Friday, 28 April 2023

देशातील ९१ एफएम रेडिओ केंद्रांचे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

 देशातील ९१ एफएम रेडिओ केंद्रांचे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून उपस्थिती


महाराष्ट्रात सात ठिकाणी एफएम केंद्रांचा शुभारंभ  


 


            मुंबई, दि. २८ : देशातील रेडिओ कनेक्टिव्हिटीला चालना देण्यासाठी ९१ एफएम रेडिओ केंद्रांचे लोकार्पण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. यावेळी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते महाराष्ट्रातील दुर्गम भागातील ७ एफएम केंद्रांचाही शुभारंभ झाला. “डिजिटल इंडियामध्ये रेडिओला नवीन श्रोता वर्ग मिळाला. हवामानासंबंधी माहिती वेळेवर प्रसारित करण्यात ट्रान्समीटर महत्त्वाची भूमिका बजावतील आणि महिला बचत गटांसाठी ते उपयुक्त ठरतील”, असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला.


            यावेळी महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा, अहेरी तसेच नंदूरबार, हिंगोली, वाशिम, अचलपूर, सटाणा या सात ठिकाणी एमएफ सेंटर्सचा शुभारंभ करण्यात आला.


देशातील १८ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांमध्ये ९१ एफएम ट्रान्समीटरच्या लोकार्पणप्रसंगी पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज ऑल इंडिया रेडिओच्या एफएम सेवेचा हा विस्तार ऑल इंडिया एफएम होण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. ऑल इंडिया रेडिओच्या या एफएम प्रसारणाचा हा शुभारंभ म्हणजे देशातील ८५ जिल्ह्यांतील २ कोटी नागरिकांना भेट असल्याचे त्यांनी सांगितले.


            माहितीचा वेळेवर प्रसार, शेतीसाठी हवामान अंदाज, किंवा महिला बचत गटांना नवीन बाजारपेठेशी जोडणे यामध्ये एफएम ट्रान्समीटर महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. रेडिओच्या माध्यमातून ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे स्वच्छता अभियान, बेटी बचाओ, बेटी पढाओ यांसारख्या उपक्रमांना लोकचळवळीचे स्वरूप आल्याचे प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितले.


००००

Upay##वातदोष.... उपाय...*👇

 *###वातदोष.... उपाय...*👇


..१) ५०-५० ग्राम मेथिचे

 दाणे, हळद सुंठ व अश्वगंधा चूर्ण २५ ग्राम हे समप्रमाणात घेऊन चूर्ण तयार करून सकाळ संध्याकाळ, नाश्ता नंतर घ्या. रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्याबरोबर घ्यावे..

२) दोन चमचे एरंडेल तेल गरम दूधात मिसळून रात्री झोपण्यापूर्वी घ्या.

३) ४ग्राम मोहरिचे चूर्ण, ४ग्राम गूळात मिसळून सकाळी संध्याकाळी कोमट पाण्याने घ्या.

४) हिरडे, सुंठ, व ओवा समप्रमाणात घेऊन याचे चूर्ण तयार करून ते कोमट पाण्याबरोबर घ्यावे.

५) सुंठ चूर्ण १\२चमचा, जायफळ पूड पाव चमचा, कोरफड गर सोबत घ्यावे..

६) लसुणाच्या पाकळ्या तुपावर परतून सकाळी पाण्यासोबत घ्या.

७) अद्रक रस व जुना गुळ बकरिच्या दूधातून घ्यावे.

८) त्रिफळा चूर्ण १\४चमचा, अर्धा चमचा कोथिंबीर, १\४ विलायचि पावडर एकत्र वाटून हे दिवसातून दोन वेळा घ्या

९) दालचिनी चूर्ण मधात मिसळून द्यावे

१०) सिंहनाद गुग्गुळ वटि एक एक जेवणानंतर घ्या दोन वेळा..

११) वातहारि वटि एक एक जेवणानंतर घ्या.

१२) महायोगराज गुग्गुळ एक एक जेवणानंतर घ्या

१३) रोज सकाळी अळिवाचि फिर दूधात शिजवून खावि. 

१४) दशमूलारिषट दोन चमचे चार चमचे पाण्यात मिसळून जेवणानंतर घ्या

१५) मेथिची पुड पाण्यासोबत घ्या सकाळी रिकाम्या पोटी..

१६) महासुदर्शन चुर्ण दोन वेळा पाण्या सोबत घ्यावे

१७) निर्गुंडि पाने पाण्यात उकळून याने स्नान करावे..


... वरील उपाय केल्यास वातदोष शांत होतो....


   आयुर्वेद अभ्यासक.... सुनिता सहस्रबुद्धे... निरामय आयुर्वेद व होमिओपॅथी प्रचार..🌿☘️


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


खडी साखर ॲसिडिटी, उष्णता, आणि इतर अनेक आजारांवर रामबाण उपाय : l*

 *ॲसिडिटी, उष्णता, आणि इतर अनेक आजारांवर रामबाण उपाय : खडी साखर* 


खडीसाखर खाल्ल्याने आरोग्याच्या अनेक तक्रारी दूर होऊ शकतात. खडीसाखरेचे दोन प्रकार आहेत. यापैकी एका खडीसाखरेचा आकार ओबडधोबड असतो, तर दुसरी खडीसाखर प्रमाणबद्ध असते. यापैकी आकार नसलेली आणि ओबडधोबड असणाऱ्या खडीसाखरेमध्ये औषधी गुणधर्म जास्त प्रमाणात असतात.


पित्त विकार, उष्णतेचा त्रास, ॲसिडिटी अशा काही आजारांवर खडीसाखर रामबाण उपाय आहे. जाणून घेऊया खडीसाखर खाण्याचे इतर फायदे.


*तोंडाला दुर्गंधी :-* 


मुखदुर्गंधीचा त्रास अनेक जणांना असतो. दररोज 2 वेळा स्वच्छ दात घासूनही तोंडाचा वास जात नाही. अशा लोकांना नियमितपणे खडीसाखर खाणे फायद्याचे ठरते. यासाठी जेवण झाल्यानंतर खडीसाखरेचा 1 खडा आणि थोडीशी बडीशेप तोंडात टाका आणि चावून चावून खा. तोंडाची दुर्गंधी कमी होईल.


*खोकल्यावर गुणकारी :-* 


सतत कोरडा खोकला येण्याचा त्रास होत असेल, तर अशावेळीही खडीसाखर चांगली उपयोगी पडते. ज्या लोकांना खास करून रात्री झोपल्यानंतर खोकल्याची उबळ येते, त्यांनी खोकला सुरू झाल्यावर खडीसाखरेचा एक तुकडा तोंडात ठेवून चघळावा. काही वेळातच खोकला कमी होईल.


*ॲसिडिटीसाठी उत्तम :-* 


खडीसाखर ही नैसर्गिकदृष्ट्या थंड असणारा पदार्थ म्हणून ओळखली जाते. त्यामुळे उष्णतेचे त्रास कमी होण्यासाठी खडीसाखर खावी. छातीत जळजळ होणे, ॲसिडिटी असा त्रास ज्यांना होतो, त्यांनी खडीसाखरेचे पाणी प्यावे. ॲसिडिटी लगेचच कमी होईल. हा उपाय केल्यामुळे मळमळ होण्याचा त्रासही कमी होतो.


डॉ. प्रमोद ढेरे,


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*





मन की बात जन तक


 

बायकोचे वय

 


माकड खेळते नारळ हांडी

 


महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापन दिनी

 महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापन दिनी

ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ सकाळी ८ वाजता.

            मुंबई, दि. २७ :- महाराष्ट्र राज्य स्थापनेला ६३ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने दिनांक १ मे २०२३ रोजी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी म्हणजे सकाळी ८ वाजता आयोजित करण्यात यावा. या मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावे, यासाठी या दिवशी सकाळी ७.१५ ते ९ वाजेदरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. जर एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वतःचा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो समारंभ सकाळी ७.१५ वाजेपूर्वी किंवा ९ वाजेनंतर करावा, असे राजशिष्टाचार विभागाने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.


            या परिपत्रकानुसार मुंबईत शिवाजी पार्क, दादर, मुंबई येथे राज्यपाल हे प्रमुख कार्यक्रमास उपस्थित राहून ध्वजारोहण करतील. तर विभागीय व जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री राष्ट्रध्वजारोहण करतील. ज्या ठिकाणी पालकमंत्री उपस्थित राहू शकणार नाहीत त्या विभागीय व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी अनुक्रमे संबधित विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी ध्वजारोहण करतील. तसेच, संबंधित तहसिलदार हे तालुका मुख्यालयी ध्वजारोहण करतील.


            राष्ट्रध्वजाला वंदन करताना ‘राष्ट्रगीत’ म्हणण्यात/ वाजविण्यात यावे. त्यानंतर 'राज्यगीत' म्हणण्यात/ वाजविण्यात यावे. ध्वजारोहण समारंभाचे अध्यक्षस्थान स्वीकारणाऱ्या मान्यवरांनी / अधिकाऱ्यांनी अशा प्रसंगी भाषण करावे किंवा नाही हे स्वतः ठरवावे. सलामीच्या वेळी सज्ज असलेला बॅन्ड सलामीपूर्वी व सलामीनंतर वाजविण्यास हरकत नसावी. राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पद्धतीबाबत शासन परिपत्रक क्रमांक एफएलजी-१०९१/३०, दिनांक २ मार्च, १९९१ तसेच क्रमांक एफएलजी-१०९१/(२)/३०, दिनांक ५ डिसेंबर, १९९१ तसेच क्रमांक एफएलजी-१०९८/(ध्वजसंहिता)/३०, दिनांक ११ मार्च, १९९८ अन्वये दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी. ध्वजारोहणाची रंगीत तालीम घेतली जाईल याची दक्षता घेण्यात यावी. राष्ट्रध्वज सुस्थितीत असल्याबाबत व सूर्यास्तास उतरवला जाईल, याचीही दक्षता घेण्यात यावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.


            महाराष्ट्र दिनाच्या समारंभाला सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित रहातील याची दक्षता घ्यावी. उत्सव अथवा औपचारिक प्रसंगी परिधान करावयाचा राष्ट्रीय पोषाख महाराष्ट्र दिन समारंभ प्रसंगी उपस्थित राहणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांनी व व्यक्तींनी परिधान करावा. स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवानांच्या पत्नींना व आई-वडील यांना निमंत्रित करावे. अधिकाधिक नागरिकांना हा सोहळा घरबसल्या पाहता यावा, यासाठी वेबसाईटद्वारे थेट प्रक्षेपण करण्याचा प्रयत्न करावा, असेही या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी हे परिपत्रक शासनाच्या https://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


0000

Featured post

Lakshvedhi