Wednesday, 26 April 2023

Job हवा?

 सर्व मित्र परिवार यांना माहिती देण्यात येत आहे, की आपल्या घरी, नातेवाईक मध्ये जे पदवी प्राप्त विद्यार्थी (वार्षिक 2020-23 या कालावधीत) पास झाले असेल. अश्या विद्यार्थी साठी Tata consultancy Services, Mihan Nagpur येथे interview सुरु होत आहे.... तरी आपल्या जवळचे IT व Graduate विद्यार्थी मध्येही ही माहिती share करावी.


तारीख 25-28 एप्रिल 2023

स्थळ TCS मिहान Nagpur.



Document


*4-5 पासपोर्ट फोटो

*CV / resume

* आधार




माहिती करिता संपर्क


9021703384


Regards


Nishant Umathe

TCS Pune.

उन्हाळ्यात कोकम सरबत का प्यावे ?*

 *उन्हाळ्यात कोकम सरबत का प्यावे ?* 


उन्हाळ्यात भरपूर प्रमाणात प्यायलं जाणारं पेय म्हणजे कोकम सरबत. कोकम हे वात व पित्त नाशक फळ आहे. तसेच भूक वाढवणे, अन्नाची रुची वाढवणे आदी गुण देखील कोकममध्ये आहेत.


कोकम सरबत सेवनाने पचनासंबंधी व्याधी,अतिसार यात अत्यंत उपयुक्त ठरते. ताजेतवानं आणि थंड गुणधर्मांमुळे कोकम सरबताला उन्हाळ्यात प्राधान्य दिलं जातं. कोकम सरबताचे अनेक फायदे आहेत.


कोकम फळपासून सरबत बनवले जाते. कोकमला शास्त्रीयदृष्ट्या 'गार्सिनिया इंडिका' असे देखील संबोधले जाते. हे फळ गडद जांभळ्या रंगाचे असते. चवीला तिखट असते. कोकम फळ पाण्यात उकळून त्यात चवीनुसार साखर, मीठ टाकून कोकम सरबत तयार केलं जातं. काही लोक रसाची चव वाढवण्यासाठी जिरे आणि आले वर इतर चाट मसाले देखील घालतात.


*उन्हाळ्यात कोकम सरबत सेवनाचे फायदे...* 


*उष्माघातावर रामबाण:* 


कोकममध्ये उष्माघात टाळण्याचे गुणधर्म आहे. कोकम सरबत सेवनाने उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत होते. निर्जलीकरण आणि उष्माघात टाळण्यास देखील मदत करते.


*पचनास उपयुक्त:* 


कोकम सरबत त्याच्या आंबटपणामुळे एक उत्कृष्ट पचन सहाय्यक आहे.हे पाचक एन्झाईम्सचा स्राव उत्तेजित करण्यास आणि पोटातील आम्लता कमी करण्यास मदत करते.


*वजन कमी होणे:* 


कोकमच्या रसामध्ये कॅलरी कमी आणि फायबर जास्त असते. जे वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असलेल्या लोकांसाठी ते एक आदर्श पेय बनवते.


*दाहक-विरोधी गुणधर्म:* 


कोकम सरबतमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. जे शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतात. हे संधिवात आणि इतर दाहक परिस्थितींमुळे होणारी वेदना आणि सूज कमी करण्यास देखील मदत करते.


*रोगप्रतिकार शक्ती वाढवते:* 


कोकममध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. जे एक नैसर्गिक अँटिऑक्सिडेंट आहे. जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते.


*संकलन-* 

डॉ. प्रमोद ढेरे,


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



उन्हाळ्यातील आहार:रात्री 10 नंतर खाल्ल्यास 20% वाढू शकते शुगर, झोपण्याच्या 3 तास आधी करा जेवण.....*

 *उन्हाळ्यातील आहार:रात्री 10 नंतर खाल्ल्यास 20% वाढू शकते शुगर, झोपण्याच्या 3 तास आधी करा जेवण.....*


सकाळी ९ आणि रात्री ९ वाजता खाल्लेल्या सारख्याच अन्नाचे शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर होतात वेगवेगळे परिणाम होतात.


आहाराच्या बाबतीत ऋतू, वेळ व प्रमाण खूप महत्त्वाचे आहे. अनेक अध्ययनांत आढळले की, बहुतांश जेवण दिवसाच्या पहिल्या भागात केले पाहिजे. म्हणजे नाष्टा भरपूर असावा, दुपारचे जेवण संतुलित आणि रात्रीचे जेवण खूप कमी असावे. उन्हाळ्यात खाण्याची ही पद्धत अधिक उपयुक्त आहे. हे आपल्या जैविक घड्याळासाठी योग्य आहे. वास्तविकतः अन्न पचवण्याची क्षमता केवळ आपल्या जैविक घड्याळावर अवलंबून असते. जसजसा दिवस पुढे जातो तसतसे आपले चयापचय मंदावते. रात्री ९ वाजता खाल्लेल्या अन्नापेक्षा सकाळी ९ वाजता खाल्लेल्या अन्नाचा पूर्णपणे वेगळा परिणाम होतो. अन्न सारखेच आणि समान प्रमाणात असले तरीही. रात्री १० नंतर खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी संध्याकाळी सहा वाजता खाण्यापेक्षा २० टक्क्यांनी वाढू शकते. अशा परिस्थितीत उन्हाळ्यात आपला आहार अतिशय संतुलित असणे आवश्यक आहे.


*उन्हाळ्यात असा असावा आहार, शरीराला असे ठेवा...*


 *हायड्रेट न्याहारी...*

 दररोज या ५ पदार्थांचा समावेश करा नाष्ट्यामध्ये फळे, भाज्या, तृणधान्ये, प्रथिनेयुक्त अन्न यांचा समावेश करण्याची खात्री करा. एक ग्लास दूध किंवा दही सोबत घेतल्यास ते पूर्ण होते. एकत्रितपणे ते दिवसभर शरीरासाठी आवश्यक खनिजे, ऊर्जेसाठी कर्बोदकांमधे आणि सूक्ष्म पोषक घटक प्रदान करतात.


*दुपारचे जेवण...*

शरीर हायड्रेटेड ठेवणारे असावे दुपारचे जेवण शरीराला हायड्रेट ठेवणारे असावे. यामुळे सुस्ती येत नाही. ब्रेड कमी ठेवा. दलिया खिचडी, डाळीचा भात, दही, ताक, भाज्या यांचा समावेश करा. ते पोटाचा मायक्रोबायोटा निरोगी ठेवतात. काकडीत फायबर असते. ते चयापचय सुधारते.


*रात्रीचे जेवण...*

झोपण्याच्या ३ तास आधी रात्रीचे जेवण झोपण्याच्या तीन तास आधी करा. उदा. तुम्ही १२ वाजता झोपलात तर रात्रीचे जेवण ९ वाजेपर्यंत संपले पाहिजे. हे करणे अवघड असेल तर सूप, मूग डाळ खिचडी, पनीर, टोफू, भाज्यांची कोशिंबीर इत्यादी पदार्थ जेवणात घेता येतात.


*पाणी...*

हायड्रेशनसाठी तहान नसताना पाणी पीत राहावे? हायड्रेशन म्हणजे शरीरातील सोडियम व पाणी अशा इलेक्ट्रोलाइट्समधील संतुलन. तहान लागणे हे सूचित करते की शरीरात पाण्याची कमतरता आहे. अशा वेळी उन्हाळ्यात तहान न लागता मध्येच पाणी प्यायला हवे. साधारणपणे २.५ ते ३ लिटर द्रव (रस, दूध, सरबत इ. मिळून) घ्या.


*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

डॉ. प्रमोद ढेरे,


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



काजू.....Cashew..Nut...

 ....काजू.....Cashew..Nut...


... .. ड्रायफ्रुट महणजेच सुकामेवा. शरिराचि उर्जा टिकवतो... रोगप्रतिकार शक्ति वाढवतो... खुप गरजेचे आहे.. बदाम, पिस्ता, काजू, चारोळि, खारिक, असा सर्वच सुका मेवा बलदायि, शरीर पुष्ट करतो.. यातच एक चविष्ट, बलदायि सुके फळ म्हणजे... काजू...

....... काजु कोकणात मिळणाऱ खास फळ.. . खुप फायदे आहेत याचे.. तर बघू या..!!!


 


१).. काजुमध्ये प्रोटिन, व्हिटमिन, बी, सी, के, चे प्रमाण अधिक असते, यात पोटँशिअम, मँग्नेशिअम भरपूर असतं. याने एनर्जि मिळून अनेक आजारांपासून आपलं संरक्षण होते

२) डोकेदुखि, किंवा मायग्रेनचा त्रास असेल तर रोज सकाळी उपाशि पोटि 4 काजू खावेत व त्यावर एक चमचा मध घ्यावं. याने हा आजार संपुष्टात येतो..

३) नैराश्य, व डिप्रेशनवर काजू रामबाण उपाय आहे.. मासिक पाळिच्या दिवसात मूडस्विंग्सच्या वेळि काजू खाल्याने चांगला फायदा होतो.. काजूमुळे मेंदुतिल सिरोटोनिनचं प्रमाण वाढतं. त्यामूळे मानसिक स्थिति सुधारते..

४) काजु डायबिटिस व डायबिटिसमूळे जडणार्या आजारांपासून दूर ठेवतं

५) काजूचं सेवन केल्याने कँन्सरच्या पेशि शरिरात पसरत नाहि. त्यामूळे लिव्हर व ब्रेस्ट कँन्सर सारखे आजार दूर राहतात..


         


६) काजूत प्रोटिन जास्त प्रमाणात असते. त्यामूळे याचे सेवन केल्यास. केस व त्वचा स्वस्थ व सुंदर राहते. पायांना भेगा पडल्या असतील तर काजूचे तेल लावून 

.. पायात मोजे घालावे. काहि दिवसातच भेगा नाहिश्या होतात.

७) काजुगर खाल्याने हिरड्यांना ताकद मिळते व दात चमकदार होतात. काजू खाल्याने कोलेस्ट्रोल नियंत्रित करण्यास मदत होते. यात प्रथिने जास्त आहे. वते लवकर पचते.

८) काजू लोहाचा चांला स्रोत मानला जातो.. म्हणून अशक्तपणा आल्यास रोज ५-६ काजूगर खावेत.. काजुमधिल, कँल्शिअम व मँग्नेशिअम आपल्या हाडांसाठि खूप फायदेशिर आहे..

९) काजूमधील पोषकतत्वांमूळे पेशिच्या डीएन एचे रक्षण होते यामूळे अनेक पेशि निरोगि राहतात. व माणूस निरोगि राहतो..

१०) आजकालच्या प्रदूषणामूळे डोळ्यांचि आग होणे, खाजवणे, द्रुष्टि मंदावणे सारखे त्रास होतात. काजूमध्ये..zea_ xanthine नावाचे एक अँटि - आँक्सिडंट असत . आपल्या डोळ्याचा रेटिना हे शोषून घेतं. याने एक पापूद्रा तयार होतो. जो संरक्षण कवचासारखं काम करतो. व डोळ्यांना UV. रेज पासून वाचवतो..

११) काजू शरिरातिल अतिरिक्त वजन घडवण्यात मदत 

 करतात. काजू शरिराचा BMI.. इंडेक्स नियंत्रणात ठेवतात.. काजूत असलेल्या ओमेगा ३ घटकामूळे शरिराच्या हालचालिला प्रोत्साहन मिळून चरबि जळते

१२) ##हार्टकरता उपयुक्त.. काजूगरात असणार्या मँग्नेशिअम, पोटँशिअम, फाँलिक अँसिड , विटामिन ई, व बी-6 मूळे रक्तातिल वाईट कोलेस्ट्रोल व triglycerides. चे प्रमाण कमी होते. व एच डि एल . वाढते. म्हणून मग रक्तदाबही नियंत्रित राहतो. त्यामूळे

... ह्रूदयवीकार, हार्ट अटँक, हाय ब्लडप्रेशर, पक्षाघात हे आजार होत नाही..

.. तेव्हा हे सगळे फायदे बघता.. आपल्या दैंनदीन जीवनात सर्व प्रकारच्या ड्रायफ्रूटला, व विशेषतः.. काजूला प्राधान्य दिले पाहिजे....


   आयुर्वेद अभ्यासक.. सुनिता सहस्रबुद्धे..

     


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*




मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 लोकार्पण कार्यक्रम

 मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 लोकार्पण कार्यक्रम

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनाशेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी उपयुक्त


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


            मुंबई, दि 25 :- “शेतकऱ्यांना दिवसाही वीज उपलब्ध होण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अतिशय उपयुक्त ठरणार असून शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठीची ही 'फ्लॅगशीप' योजना सर्व जिल्ह्यांमध्ये अतिशय प्रभावीपणे राबविण्यात यावी,” असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. नुकत्याच झालेल्या सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या एक दिवसीय परिषदेत मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना- 2.0 च्या लोकार्पणाचा कार्यक्रम झाला.


            यावेळी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करिर, अपर मुख्य सचिव दीपक कपूर, ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, प्रधान सचिव एकनाथ डवले, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे, विजय सिंगल, पी.अन्बलगन, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, तसेच विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी उपस्थित होते. यावेळी ‘मिशन- 2025’ या पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.


            उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शेती आणि शेतकरी राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी भक्कमपणे कायम उभे आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे, कारण ही स्वस्त आणि हरित ऊर्जा आहे. क्रॉस सबसिडी कमी होण्याच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रालाही ही योजना चालना देणारी ठरेल. या योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त फीडर हे सौर ऊर्जेवर आणण्यावर भर देण्यात येणार आहे. सौर ऊर्जेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणारा जिल्हा करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी प्रयत्नशील रहावे.


            या प्रकल्पांमध्ये जमिनीची उपलब्धता कालबद्ध होणे हे अत्यंत गरजेचे असल्याने यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी महावितरण सब स्टेशनच्या पाच ते दहा किलोमीटरमध्ये असणाऱ्या शासकीय व निमशासकीय जमिनींची माहिती गोळा करावी. त्यातील ज्या जमिनी प्रकल्प उभारण्यासाठी सुयोग्य असतील त्या जमिनी आवश्यक ती सगळी प्रक्रिया करून या सर्व प्रकल्पांसाठी उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देशही उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी दिले.


ग्रामपंचायती अंतर्गत विविध सुविधाही सौर ऊर्जेवर


            पुढील टप्प्यात ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या विविध सुविधा, कार्यालये पूर्णपणे सौर ऊर्जेवर करण्यावर भर देण्यात येणार आहे. सौर ऊर्जा विकासाच्या क्षेत्रात मोठे उद्योग येण्यास उत्सुक आहेत. बॅटरीवरील पंपही भविष्यात मोठे बदल घडवून आणणारे ठरतील. सर्व जिल्हाधिकारी यांनी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 योजनेचा संबंधित जिल्ह्यांत अधिकाधिक प्रचार-प्रसार करावा, असे निर्देशही उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी दिले.


            ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला प्रास्ताविकात म्हणाल्या की, वीज क्षेत्रात गेल्या दशकात मोठे बदल झाले आहेत. २०१७ मध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना नावाने भविष्याचा वेध घेणारी महत्त्वाकांक्षी योजना सुरू करण्यात आली. याद्वारे किफायतशीर सौर ऊर्जेचा फायदा औद्योगिक ग्राहकांसह शेतकऱ्यांनाही कसा करून देता येईल, याचा विचार करण्यात आला. सुरुवातीच्या काळातील या योजनेच्या अंमलबजावणीचे उत्साहवर्धक परिणाम दिसून आले आहेत.


            या योजनेद्वारे शेतकऱ्यांना दिवसा पुरवठा उपलब्ध होणार असून त्यामुळे शेतकऱ्यांचा सिंचनाच्या वेळी होणारा त्रासही कमी होणार असल्याचे श्रीमती शुक्ला यांनी सांगितले.


मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना- २.० – ‘मिशन २०२५’


            देशाने अपारंपारिक ऊर्जेच्या वापरासाठी ४५० गिगाव्हॅट क्षमता २०३० पर्यंत उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्या दृष्टीने देखील मिशन २०२५ ची अंमलबजावणी महत्त्वाची ठरेल. याद्वारे फक्त शेतीसाठी आणि एका राज्यात ७ हजार मेगावॅट पेक्षा जास्त सौर ऊर्जा निर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. इतर अनेक क्षेत्राप्रमाणे शेती क्षेत्रही विजेच्या मागणीत देशभरात अग्रेसर असून महाराष्ट्रातील सुमारे ४५ लाख शेती वीज पंपांची संख्या ही देशात सर्वाधिक आहे. राज्यातील एकूण विजेच्या वापरापैकी २२ टक्के वीज वापर शेतीसाठी होतो.


            शेतीला परवडणाऱ्या दरात वीज मिळावी यासाठी शासनाकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणात अनुदान तर दिले जातेच पण वीज वितरण कंपनीच्या इतर ग्राहकांकडून क्रॉस सबसिडी देखील दिली जाते. शेतकऱ्यांना माफक, सवलतीच्या दरात वीज पुरवठा केला जातो. भविष्यामध्ये क्रॉस सबसिडीच्या माध्यमातून शेतीचे वीजदर मर्यादित ठेवण्यावर मोठ्या प्रमाणात मर्यादा येणार आहे. त्यादृष्टीने वीज ग्राहक, शेतकरी व वीज वितरण कंपनी या सर्वांच्या हिताची अशी ही योजना आहे. शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना दिवसा अखंडीत व भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी हे अभियान आहे.


डिसेंबर २०२५ पर्यंत ३० टक्के शेतीच्या वाहिन्या सौर ऊर्जेवर


            मिशन २०२५ च्या माध्यमातून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना अजून महत्त्वाकांक्षीपणे मोठ्या प्रमाणात व वेगाने अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मिशन २०२५ द्वारे डिसेंबर २०२५ पर्यंत सर्व जिल्ह्यातील किमान ३० टक्के शेतीच्या वाहिन्या अशा प्रकल्पांद्वारे सौर ऊर्जेवर आणण्याचे उद्दिष्ट असून ‘मिशन २०२५’ द्वारे शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी अनेकविध प्रोत्साहनात्मक सुविधा देण्यात आल्या आहेत. त्यात शेतकरी व सौर उद्योग या दोघांसाठीही फायद्याच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. शेतकरी या प्रकल्पांसाठी जमीन भाड्याने द्यायला तयार आहेत. त्यांना दर हेक्टरी एक लाख २५ हजार रुपये दरवर्षी एवढा भाडेपट्टा देण्याची तरतूद आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना खात्रीच्या उत्पन्नाचा एक मार्ग उपलब्ध होऊ शकेल.


            ज्या ठिकाणी शासकीय जमिनी महावितरणच्या सब स्टेशनच्या जवळ उपलब्ध आहेत, तिथे या जमिनी सुद्धा सर्व प्रकल्पांसाठी उपलब्ध करून देण्यात येतील. त्यामुळे असे प्रकल्प मोठ्या प्रमाणात राबवणे शक्य होईल.


सौर ऊर्जेच्या संदर्भातली इकोसिस्टीम तयार होणा


            शेतकऱ्यांच्या बरोबरच उद्योजकांनीही या प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन वेगाने शेतकरी हिताचे प्रकल्प उभारावेत यासाठी प्रोत्साहन दिले जाईल. त्याचबरोबर ज्या गावांमध्ये हे प्रकल्प उभे राहतात अशा ग्रामपंचायतींना देखील पहिली तीन वर्षे पाच लाख रुपये प्रति वर्ष असे अनुदान दिले जाईल. या सर्व उपाययोजनांमुळे ग्रामीण भागामध्ये संपूर्ण सौर ऊर्जेच्या संदर्भातली इकोसिस्टीम तयार होईल. ग्रामीण युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी तयार होतील. त्यांच्यामध्ये सौर ऊर्जा संदर्भातील आवश्यक कौशल्यांचा विकास होईल.


राज्याच्या अर्थव्यवस्थेला व शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देणारे मिशन


            राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक या अभियानांतर्गत अपेक्षित आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेला व शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देणारे हे मिशन २०२५ महत्त्वाकांक्षी योजना आहे. मिशन २०२५ ची अंमलबजावणी फक्त महाराष्ट्रासाठीच नाही तर सर्व देशासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. मिशन २०२५ अंतर्गत देण्यात येणारे प्रोत्साहनात्मक अनुदान, जमिनीची उपलब्धता वाढवण्यासाठी करण्यात येणारी प्रक्रिया अशा अनेक उपाययोजना राष्ट्रीय स्तरावर देखील कुसुम योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक ठरतील. त्या दृष्टीने देखील महाराष्ट्र मिशन २०२५ ची यशस्वी अंमलबजावणी करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.


-----000-----

राज्यातील भूजल संपत्तीचे संरक्षण व संवर्धनासाठी

 राज्यातील भूजल संपत्तीचे संरक्षण व संवर्धनासाठी

राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करणार

- भूजल आयुक्त चिंतामणी जोशी.

            मुंबई, दि. २५ : भूजल पातळी वाढविण्यासाठी राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पासारख्या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करणार असल्याची माहिती भूजल आयुक्त चिंतामणी जोशी यांनी 'दिलखुलास' कार्यक्रमातून दिली आहे.


            राज्यात राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्प जागतिक बँकेच्या अर्थसहायाने २०१६ पासून राबविण्यात येत आहे. राज्यातील भूजल संपत्तीचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी हा राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्प ग्रामीण भागात राबविण्यात येत आहे. या प्रकल्पामधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल जागतिक बँकेने हैद्राबाद येथे झालेल्या कार्यक्रमात राज्याचे भूजल आयुक्त चिंतामणी जोशी यांचा नुकताच सन्मानचिन्ह देऊन गौरवही केला आहे. हा प्रकल्प आणि त्यातून मिळालेले शाश्वत यश याबाबत. ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून भूजल आयुक्त चिंतामणी जोशी यांनी सविस्तर माहिती दिली आहे.


            माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमातून ही मुलाखत बुधवार दि.26, गुरुवार दि.27, शुक्रवार दि. 28 एप्रिल 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयाआर' या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. ही मुलाखत निवेदक शिबानी जोशी यांनी घेतली आहे.


०००

पहिले पाऊल' शाळास्तर उपक्रमाचा प्रारंभ प्रत्येक मूल येणार शिक्षण प्रवाहात

 पहिले पाऊल' शाळास्तर उपक्रमाचा प्रारंभ प्रत्येक मूल येणार शिक्षण प्रवाहात

- शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर

            मुंबई, दि. २५ : महाराष्ट्राला शिक्षणाची प्रदीर्घ आणि आदर्श परंपरा आहे. स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचे कार्य 'पहिले पाऊल' या उपक्रमातून घरोघरी पोहचविण्यात येणार आहे. या उपक्रमातून प्रत्येक मूल शिक्षणाच्या प्रवाहात येईल, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.


            महाराष्ट्र शासन व बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आणि प्रादेशिक विद्या प्राधिकरण (मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व 'स्टार्स' प्रकल्प अंतर्गत शाळापूर्व तयारी अभियान-२०२३ 'पहिले पाऊल' शाळास्तर उद्घाटन मेळावा आज (दिनांक २५ एप्रिल २०२३) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वरळी सी फेस शाळेमध्ये पार पडला. यानिमित्ताने सदर उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झाला आहे. या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी श्री. केसरकर बोलत होते.


            शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सहआयुक्त (शिक्षण) अजित कुंभार, अभिनेते सचिन खेडेकर, अभिनेत्री श्रीमती निशिगंधा वाड, मुंबई शिक्षण विभागाचे उपसंचालक संदीप संगवे, प्रादेशिक विद्या प्राधिकरण उपसंचालक श्रीमती मनीषा पवार, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी राजू तडवी, उपशिक्षणाधिकारी श्रीमती मालती टोणपे, प्रथम संस्थेच्या सचिव श्रीमती फरिदा लांबे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. 


            श्री.केसरकर म्हणाले की, मातृभाषेचा सतत अभिमान बाळगायला हवा. ज्या देशांनी मातृभाषेचे महत्त्व वेळीच ओळखले त्या देशांनी प्रगती केली. त्यामुळे आपण आपली मातृभाषा म्हणजेच माय मराठीतूनच शिक्षण घ्यायला हवे. रशिया, फ्रान्स, जर्मनी, इस्त्राइल या देशांनी वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगती केली. कारण त्यांनी प्रत्येक टप्प्यावर मातृभाषेचा आग्रह धरला. इंग्रजी ही केवळ आंतरराष्ट्रीय संवाद साधण्याची भाषा आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून मराठीतून अभियांत्रिकी, वैद्यकीय हे अभ्यासक्रम इंग्रजीसह त्या राज्याच्या मातृभाषेतूनही शिकविले जाणार आहेत. त्यामुळे मुलांमध्ये आतापासूनच आपल्या मातृभाषेविषयी प्रेम निर्माण करा, असे आवाहनही श्री. केसरकर यांनी केले.


व्यावसायिक शिक्षणाचे सांगितले महत्त्व


            भारत हा तरूणांचा देश आहे. आपल्या देशातील तरूणांना स्वावलंबी करण्यासाठी व्यावसायिक शिक्षण मोलाचे आहे. त्यामुळे येणारी पिढी ही तंत्रकुशल असायला हवी, यासाठी केंद्र आणि राज्य शासनाचे प्रयत्न सुरू असल्याचे मंत्री श्री.केसरकर यांनी सांगितले. राज्य शासन तरूणांना रोजगार मिळावा, यासाठीच्या उपक्रमाची त्यांनी माहिती दिली. येत्या शैक्षणिक वर्षापासून पहिली ते आठवीच्या सर्व मुलांना गणवेश, बूट-मोजे, वह्या-पुस्तके शासनामार्फत दिली जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.


            शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांनी शाळाबाह्य मुले शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी या उपक्रमाची मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. तसेच शिक्षणाचा पाया मजबूत होण्यासाठी हा उपक्रम मोलाचा ठरणार असल्याचेही ते म्हणाले.


'पहिले पाऊल' ठरणार ऐतिहासिक पाऊल


            शिक्षण विभागातील 'पहिले पाऊल' हा उपक्रम ऐतिहासिक पाऊल ठरणार असल्याचे सांगून मुलांसाठी प्रशासनाने सुरू केलेली ही पूर्वतयारी त्यांच्या भविष्यासाठी नक्कीच फलदायी ठरणार असा विश्वास अभिनेते सचिन खेडेकर यांनी व्यक्त केला. 'पहिले पाऊल' या उपक्रमात खारीचा वाटा उचलण्याची अभिनेत्री निशिगंधा वाड यांनी तयारी दर्शविल्याने मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले.


            प्रकल्प संचालक कैलास पगारे यांनी प्रास्ताविकातून उपक्रमाची माहिती दिली. येत्या २७ एप्रिल रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात असाच कार्यक्रम होणार असल्याचेही ते म्हणाले.


            यावेळी मान्यवरांनी उपस्थित चिमुकल्यांशी संवाद साधला. सेल्फी घेताना श्री. केसरकर यांनी चिमुकल्यांना उचलून घेतले. त्यामुळे लहानग्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. मान्यवरांनी पहिलीच्या वर्गात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या प्रवेशपात्र मुलांच्या क्षमतांची तपासणी करण्यासाठी मांडण्यात आलेल्या विविध संचांना भेट दिली. शाळेच्या मुख्याध्यापक श्रीमती निशा म्हात्रे यांनी संयोजन केले. किसन पावडे यांनी सूत्रसंचालन केले.


00000

Featured post

Lakshvedhi