्गाचा दर्जा द्यावयाचा झाल्यास प्रथम त्यांचा समावेश रस्ते विकास आराखड्यामध्ये करणे आवश्यक असते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ग्रामविकास विभाग यांनी समन्वयाने कार्यवाही करून राज्यातील पाणंद रस्त्यांना ग्रामीण मार्गात रुपांतर करण्यात येतील असे श्री महाजन यांनी सांगितले.


            यावेळी मंत्री श्री महाजन म्हणाले की, राज्यातील पानंद रस्ते हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. शेतकऱ्यांना आपल्या शेतातील शेतीमालाची ने - आण करणे तसेच शेतातील उत्पादित मालाची बाजारपेठेसाठी वाहतूक करणे गरजेचे असून पावसाळ्यात रस्त्याच्या अभावामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर गैरसोय होऊन त्रासाला सामोरे जावे लागते. या मुळे पाणंद रस्ते मोठ्या प्रमाणावर पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले

अनधिकृत बांग्लादेशी फेरीवाल्यांवर कडक कारवाई करावी

 अनधिकृत बांग्लादेशी फेरीवाल्यांवर कडक कारवाई करावी


- महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा


 


               मुंबई, दि. 29 : आरे स्टॉल समोर अनधिकृत बांग्लादेशी फेरीवाल्यांच्या होणाऱ्या त्रासामुळे नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे हे लक्षात घेता अनधिकृत बांग्लादेशी फेरीवाल्यांवर तत्काळ कडक कारवाई करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी प्रशासनाला दिले.


             पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीर कार्यक्रमात कुर्ला (पश्च‍िम) एल वॉर्ड येथे आज ६८९ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी 130 तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्यात आले आहे. उर्वरित तक्रारी देखील वेळेत निराकरण करून समस्या प्राधान्याने सोडविण्याचे निर्देश मंत्री श्री. लोढा यांनी दिले. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.


                   यावेळी महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तसेच बँका आणि महिला आर्थिक विकास महामंडळ आणि विविध विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलमध्ये शासनाच्या विविध विभागांकडून महिलांकरिता राबविण्यात येणा-या योजनांची माहिती महिलांना देण्यात आली.      


                 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीर कार्यक्रम आयोजित केला आहे. हा उपक्रम 31 मे 2023 पर्यंत दुपारी 3 ते 5.30 वाजता सुरू राहणार आहे. या उपक्रमात महिलांना तक्रारीसाठी प्रत्येक वॉर्डमध्ये ऑनलाईन अर्जही करता येणार आहेत. अधिक माहितीसाठी व अर्ज भरण्यासाठी https://forms.gle/7GzCSACLYsj38amq9 या लिंकवर जाऊन माहिती भरता येणार आहे.


****

Featured post

Lakshvedhi