Monday, 8 May 2023

टाळ्या वाजवा आणि स्वास्थ मिळवाः।

 *                                                                           👏 टाळ्या वाजवा आणि स्वास्थ मिळवाः।*


   रोज 400 टाळ्या वाजवल्याने संधिवात, गाउट, आमवात, बरा होतो., टाळ्या वाजवल्याने हाताचे रक्ताभिसरण जलद होते. Blood flow वाढतो. , ज्याने थेट नसा active होउन गाउट बरा होतो.


👏.  Hand paralysis  म्हणजे हाताचा लकवा, हात थरथर कापणे, हे सर्व सकाळ, संद्ध्याकाळ  400 टाळ्या वाजवल्याने  ५, ६,  महिन्यातच बरा होतो.


## internal organs ह्रुदयरोग, फुफ्फुसांचे, आजार, यक्रुताचा आजार, रोज सकाळ, संद्याकाळ, ४०० टाळ्या

 वाजवल्याने बरे होतात.


👏.. immune system/रोग प्रतिकार शक्ती वाढते, कारण रक्तसंचार वाढल्याने प्रत्येक  अवयव प्रभावित होतो,


## टाळ्या वाजवल्याने डोकेदुखि,अस्थमा, मधुमेह, नियंत्रणात राहतो, clapping सर्व प्रकारच्या आरोग्यविषयक समस्या नियंत्रणात ठेवतात.


👏.. Hair fall   व सर्व प्रकारच्या केसांसंबंधित विकार बरे होतात. कारण, हाताचा अंगठा, व बोटांच्या शिरा, नसा, या डोक्याशि जोडलेल्या असतात.


रोज जेवणानंतर ४००, टाळ्या वाजवल्याने सर्व आजार बरे होतात.. फालतू चर्बि, मेद, झडतो, Obesity  दूर होते.. टाळ्या वाजवल्याने स्मरणशक्ति वाढते.


👏.. शरिराचे सर्व जोडबिंदू हे हाताच्या बोटांशि जोडलेले असल्याने, टाळ्या वाजवल्याने Healthy body, fit mind//. शरिर स्वथ, निरोगि राहते..


 टाळ्या कश्या व कधि वाजवाव्यातः।  टाळ्या वाजवणाच्या आधि, हाताला, बदामाचे, आँलिव्ह आँईल , किंवा खोबरेल तेल  लावावे, रोज सकाळी २०० व संद्याकाळि २०० टाळ्या वाजवाव्या.

  ##   २०० टाळ्या हात वर करून वाजवा, आणि  २०० टाळ्या सामान्य स्थितित उभे राहून वाजवा.


👏👏.. आपले पूर्वज हे ,,ज्ञानि,, हुशार होते,  त्यांना माहित होते की ,, मनुष्य,, हा धर्माशि जोडलेले प्रत्येक काम नक्कि करतो,  म्हणून मग देवपुजेनंतर आरति करतांना,, टाळ्या,, वाजवण्याचि प्रथा सुरू झाली..

                      👏👏....मग करा चालू आत्ताच....😊..



*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



टाळ्या वाजवा आणि स्वास्थ मिळवाः।*

 *👏 टाळ्या वाजवा आणि स्वास्थ मिळवाः।*


   रोज 400 टाळ्या वाजवल्याने संधिवात, गाउट, आमवात, बरा होतो., टाळ्या वाजवल्याने हाताचे रक्ताभिसरण जलद होते. Blood flow वाढतो. , ज्याने थेट नसा active होउन गाउट बरा होतो.


👏. Hand paralysis म्हणजे हाताचा लकवा, हात थरथर कापणे, हे सर्व सकाळ, संद्ध्याकाळ 400 टाळ्या वाजवल्याने ५, ६, महिन्यातच बरा होतो.


## internal organs ह्रुदयरोग, फुफ्फुसांचे, आजार, यक्रुताचा आजार, रोज सकाळ, संद्याकाळ, ४०० टाळ्या

 वाजवल्याने बरे होतात.


👏.. immune system/रोग प्रतिकार शक्ती वाढते, कारण रक्तसंचार वाढल्याने प्रत्येक अवयव प्रभावित होतो,


## टाळ्या वाजवल्याने डोकेदुखि,अस्थमा, मधुमेह, नियंत्रणात राहतो, clapping सर्व प्रकारच्या आरोग्यविषयक समस्या नियंत्रणात ठेवतात.


👏.. Hair fall व सर्व प्रकारच्या केसांसंबंधित विकार बरे होतात. कारण, हाताचा अंगठा, व बोटांच्या शिरा, नसा, या डोक्याशि जोडलेल्या असतात.


रोज जेवणानंतर ४००, टाळ्या वाजवल्याने सर्व आजार बरे होतात.. फालतू चर्बि, मेद, झडतो, Obesity दूर होते.. टाळ्या वाजवल्याने स्मरणशक्ति वाढते.


👏.. शरिराचे सर्व जोडबिंदू हे हाताच्या बोटांशि जोडलेले असल्याने, टाळ्या वाजवल्याने Healthy body, fit mind//. शरिर स्वथ, निरोगि राहते..


 टाळ्या कश्या व कधि वाजवाव्यातः। टाळ्या वाजवणाच्या आधि, हाताला, बदामाचे, आँलिव्ह आँईल , किंवा खोबरेल तेल लावावे, रोज सकाळी २०० व संद्याकाळि २०० टाळ्या वाजवाव्या.

  ## २०० टाळ्या हात वर करून वाजवा, आणि २०० टाळ्या सामान्य स्थितित उभे राहून वाजवा.


👏👏.. आपले पूर्वज हे ,,ज्ञानि,, हुशार होते, त्यांना माहित होते की ,, मनुष्य,, हा धर्माशि जोडलेले प्रत्येक काम नक्कि करतो, म्हणून मग देवपुजेनंतर आरति करतांना,, टाळ्या,, वाजवण्याचि प्रथा सुरू झाली..

                      👏👏....मग करा चालू आत्ताच....😊..



*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



Sunday, 7 May 2023

वाघाच्‍या हल्‍ल्‍यात मृत झालेल्‍या व्‍यक्‍तीच्‍या कुटुंबीयांस पाच लाख रुपयांची मदत

 

वाघाच्‍या हल्‍ल्‍यात मृत झालेल्‍या व्‍यक्‍तीच्‍या

 कुटुंबीयांस पाच लाख रुपयांची मदत


वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते धनादेश प्रदान


वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते धनादेश प्रदान


                चंद्रपूर,दि.7 : चंद्रपूरच्‍या इंदिरानगर येथील रहिवासी पुरुषोत्‍तम बोपचे (वय 40 वर्षे) हे फुले वेचण्‍यासाठी जंगलात गेले असता वाघाने त्‍यांच्‍यावर हल्ला केला. त्‍यात त्‍यांचा जागीच मृत्‍यू झाला. या घटनेनंतर राज्याचे वनमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुरुषोत्तम बोपचे यांच्‍या कुटुंबीयांस शासन नियमानुसार मदत करण्‍याचे निर्देश दिले. त्‍यानुसार वन विभागातर्फे पुरुषोत्तम बोपचे यांच्‍या कुटुंबास 5 लाख रुपयांचा धनादेश वनमंत्री श्री.मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते नुकताच प्रदान करण्यात आला. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. कारेकर, माजी उपमहापौर राहुल पावडे, देवराव भोंगळे, पप्‍पू बोपचे, आशिष ताजने आदी उपस्थित होते.

अल्पसंख्याक समाजासाठीच्या कर्ज योजनेला इच्छुकांचा चांगला प्रतिसाद

 अल्पसंख्याक समाजासाठीच्या कर्ज योजनेला

इच्छुकांचा चांगला प्रतिसाद


३१ मेपर्यंत नवीन अर्ज करण्याची संधी

                   मुंबई, दि. ७ : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत कर्ज स्वरुपात उपलब्ध होणाऱ्या निधीतून राज्यात अल्पसंख्याक समाजासाठी व्यवसाय, उद्योग सुरु करण्याकरीता राबविण्यात येणाऱ्या मुदत कर्ज योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. संपूर्ण राज्यभरातून मुदत कर्ज योजनेअंतर्गत १ हजार ५५३ अर्ज विविध जिल्हा कार्यालयामध्ये प्राप्त झाले आहेत.


                   ११ नोव्हेंबर २०२२ रोजी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंती दिनापासून राज्यातील सर्व जिल्ह्यांमधून अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. मुदत कर्ज योजनेअंतर्गत छोट्या व्यवसायांना प्रथम प्राधान्य देऊन ३.२० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मंजूर करुन मंजुरी पत्र लाभार्थ्यांना निर्गमित करण्यात येत आहेत. या योजनेअंतर्गत राज्यातील ७८३ लाभार्थ्यांना आतापर्यंत मंजुरी पत्र निर्गमित करण्यात आले आहेत. कर्ज मंजुरीपत्र निर्गमित केलेल्या लाभार्थ्यांनी सादर केलेल्या कागदपत्रावरुन स्थळ पाहणी करण्याच्या सूचना कर्ज वितरण अधिकारी व कर्ज वसुली अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. दस्तऐवजांची पूर्तता करणाऱ्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये कर्जाची रक्कम थेट जमा करण्यात येणार आहे. ऑनलाईन पध्दतीने कर्ज परतफेडी संदर्भातील बँकेकडील तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना कर्ज रकमेचे त्वरित वितरण करण्यात येईल, अशी माहिती मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. लालमिया शरीफ शेख यांनी दिली.


                   या योजनेला अल्पसंख्याक समाजाचा मिळालेला प्रतिसाद विचारात घेता प्राप्त झालेल्या अर्जावर जलदगतीने कार्यवाही करण्यासाठी ३१ मे २०२३ पर्यंत नवीन अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. प्राप्त झालेल्या अर्जाचा निपटारा करण्यासाठी ३१ मे २०२३ नंतर पुढील आदेश होईपर्यंत या योजनेअंतर्गत नव्याने अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत, असे डॉ. शेख यांनी सांगितले.


                   या योजनेअंतर्गत आतापर्यंत 1 हजार 553 प्रस्ताव जिल्हा कार्यालयामध्ये प्राप्त झाले आहेत. यामध्ये मुंबईतून 4 अर्ज, ठाणे 1, रायगड 2, पुणे 84, सोलापूर 44, सातारा 12, सांगली 10, कोल्हापूर 102, नाशिक 7, नंदुरबार 15, धुळे 29, जळगाव 101, अहमदनगर 42, औरंगाबाद 96, परभणी 173, बीड 215, लातूर 53, जालना 82, हिंगोली 43, नांदेड 9, उस्मानाबाद 61, अमरावती 18, वाशिम 54, बुलढाणा 157, यवतमाळ 97, अकोला 27, नागपूर 13, तर वर्धा जिल्ह्यातून 2 अर्ज जिल्हास्तरावर प्राप्त झाले आहेत.


००००

मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर साधणार 'जनतेशी सुसंवाद

 मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर साधणार 'जनतेशी सुसंवाद'.


                मुंबई दि. 7 - राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर 'सरकार आपल्या दारी', 'जनतेशी सुसंवाद' कार्यक्रमाच्या माध्यमातून येत्या बुधवार आणि गुरूवारी नागरिकांशी संवाद साधणार आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग कार्यालयात होणाऱ्या या कार्यक्रमात नागरिकांनी शासकीय योजना, आपल्या प्रभागातील विकासकामांबाबत सूचना व इतर समस्यांबाबतच्या निवेदन अथवा अर्जासह उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.


केव्हा आणि कुठे होईल संवाद


बुधवार दि 10 मे रोजी महानगरपालिकेच्या 'सी वॉर्ड' मध्ये कॉन्फरन्स हॉल, सी विभाग कार्यालय, चंदनवाडी, मरीन लाईन्स येथे तर गुरूवार दि 11 मे रोजी 'डी वॉर्ड' मध्ये कॉन्फरन्स हॉल, डी विभाग कार्यालय, ग्रँट रोड (प.) येथे सायंकाळी 4 ते 6 या वेळेत पालकमंत्री श्री. केसरकर नागरिकांशी संवाद साधण्यासाठी उपस्थित राहतील. त्याचप्रमाणे 'जनतेशी सुसंवाद' कार्यक्रमास पालकमंत्री यांच्यासोबत संबंधित विभागांचे लोकप्रतिनिधी, सर्व विभागांचे शासकीय तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत.


                या कार्यक्रमात नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री श्री. केसरकर यांनी केले आहे.


 

मणिपूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधला संवाद

 मणिपूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधला संवाद

विद्यार्थ्यांना आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश


                मुंबई, दि. 7 : मणिपूरमध्ये सुरु असलेल्या दंगलीमुळे तिथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दूरध्वनीवरुन संपर्क साधला आणि त्यांना दिलासा देऊन सर्वतोपरी मदतीची ग्वाही दिली. दरम्यान, या अडकलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली असून लवकरच हे विमान अडकलेल्या 22 विद्यार्थ्यांना घेऊन महाराष्ट्रात दाखल होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


                महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी मणिपूरच्या एनआयटी, आयआयटीमध्ये शिक्षण घेत असून यातील तुषार आव्हाड आणि विकास शर्मा या विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीवरुन संपर्क साधला त्यांच्याशी चर्चा करुन त्यांना आश्वस्त केले, त्यांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी मणिपूरच्या मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांशी संपर्क साधून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्याची विनंती करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.


                विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतर आणि परिस्थितीची संपूर्ण माहिती घेतल्यावर या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष विमानाची व्यवस्था करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. लवकरच हे विमान या अडकलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन महाराष्ट्रात येईल. राज्य शासन मणिपूरमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.


००००


दि. 7 मे, 2023


वृत्त क्र. 1480


 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मणिपूरसह आसामच्या


मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवरून साधला संवाद


 


मणिपूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सुरक्षा पुरवण्याची केली विनंती


 


मुंबई, दि. 7 - मणिपूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सुरक्षा पुरविण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह आणि आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली.


          मणिपूरमध्ये अडकलेल्या 22 विद्यार्थ्यांना विशेष विमानाने महाराष्ट्रात आणण्यात येणार असून तत्पूर्वी या विद्यार्थ्यांना मणिपूरहून आसाममध्ये आणण्यात येईल. मणिपूरहून आसामपर्यंत आणताना या विद्यार्थ्यांना विशेष सुरक्षा पुरविण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा आणि मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली.

रिकामा डबा आणि भरलेलं मन..

 रिकामा डबा आणि भरलेलं मन..

     काल सदाशिवपेठेत माझ्या प्रकाशकाच्या ऑफीसला गेले होते.. येताना तुळशीबागेत सहज चक्कर मारायचा प्लॅन होता आणि श्रीकृष्ण मिसळ खायची पण आमच्या पुण्यात मिसळ ७ वाजता बंद झाली आणि मला तिथुन परत यावे लागले..

बाहेर पडताना डाव्या हाताला एक वयस्कर आजोबा पैसे मागत बसले होते.. आजोबा पाहिल्यावर वाटलं , त्यांना काहीतरी द्यावे तितक्यात माझा फोन वाजला म्हणुन तिथेच बाजूला उभी राहुन फोन घेतला.. फोन संपवुन पर्स उघडणार तितक्यात एक लेडी तिथे आली आणि आजोबाना म्हणाली ,काय रे म्हाताऱ्या अजुन डबा रिकामाच का ?? .. भिक मागुन कमवायची पण लायकी नाही का ?? .. मी उघडलेली पर्स पुन्हा बंद केली .. ती लेडी तिथुन निघुन गेली होती म्हणुन मी आजोबांच्या जवळ गेले आणि म्हणाले ,आजोबा कोण होती हो ती ?? .. त्यांच्या डोळ्यात पाणी दिसले .. मी म्हटलं ,,आजोबा हे पैसे घ्या .. मला माफ करा .. मी तुम्हाला विचारायला नको होते.. तितक्यात ते म्हणाले , पोरी तसं नाही..ती सुन होती माझी .. तिने थोड्या वेळापुर्वी माझ्या डब्यात साठलेले सगळे पैसे नेले आणि आता पुन्हा आली.. हे तुमचे पैसे परत घ्या आणि मला काहीतरी खायला आणुन द्या...नाहीतर आजही रात्री मला उपाशी झोपावे लागेल.. मी त्यांना खायला आणुन दिले पण खुप वाईट वाटलं..यात मला कोणालाच दोष द्यायचा नाही पण तो रिकामा डबा आणि भरलेलं मन मला माझ्या बालपणात घेउन गेलं कारण लहानपणी आमच्या फडताळात ( कपाटात ) बऱ्याचदा मी असा रिकामा डबा पाहिला होता ज्यात ५ पैसेही नसायचे आणि मला पुस्तक किवा पेंसील हवी असायची.. आज त्याच पुस्तक पेन ने मला तुमच्यासारखे वाचक भेटले..

मी थोडी डीस्टर्ब झाले पण काळ आणि वेळ हेच सगळ्यावर औषध असते.. उद्या त्या आजोबांच्या जेवणाचे काय हा प्रश्न वरचा सोडवेल पण त्या प्रसंगाने पुन्हा एकदा मला जमीनीवर राहायला शिकवले..आयुष्यात प्रत्येक क्षण आपल्याला काहीना काही शिकवतो.. फक्त आपले डोळे उघडे हवेत..

सोनल गोडबोले

लेखिका , अभिनेत्री

Featured post

Lakshvedhi