Friday, 21 April 2023

नाशिकवासियांच्या आरोग्य सुविधांमध्ये भर ;

 नाशिकवासियांच्या आरोग्य सुविधांमध्ये भर ;


नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जमीन हस्तांतरणास शासनाची मंजुरी


- मंत्री दादाजी भुसे


            मुंबई, दि. २० : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित ४३० रुग्णखाटांचे रुग्णालय स्थापन करण्यास शासन मान्यता देण्यात आलेली आहे. या नवीन महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयांच्या विस्तारीकरणांसाठी मौजे म्हसरुळ ता.जि. नाशिक येथील सर्व्हे नं. क्र. २५७ क्षेत्र १४.०० हे. आर. जागा उपलब्ध करुन देण्यात आली असल्याची माहिती बंदरे व खनिकर्म मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिली. याबाबत शासन ज्ञापन गुरुवारी दि. २० एप्रिल २०२३ रोजी काढण्यात आले आहे.


            महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे विद्यापिठाची स्वतःची पदवी व पदव्युत्तर संस्था सुरु करण्यासाठी दि. ०५ एप्रिल २०२१ रोजीच्या शासनाने मान्यता दिली होती. तसेच पदवी अभ्यासक्रमासाठीच्या पायाभूत सुविधांच्या आधारावर अत्याधुनिक अतिविशेषोपचार आरोग्य सेवा व संशोधनास चालना देण्यासाठी "महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था स्थापन करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्यामुळे या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास मान्यता मिळाली आहे. त्यामुळे नाशिकवासियांच्या आरोग्य सुविधांमध्ये भर पडणार असून उत्तर महाराष्ट्राचे वैद्यकीय महाविद्यालय, पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था यांचे स्वप्न साकार होणार असल्याचे मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.


            लवकरच नवीन शासकीय महाविद्यालयाचे भूमिपूजन होणार असल्याची माहिती मंत्री श्री. भुसे यांनी दिली.

कामगारांच्या सामाजिक सुरक्षेसाठी एल-20 उपयुक्त

 कामगारांच्या सामाजिक सुरक्षेसाठी एल-20 उपयुक्त

- कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे.

            मुंबई, दि. २० : कामगार ही एक मोठी ताकद असून त्यांना सामाजिक सुरक्षा मिळाली पाहिजे. त्यादृष्टीने जी 20 परिषदेच्या अंतर्गत असलेले एल 20 हे उपयुक्त माध्यम असल्याचे कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी सांगितले.


            परेल येथील नारायण मेघाजी लोखंडे विज्ञान संस्थेत आयोजित लेबर - 20 च्या प्रास्ताविक बैठकीत मंत्री श्री.खाडे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कामगार आयुक्त संतोष देशमुख, मजदूर संघाचे माजी अध्यक्ष सी. के. साजीनारायण, अनिल डुमणे, श्री.येलोरे, बापू दरड, इतर संबंधित उपस्थित होते.


            मंत्री श्री.खाडे म्हणाले की, यावर्षी जी-20 चे अध्यक्षपद भारताला मिळणे ही आनंदाची गोष्ट आहे. जी 20 च्या निमित्ताने 20 विविध क्षेत्रातील गटांची निर्मिती केलेली असून त्यात उद्योग, विज्ञान, स्टार्ट-अप, शेती, वैचारिक, शिक्षण, आरोग्य, ऊर्जा, युवा असे वेगवेगळे गट आहेत. यातील लेबर-20 हा एक गट आहे. हा जी-20 च्या सदस्य देशांतील कामगार या विषयाचा गट आहे. या गटात सदस्य देशातील कामगार संघटनेचे प्रतिनिधी एकत्र येवून विविध कामगार विषयावर चर्चा करतात, त्यावर एकमत करून ते विषय सदस्य देशांनी आपल्या देशामध्ये राबवावे असे अपेक्षित आहे.


            एल 20 ने सामाजिक सुरक्षा आणि महिलांचे भविष्यातील कामाचे स्वरूप, सहभाग, कामाच्या ठिकाणी वातावरण, गुणवत्ता वाढ हे विषय निवडलेले आहे. जे कामगारांना अधिक सुविधायुक्त आणि त्यांच्या सामाजिक सुरक्षेची व्याप्ती वाढवणारे वातावरण उपलब्ध करून देण्यासाठीच्या महत्वपूर्ण सुधारणा सुचवले, असे श्री.खाडे म्हणाले.


             महिला या कौशल्यपूर्ण, वेळेत काम करण्याची क्षमता असलेल्या समाजातील महत्त्वाचा घटक असून त्यांच्या अधिकारांसाठी देखील एल 20 निश्चितच उपयुक्त ठरेल. कामगारांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळावा, यासाठी शासन प्रयत्नशील असून माथाडी कामगारांना मूलभूत सोयीसुविधा कामाच्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यासंदर्भात रेल्वे प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. तसेच सुरक्षा रक्षकांच्या वेतनात वाढ करण्याचाही निर्णय विभागाने घेतला असल्याचे श्री.खाडे यांनी सांगितले.


            कामगार आयुक्त संतोष देशमुख म्हणाले की, कामगार विषयाशी संबंधित एल 20 याची व्याप्ती मोठी आहे. शासन, प्रशासन आणि कामगार संघटना यांच्या सर्वांच्या एकत्रित सहकार्याने ही संकल्पना यशस्वी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


            सी. के. साजीनारायण म्हणाले की, जागतिक स्तरावर महत्त्वाचे स्थान असलेल्या जी 20 चे यजमान पद भारताला मिळाले ही अभिमानास्पद बाब आहे. त्याअंतर्गत एल 20 च्या माध्यमातून कामगार क्षेत्रात भरीव स्वरूपात सकारात्मक बदल घडवून अधिक चांगल्या पद्धतीने कामगारांसाठी कल्याणकारी कामे करण्याची संधी मिळाली आहे.


            कार्यक्रमास विविध उद्योग, कामगार संघटनांचे प्रतिनिधी, संबंधित उपस्थित होते.

मराठी विषय वगळण्यात आलेला नाही;यावर्षीच्या आठवीच्या विद्यार्थ्यांना दहावीपर्यंत गुणांकनाची सवलत.

 मराठी विषय वगळण्यात आलेला नाही;यावर्षीच्या आठवीच्या विद्यार्थ्यांना दहावीपर्यंत गुणांकनाची सवलत.

उष्णतेची तीव्रता लक्षात घेता राज्य मंडळाच्या शाळांना उद्यापासून सुटी


- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर.

            मुंबई, ता. २० : राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी विषय हा सक्तीचा करण्यात आला आहे. केवळ केंद्रीय मंडळाच्या शाळांमध्ये आठवीच्या यावर्षीच्या वर्गालाच (बॅच) गुणांकनाची सवलत देण्यात आली आहे. मराठी विषय वगळण्यात आलेला नाही, असे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केले. उष्णतेची तीव्रता लक्षात घेता राज्य मंडळाच्या शाळांना उद्यापासून सुटी जाहीर करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.


            मंत्री श्री.केसरकर म्हणाले, मराठी भाषा सक्ती ही इयत्ता सहावी पासून करण्यात आली आहे. तथापि कोरानाचा काळ असल्याने यावर्षी आठवीत शिकत असलेले विद्यार्थी मराठी भाषा विषय पहिल्यांदाच शिकत आहेत. त्यामुळे 2022-23 च्या आठवीच्या विद्यार्थ्यांना 2024-25 या वर्षी दहावी पर्यंत एक वेळची बाब म्हणून मराठी विषयाच्या परीक्षेचे श्रेणीमध्ये रूपांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


उद्यापासून सुटी जाहीर


            यापूर्वीच जाहीर केल्याप्रमाणे पुढील शैक्षणिक वर्ष 15 जून पासून तर विदर्भातील शाळा 30 जून पासून सुरू होतील. तथापि सध्या असलेली उष्णतेची तीव्रता लक्षात घेता राज्य मंडळाच्या शाळांना उद्यापासून सुटी देण्यात येत आहे. सुटीच्या कालावधीत ज्या शाळांना अतिरिक्त उपक्रम राबवायचे असतील त्यांनी ते सकाळच्या अथवा संध्याकाळच्या सत्रात घ्यावेत. तथापि यासाठी नववी अथवा दहावीचे विद्यार्थी वगळता इतर वर्गातील विद्यार्थ्यांना बोलावण्यात येऊ नये. इतर विद्यार्थ्यांना अभ्यासाचा बोजा न देता सुटीचा आनंद उपभोगू द्यावा, असेही श्री.केसरकर यांनी स्पष्ट केले.


000



 

मुंबईसह राज्याच्या सर्वांगीण विकासाचा अजेंडा ;देशातील सर्वाधिक पायाभूत सुविधा प्रकल्प

 मुंबईसह राज्याच्या सर्वांगीण विकासाचा अजेंडा ;देशातील सर्वाधिक पायाभूत सुविधा प्रकल्प महाराष्ट्रात सुरु


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


            मुंबई, दि. २० : मुंबईसह राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्यात येत आहे. देशातील सर्वाधिक पायाभूत प्रकल्प महाराष्ट्रात सुरु असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दिली.


            लोकशाही मराठी या वृत्तवाहिनीद्वारे आयोजित ‘लोकशाही संवाद २०२३’ या विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. लोकशाही मराठी वृतवाहिनीचे संपादक कमलेश सुतार यांनी या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांशी राज्यातील विविध विषयांवर संवाद साधला.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, आमचं सरकार आल्यापासून प्रलंबित कामे मार्गी लावले. पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती दिली. समृद्धी महामार्ग, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, मेट्रो प्रकल्पांना चालना दिली. मेट्रो कारशेडच्या प्रकल्पास मार्गी लावले. मेट्रोचे जाळे पूर्ण झाल्यानंतर रस्त्यावरील लाखो खासगी वाहने कमी होतील. परिणामी लोकांचा वेळ, खर्च वाचेल आणि प्रदूषण कमी होईल. राज्यातील विकास प्रकल्प पूर्ण करीत आहोत.


पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांना फायदा


            पायाभूत सुविधा प्रकल्प मुंबई आणि आजूबाजूलाच का आणि त्याचा शेतकरी आणि सर्वसामान्यांना फायदा काय असा प्रश्न उपस्थित केला असता त्यावर उत्तर देतांना मुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील चार नोड्सला जोडणारा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग सुरु केला आहे. या महामार्गामुळे नागपूरचा संत्रा उत्पादक शेतकरी कमी वेळेत थेट मुंबईच्या बाजारपेठेत आपला माल आणू शकणार आहे. समृद्धी महामार्ग हा गेमचेंजर प्रकल्प आहे. या भागातील कृषी उत्पादनावर प्रक्रियेसाठी उद्योग, कृषी प्रक्रिया प्रकल्प, लॅाजिस्टीक पार्क अशा विविध सुविधा उभारल्या जात असून त्यातून मोठी साखळी तयार होत आहे.त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल, रोजगार वाढेल.


एमटीएचएल प्रकल्प वरळी, कोस्टल रोडला जोडणार


            राज्यात ५ हजार किलोमीटरचे रस्ते तयार केले जात असून त्याचा विकास आराखडा तयार करीत आहोत. रस्त्यांचे जाळे निर्माण केले जात आहे. मुंबईपुरताच नव्हेतर संपूर्ण महाराष्ट्राचा सर्वसमावेशक विकास करण्याचे काम हाती घेतले आहे. त्याचा शेतकरी, सर्वसामान्यांना फायदा होणार आहे. सर्वाधिक पायाभूत सुविधांचे प्रकल्प सुरु करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.एमटीएचएल प्रकल्प वरळी आणि कोस्टल रोडला जोडणार आहोत, त्यामुळे नरिमन पॉईंट येथून चिर्ले, रायगडजवळ दोन तास नव्हेतर फक्त १५ मिनिटात पोहोचता येणार आहे.


दुष्काळग्रस्त १४ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २१ हजार रुपये मिळणार


            मुख्यमंत्री म्हणाले, शेतकरी, बळीराजाला केंद्रबिंदू माणून राज्य शासन काम करत आहे. नैसर्गिक आपत्ती काळातील नुकसानग्रस्तांना एनडीआरएफचे २ हेक्टरचे निकष बदलून ३ हेक्टर केले आणि शेतकरी आपत्तीग्रस्तांना मदत दिली. नियमित कर्जफेड करणाऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान दिले. शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये देण्याच्या केंद्र सरकारच्या योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने नमो सन्मान योजना सुरु केली. त्यातून शेतकऱ्यांना राज्याकडून ६ हजार रुपये समाविष्ट केले. यासह १४ दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील प्रती व्यक्ती १८०० रुपये दिले जाणार असून एका कुटुंबात पाच व्यक्ती असल्यास त्यांना केंद्र व राज्य शासनाचे मिळून एकूण २१ हजार रुपये शेतकऱ्याला मिळणार आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

६ लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एका क्लिकवर पैसे


            शासकीय योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याबाबत उपस्थित प्रश्नाला उत्तर देतांना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, राज्यातील ६ लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकाच क्लिकवर एकाच दिवशी पैसे पाठविण्यात आले. आनंदाचा शिधा’ ने गोरगरिबांची दिवाळी, पाडवा गोड केला. हा शिधा वाटप कार्यक्रम डॅा. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपर्यंत राबविला. राज्यात ७५ हजार पदांची भरती प्रक्रिया सुरु आहे. लोकहिताचा निर्णय घेतले जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.


राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारचा पाठिंबा


            राज्यातील महिला व ज्येष्ठ नागरिकांना सोयीसुविधा दिल्या जात आहेत. केंद्राकडून राज्यातील प्रकल्पांसाठी कोट्यवधी रुपयांची मदत मिळत आहे. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारचा पाठिंबा मिळत आहे. राज्याचा सर्वांगीण विकास हाच राज्य शासनाचा अजेंडा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.


            मुख्यमंत्री पुढे म्हणाले, १ लाख ३७ हजार कोटींचे गुंतवणूक करार करण्यात आले आहेत. या करारांपैकी २५ टक्के उद्योगांना जमिनी देण्याची प्रक्रिया सुरु आहेत. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून सुमारे ५० कोटी रुपयांचा निधी वाटप करण्यात आला असून गरजू लोकांना वेळेत मदत पोहचवण्याच काम राज्य सरकारने केले आहे, अशी माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.


0000

पुढील उष्णतेच्या लाटेसाठी *तयार रहा*40 ते 50 डिग्री सेल्सिअस दरम्यान.* नेहमी खोलीच्या तापमानाचे पाणी हळूहळू प्या.

 *पुढील उष्णतेच्या लाटेसाठी *तयार रहा*40 ते 50 डिग्री सेल्सिअस दरम्यान.* नेहमी खोलीच्या तापमानाचे पाणी हळूहळू प्या.

 थंड किंवा बर्फाचे पाणी पिणे टाळा!


 सध्या, मलेशिया, इंडोनेशिया, सिंगापूर आणि इतर देश "उष्णतेची लाट" अनुभवत आहेत.


 ``हे करा आणि करू नका:```


   1. *तापमान ४० डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचल्यावर खूप थंड पाणी न पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात, कारण आपल्या लहान रक्तवाहिन्या फुटू शकतात.*


 अशी बातमी आली की एका डॉक्टरचा मित्र खूप उष्ण दिवसातून घरी आला होता - त्याला खूप घाम येत होता आणि त्याला स्वतःला लवकर थंड करायचे होते - त्याने ताबडतोब आपले पाय थंड पाण्याने धुतले... अचानक, तो कोसळला आणि त्याला रुग्णालयात नेण्यात आले.


   2. जेव्हा घराबाहेर उष्णता 38 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचते आणि घरी आल्यावर थंड पाणी पिऊ नका - फक्त कोमट पाणी हळूहळू प्या.


 कडक उन्हात हात किंवा पाय लगेच धुवू नका. धुण्याआधी किंवा आंघोळ करण्यापूर्वी किमान अर्धा तास प्रतीक्षा करा.


   3. कोणीतरी उष्णतेपासून थंड होऊ इच्छित होता आणि लगेचच शॉवर घेतला. आंघोळीनंतर, व्यक्तीला ताठ जबडा आणि स्ट्रोकसह रुग्णालयात नेण्यात आले.


 *कृपया लक्षात ठेवा:*

 उष्णतेच्या महिन्यांत किंवा तुम्ही खूप थकले असाल तर लगेचच खूप थंड पाणी पिणे टाळा, कारण यामुळे शिरा किंवा रक्तवाहिन्या अरुंद होऊ शकतात, ज्यामुळे पक्षाघाताचा झटका येऊ शकतो.


 *कृपया चेतावणी इतरांपर्यंत पसरवा! *

Thursday, 20 April 2023

"या" बियांचा आहारात समावेश केल्याने राहाल आयुष्यभर फिट.

 "या" बियांचा आहारात समावेश केल्याने राहाल आयुष्यभर फिट...

विविध प्रकारच्या धान्यांच्या, भाज्यांच्या बिया पोषणमूल्यांनी समृद्ध असतात. यामध्ये आरोग्यदायी मोनोसॅच्युरेटेड फॅट्स, पॉलिसॅच्युरेटेड फॅट्स, जीवनसत्त्वे, क्षार, अँटीऑक्सिडेंट्स असतात.


जवसाच्या बिया : या बियांमध्ये प्रथिने, ब १ जीवनसत्त्व, ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड्स, झिंक, मॅग्नेशियम, कॉपर हे क्षार असतात. दोन टेबलस्पून जवसाच्या बियांमध्ये ६ ग्रॅम फायबर आणि ४ ग्रॅम प्रथिने असतात.


शेंगदाणे : शेंगदाण्यांमध्ये प्रथिने आणि शरीराला आवश्यक असणारी फॅट्स भरपूर प्रमाणात असतात. कच्चे, भाजलेले खारे शेंगदाणे किंवा गूळ-शेंगदाण्याचा लाडू, शेंगदाण्याचा कूट, चिक्की अशा कोणत्याही प्रकारात शेंगदाणे खाता येतात.मात्र, पचायला जड असल्याने शेंगदाणे प्रमाणातच खावेत.


हळीव : १०० ग्रॅम हळिवांत तब्बल १०० मिलिग्रॅम आयर्न असते. तसेच लोह, कॅल्शियम, फॉलेट, बेटाकेरोटीन, क जीवनसत्त्व व टोकोफेरॉक हे पोषक घटक असतात. रज:स्रव नियमित करण्यात मदत करते. यात अँटिऑक्सिडंट्स व रक्तशुद्धी करणारे घटक असतात. अंकुरलेले हळीव सलाडमध्ये घालून घेतल्यास ते डोळ्यांसाठी हितकर आहेत. हळिवांतील चिकट गुणधर्मामुळे मलाविरोधाची तक्रार कमी होते. हळिवाच्या गॉयट्रोजेनिक गुणधर्मामुळे हायपोथायरॉईडचा त्रास असणा-यांनी या बियांचे पदार्थ खाऊ नयेत.


काळे आणि पांढरे तीळ : तीळ बुद्धी वाढवितात, दातांसाठी हितकर असतात, वर्ण उजळवतात, व्रण भरून येण्यासाठी हितकर असतात, वाताला कमी करतात व कफ वाढवितात. तसेच, मूळव्याधीवर गुणकारी, हाडांच्या मजबुतीसाठी उपयुक्त आहेत. वजन वाढविणा-या आणि कमी करू इच्छिणा-या अशा दोघांनीही तीळ खाणे हितकारक आहे. काळ्या तिळांत औषधी गुणधर्म असतात.


भोपळ्याच्या बिया : यामध्ये ई जीवनसत्त्व, झिंक, मँगेनीज, फॉस्फरस, मोनोसॅच्युरेटेड फॅट्स, ओमेगा ६ फॅटी अ‍ॅसिड्स असतात, हृदयविकार, मधुमेहींसाठीही भोपळ्याच्या बिया उपयुक्त आहेत. सर्व प्रकारचे कॅन्सर्स, विशेषत: प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी होतो. यासाठी रोज दोन ते चार चमचे भोपळ्याच्या भाजलेल्या बिया खाल्ल्याच पाहिजेत.


सूर्यफूलाच्या बिया : सूर्यफुलात ई जीवनसत्त्व, कॅल्शियम, अँटी ऑक्सिडेंट्स मोठय़ा प्रमाणात असतात. या बिया पोषणमूल्यांनी अत्यंत समृद्ध आहेत. या बियांमधील फायटोसस्टेरॉल घटकामुळे कोलेस्टेरॉल कमी व्हायला मदत होते. रोगप्रतिकार शक्ती वाढवतात. केसांची मुळे घट्ट होतात. मासिक पाळीच्या वेळी होणारी चिडचिड, मूड स्विंग, पोटदुखी आदी त्रास कमी होतात.


खसखस : या काहीशी मातकट चव लागणा-या बिया पोषणमूल्यांनी समृद्ध असतात. यातून कॅल्शियम, लोह, प्रथिनेही मिळतात. यात प्रति औंस ६ ग्रॅम फायबर्स असतात. यामुळे पचनक्रिया सुधारते. यामध्ये औषधी गुणधर्मही आहेत. पोटदुखी, उलटीच्या समस्येवर गुणकारी आहेत.


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



संसदीय आयुधे, समिती पद्धत, विधेयके या विषयांवर विधानपरिषद सदस्यांसाठी २५ एप्रिलला कृतीसत्र

 संसदीय आयुधेसमिती पद्धतविधेयके या विषयांवर

विधानपरिषद सदस्यांसाठी २५ एप्रिलला कृतीसत्र

 

            मुंबईदि. २० : महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे विधिमंडळ सदस्यांसाठी विविध प्रबोधनात्मक आणि प्रशिक्षणात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. याच मालिकेत विधानपरिषद सदस्यांसाठी एकदिवसीय कृतीसत्राचे आयोजन विधानपरिषदेच्या उप सभापती मा.डॉ. नीलमताई गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारदिनांक २५ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ११.०० ते ५.०० यावेळेत विधान भवनमुंबई येथे करण्यात आले आहे. या कृतीसत्रात विविध संसदीय आयुधेसम पध्दतविधेयके या विषयांवर तीन सत्रे होतील.

            या कृतीसत्राचे उद्घाटन विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकरविधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते तसेच संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटीलविधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेविधानपरिषद सदस्य तथा माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकरविधानपरिषद सदस्य सर्वश्री प्रविण दरेकरॲड. अनिल परबशशिकांत शिंदेजयंत पाटील, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत  यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

            या कृतीसत्रासाठी वक्ते म्हणून महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय (विविध संसदीय आयुधे) सेवानिवृत्त प्रधान सचिव डॉ. अनंत कळसेमहाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय (समिती पध्दत) सह सचिव डॉ. विलास आठवले व महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय (विधेयके) सेवानिवृत्त प्रधान सचिव विलास पाटील हे उपस्थित राहणार आहेत. प्रत्येक सत्राचे अध्यक्षस्थान अनुक्रमे विधानपरिषद सदस्य अशोक ऊर्फ भाई जगतापकपिल पाटील आणि एकनाथराव खडसे - पाटील हे भूषवतील.

            विधानपरिषद सदस्यांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र विधानमंडळाचे प्रधान सचिव श्री. राजेन्द्र भागवत यांनी केले आहे.

Featured post

Lakshvedhi