Friday, 28 April 2023

खडी साखर ॲसिडिटी, उष्णता, आणि इतर अनेक आजारांवर रामबाण उपाय : l*

 *ॲसिडिटी, उष्णता, आणि इतर अनेक आजारांवर रामबाण उपाय : खडी साखर* 


खडीसाखर खाल्ल्याने आरोग्याच्या अनेक तक्रारी दूर होऊ शकतात. खडीसाखरेचे दोन प्रकार आहेत. यापैकी एका खडीसाखरेचा आकार ओबडधोबड असतो, तर दुसरी खडीसाखर प्रमाणबद्ध असते. यापैकी आकार नसलेली आणि ओबडधोबड असणाऱ्या खडीसाखरेमध्ये औषधी गुणधर्म जास्त प्रमाणात असतात.


पित्त विकार, उष्णतेचा त्रास, ॲसिडिटी अशा काही आजारांवर खडीसाखर रामबाण उपाय आहे. जाणून घेऊया खडीसाखर खाण्याचे इतर फायदे.


*तोंडाला दुर्गंधी :-* 


मुखदुर्गंधीचा त्रास अनेक जणांना असतो. दररोज 2 वेळा स्वच्छ दात घासूनही तोंडाचा वास जात नाही. अशा लोकांना नियमितपणे खडीसाखर खाणे फायद्याचे ठरते. यासाठी जेवण झाल्यानंतर खडीसाखरेचा 1 खडा आणि थोडीशी बडीशेप तोंडात टाका आणि चावून चावून खा. तोंडाची दुर्गंधी कमी होईल.


*खोकल्यावर गुणकारी :-* 


सतत कोरडा खोकला येण्याचा त्रास होत असेल, तर अशावेळीही खडीसाखर चांगली उपयोगी पडते. ज्या लोकांना खास करून रात्री झोपल्यानंतर खोकल्याची उबळ येते, त्यांनी खोकला सुरू झाल्यावर खडीसाखरेचा एक तुकडा तोंडात ठेवून चघळावा. काही वेळातच खोकला कमी होईल.


*ॲसिडिटीसाठी उत्तम :-* 


खडीसाखर ही नैसर्गिकदृष्ट्या थंड असणारा पदार्थ म्हणून ओळखली जाते. त्यामुळे उष्णतेचे त्रास कमी होण्यासाठी खडीसाखर खावी. छातीत जळजळ होणे, ॲसिडिटी असा त्रास ज्यांना होतो, त्यांनी खडीसाखरेचे पाणी प्यावे. ॲसिडिटी लगेचच कमी होईल. हा उपाय केल्यामुळे मळमळ होण्याचा त्रासही कमी होतो.


डॉ. प्रमोद ढेरे,


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*





No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi