Sunday, 14 May 2023

तुमच्या दुकानात देव मिळेल कां?*

 *तुमच्या दुकानात देव मिळेल कां?

*पाच वर्षांचा एक छोटा मुलगा हातात एक रुपया घेऊन एका किराणा दुकानात जाऊन ऊभा राहिला.* 


*दुकानदाराने त्या मुलास विचारले बाळा काय हवं तुला?* 


*त्या मुलाने दुकानदारास विचारले* 

*तुमच्या दुकानात देव मिळेल का?* 


*हे ऐकून दुकानदार संतापला आणि त्या मुलावर जोराने ओरडून त्याने त्या मुलाला दुकानातून हाकलून दिले.* 


*तो मुलगा दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या, असे करत करत ३० - ४० दुकाने फिरला.* 


*प्रत्येक दुकाना समोर जाऊन एकच विचारायचा तुमच्या दुकानात देव मिळेल का?* 


*शेवटच्या दुकानात एक म्हातारे आजोबा बसले होते, त्यांना पाहून ह्या लहान मुलाने विचारले, बाबा तुमच्या दुकानात देव मिळेल का?* 


*त्या आजोबांनी विचारले बाळा तुझ्याकडे किती पैसे आहेत?* 


*मुलाने प्रांजळपणाने सांगितले एक रुपया आहे माझ्याकडे. त्यांनी मुलाला जवळ घेत विचारले, बाळा तुला कशाला देव हवा आहे? तु देव विकत घेऊन करणार काय ?* 


*प्रश्न ऐकून मुलाला खूप बरं वाटले. त्याच्या अशा पल्लवीत झाल्या, बाबा असे विचारतात म्हणजे नक्कीच यांच्या दुकानात देव असणार आहे.* 


*तो म्हणाला ह्या जगात मला माझ्या आई शिवाय कोणीच नाही. रोज माझी आई कामाला जाते आणि माझ्यासाठी जेवण घेऊन येते. पण काल पासून ती हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे. जर उद्या माझी आई मेली तर मला जेवण कोण देणार?* 

*डॉक्टर म्हणाले की आता फक्त देवच तुझ्या आईला वाचवू शकतो.*

*म्हणून मी देव शोधतो आहे बाबा.* 

*आहे ना तुमच्या दुकानांत देव?* 


*दुकानदाराने त्या मुलाला विचारले किती पैसे आहेत तुझ्याकडे?* 


*फक्त एक रुपया बाबा.* 

*बरं, नको काळजी करू.*

*एक रुपयात देखील देव भेटेल!*


*दुकानदाराने तो एक रुपया घेतला आणि एक ग्लास फिल्टरचें पाणी त्या मुलाच्या हातात दिले आणि म्हणाला की हे पाणी घेऊन जा आणि तुझ्या आईला पाज. हे पाणी प्यायला दिले की आई तुझी ठीक होईल.* 


*दुसऱ्या दिवशी एक स्पेशालिस्ट डॉक्टर हॉस्पिटल मध्ये आले आणि आईचें ऑपरेशन झाले. कांही दिवसात ती ठीक ही झाली.* 


*डीस्चार्ज च्या दिवशी हॉस्पिटलचें बिल बघून ती बाई चक्रावली! पण डॉक्टर धीर देत म्हणाले. काळजी करू नका. एका वयस्कर व्यक्तीने हे सर्व बिल भरले आहे आणि सोबतच एक चिट्टीही ठेवली आहे.* 


*चिठ्ठी उघडून वाचताच, माझे धन्यवाद मानू नकोस, तुला वाचवले ते परमेश्वरानेच. मी फक्त निमित्त होतो. तुला धन्यवाद द्यायचेच असतील तर आपल्या छोट्या अज्ञान बाळाला दे, जे बाळ एक रुपया घेऊन देव शोधत फिरत होते.* 

*यालाच म्हणतात विश्वास ...* 

*देवाला शोधण्यासाठी करोडो रुपये दान करावे नाही लागत! श्रद्धा, भाव, विश्वास असला की एक रुपयातही देव मिळतो.* 


*तात्पर्य:* 

*भक्ती साधी भोळी असू दे. फक्त मनापासुन नामस्मरण केले की देव कोणत्या न कोणत्या रूपात येऊन नक्की मदत करतो ....!*

🛕⛪🕋🕍🕌

🌼🌺🌸🌼🌺🌸🌼🌺🌸🌼🌺🌸

कांदिवलीतील रोटी बँक उपक्रम ‘मानवतेचे प्रमुख केंद्र’ बनेल


 कांदिवलीतील रोटी बँक उपक्रम ‘मानवतेचे प्रमुख केंद्र’ बनेल -

आ. अतुल भातखळकर यांचा विश्वास, मुंबईतील पहिल्या वहिल्या उपक्रमाचे लोकार्पण

फोटो

मुंबई : कांदिवली पूर्व विधानसभेत निर्माण करण्यात आलेल्या ‘रोटी बँक’ तसेच मोफत ग्रंथालय, पाणपोई, सुशोभिकरण, सार्वजनिक शौचालय अशा विविध प्रकल्पांचे लोकार्पण आज होत आहे. येणाऱ्या काळात हे केंद्र ‘मानवतेचे एक प्रमुख केंद्र’ बनल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी व्यक्त केला. कांदिवली पूर्व विधानसभेतील आकुर्ली रोड येथे आ. भातखळकर यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या ‘रोटी बँक’ या मुंबईतील पहिल्या वहिल्या उपक्रमाच्या लोकार्पणानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खा. गोपाळ शेट्टी, त्रिवेणीबेन आचार्य यांसह मान्यवर उपस्थित होते.

आ. भातखळकर म्हणाले, जात, पात, धर्म, भाषा यापलिकडे गोरगरिब व्यक्तींची सेवा करणे, मानवतेची सेवा करणे, असे संस्कार आमच्यावर झाले आहेत. स्व. दिनदयाळ उपाध्याय यांनी ‘अंत्योदय’ची कल्पना मांडली. समाजातील शेवटच्या घटकाचा विकास करणे ही आपली आर्थिक निती असायला हवी, या त्यांच्या विचाराच्या आधारावर येणाऱ्या काळात आम्ही जरूर काम करू. ‘रोटी बँक’ हा उपक्रम कांदिवली पूर्वमध्ये अत्यंत प्रभावीपणे राबवण्यात येईल, असेही ते म्हणाले.

यावेळी खा. शेट्टी म्हणाले, लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना आतापर्यंतच्या २१ वर्षांच्या काळात एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर विविध प्रकल्पांचे लोकार्पण होताना मी पहिल्यांदाच पाहिले आहे. याचा मला अभिमान आहे. कांदिवली पूर्व विधानसभा क्षेत्रात जेव्हा आपण फिरत असतो तेव्हा एक बाब निदर्शनास येते की, प्रत्येक अर्धा किमी अंतरावर आ. भातखळकर यांच्या माध्यमातून झालेले विविध प्रकल्प नजरेस पडतात. आमदार झाल्यानंतर ज्या वेगात त्यांनी काम केले, ते अभिमानास्पद आहे. या रोटी बँकच्या माध्यमातून समाजातील गोरगरिबांची सेवा होणार आहे, याचा मला आनंद आहे. यावेळी त्रिवेणीबेन आचार्य यांचेही भाषण झाले. यावेळी अनुकंपा संस्थेच्या प्रमुखांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विविध सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. यावेळी गरजूंना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले.

उद्योजक

 *🔰फ्रोझन मटार व्यवसाय तुम्हाला करील मालामाल, खर्चाच्या 10 पट कमाई होईल !*


*📍या व्यवसायासाठी 10 लाखापर्यंत Mudra योजनेअंतर्गत (Mudra) बिनव्याजी कर्ज उपलब्धआहे.*


*✅फ्रोझन मटार मशीन खरेदी करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा*


👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻


*https://bit.ly/42NBzJU*

*https://bit.ly/42NBzJU*

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन


            सातारा दि.13 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील दौलतनगर येथे आयोजित महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.


            यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, फलोत्पादन व रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे, उद्योग मंत्री उदय सामंत, राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री शंभूराज देसाई आदी उपस्थित होते.


            पालकमंत्री श्री. देसाई यांनी यावेळी डॉक्टर आणि रुग्णांशी संवाद साधला. आरोग्य शिबीरामध्ये किमान 10 हजार नागरिकांच्या आरोग्य तपासणीची व्यवस्था करण्यात आली होती. त्यासाठी जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय, आयएमए, कृष्णा रुग्णालय कराड यांची पथके तैनात करण्यात आली होती.


            शिबिरात रक्त लघवी तपासणी, दंत चिकित्सा, नेत्र रोग, बालरोग, तातडीची सेवा, औषधे, लॅबोरेटरी, एनसीडी, रक्तदाब, मधुमेह, कर्करोग तपासणी, औषध विभाग, कान, नाक, घसा, त्वचारोग, किडनी विकार, शस्त्रक्रिया, अस्थिरोग, स्त्रीरोग, मानसोपचार तपासणी असे कक्ष तयार करण्यात आले होते. 40 तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ला

भला.


भूजल तील मासेमारी

 


ॲप आधारित सेवा पुरवणाऱ्या वाहनांच्या नियमावलीसाठी समिती गठीत

 ॲप आधारित सेवा पुरवणाऱ्या वाहनांच्या नियमावलीसाठी समिती गठीत


२० मेपर्यंत अभिप्राय कळविण्याचे नागरिकांना आवाहन


 


            मुंबई, दि.13: केंद्र शासनाने ओला, उबर व इतर एग्रीगेटर्स कंपन्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्याविचारात घेऊन ॲप आधारित वाहनांच्या प्रचलनाकरीता महाराष्ट्र मोटार वाहन समुच्चयक नियमावली करण्यासाठी सेवा निवृत्त अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.


            नागरिकांची मते व अभिप्राय विचारात घेऊन मसुदा तयार करण्यात येणार आहे. तरी याबाबत नागरिकांनी dycommr.enf1@gmail.com या ई-मेलवर दिनांक २० मे २०२३ पर्यंत अभिप्राय सादर करावेत, असे आवाहन राज्याच्या परिवहन आयुक्त यांनी केले आहे.


            याविषयी अधिक माहितीसाठी कैलास कोठावदे, सहाय्यक परिवहन आयुक्त, परिवहन आयुक्त कार्यालय, मुंबई यांच्याशी संपर्क साधावा. (मो. ९५५२८८३९३०/ ई-मेल- dycommr.enf1@gmail.com) केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना www.morth.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्याची लिंक https://morth.nic.in/sites/default/files/notificationsdocument/Motor%20Vehicle%20Aggregators 27112020150046.pdf   


000

Featured post

Lakshvedhi