Sunday, 21 May 2023

पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्य गटाचीतिसरी बैठक 21 ते 23 मे 2023 दरम्यान मुंबई

 पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्य गटाचीतिसरी बैठक 21 ते 23 मे 2023 दरम्यान मुंबई


            मुंबई, दि. २०: भारताच्या जी 20 परिषदेच्या अध्यक्षतेअंतर्गत पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्य गटाची तिसरी बैठक 21 ते 23 मे 2023 दरम्यान मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीचे मुख्य उद्दिष्ट संवादाच्या आराखड्याच्या अनुषंगाने होणाऱ्या फलनिष्पत्तीवर आधारित दृष्टीकोन ठेऊन चर्चा करण्यावर असेल.  


            या तीन दिवसीय बैठकीची सुरुवात जुहू चौपाटीवर किनारपट्टी स्वच्छता मोहिमेने होईल. यानंतर ‘ओशन-20’ संवादाचे आयोजन करण्यात येईल. आपले समुद्र किनारे आणि महासागरांचे रक्षण करण्याविषयी लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे आणि सामुदायिक सहभागाची जाणीव करून देणे किनारपट्टी स्वच्छता मोहिमेचे उद्दिष्ट आहे.


            ओशन-20 मंचाची सुरुवात इंडोनेशियाच्या जी-20 अध्यक्षते दरम्यान महासागर विषयक प्रश्नांवरील विचार आणि कृती पुढे नेण्यासाठी झाली होती. या उपक्रमाचे सातत्य कायम राखून त्यात अधिक भर घालण्याच्या हेतूने भारताच्या अध्यक्षतेखाली सक्रीय नेतृत्वाचे दर्शन घडवून पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्य गटाच्या तिसऱ्या बैठकीत नील अर्थव्यवस्थेच्या तीन स्तंभांवर अधिक लक्ष केंद्रित केले जाईल. या दोन्ही उपक्रमांच्या माध्यमातून शाश्वत आणि हवामानाच्या दृष्टीने संवेदनक्षम नील अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्याचा उद्देश आहे.


            बैठकीच्या पहिल्या दिवशी होणारे सत्र ‘नील अर्थव्यवस्थे’च्या विविध पैलूंवर आधारित असेल. या दिवशीचे पहिले सत्र हे नील अर्थव्यवस्थेसाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष या विषयावर असेल. त्यानंतर धोरणे, शासन आणि सहभाग या विषयांवर परिसंवाद होतील तर नील अर्थव्यवस्थेसाठी वित्त पुरवठा यंत्रणा स्थापन करणे या संदर्भात समारोपाचे सत्र होईल.


            या सत्राची रचना, पॅनल चर्चा आणि त्यानंतर श्रोत्यांशी संलग्न चर्चा अशाप्रकारे केली गेली आहे. महासागरांची जपणूक आणि त्यांची हानी थांबवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न आणि आपल्या सागरी स्त्रोतांचे रक्षण करण्यासाठीच्या चर्चेवर या परिसंवादात भर दिला जाणार आहे.


            पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्य गटाच्या तिसऱ्या बैठकीत पुढील दोन दिवस जी 20 देशांमधील एकमत साध्य करण्याच्या दिशेने विचारमंथन करून मसुद्याच्या मंत्रिस्तरीय बैठकीच्या आराखड्यावर चर्चा केली जाईल. यानंतर अंतर्गत सत्रानंतर चौथ्या ECSWG बैठकीच्या नियोजना विषयी चर्चा होऊन समारोप होईल.


            जी 20 सदस्य राष्ट्रांमध्ये महासागरांचे शाश्वत व्यवस्थापन आणि समुद्री जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी अत्याधुनिक उपाय विकसित करण्यावर भारताच्या जी 20 परिषदेच्या अध्यक्षतेखालील पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्य गट भर देत आहे. एकत्रित जागतिक प्रयत्नांची आवश्यकता आणि सध्याची परिस्थिती हाताळण्यासाठी त्वरित कृतीची गरज यावर प्रत्येक बैठकीत सातत्याने भर देण्यात आला आहे.


            शाश्वत आणि संवेदनशील भविष्या करता G20 देश, निमंत्रित देश आणि आंतरराष्ट्रीय संघटनांच्या प्रयत्नांना चालना देण्यासाठी तिसरी ECSWG बैठक एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय, प्रत्येक प्राधान्य क्षेत्रांतर्गत परिणाम साध्य करण्यासाठी आणि सर्वांसाठी शाश्वत आणि संवेदनशील भविष्य घडवण्यासाठी सर्व भागधारकांसोबत कार्य करण्यासाठी वचनबद्ध आहे.


पीआयबी/ मुंबई

सामुदायिक सोहळ्यातील विवाहासाठीच्याअनुदानात 25 हजार रुपये वाढ करणार

 सामुदायिक सोहळ्यातील विवाहासाठीच्याअनुदानात 25 हजार रुपये वाढ करणार


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती


 


            पालघर, दि.20 : आदिवासी तसेच आर्थिक दुर्बल घटकातील वधू-वर सामुदायिक विवाह सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. सामुदायिक विवाहसोहळ्यातील विवाहासाठीच्या अनुदानात २५ हजारांपर्यंत वाढ करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवली.


            पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी आमदार रवींद्र फाटक, राजेश पाटील, श्रीनिवास वनगा, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, जिल्हाधिकारी गोविंद बोडके , जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते.


            सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून अशा कार्यक्रमाला प्रत्येकाने आवर्जून वेळ काढून जायला हवे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील वधू-वरांचा विवाह होतो ही अभिमानाची बाब आहे. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी प्रत्येकाने सामुदायिक विवाह सोहळ्याला सहकार्य केले पाहिजे. कर्ज काढून लग्नसोहळे केल्याने अनावश्यक खर्च होतो. असा खर्च टाळता यावा यासाठी असे सामुदायिक विवाहसोहळे गरजेचे असून ही समाज व काळाची गरज आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.


            शेतकरी सन्मान योजनेतून केंद्राचे सहा हजार रुपये व राज्य सरकारचे सहा हजार रुपये असे एकूण बारा हजार रुपये शेतकरी बांधवांना देण्यात येतात. या भागाच्या विकासासाठी सरकार प्रयत्नशील आहे. बांद्रा वर्सोवा ब्रिज विरारपर्यंत आणला जाईल. कामगारांसाठी 150 खाटांचे रुग्णालय अंतिम टप्प्यात आहे. विरारपासून कोस्टल हायवे ॲक्सेस कंट्रोल थेट पालघरपर्यंत नेण्याचा प्रयत्न आहे. एमएमआरडीएद्वारे आवश्यक प्रकल्प दिले जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

सिंगापूर इंटरनॅशनल स्कुलचा दीक्षांत समारंभ राज्यपालांच्या उपस्थितीत संपन्न

 सिंगापूर इंटरनॅशनल स्कुलचा दीक्षांत समारंभ राज्यपालांच्या उपस्थितीत संपन्न 


जगासाठी उत्कृष्ट शिक्षक घडवून भारताने 'विश्वगुरु' व्हावे : राज्यपाल रमेश बैस 


आज जगातील अनेक देशांना चांगल्या शिक्षकांची आवश्यकता आहे. भारताने संपूर्ण जगाकरिता उत्कृष्ट शिक्षक घडवून खऱ्या अर्थाने 'विश्वगुरु' व्हावे, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.     


          मुंबई, दि. 20: मुंबईतील सिंगापूर इंटरनॅशनल स्कुल मुंबई या संस्थेच्या २०२३ वर्गाचा पदवीदान समारंभ राज्यपाल बैस यांच्या मुख्य उपस्थितीत संस्थेच्या दहिसर मुंबई येथील शैक्षणिक संकुलात शनिवारी (दि. २०) संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.


          सध्याच्या ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्थेमध्ये देशाला मोठ्या प्रमाणात अभियंते, व्यवस्थापक, सीए, कंपनी सचिव, अधिकारी, कुशल कामगार व तंत्रज्ञांची आवश्यकता आहे. परंतु त्याहीपेक्षा देशाला चांगले नागरिक घडवणाऱ्या उत्तम शिक्षकांची गरज आहे, असे सांगून मेधावी स्नातक विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेतल्यानंतर शिक्षक बनण्याचा देखील पर्याय निवडावा असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले. 


          महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ बाबासाहेब आंबेडकर आदी राष्ट्रीय नेत्यांनी विदेशात शिक्षण घेतले परंतु देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी पुन्हा भारतात परत आले, याचे स्मरण देऊन विद्यार्थ्यांनी विदेशात शिक्षण घेतले तरी देखील देशाच्या विकासात योगदान देण्यासाठी परत आले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले. 


          शाळेच्या २०२३ वर्षाच्या ९७ विद्यार्थ्यांना यावेळी शालान्त आयबी डिप्लोमा प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते विशेष प्राविण्य प्राप्त करणाऱ्या स्नातकांचा सत्कार करण्यात आला.      


          कार्यक्रमाला आमदार मनिषा चौधरी, आमदार पंकज भोयर, सिंगापूर इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका शारोनी मल्लिक, प्राचार्य ग्रॅम कॅसलेक, आयबी प्रमुख अब्सोलोम मुसेवे, स्नातक विद्यार्थी तसेच शिक्षक व पालक उपस्थित होते

ओम् उच्चारणे फक्त धार्मिक नाही तर आरोग्यासाठी फायदेशीर आहे.*

 *"ओम् उच्चारणे फक्त धार्मिक नाही तर आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

रोज फक्त पाच मिनिटे ओम् उच्चारण केल्याने मेंटल आणि फिजिकल फायदे होतात.


 *कसे करावे ओम् उच्चारण?*


ओम् उच्चारण करण्यासाठी कोणत्याही पोजिशनमध्ये बसा. डोळे बंद करुन दिर्घ श्वास घ्या आणि नंतर ओम् उच्चारण करत हळुहळू श्वास सोडा. या काळात पुर्ण शरीरात व्हायब्रेशन होईल याचा प्रयत्न करा. 

जर ओम् उच्चारण करताना कान बंद करता आले तर यापेक्षा जास्त फायदा होईल.

*ओम् कार जपाचे महत्व आणि परिणाम :


१)मानवी मनाची शुद्धता करणे.


२)मानवी मनातील भावनांवर नियंत्रण करणे.


३)मनाची एकाग्रता, स्मरणशक्ती व बुद्धिमत्ता वाढविणे, तसेच एखादी गोष्ट समजून घेण्याची मनाची पात्रता वाढविणे.


४)शारीरिक दृष्ट्या, मानसिकरीत्या आराम वाटणे, तसेच भाव भावनांवर नियंत्रण आणणे.


५)ओम् कर जपामुळे आजूबाजूच्या वातावरणामध्ये एक प्रकारचे तरंग निर्माण होवून, ते वातावरण भारावून टाकले जाते व त्यामुळे मानवी मन त्या वातावरणामध्ये हरवून जाते व समाधी स्थिती गाठणे सोपे जाते.


*ओम् कर जप :


ओ SSSSSS म् ………………..ओ SSSSSS म्………………ओ SSSSSSS म्……………..

------------------------------------------------

*ओंकाराच्या उच्चाराने मिळवा अनेक आजारांवर नियंत्रण*

   

हिंदू धर्मात ओंकाराचे महत्व अनन्यसाधारण आहे. जीवसृष्टीतील पहिला ध्वनी ओम असल्याचे मानतात. मंत्रोच्चारात ओंकार नसल्यास मंत्र अपू्र्ण वाटतात. 

परंतु धार्मिक महत्वाशिवाय ओंकाराचे शारीरिक महत्वही आहे. होय, ओंकाराचा उच्चार केल्याने शारीरिक स्तरावर अनेक फायदे होतात. 

*तुम्ही अनभिज्ञ असलेल्या ओंकाराच्या फायद्यांविषयी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.*


*१. थायरॉईड -*

 ओंकाराचा उच्चार केल्याने गळ्यात कंपन निर्माण होतात. याचा थायरॉईड ग्रंथीवर सकारात्मक परिणाम होतो. 


*२. अस्वस्थता -*

 तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल तर डोळे बंद करून पाच वेळा लांब श्वास घेऊन ओंकाराचे उच्चारण करा. 


*३. तणाव -*

 यामुळे शरीरातील विषारी पदार्थ (टॉक्झिन्स) दूर होतात.


*४. रक्तप्रवाह -*

 यामुळे हृदय सुदृढ राहून रक्तप्रवाह सुरळीत राहतो. 


*५. पचन -*

 ओंकाराचा उच्चार केल्याने पचनशक्ती वाढते. 


*६. स्फूर्ती -*

 ओंकारामुळे शरीरात स्फूर्तीचा संचार होतो. 


*७. थकवा -*

 थकवा मिटवण्यासाठी याहून दुसरा चांगला उपाय नाही. 


*८. झोप -*

 ओंकाराच्या नियमित उच्चाराने काही दिवसांतच झोप न येण्याची समस्या दूर होते. म्हणून झोपण्यापूर्वी ओंकाराचा उच्चार करणे आवश्यक आहे. 


*९. फुफ्फुस -*

 ओंकाराच्या उच्चाराने फुफ्फुसाचे कार्य सुधारते. 


*१०. पाठीचा कणा -*

 ओंकारामुळे निर्माण होणारे कंपन पाठीच्या कण्याला बळकट बनवतात.



*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



ज्वारिचि.. भाकरी.. 👇

 *ज्वारिचि.. भाकरी.. 👇*


... आरोग्याच्या दृष्टीने पाहिले तर गहू व इतर धान्यापेक्षा ज्वारी हि पचायला हलकि व अतिशय गुणकारी आहे. आठवड्यातून दोन दिवस तरि आहारात ज्वारिच्या भाकरिचा समावेश करावा. रजोनिवृत्ती घ्या काळात शरिरातील हार्मोन्स असंतुलित होतात. अशा वेळी स्त्रियांनी आहारात ज्वारिच्या भाकरिचा समावेश करावा. नियमितपणे भाकर खाल्ल्यास ब्रेस्ट कॅन्सर होत नाही.असे संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार सिद्ध झाले आहे.आपण भाकर खाण्याचे फायदे बघू या..


...(१)..ज्वारिमध्ये मुबलक प्रमाणात तंतूमय पदार्थ असतात. त्यामुळे पोट साफ होते, एसिडिटि होत नाही. आणि मुळव्याध, बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही..


      (२).. किडनी स्टोन चा त्रास असलेल्या व्यक्तिने आहारात ज्वारिच्या भाकरिचा समावेश केल्यास पोषक घटक असल्याने . स्टोन विरघळून बाहेर पडतात.ज्वारिमध्ये लोह भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे एनिमियाचा त्रास असलेल्या व्यक्तिने आहारात ज्वारिच्या भाकरिचा समावेश करावा.


...(३).. वजन नियंत्रणात राहते. आजकाल फास्ट फूड, जंक फूड, मुळे लठ्ठपणाचं प्रमाण वाढले आहे. आणि मग दुष्ट चक्र चालू होते. उच्च रक्तदाब, मधुमेह, थायराइड, ह्रुदयविकार,.एसिडिटि.. इत्यादी. तेव्हा नियमितपणे आहारात ज्वारिच्या भाकरिचा समावेश केल्यास अतिरिक्त चरबी कमी होते.वजन कमी होते.


   (४).. ज्वारी मूळे शरिरातील इंस्युलिनचे प्रमाण नियंत्रित राहते. त्यामुळे मधुमेही रुग्णांनि कायम ज्वारिचि भाकरी .खावि.. ज्वारीची भाकरी पचनास सुलभ असल्याने आजारी व्यक्तीला दूध.व भाकरी असा आहार द्यावा.

.रक्तातिल कोलेस्टेरॉल चि पातळी कमी करण्यासाठी ज्वारी अत्यंत उपयुक्त आहे.


.....(५)..काविळिच्या आजारात पचायला हलक्या अन्नाचि आवश्यकता असते. तेव्हा.. ज्वारीची भाकरी खायला द्यावि....ज्वारिच्या भाकरित पोटॅशियम, व मॅग्नेशियम, चे प्रमाण जास्त असते त्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो.ग्लुटेनचे प्रमाण नसल्याने ही गव्हाच्या पोळिपेक्षा चांगली आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवण्यासाठी ज्वारी ला थोडा जास्त वेळ लागतो, पण त्यामुळे अचानक शुगर वाढण्याचा त्रास होत नाही.


   (६).. ज्वारी मध्ये असलेल्या काॅपर व आर्यन हे दोन मिनरल असल्याने रक्ताभिसरण सुरळीत होण्यासाठी मदत होते. लोह भरपूर प्रमाणात असते त्यामुळे लाल रक्तपेशी वाढतात.


       (७).. ज्वारी वर एक थर असतो, जो कॅन्सर चार प्रतिकार करू शकतो. शिवाय ज्वारी मध्ये असलेल्या काही घटकांमुळे अकाली वृद्धत्व येत नाही.ज्वारिच्या एक कप मध्ये..२२ ग्राम प्रोटीन असतं. हे शरिराला उर्जा देतात.म्हणूनच शहरात राहणाऱ्या लोकांपेक्षा. ग्रामीण भागातील जनता अधिक तंदूरुस्त असतात.


... तेव्हा वरील सर्व प्रकारचे फायदे बघता. आपण किमान दोन दिवस ज्वारीची भाकरी आहारात असू द्यावि..


 सुनिता सहस्रबुद्धे..


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



पिंजऱ्यातील बाप"*🌹

 🌹"पिंजऱ्यातील बाप"*🌹🌿

✍️ प्रत्येक बापाची थोड्याफार फरकाने घरात साधारण हीच परिस्थिती असते. 

वाढलेल वय,मानसिक ताण सहन होत नसतानाही त्या आरोपांसाठी सामोरं जावं.

तुंम्ही आमच्यासाठी काय करुन ठेवले?

हा एक सर्वसाधारण आरोप असतोच, आणि तो सगळ्याच बापांच्या विरुध्द केला जातो. काय केलं याची यादी जर एखादा बाप चुकूनमाकून द्यायला लागलाच तर, ”त्यात वेगळं काय केलंत तुंम्ही, ते तर सगळेच बाप करतात” असं टोकलं जातं आणि सगळी सफाई देण्यापूर्वीच संपवलेली असते.

तुंम्ही आंम्हाला प्रोत्साहनच दिलं नाही! असा आणखी एक आरोप असतो. प्रोत्साहन द्यायचं म्हणजे काय करायचं? मुलाने जसा परफॉरमन्स दाखवला असेल त्यानुसार त्याने आपलं करीयर निवडलेलं असतं.

अगदी इंजिनियर जरी झाला तरी मुलगा असा आरोप करतो. त्यावेळी विचारच करत नाही की बापाने इंजिनियरिंगची फी भरताना किती ओढाताण करुन घेतली होती.

तुंम्हाला दूरदृष्टीच नाही!

ज्यावेळी घरं स्वस्त होती, तेंव्हा चार खोल्या आणि कार पार्कींग असलेला ब्लॉक घ्यायला काय हरकत होती, अशा प्रकारचा आणखी एक आरोप असतो. तीन खोल्या घेताना अधिकचे पैसे भरण्यासाठी बापाने काढलेलं कर्ज फेडण्यासाठी आणखी एक पार्टटाईम नोकरी केलेली असते हे मुलगाही विसरतो आणि त्याची आई पण. 

माझा एक मित्र आहे. वकिली करतो. वकिली ठीक सुरु आहे. त्याने लग्न केलं त्यावेळी त्याची बायको बी,कॉमच्या शेवटच्या वर्षाला नापास झाली होती. आपल्याला कुठे बायकोला नोकरीला लावायचंय? असं म्हणत त्याने ती पसंत केली. दिसायला चारचौघींसारखीच होती. त्याने लग्नानंतर तिची इच्छा नसतानाही, तिला "बी.कॉम". करायला प्रोत्साहन दिलं. 

पुढे ती "एम कॉम" ही झाल्यावर एका कॉलेजात प्राध्यापिका. म्हणून रुजू झाली. तुंम्हाला माहितच आहे प्राध्यापकांना पगार किती आहे तो? तिला भरपूर पगार मिळायला लागला. लग्नानंतर, वीस वर्षांनी तिला जाणवायला लागलं की आपण एक वकील पसंत केला, खरं तर ही चूकच झाली. याच्यापेक्षा चांगलं स्थळ शोधायला हवं होतं. याचं कारण आता तिचं क्षितीज रुंदावलं होतं, हाती भरपूर पगार येत होता. समाजात एक वेगळा स्टेटस् , दर्जा निर्माण झाला होता, राहणीमान उंचावले होते, काॅलेजात व बाहेर मॅडम म्हणून संबोधले जाऊ लागले.

आता ती हा विचार मात्र करत नाही की, तिला शिकायला नवर्‍यानेच प्रवृत्त केलं, मदत केली, नोकरी मिळण्यासाठी ओळखीचा वापर केला. आज तिलाच आपला नवरा आपल्याला मॅच होत नाही, शोभत नाही, असं वाटायला लागलं. अजूनही दोघे एकत्रच आहेत आणि संसारही सुरु आहे. पण तिने कुठे तरी कुणाकडे तरी चुकून बोललेलं याच्या कानावर आल्यामुळे मात्र हा आतल्या आत खचून मात्र गेला आहे.

मुलगा ज्यावेळी बापावर आरोपपत्र ठेवतो, त्यावेळी अनेक वेळा मुलाची आई आणि बापाची सहचारिणी, बापाविरोधात साक्षिदार बनलेली पाहायला मिळते. ”तो काय चुकीचं बोलतो आहे ?” हे एक वाक्य बापाच्या आयुष्यावर ’नापास’ किंवा ’पराभूत’ असा शिक्का मारायला पुरेसं असतं. 

तुंम्ही हे करायला हवं होतं, ते करायला नको होतं अशा अनेक गोष्टींचे अध्याय रोजच वाचले जातात. 

विशेषत: बाप निवृत्त झाल्यावर आणि मुलगा कमवायला लागल्यावर अशा आरोपांची संख्या आणि फ्रिक्वेन्सी वाढतीच असते. अनेकांना समजत नाही की, आपण. सेवेत असताना, एक हुशार गुणवंत कर्मचारी, प्रामाणिक, कष्टाळू माणूस अशा उपाध्या मिळवलेले, निवॄत्ती नंतर खरंच आपण इतके कसे मूर्ख बनलो.

जे आपलं कर्तव्य आहे असं समजत होतो आणि जे करण्यासाठी आपण आपल्यावरच अन्याय करत होतो, ते आपले गुन्हे कसे बनले. याचं सगळ्यात महत्वाचं आणि एकमेव कारण म्हणजे आता बापावरचं अवलंबित्व संपलेलं असतं, मुलांचं आणि बायकोचंही. आता तिला, तिचा मुलगा आधार द्यायला सिध्द झालेला असतो. बापाकडे जरी निवृत्ती वेतन असले, थोडीफार शिल्लक असली तरी जर त्यावाचून कुणाचं अडणार नसेल तर बापाची ही अवस्था ठरलेलीच आहे.

आता बापांनी काय करायच तर.... आपण चुकीच्या लोकांसाठी, चुकीच्या कारणांसाठी आपलं आयुष्य वापरलं आहे असा पश्चात्ताप करायचा नाही. हाल सोसताना, कष्ट करताना, त्याग करताना आपल्याला "कर्तव्यपूर्तीचा आनंद" मिळत होता ना, तो आठवायचा. 

जग राहाटी अशीच असणार आहे. प्रत्येक 'बापाला आरोपीच्या पिंजर्‍यात, उभं रहायला लागणारच आहे. आता असे आरोप झाले तर लगेच कबुली जबाब द्यायचा, आणि पुढचा वाद टाळायचा. 

मित्रांनो, ज्यांच्यासाठी त्याग केला, कष्ट सोसले त्यांच्याशी वाद घालायचे प्रसंग टाळणे तर आपल्या हाती आहे ना.

एका त्रयस्थ भूमिकेतून या आरोपांकडे पाहायचं आणि बोध घेत पुढचं आयुष्य आपल्याच धुंदीत, मस्तीत व्यतीत करायचं.

सकाळ संध्याकाळ मित्रांसमवेत व्यतीत करायचे, त्यांचेशी समक्ष तर कधी फोनवर गप्पा गोष्टी करायच्या, छोट्या मोठ्या सहलीचा आनंद लुटण्याचा प्रयत्न केला पाहिजे, पुस्तके वाचायची, टीव्ही मोबाईल वर वेळ घालवायचा, आपले छंद जोपासायचे, नातेवाईकांच्या सुख दुःखात सहभागी व्हायचा प्रयत्न करायचा, नोकरीत असताना हे राहून गेले होते. हाच शहाणपणा आहे. 

 मित्रांनो !!😊

शेवटी आपल्या नजरे समोर एक वाक्य दिसेल असे लिहून ठेवायचे आहे , "चलो,ये भी दिन जायेंगे", "ये तो होना ही था"

माझ्या सर्व मित्रांनो, आपल्याला हे पिंजऱ्यातील जीवन तितकेच आनंदात जगायचं आहे. जमेल मित्रांनो,पहा प्रयत्न करुन !!!

🌹*सामान्य बाप.*🌹🌿🌾🌾

गुलकंदाचे हे ६ फायदे, आरोग्य आणि सौंदर्यही!*

 *||श्री स्वामी समर्थ||*

*गुलकंदाचे हे ६ फायदे, आरोग्य आणि सौंदर्यही!* 


                   उन्हाळा आला की ‘अन्न, वस्त्र, निवारा’ यांच्या बरोबरीने आणखी एक मूलभूत गरज होऊन जाते, ती म्हणजे थंडावा! थंड गोष्टी हव्याहव्याशा वाटतात. थोडक्यात काय, तर थंडावा मिळवण्यासाठी जे जे काही उपाय करता येतील ते सगळे करायचे प्रयत्न सुरु असतात. या सगळ्या पदार्थांच्या यादीत आणखी एक पदार्थ अनेकदा पाहायला मिळतो आणि तो म्हणजे गुलकंद!

                  गुलाब हे प्रेमाचं प्रतीक मानलं जातं. त्या प्रेमात जसा गोडवा असतो, तसाच गोडवा गुलाब पाकळ्यांपासून बनलेल्या गुलकंदातही असतो.


 *१. थंडावा मिळण्यासाठी उत्तम पर्याय* 

                     शरीर थंड ठेवण्यासाठी आवश्यक त्या सगळ्या गोष्टी गुलकंदात असतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात गुलकंद खाणं कधीही चांगलंच ठरतं. कमी करण्याची क्षमता असणारे गुलकंद, थकवा, अंगदुखी, खाज अशा उन्हाळ्यातील त्रासांवर गुणकारी ठरते. याशिवाय अतिउष्णतेमुळे स्ट्रोकचा धोका संभवतो. अशावेळी गुलकंद सुद्धा कांद्याइतकंच गुणकारी ठरतं. चवीला उत्तम असल्याने, कांद्याचा पर्याय म्हणून गुलकंदाचे सेवन करणे नक्कीच फायदेशीर ठरू शकते.


 *२. बद्धकोष्ठतेवर गुणकारी* 

                      हालचाल कमी झालेल्या हल्लीच्या जीवनात बद्धकोष्ठ हा सामान्य आजार होऊ लागला आहे. त्यातच वर्क फ्रॉम होमच्या संकल्पनेमुळे, ऑफिसच्या निमित्ताने घराबाहेर पडणे सुद्धा बंद झालंय. अशावेळी, गुलकंद खाणे हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. पोटातून बाहेर पडत असलेलं मल, फार घट्ट राहू नये यासाठी गुलकंद उपयोगी आहे. मल योग्य प्रमाणात नरम होण्यास आणि मलविसर्जन चांगल्यारितीने होण्यास गुलकंदाचे सेवन उपयोगी ठरते.


 *३. अल्सरवर गुणकारी* 

                    शरीरातील अति उष्णतेचा परिणाम म्हणून तोंडाचा अल्सर होणं, हा त्रास सुद्धा अनेकांना होतो. उष्णतेवर रामबाण उपाय ठरणारा गुलकंद तोंडाच्या असल्सवर सुद्धा गुणकारी ठरतो. तसेच गुलकंद आम्लपित्त नियंत्रणासाठी सुद्धा उपयुक्त आहे. दोन जेवणांच्या मधल्या वेळात अर्धा चमचा गुलकंदाचे सेवन आम्ल्पित्ताचे नियंत्रण करते असा उल्लेख आयुर्वेदातही केला आढळतो.


 *४. मासिक पाळीदरम्यानचा त्रास कमी करते* 

                   मासिक पाळीदरम्यानचा रक्तस्राव कमी करण्यासाठी गुलकंद खाणे फायदेशीर आहे. स्त्रियांच्या जननेंद्रियाच्या स्नायूंवरीला तणाव कमी करण्यास गुलकंद मदत करते, हे वैद्यकीय शास्त्रानुसार सिद्ध करण्यात आले आहे.


 *५ . जळजळ कमी होणे* 

                   अति उष्णतेमुळे होणारी त्वचेची जळजळ नियंत्रणात आणण्यासाठी गुलकंदाचे सेवन मदत करते. म्हणजेच त्वचा तजेलदार आणि टवटवीत ठेवण्यासाठी गुलकंद खाणे उत्तम!


 *६. शांत झोप लागण्यासाठी* 

                    चांगली झोप लागायला हवी असेल, तर रात्रीच्या वेळी गुलकंद घातलेलं दूध पिणं कधीही चांगलं. दूध आणि गुलकंद हे दोन्ही पदार्थ उष्णतेवर नियंत्रण ठेवतात. त्यामुळेच दिवसभराचा थकवा, ताणतणाव दूर ठेवण्यासाठी हे पेय उपयोगी आहे. मनाला आणि शरीराला मिळालेल्या या शांततेमुळे, रात्री उत्तम झोप लागणं शक्य होतं.

Featured post

Lakshvedhi