Wednesday, 26 April 2023

राज्यातील भूजल संपत्तीचे संरक्षण व संवर्धनासाठी

 राज्यातील भूजल संपत्तीचे संरक्षण व संवर्धनासाठी

राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करणार

- भूजल आयुक्त चिंतामणी जोशी.

            मुंबई, दि. २५ : भूजल पातळी वाढविण्यासाठी राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पासारख्या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करणार असल्याची माहिती भूजल आयुक्त चिंतामणी जोशी यांनी 'दिलखुलास' कार्यक्रमातून दिली आहे.


            राज्यात राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्प जागतिक बँकेच्या अर्थसहायाने २०१६ पासून राबविण्यात येत आहे. राज्यातील भूजल संपत्तीचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी हा राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्प ग्रामीण भागात राबविण्यात येत आहे. या प्रकल्पामधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल जागतिक बँकेने हैद्राबाद येथे झालेल्या कार्यक्रमात राज्याचे भूजल आयुक्त चिंतामणी जोशी यांचा नुकताच सन्मानचिन्ह देऊन गौरवही केला आहे. हा प्रकल्प आणि त्यातून मिळालेले शाश्वत यश याबाबत. ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून भूजल आयुक्त चिंतामणी जोशी यांनी सविस्तर माहिती दिली आहे.


            माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमातून ही मुलाखत बुधवार दि.26, गुरुवार दि.27, शुक्रवार दि. 28 एप्रिल 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयाआर' या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. ही मुलाखत निवेदक शिबानी जोशी यांनी घेतली आहे.


०००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi