Thursday, 27 April 2023

ग्राहकाभिमुख ‘महारेरा’कायद्याच्या माध्यमातून ग्राहकांच्या हिताचे रक्षण

 ग्राहकाभिमुख ‘महारेरा’कायद्याच्या माध्यमातून ग्राहकांच्या हिताचे रक्षण


- महारेराचे सचिव डॉ. वसंत प्रभू


           


            मुंबई, दि. 26: “ 'महारेरा' कायद्यामुळे घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. या कायद्याच्या माध्यमातून ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करणे तसेच बांधकाम क्षेत्राचा कारभार पारदर्शकपणे व नियमित करणे ही या कायद्याची महत्त्वाची उद्दिष्ट्ये आहेत”, अशी माहिती महारेराचे सचिव डॉ. वसंत प्रभू यांनी ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून दिली आहे.


            महारेरा हा “ग्राहकाभिमुख” कायदा असून या कायद्यामुळे घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या फसवणुकीला पायबंद घातला जाणार आहे. भूखंड, अपार्टमेंट, इमारत तसेच कोणत्याही रिअल इस्टेट प्रकल्पाच्या खरेदी आणि विक्रीमध्ये पारदर्शकता व कार्यक्षमता आणण्यासाठी हा कायदा महत्वाची भूमिका पार पाडत आहे. या कायद्यानुसार बांधकाम व्यावसायिकांना आपल्या प्रकल्पाचा संपूर्ण आराखडा, परवानग्या व इतर आवश्यक कागदपत्रे महारेराच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे मोठमोठ्या आकर्षक व अवास्तव जाहिराती करुन ग्राहकास भूलवणे अशक्य होणार आहे. ग्राहक आणि बांधकाम व्यवसाय यावर या कायद्यामुळे कसा परिणाम होऊ शकतो, ग्राहकांनी घर खरेदी करतांना कोणत्या नियमांचे काटेकोरपणे वाचन व पालन केले पाहिजे अशा विविध विषयांवर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून सविस्तर माहिती डॉ. प्रभू यांनी दिली आहे.


            माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत, गुरुवार दि. 27 एप्रिल 2023 रोजी सायं 7.30 वा. महासंचालनालयाच्या पुढील समाजमाध्यमांच्या लिंकवर पाहता येईल. ही मुलाखत निवेदक रिताली तपासे यांनी घेतली आहे.


महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर हे कार्यक्रम पाहता येतील.


ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR


फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR


यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR


0000


 

ADHS मुंबई जागतिक मलेरिया दिनानिमित्त उरण भागातील 130 हून अधिक गावांमध्ये डिजिटल IEC डिस्प्ले बोर्ड वितरित करणार आहे

 ADHS मुंबई जागतिक मलेरिया दिनानिमित्त उरण भागातील 130 हून अधिक गावांमध्ये डिजिटल IEC डिस्प्ले बोर्ड वितरित करणार आहे.


हार्ट फाउंडेशनचा नॉव्हेल पब्लिक आयईसी ओरिएंटेड इनिशिएटिव्ह, आणि अमेय लॉजिस्टिक, नवी मुंबई द्वारे समर्थित

नवी मुंबई : सन 2030 पर्यंत मलेरिया आणि डेंग्यूचे समूळ उच्चाटन करण्याच्या माननीय पंतप्रधानांच्या संकल्पनेला अनुसरून आरोग्य सेवा मुंबईच्या अस्तित्त्व संचालक कार्यालयाने हार्ट फाउंडेशन आणि अमेय लॉजिस्टिक्स, उरण यांच्या संयुक्त विद्यमाने पुन्हा एकदा जनजागृतीचा अनोखा उपक्रम राबवला आहे. उरणच्या जवळपास 130 गावांमध्ये 130 डिजिटल IEC डिस्प्ले बोर्ड वितरित करून विविध आरोग्य समस्या, त्यांची लक्षणे आणि खबरदारी याविषयी माहिती प्रदर्शित करणे. पूर्वी, ADHS कार्यालयाने खारघरमधील विविध सोसायट्यांमध्ये 80 डिजिटल IEC डिस्प्ले बोर्ड वितरित केले होते.


अशी सामान्य जागरूकता वाढवण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, हा संयुक्त उपक्रम डॉ. बाळासाहेब सोनवणे, सहाय्यक यांच्या हस्ते सुरू करण्यात आला आणि त्याचे अनावरण करण्यात आले. संचालक आरोग्य सेवा NVBDCP. मुंबई, सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन. तसेच डॉ. राजाराम भोसले, जिल्हा हिवताप अधिकारी-रायगड, डॉ. जयकर एलिस, संस्थापक अध्यक्ष हार्ट फाउंडेशन आणि आयईसी समन्वयक यांच्या उपस्थितीत, डॉ. आर.जी इटकरी, THO- उरण, श्री. धुमाळ आणि श्री. किर्वे. , आरोग्य पर्यवेक्षक सहसंचालक कार्यालय - पुणे, डॉ. धाडवड, वै. अधिकारी कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्र, श्री. अरुण परदेशी, आरोग्य सहाय्यक आणि अमेय लॉजिस्टिक, नवी मुंबईच्या कु. शुभांगी मोकल आणि छाया पाटील ह्या सरकारच्या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी पुढे आल्याचा आम्हाला आनंद आहे. तसेच, कोणताही उपक्रम सार्वजनिक आणि समाजाच्या मोठ्या सहभागाशिवाय यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळे, तुमच्या सर्वांच्या पाठिंब्याबद्दल मी खूप आभारी आहे आणि एकत्रितपणे आम्ही निश्चितपणे ध्येय साध्य करू.

“माझ्या रायगड परिसरात विशेषतः उरणमध्ये आम्ही हे 130 डिजिटल IEC डिस्प्ले बोर्ड लॉन्च करू शकलो याचा मला खूप आनंद आहे. हार्ट फाऊंडेशनचे डॉ. जयकर एलिस आणि अमेय लॉजिस्टिक्स यांनी पुढे येऊन या अत्यंत आवश्यक कार्याला पाठिंबा दिल्याबद्दल मी आभारी आहे” डॉ. राजाराम भोसले म्हणाले.

यावेळी बोलताना सु. शुभांगी मोकल, अमेय लॉजिस्टिक्स, नवी मुंबई म्हणाल्या, “अमेय लॉजिस्टिकला या CSR उपक्रमाचा एक भाग होण्याचा बहुमान मिळाला आहे. रोग सर्वत्र पसरत आहेत आणि जागरूकतेचा अभाव आहे ज्यामुळे विविध मृत्यू होतात. पण या उपक्रमात आम्ही त्याबद्दल बोलतो आणि त्यांना स्वतःची काळजी घेण्यास मदत करतो. आम्हाला खरोखर लोकांच्या आरोग्याच्या प्रतिबंधात्मक पैलूंवर लक्ष केंद्रित करायचे आहे आणि या उपक्रमाद्वारे आम्ही ते करत आहोत, म्हणून आम्ही याचा एक भाग बनल्याबद्दल आभारी आहोत.”चित्र 1: डावीकडून उजवीकडे: डॉ. महेंद्र धाडवड, श्री. किर्वे, डॉ. इटकरे, डॉ. जयकर एलिस संस्थापक अध्यक्ष हार्ट फाउंडेशन आणि आयईसी समन्वयक, कु. शुभांगी मोकल, अमेय लॉजिस्टिक, डॉ. बाळासाहेब सोनवणे सहाय्यक, संचालक आरोग्य सेवा NVBDCP. मुंबई. सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन. डॉ.राजाराम भोसले आणि श्री.धुमाळ.

चित्र 2:- आशा स्वयंसेविका आणि आरो



चेहरा सुंदर होण्यासाठि...... अप्रतिम उपाय....👇*

 *चेहरा सुंदर होण्यासाठि...... अप्रतिम उपाय....👇*



  मसूर डाळ तुपासह घोटुन तयार केलेला लेप दुधात मिसळून चेहर्यावर लावावा. असे सात दिवस केल्यास, चेहरा गुलाबासारखा टवटवीत व सुंदर होतों..

२)##वांगदूर #होण्यासाठि... डाळिंबाची साल मधासह वाटून याचा लेप लावावा. वांग समूळ नष्ट होतात.

३) ,##तारुण्यपिटिका ##जाण्यासाठि..धने, वेखंड , लोध्र, यांचा दूधासह वाटून याचा लेप चेहऱ्यावर लावावा. पिंपल्स, मुरूमे जातात.त्वचा निरोगी ठेवण्यासाठी रोज सकाळी तुळशीच्या पानांचा रस व मध यांचे मिश्रण घेणे फायदेशीर ठरते. त्यामुळे रक्तशुद्धी होते आणि त्वचा तजेलदार होते.

४) अल्प प्रमाणात आठवडाभर द्राक्षाचा रस घेतल्यास निस्तेज त्वचा उजळते. तसेच द्राक्षाचा रस सर्वांगाला लावल्याने त्वचा उजळते.

५) त्वचा नेहमी चांगली राहावी यासाठी ३-४ थेंब लिंबाचा रस, चिमुटभर हळद, एक चमचा भरून काकडी रस, एकत्र करून हे मिश्रण चेहऱ्याला लावावे.

६) काकडिचा रस, संत्र्याचा रस, पपयीचा गर, सीताफळाचा गर, यापैकी जे उपलब्ध असेल तो चेहर्याला लावा. यामुळे त्वचा उजळते. व काळसर पणा जाईल. व त्वचा मऊ होते.

७) त्वचेला घट्टपणा यावा यासाठी त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यासाठी ग्लिसरीन, अंड्याचा पांढरा भाग,३-४ थेंब मध, या मिश्रणाचे चेहर्यावर दोन थर द्यावेत. हे वाळल्यावर कोमट पाण्याने धुवावे.

८) त्वचा अतिशय नाजूक असते.हे लक्षात घेऊन मेक अप करताना ही काळजी घ्यावी. व मेक अप उतरवताना काळजी घ्यावी. त्यासाठी क्लिंजिंग म्हणून कच्च्या दूधाचा वापर करावा. तसेच..१ टेबल स्पून तांदूळ पिठी, व २ टेबल स्पून दहि एकत्र करून तयार झालेले मिश्रण क्लिंजिंग प्रमाणे वापरता येईल..

                          


९) जायफळ दूधामध्ये उगाळून लावावे. याने चेहऱ्याची त्वचा उजळते. व काळे डाग जातात.


   ###तेलकट ##त्वचेसाठि... रात्री कच्च्या बटाट्याचा किस चेहर्याला चोळून सकाळी थंड पाण्याने धुऊन घ्या. याने तेलकट पणा जातो.

चेहर्यावरील तेलकट पणा जाण्यासाठी, व चेहरा उजळण्यासाठी रात्री मसूर डाळ पाण्यात भिजवून सकाळी वाटून दूधामध्ये मिसळून हा लेप चेहऱ्यावर लावावे याने चेहरा उजळतो.

१०) पिंपल्स असेल तर आठवड्यात एक दिवस गरम पाण्याने वाफ घ्यावी. नंतर पाव चमचा गुलाब पावडर, अर्धा चमचा चंदनपावडर, ग्लिसरीन, गुलाब पाणी यांचा., फेसपॅक, करून लावून ठेवा. त्वचा मवू होईल. जांभूळ बी उगाळून लेप लावावा.

११) रोजच्या आहारात पुदिना पाने वापरावे. याने पोटाचे विकार होत नाही. वपिंपल येत नाही. सितोपलादी चूर्ण, व मध मिसळून हे चाटण घ्यावे, चेहर्यावर फोड, फुंसी येत नाही.

१२) चेहर्यावर जास्त पिंपल्स येत असेल तर बाजरिच्या पिठाचा लेप लावावा. चेहरा तेजस्वी होतो.

 मेरिगोल्ड जेल.. चेहर्यावर पिंपल्स असेल तर याने मसाज करावा..


              


१३) ##कोरड्या ##त्वचेसाठि.... कोरडेपणा कमी करण्यासाठी चेहरा दिवसातून एकदा तरी कच्च्या दूधाने धुवावा., त्वचा मवू, मुलायम होण्यासाठी सर्वांगाला लोण्याने मसाज करावा. यामुळे त्वचा मवू होईल. 

        रात्री झोपण्यापूर्वी तीळ, बदाम, लवंग असलेल्या तेलाने मालिश करा. थंडित कोल्ड क्रीम, माॅईच्शरायजर आवर्जून वापरावे. यामुळे त्वचा कोरडी पडत नाही.

         नारळाच्या पाण्यात ताजि साय मिसळून तयार केलेलं मिश्रण चेहऱ्याला लावावे. याने कोरडि त्वचा मऊ होते. व सुरकुत्या सुद्धा जातात.

     चेहरा मुलायम होण्यासाठी कलिंगड रस चेहऱ्याला लावावा. पंधरा मिनिटे ठेवावे व नंतर धूवावे.

 १४) ###निस्तेज ##चेहरा....चंदन पावडर एक चमचा, मंजिष्ठ पावडर एक चमचा, एक चमचा कापूर पावडर, अर्धा चमचा आंबेहळद, हे सर्व दूधात मिसळून चेहर्यावर लावावा. व २० मिनिटांनी धुवून घ्या. यामुळे चेहऱ्यावर एक प्रकारची चमक येते.

.... आवळा, हिरडा, बेहडा समप्रमाणात घेऊन एक चमचा याचे चूर्ण घेउन याचा लेप चेहऱ्यावर लावावे. नंतर धूवावे. चेहरा चमकदार होतो.

          गव्हाचा कोंडा.. यात भरपूर प्रमाणात विटामिन ( इ) असतं. तो सायित मिसळून याचा लेप चेहऱ्यावर लावावा.यामुळे चेहरा उजळतो..


...... आपण वरिल उपाय केल्यास तुमच्या चेहऱ्याचे आरोग्य नेहमी चांगले राहील......


       आयुर्वेद अभ्यासक....... सुनिता सहस्रबुद्धे.........



*⭕️

Wednesday, 26 April 2023

मन की बात’ राष्ट्रीय परिषदेतमहाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग

 मन की बात’ राष्ट्रीय परिषदेतमहाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग.

            नवी दिल्ली, 26 : केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्यावतीने आकाशवाणीवर प्रसारित होणाऱ्या ‘मन की बात’ या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या विशेष कार्यक्रमाचे 99 भाग पूर्ण झाले असून, येत्या रविवारी 30 एप्रिल रोजी याचा 100 वा भाग प्रसारित होणार आहे. याचे औचित्य साधून आजपासून दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन विज्ञान भवनात करण्यात आले. या कार्यक्रमास उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची प्रमुख उपस्थिती होती. यांच्यासह केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसेच क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री अनुराग ठाकूर, विभागाचे सचिव अपूर्व चंद्र व्यासपीठावर उपस्थित होते. या परिषदेत महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


            आतापर्यंत प्रसारीत झालेल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात प्रधानमंत्री यांनी 700 पेक्षा अधिक वेळा लोकांशी संवाद साधला आहे. या 300 संघटनाचा उल्लेख केला असून यामधले 37 व्यक्ती आणि 10 परदेशी संस्था आहेत. आजपासून सुरु असलेल्या राष्ट्रीय परिषदेमध्ये चार सत्रे असणार आहेत.


             महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवर या राष्ट्रीय परिषदेस विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित आहेत. यामध्ये सुप्रसिद्ध अभिनेते आमिर खान, रवीना टंडन, चंद्रकांत दामोदर कुलकर्णी, बंडू सीताराम धोत्रे, सोनाली हेलवी, राजेंद्र यादव, डॉक्टर रोहीदास बोरसे, चंद्रकिशोर पाटील आणि शर्मिला ओसवाल, वेदांगी कुलकर्णी, शैलेश भोसले, डॉ. अन्यया अवस्थी या काही लोकांचा समावेश आहे.


            या राष्ट्रीय परिषदेत, देशाच्या विविध भागातील 100 सन्माननीय नागरिक सहभागी झाले आहेत. या सर्वांचा प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’ च्या विविध भागांमध्ये उल्लेख केला आहे. या व्यक्तींनी देश उभारणीत दिलेल्या विशेष योगदानाची दखल प्रधानमंत्री यांनी आपल्या मासिक संवाद कार्यक्रमातून वेळोवेळी घेतली आहे.


            पुण्याचे चंद्रकांत कुलकर्णी यांनी, आपल्या 16,000 रुपयांच्या मासिक निवृत्तीवेतनातून दरमहा 5,000 रुपये, स्वच्छता मोहिमेसाठी देण्याचा संकल्प केला आहे. चंद्रपुरचे बंडू सीताराम धोत्रे, ‘पर्यावरण संरक्षण संघटना’ या स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष असून, त्यांच्या संस्थेने, चंद्रपूरचा किल्ला आणि आसपास स्वच्छता मोहीम राबवली. साताऱ्याची सोनाली हेळवी ही महाराष्ट्राच्या 21 वर्षांखालील महिला कबड्डी संघाची कर्णधार आहे.राजेंद्र यादव हे प्रयोगशील शेतकरी असून त्यांनी कोविड-19 महामारीच्या काळात त्यांच्या ट्रॅक्टरचा वापर करुन लसीकरणासाठी उपयुक्त वाहन तयार केले. पुण्याचे डॉ.बोरसे हे कोविड योद्धा आहेत.


            चंद्रकिशोर पाटील यांच्या नाशिकमध्ये गोदावरी नदीचे पात्र स्वच्छ करण्यासाठीच्या प्रयत्नांचा उल्लेख पंतप्रधानांनी केला होता. अलिबागजवळील केनाड येथील रहिवासी असलेल्या शर्मिला ओस्वाल गेल्या 20 वर्षांपासून अनोख्या पद्धतीने भरड धान्यांचे उत्पादन करत असून त्यांना ‘मिलेट्स वुमन’ म्हणून त्यांची वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली आहे.


            उद्घाटन पर सत्रात उपराष्ट्रपतींच्या हस्ते दोन पुस्तकांचे अनावरण करण्यात आले. त्यापैकी पहिले पुस्तक “मन की बात @100” हे कॉफीटेबल पुस्तक आहे यामध्ये या कार्यक्रमाची आतापर्यंतची वाटचाल तसेच या कार्यक्रमामुळे प्रधानमंत्री आणि सामान्य नागरिक यांच्या दरम्यानच्या थेट संवादाला उत्तेजन देण्याचे परिवर्तनकारी परिणाम अधोरेखित करण्यात आले आहेत.


            दुसरे पुस्तक प्रसार भारतीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एस.वेम्पती यांनी लिहिलेले “कलेक्टिव्ह स्पिरीट, काँक्रीट ॲक्शन.” मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांच्या हृदयात असलेल्या ज्या सामाजिक, आर्थिक, पर्यावरणविषयक, सांस्कृतिक, आरोग्यविषयक तसेच तंदुरुस्तीविषयक समस्यांसह विविध संकल्पनांवर चर्चा केली त्यांची माहिती या पुस्तकामध्ये देण्यात आली आहेत

.


००००

विद्यार्थ्यांना ऑन जॉब ट्रेनिंग आणि इंटर्नशिप सुविधा उपलब्ध करून देणार

 विद्यार्थ्यांना ऑन जॉब ट्रेनिंग आणि इंटर्नशिप सुविधा उपलब्ध करून देणार


- मंत्री मंगलप्रभात लोढा


            मुंबई, दि. २६ : “महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठांसोबत १२ उद्योग समूहांनी सामंजस्य करार केल्यामुळे कौशल्य पूर्ण शिक्षणाच्या माध्यमातून अधिकाधिक रोजगाराच्या संधी निर्माण होण्यास मदत होणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२३- २४ पासून विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण, ऑन जॉब ट्रेनिंग आणि इंटर्नशिप सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील” अशी ग्वाही कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.


            महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे विविध उद्योगसमूहांशी सामंजस्य करार मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत मंत्रालयातील दालनात आज झाले, त्यावेळी ते बोलत होते.


            मंत्री श्री.लोढा म्हणाले की , उद्योजकता आणि नावीन्यता विद्यार्थ्यांमध्ये रुजवावी या मुळ उद्देशाने महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाची स्थापना केली असून, हे विद्यापीठ सातत्याने प्रगती करीत आहे. पाच कौशल्य प्रशाला, एकवीस नवीन अभ्यासक्रम सुरू केले आहेत. विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासाठी शासन अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे. याच माध्यमातून अनेक उद्योगसमूहाशी सामंजस्य करार देखील करण्यात आले आहेत. संस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधून शैक्षणिक वर्ष २०२३- २४ पासून विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण, ऑन जॉब ट्रेनिंग आणि इंटर्नशिप सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


            मंत्री श्री. लोढा म्हणाले की, जागतिक दर्जाच्या शिक्षणातून अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. यासाठी या सर्व उद्योगसमूहांचे सहकार्य मिळेल. मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना अशाप्रकारे प्रशिक्षित करून देशात आणि परदेशातही उत्तम पगाराच्या नोकऱ्या मिळतील. डिजिटल व्हिडिओ प्लॅटफॉर्म, विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान शिकवणे यातून कौशल्ययुक्त विद्यार्थी घडण्यास मदत होणार असल्याने, या सर्व उद्योगसमूहांचे त्यांनी आभार मानले.


जागतिक दर्जाच्या शिक्षणातून रोजगाराच्या संधी : अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक


             अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक म्हणाल्या की, भारत हा सर्वाधिक लोकसंख्येचा देश असून, यामध्ये तरुणांची संख्या जास्त आहे. शिक्षण घेणारा तरुण हा कौशल्ययुक्त असावा यासाठी शासन विविध योजना राबवत आहे. आरोग्य, हॉटेल, औद्योगिक क्षेत्र, आयटी क्षेत्र यामध्ये उच्च तंत्रज्ञान आत्मसात केलेल्या कुशल मनुष्यबळाची अत्यंत आवश्यकता असल्याचे लक्षात घेऊन शासनाने आज विविध बारा उद्योग समूहांशी सामंजस्य करार केले आहेत. या सामंजस्य कराराच्या उद्योग क्षेत्राला आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ मिळण्यासाठी मदत होईल


            यावेळी कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, यासह सॅप इंडिया, रेडहंट, मायक्रोसॉफ्ट, सेर्टी पोर्ट ,एमईडीसी, मॅक, एनआरएआय, संचेती, सीएसडीसीआय यासह विविध उद्योगसमूहांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

###बाभळिच्या ###शेंगांचे औषधिय..व गुणकारी.. फायदे*

 *####बाभळिच्या ###शेंगांचे औषधिय..व गुणकारी.. फायदे* 👇


... आयुर्वेदात अशा अनेक वनौषधी आणि वनस्पती आहे, ज्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर आहे यातिल बाभुळिच्या शेंगांना फार मौल्यवान मानले जाते. खुपच गुणकारी आहे तर बघू या फायदे 👇

  ..... (१)..गुडघेदुखित बाभळीच्या शेंगांचे चूर्ण उपयुक्त आहे.. व्रुध्दापकाळात सांधेदुखी, ही सामान्य समस्या आहे आणि गुडघेदुखी तर चाळिसिनंतर चालू होते. तेव्हा. या शेंगांचे चूर्ण सकाळ संध्याकाळ कोमट पाण्याबरोबर घ्यावे हे चूर्ण कोणत्याही आयुर्वेद शाॅपला नक्कीच मिळेल, याने काही दिवसांतच ,, गुडघेदुखी,, समूळ नष्ट होते..


....(२).. डोकेदुखी दूर होते.. वाढता ताण-तणाव, चिंता, धावपळ, यामुळे. सतत डोकेदुखी असणं ही समस्या घरोघरी आढळून येते, अशा वेळी बाभुळ शेंगाचि पावडर कोमट पाण्याबरोबर घ्यावी, लगेच आराम मिळतो..


....(३) स्त्रियांसाठी शेंगांचे चूर्ण फायदेशीर आहे... आजकाल बहुतेक महिलांना ल्यूकोरिया चा त्रास होतो, श्वेतप्रदर,. . पांढरे पाणी जाणे, हि समस्या बहुतेक महिलांना होतो. तेव्हा. या शेंगांचे चूर्ण सकाळ संध्याकाळ कोमट पाण्याबरोबर घ्यावे. याने आराम मिळतो नक्कीच..


......(४).. पुरुषांसाठी या शेंगांचे चूर्ण फायदेशीर ठरते.. बाभळीच्या शेंगांचे चूर्ण पुरुषांना देखील फायदेशीर आहे. ज्यांना धातूक्षयाचा त्रास असेल. त्यांनी हि पावडर. नियमितपणे कोमट पाण्याबरोबर घेतल्यास फायदा होतो.. वंध्यत्व दूर होते..


.......(५).. पाठदुखी कंबरदुखी या त्रासात आराम देण्यासाठी बाभळीच्या शेंगांचे चूर्ण फायदेशीर आहे.. एकाच स्थितीत बराच वेळ बसल्यामुळे पाठदुखी कंबरदुखी चा त्रास होतो, आजकाल बहुतेक लोक बसून काम करतात त्यामुळे पाठदुखी देखिल सामान्य समस्या आहे, तेव्हा हि पावडर उपयुक्त ठरते, जेवणानंतर एक चमचा भरून चूर्ण कोमट पाण्याबरोबर घ्यावे. याने छान आराम मिळतो नक्कीच.. जमल्यास हि पावडर दूधासोबत घेतल्यास स्नायू बळकट होतात..


..... जूलाबाच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी. बाभळीच्या शेंगांचे चूर्ण फायदेशीर आहे.. बरेच वेळा , बाहेरच्या खाण्यामुळे, पोट खराब होऊन पातळ जुलाब होतात, अतिसार होतो, गळल्यासारखे होते,. यांच्यावर शेंगांचे चूर्ण हे रामबाण औषध आहे, थोडं चूर्ण पाण्यासोबत घेतल्यास आराम मिळतो


...(७). . अशक्तपणा, कमजोरी वाटणे, यावर..जर तुम्ही शारिरीक दृष्ट्या अशक्त असाल तर , तुम्ही. बाभळीच्या शेंगांचे चूर्ण पाण्यात किंवा दुधात मिसळून रोज एक वेळा सेवन करू शकता. आणि वाटलं तर मधात मिसळून चाटण म्हणून घ्या.. 


..... तेव्हा वरिल फायदे बघता .. बाभळीच्या शेंगांचे चूर्ण.. अतिशय मौल्यवान औषध आहे.. आणि सहज आयुर्वेद दुकानात मिळतं.. जरुर हि पावडर घरात असू द्यावि..


.........###आयुर्वेद##अभ्यासक....... सुनिता सहस्रबुद्धे... निरामय आयुर्वेद व होमिओपॅथी प्रचार!!!


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


*(

जलयुक्त शिवारला मोठे यश, जलसंवर्धनात महाराष्ट्र पहिला

 जलयुक्त शिवारला मोठे यश, जलसंवर्धनात महाराष्ट्र पहिला

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी केले जनतेचे अभिनंदन


 


            मुंबई, दि. 26 :- केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने भारतातील जलाशयांच्या गणनेचा पहिला अहवाल जाहीर केला असून, त्यात महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आला आहे. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेचे अभिनंदन केले आहे.


            या अहवालाबाबत माहिती देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने भारतातील जलाशयांच्या गणनेचा पहिला अहवाल जाहीर केला असून, त्यात आपल्या महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आला आहे, हे सांगताना मला अत्यानंद होतो. जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे आदी योजना एकत्रितपणे राबविल्याचे हे यश आहे. अन्य राज्यात तळी आणि जलसाठे अधिक असली तरी जलसंवर्धनाच्या बाबतीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला आहे. 2018-19 या वर्षात ही गणना करण्यात आली होती. या अहवालातील महत्त्वाचे निरीक्षण म्हणजे बहुसंख्य जलसाठे हे जलसंवर्धन योजनांमधील आहेत.


            जलयुक्त शिवार आणि अन्य जलसंवर्धनाच्या योजनांना लोकचळवळ बनविणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व नागरिकांचे, सामाजिक संघटनांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मन:पूर्वक अभिनंदन केले असून, या कार्यात सहभागी सर्वांचे आभार सुद्धा मानले आहेत. हे आपल्या सर्वांचे सामूहिक यश आहे. आता जलयुक्त शिवार 2.0 अभियान सुद्धा असेच सर्वांनी यशस्वी करावे, असे आवाहन सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Featured post

Lakshvedhi