सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Monday, 22 May 2023
चहा किंवा कॉफी घेण्यापूर्वी* *पाणी का प्यावे?*
*चहा किंवा कॉफी घेण्यापूर्वी* *पाणी का प्यावे?*
*सकाळी उठल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा काय करता?*
*कपभर चहा किंवा कॉफी घेता.... ?*
अनेकांना ही सवय आहे. असे आपल्यापैकी अनेकजण करतात. सकाळी झोपेतून उठल्यावर चहा किंवा कॉफी घेतल्याशिवाय फ्रेश वाटत नाही. ही सवय चुकीची असल्याची जाणीव अनेकांना आहे. परंतु, रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी काहीही घेतल्यास आरोग्यावर सारखाच विपरीत परिणाम होतो, हे खूप लोकांना माहीत नाही.
कॉफी किंवा चहा घेण्यापूर्वी ग्लासभर पाणी प्यावे, याची अनेकांना कल्पना नाही. सकाळी किंवा संध्याकाळी, चहा किंवा कॉफी घेण्याआधी थोडं पाणी अवश्य प्या. ही सवय आरोग्यदायी आहे.
*चहा किंवा कॉफी घेण्यापूर्वी पाणी का प्यावे?*
चहा किंवा कॉफी घेण्यापूर्वी पाणी पिण्यामागचे कारण म्हणजे त्यामुळे पोटातील ॲसिडिटी कमी होते. चहा सुमारे ६ ph म्हणजे ॲसिडिक असतो आणि कॉफी ५ ph म्हणजे ॲसिडिक रेंज थोडीसी कमी आहे. म्हणून तुम्ही जेव्हा सकाळी किंवा संध्याकाळी चहा किंवा कॉफी घेता तेव्हा ॲसिडिटी वाढते. तसंच काहीशी अल्सर्स आणि कॅन्सरच्या धोक्याची शक्यता असते. जर तुम्ही चहा किंवा कॉफी घेण्याआधी पाणी प्यायलात तर पोटातील ॲसिडची पातळी काहीशी सौम्य होते व पोटाच्या व इतर आरोग्याची हानी कमी होते. त्याचबरोबर चहाच्या अधिक ॲसिडिक स्वरूपामुळे दातांवर होणारा दुष्परिणाम कमी होतो. पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि शरीरातून टॉक्सिन्स निघून जाण्यास मदत होते.
खरं जर चहा किंवा कॉफी आपले भारतीय पेय नाहीच. त्यामुळे ते पिणे टाळणे उत्तमच. पण अगदीच प्यायचा झाला तर वरीलप्रमाणे काळजी अवश्य घ्या.
🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺
Sunday, 21 May 2023
घटना
आजोबांनी कष्ट करून विकत घेतलेली, कसलेली, माझ्याच आज्याची शेती माझ्या बापाच्या नावावर करावी म्हणून तलाठी सज्जात गेलो . . .
तलाठ्यानं सांगितलं -
काम करू पण,
देणार किती ?
मला वाटलं शेती आमची,
बाप माझा,
आजा माझा.
मग याला का पैसे द्यायचे ?
तलाठ्याची तक्रार करावी म्हणून पोलिस स्टेशनला गेलो.
पोलीस म्हणाले -
गुन्हा दाखल करू, तपास करू पण . . .
आमच्या चहा पाण्याचं काय ?
मला पुन्हा राग आला.
यांना तर, सरकार म्हणजेच मी पगार देतोय मग पुन्हा हे चिरीमिरी का मागत असतील.
म्हटलं हे आमदारांच्या कानावर टाकू,
आमदार म्हटले . . .
त्याची गडचिरोलीला बदली करू,
त्याला निलंबित करू,
मंत्र्यांना भेटू पण . . .
वजन ठेवल्या शिवाय फाईल पुढं जातच नाही.
मला वाईट वाटलं.
यांना तर मी मतदान केलं होतं.
वाटलं कोर्टात जाऊ . . .
गेलो.
तिथं गेल्यावर कळलं की,
तिथं एक आज-उद्या मरेल अशी म्हतारी आली आहे.
तिच्यावर तरुणपणी अत्याचार झाला होता. त्या मॅटरची तारीख होती.
अजून निकाल लागला नव्हता.
शिवाय निकाल कसा लागेल याची खात्री नव्हती.
म्हटलं हे एखाद्या . . . पत्रकार,
लेखक,
कवीला सांगावं . . .
*मन हलकं करावं !* आपल्या प्रश्नांना ते आवाज देतील.
तिकडे गेलो s s
तर सगळेच म्हणाले,
पेन आमच्या हातात असला तरी,
त्यातली शाई आम्ही विकली आहे.
आम्ही तसं लिहू शकत नाही.
आमचे हात अन . . .
पेन बांधलेले आहेत.
मला याचा प्रचंड राग आला होता.
म्हणून एका साधू कडे गेलो.
वाटलं तेवढीच आत्मशांती मिळेल.
मठावरचे सेवेकरी म्हणाले . . .
*उद्या या !*
सध्या भाऊसाहेब,
P I साहेब,
आमदार साहेब,
पत्रकार साहेब,
लेखक,
कवी आले आहेत.
महाराज त्यांच्यासोबत बिझी आहेत,
नंतर . . .
त्यांच्या सोबत जेवायला बसणार आहेत.
आज ते तुम्हाला टाईम देणार नाहीत.
माझा सगळ्यांवरचा विश्वास उडाला होता.
म्हटलं जनतेच्या दरबारात जाऊ ...!
लोकांसमोर गेलो, लोकांना हे सांगितलं.
लोकं म्हटली हा येडा झालाय् . . . . .
हल्ली काही बरळतोय् !
नंतर कळलं . . .
*लोकं गुलाम झाली आहेत !*
लाचार झाली आहेत !
क्षणभर वाईट वाटलं.
मी करणार तरी काय होतो.
त्यांच्यात सामील व्हावं कि मरावं ?
कि मारावं यांना . . .
😢 😢
*- मी एक मतदार !*
( या देशाचा मालक ? )
Only women's -beauty tips
*आपला चेहरा सकाळी उठल्यावर ड्राय आणि डल दिसतो? अनेक कंपन्यांच्या क्रीम आणि लोशन वापरून झाले असल्यावरही चेहर्यावर ती चमक येत नाहीये का? तर आम्ही आज आपल्या घरगुती नाइट फेस मास्कबद्दल माहिती देत आहोत ज्याने आपली त्वचा चमकदार होण्यात मदत मिळेल.*
माहिती आवडली तर नक्की शेअर करा 🙏🏻
हळद आणि बेसन-
चार चमचे बेसन आणि दोन चमचे दूध किंवा सायीत चिमूटभर हळद मिसळून मास्क तयार करा. हा रात्रभर चेहर्यावर लावून ठेवा. सकाळी गार पाण्याने धुऊन घ्या.
स्ट्रॉबेरी-
व्हिटॅमिन सी आणि फॉलिक अॅसिडने भरपूर स्ट्रॉबेरी त्वचेला निरोगी बनवतं. हे मास्क तयार करण्यासाठी स्ट्रॉबेरी दुधासोबत क्रश करून पेस्ट तयार करा. त्यात एक चमचा बेसन मिसळून चेहर्यावर लावा. सकाळी गार पाण्याने धुऊन घ्या. चेहरा चमकदार दिसेल.
ओट्स आणि दही
ओट्स बारीक वाटून त्या एक चमचा दही, एक चमचा मध आणि चिमूटभर हळद मिसळून पेस्ट तयार करा. आवश्यकतेनुसार पाणी मिसळून पेस्ट तयार करा आणि चेहर्यावर लावा. सकाळी उठल्यावर धुऊन घ्या.
चंदन
ड्राय, ऑयली आणि पिंपल असलेल्या त्वचेसाठी चंदनाचे मास्क उत्तम आहे. हे लावल्याने खाज दूर होते आणि त्वचा निरोगी राहते. हे मास्क तयार करण्यासाठी चंदन पावडरमध्ये जरा दूध, लॅवेंडर ऑयल आणि दोन चमचे बेसन मिसळा. किंवा आपण फक्त चंदन पावडर ही वापरू शकता. नंतर गार पाण्याने धुऊन टाका. चेहरा ग्लो करेल.
झेंडू-
झेंडूच्या फुलात अॅटीसेप्टिक आणि अँटीबॅक्टिरिअल गुण असतात. झेंडूचे पाने दुधात भिजवून ठेवा. यात एक चमचा मध मिसळून पेस्ट तयार करून चेहर्यावर लावा. सकाळी पाण्याने स्वच्छ करा.
गुलाब-
गुलाबाच्या झाडांची पाने उन्हात वाळवून घ्या नंतर याची पावडर तयार करा. यात दूध, साय मिसळून आवश्यकतेनुसार ग्लिसरीन मिसळा. हा मास्क रात्रभर लावून ठेवा.
लिंबू आणि मध-
दोन चमचे मधात दोन चमचे लिंबाचा रस मिसळून त्वचेवर लावा. रात्रभर चेहर्यावर राहून द्या. सकाळी उठून धुऊन घ्या. त्वचा चमकेल.
@आरोग्य साधना
*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*
फूल है बहरोका
युनायटेड अरब अमिरातने दुबईत उभारलेलं हे "पुष्प उद्यान" म्हणजे चित्ताकर्षक आणि विलोभनीय आविष्कार.... एक डोळा बंद करून 3D चा अनुभव घ्या... तुम्हाला नक्कीच मज्जा वाटेल अशी रचना... मग चला सफर करू या 👍👍🌹🌹🙏🙏
🥀.. सब्जा.. तुळशिचे बि..*
*🌾🥀.. सब्जा.. तुळशिचे बि..*
*माहिती आपल्याला आवडली तर नक्की शेअर करा*
उन्हाळ्याचि सुरवात झालि , तशि उन्हाळ्याचा कडाका वाढत चालला आहे. आपण काहि कामानिमित्त बाहेर पडतो, आणि उन्हाचि सामना करावा लागतो, सूर्याचि किरणे सरळ प्रूथ्विवर येउन मद्यावर येत असल्याने , उष्णतेचे प्रमाण वाढते.
🥀 नाकातून रक्त येतं, भोवळ येते, उष्माघाताचा झटका येतो, उन बाधण्याचे प्रमाण वाढते, अश्या अनेक समस्या निर्माण होतात, या सर्वावर।.,, सब्जा,, म्हणजे तुळशिचे बी, उपयुक्त उपाय आहे,
, सब्जा, चविला गोड आहे, आणि शरिरातिल उष्णता कमि करून थंडावा देते. भरपुर प्रथिने असतात, यांत फायबर, ओमेगा, फाँलिक अँसिड, कँलशिअम, मँग्नेशिअम, लोह, व्हिटमिन सि, ए, भरपुर प्रणाणांत आहे..
🥀.. फायदे🥀...(१).. सब्जामुळे प्रतिकारशक्ति वाढते, सब्जामद्धे कँलरीजचे प्रमाण अधिक असते,(२). सब्जामद्ये अल्फा लिनिलेनिक अँसिड असते, ते वजन कमी करण्यासाठी उपयोगि ठरते रोज रात्री पाण्यात भिजवून त्यात लिंबु लस व मध मिसळून ठेवा, सकाळि घ्यावे
🥀..(३).. त्वचा विकारांसाठी सब्जा लाभि आहे
त्वचेवर सुरकुत्या पडत नाही, तजेलदार राहते,(४) मधूमेहावर गुणकारी आहे.. साखर नियंत्रित राहते
(५)..🥀.. पोट साफ करण्याचे उत्तम औषध आहे.
बी पाण्यात भिजवून सकाळि घ्यावे..
(६) मायग्रेन, डिप्रेशन, मानसिक दौर्ब्यल्य, दूर होते , अंगावर येणारि सूज कमी होते,(७) खोबरेल तेलात जर सब्जा बी चे चूर्ण मिसळून लावले तर, सोरायसिस, एक्जिमा, बरा होतो
🥀🥀🥀.. सब्जा हा पाण्यात , मिल्क शेक, सरबत, फालुदा, ताक, लस्सि, यांत टाकून पितात...
*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*
स्त्री शक्ती समाधान शिबिरात 112 तक्रारींचे निराकरण
स्त्री शक्ती समाधान शिबिरात112 तक्रारींचे निराकरण
स्त्री शक्ती समाधान शिबिरात
112 तक्रारींचे निराकरण
मुंबई,दि.20: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (शासन आपल्या दारी) कार्यक्रमात आज मुलुंड पश्चिम टी वॉर्ड येथे 140 तक्रारी प्राप्त झाल्या तर त्यामधील112 तक्रारी जागीच निकाली काढण्यात आल्या. प्राप्त तक्रारी तातडीने सोडविण्याचे आदेश महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.
यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमात महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तसेच बँका आणि महिला आर्थिक विकास महामंडळ आणि विविध विभागांच्या स्टॉलमध्ये शासनाच्या विविध विभागांकडून महिलांकरिता राबविण्यात येणा-या योजनांची माहिती महिलांना देण्यात आली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (शासन आपल्या दारी) कार्यक्रमात महिलांना तक्रारीसाठी प्रत्येक वॉर्डमध्ये ऑनलाईन अर्जही करता येणार आहे. हा उपक्रम ३१ मे २०२३ पर्यंत दुपारी ३ ते 5.30 वाजता सूरू राहणार आहे.अधिक माहितीसाठी व अर्ज भरण्यासाठी https://forms.gle/7GzCSACLYsj3
मुंबई,दि.20: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (शासन आपल्या दारी) कार्यक्रमात आज मुलुंड पश्चिम टी वॉर्ड येथे 140 तक्रारी प्राप्त झाल्या तर त्यामधील112 तक्रारी जागीच निकाली काढण्यात आल्या. प्राप्त तक्रारी तातडीने सोडविण्याचे आदेश महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.
यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमात महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तसेच बँका आणि महिला आर्थिक विकास महामंडळ आणि विविध विभागांच्या स्टॉलमध्ये शासनाच्या विविध विभागांकडून महिलांकरिता राबविण्यात येणा-या योजनांची माहिती महिलांना देण्यात आली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (शासन आपल्या दारी) कार्यक्रमात महिलांना तक्रारीसाठी प्रत्येक वॉर्डमध्ये ऑनलाईन अर्जही करता येणार आहे. हा उपक्रम ३१ मे २०२३ पर्यंत दुपारी ३ ते 5.30 वाजता सूरू राहणार आहे.अधिक माहितीसाठी व अर्ज भरण्यासाठी https://forms.gle/7GzCSACLYsj38amq9 या लिंकवर भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले
Featured post
-
नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व करिअरची सुवर्णसंधी -वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ · महाराष्ट्र-बाडेन...
-
टी.एन. शेषन हे भारताचे निवडणूक आयुक्त (Chief Election Commissioner) म्हणून 1990–1996 या काळात अत्यंत कठोर, निर्भीड आणि सुधारक म्हणून ओळखले ...
-
ऑरेंज गेट बोगदा प्रकल्पाला प्रारंभ ; मुंबईच्या वाहतुकी स मोठा दिलासा मिळणार ...