सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Saturday, 15 April 2023
साखरेचं खाणार त्याला
साखरेचं खाणार त्याला
*महत्त्वाचे 👉मधुमेह झाल्यानंतर मला आयुष्यभर गोळ्या खाव्या लागतील आता मी केव्हाही बरा होऊ शकत नाही अशी मानसिकता ठेवणे ही आपली सर्वात मोठी चूक आहे, कारण मधुमेह बरा होऊ शकतो आणि आपण मधुमेह मुक्त जीवन जगू शकतो, कोणत्याही आजाराला बरा करण्यासाठी तुमचा सकारात्मक विचार असणे खूप गरजेचे आहे, लोक सकारात्मक विचार करून कॅन्सर सारख्या महा भयानक आजाराला बरा करू शकतात तर मधुमेह सारख्या छोट्या आजाराला पण बरा केला जाऊ शकतो, मी मधुमेह मुक्त जीवन जगू शकतो अशी विचारधारा बनवणे खूप गरजेचे आहे,*
*👉सातूच्या पिठापासून बनवलेले कोणतेही पदार्थ खावावे*
*👉 नाचणी पदार्थ खावावे*
*👉मोड आलेली कडधान्य जास्तीत जास्त खावावी*
*👉ताकाचा वापर जास्तीत जास्त करावा, दुपारच्या वेळेत*
*👉लसूण,कांदा, आलं, हळद यांचा जेवणामध्ये जास्त वापर करावा*
*👉भाजीमध्ये जास्तीत जास्त कारलं, शेवगा,पडवळ, घोळ, मेथी यांचा वापर करावा*
*👉जर आपण मांसाहार करत असाल तर कोंबड्याचं व बकऱ्याचे मटण खावावे*
*👉कमी पिकलेली केळी आणि खजूर खावावे*
*👉जेवणा आधी,देशी टोमॅटो जास्तीत जास्त खावावे व ग्रीन सलाड चा पण वापर करावा*
*👉रोज संध्याकाळी देशी हळद एक चमचा अर्धा ग्लास दुधातून घ्यावे*
*⭕️योगा आणि व्यायाम⭕️*
*जर आपल्याला मधुमेह मुक्त जीवन जगायचे असेल, अनुलोम, विलोम, कपालभाती, मुद्रासन आणि कमीत कमी दोन किलोमीटर चालणे गरजेचे आहे*
*👉हे सर्व आपण यूट्यूब च्या माध्यमातून शिकू शकता*
संपर्क :-
*रशीद नायकवडी*
*(विस्तार अधिकारी) समर्थ सोशल फाउंडेशन व जनरल हॉस्पिटल कोल्हापूर*
*7875481853*
उष्णता वाढतेय काळजी घ्या - -
*उष्णता वाढतेय काळजी घ्या - - - - -*
शरीरातील पाणी वाढवा - उष्णतेमुळे शरीरातील पाणी झपाट्याने कमी होते.म्हणून काळजी घ्या. नाहीतर उष्णतेचे अनेक विकार सुरू होतील.
उपाय ---
१) नियमित प्राणायाम करा. उष्णतेचा त्रास केव्हाच होणार नाही.
२) अनुलोम विलोम जास्तच करा. शरीराचे तापमान स्थीर राहिल.
३) उजवी नाकपुडी बंद करून डावी नाकपुडी जास्तच वेळ चालू ठेवा. कारण ती चंद्रनाडी आहे. त्यामुळे शरीरात गारवा तयार होईल.
४) उजव्याच कुशीवर जास्तवेळ झोपा. त्यामुळे डावी नाकपुडी आपोआप जास्त वेळ चालू राहील.
५) हलकाच आहार घ्या. पोट साफ ठेवा. पित्त वाढवू नका.
६) माठातीलच थंड पाणी अगर कोमट पाणी बसून सावकाश चवीचवीने प्या. घटाघटा नाही.
७) पेयामध्ये बर्फ वापरू नका. बर्फ गरम आहे.
८) आवळा / कोकम / लिंबू / मठ्ठा / ताक इ. सरबत जरूर प्या.
९) सकाळी ऊठल्यावर लगेच १ ते २ ग्लास कोमट पाणी प्या.
१०) प्रत्येक काम सावकाशच करा.
११) जेवतेवेळी मधे मधे १/२ वेळा थोडे पाणी प्यावे.
१२) ऊन्हातून आल्यावर गुळ पाणी पिणे.
१३) खडीसाखर सोबतच ठेवून थोडी थोडी खाणे.
१४) जिरेपूड १ चमचा + खडीसाखर १ चमचा व १ ग्लास ताकातून रोज पिणे. उष्णता वाढणार नाही.
१५) दुपारच्या जेवणात रोज पांढरा कांदा जरूर खाणे.
१६) रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेल तळपायांना चोळणे व बेंबीत घालणे. तसेच देशी गाईचे तुप नाकात लावणे.
१७) उन्हापासून शरीराचे रक्षण करा. कॅप, छत्री, गाॅगल वापरा.
# आरोग्य संदेश #
पाणी प्यावे आवडीने,
आजार पळवा सवडीने.
: *उन्हाळ्यात तब्येत सांभाळा..!!*
❄ *उष्ण व थंड पदार्थ* ❄
कलिंगड - थंड
सफरचंद - थंड
चिकू - थंड
संत्री - उष्ण
आंबा - उष्ण
लिंबू - थंड
कांदा - थंड
आलं/लसूण - उष्ण
काकडी - थंड
बटाटा - उष्ण
पालक - थंड
टॉमेटो कच्चा - थंड
कारले - उष्ण
कोबी - थंड
गाजर - थंड
मुळा - थंड
मिरची - उष्ण
मका - उष्ण
मेथी - उष्ण
कोथिंबीर/पुदिना - थंड
वांगे - उष्ण
गवार - उष्ण
भेंडी साधी भाजी - थंड
बीट - थंड
बडीशेप - थंड
वेलची - थंड
पपई - उष्ण
अननस - उष्ण
डाळींब - थंड
ऊसाचा रस बर्फ न घालता - थंड
नारळ(शहाळ) पाणी - थंड
मध - उष्ण
पंचामृत (दही, दूध, तूप, मध, साखर) - थंड
मीठ - थंड
मूग डाळ - थंड
तूर डाळ - उष्ण
चणा डाळ - उष्ण
गुळ - उष्ण
तिळ - उष्ण
शेंगदाणे,बदाम,काजू,अक्रोड,खजूर - उष्ण
हळद - उष्ण
चहा - उष्ण
कॉफी - थंड
पनीर - उष्ण
शेवगा उकडलेला - थंड
ज्वारी - थंड
बाजरी/नाचणी -उष्ण
आईस्क्रीम - उष्ण
श्रीखंड/आम्रखंड - उष्ण
दूध,दहही,तूप,ताक (फ्रिज मधले नाही) - थंड
फ्रिज मधले सगळे पदार्थ -उष्ण
फ्रिज मधिल पाणी - उष्ण
माठातील पाणी - थंड
एरंडेल तेल - अती थंड
तुळस - थंड
तुळशीचे बी - उत्तम थंड
सब्जा बी - उत्तम थंड
नीरा - थंड
मनुका - थंड
पाव/खारी/ बिस्कीट -उष्ण
हॉट ड्रिंक सर्व - उष्ण
कोल्डरिंग सर्व - उष्ण
मास/चिकन/मटण- उष्ण
अंडी (फक्त उकडलेल पांढरे) - थंड
*उन्हाळ्यात नैसर्गिक रित्या थंड पदार्थ जास्त खाल्ल्यास गरमीपासून शरीरास होणारा त्रास कमी होतो .*
_*(
आतड्यांमध्ये जमलेली घाण झपाट्याने बाहेर काढतील 'हे' ज्यूस !!*
*आतड्यांमध्ये जमलेली घाण झपाट्याने बाहेर काढतील 'हे' ज्यूस !!*
अन्नातून शरीराला ऊर्जा मिळते आणि अन्नातून पोषक तत्वे शोषून घेण्यात पचनसंस्था महत्त्वाची भूमिका बजावते. पचनक्रिया सुरळीत राहणे अत्यंत आवश्यक आहे. कोलन, ज्याला मोठे आतडे देखील म्हणतात, हा पचन तंत्राचा एक महत्त्वाचा भाग आहे.
योग्य पचनासाठी मोठ्या आतड्याचेपाणी निरोगी असणे आवश्यक आहे. शरीराचा हा अंतर्गत भाग स्वच्छ ठेवणे आणि रोगांपासून संरक्षण करणे खूप महत्वाचे आहे. ज्याप्रमाणे शरीराच्या बाहेरील भाग स्वच्छ करणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे शरीराच्या आतील भागाची स्वच्छता करणे आवश्यक आहे.
मोठ्या आतड्याची स्वच्छता करणे म्हणजे त्यातून टॉक्सिन काढून टाकणे. अनेक संशोधनात हे समोर आले आहे की मोठे आतडे स्वच्छ ठेवल्याने पचनक्रिया व्यवस्थित राहते आणि कोलन कॅन्सरचा धोकाही कमी होतो. आता प्रश्न पडतो की आतडे स्वच्छ करण्यासाठी काय करावे.
आतडे साफ करणे म्हणजे आहारात अशा पदार्थांचे सेवन करणे, ज्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातील आणि शरीरही निरोगी राहतील. काही ज्यूसचे सेवन आतडे स्वच्छ करण्यासाठी खूप प्रभावी असल्याचे सिद्ध होते. हा रस प्यायल्याने बद्धकोष्ठता दूर होते आणि पचनक्रिया निरोगी राहते. मोठे आतडे स्वच्छ करण्यासाठी कोणते ज्यूस सेवन करावे ते जाणून घेऊया.
*सफरचंद :*
सफरचंदाचा रस प्यायल्याने आतडे निरोगी राहतील. सफरचंदाचे सेवन आरोग्यासाठी जितके फायदेशीर " आहे, तितकाच त्याचा रस देखील फायदेशीर आहे. सफरचंदाच्या रसाचे सेवन केल्याने पोट साफ होण्यास मदत होते. पोटात साचलेली घाण आणि विषद्रव्ये मलमार्गे शरीरातून बाहेर पडतात. सफरचंदाचा रस आतडे डिटॉक्ससाठी खूप फायदेशीर आहे.
*भाज्या :*
भाज्यांचा रस प्या, आतडे स्वच्छ होतील. आतड्यांच्या आरोग्यासाठी भाज्यांचे रस सेवन करा. भाज्यांच्या ज्यूसमध्ये पालक, टोमॅटो, गाजर, फ्लॉवर, ब्रोकोली आणि कारल्याचा रस घ्या. हे रस शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकतात आणि कोलन स्वच्छ करतात. हे रस तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी सेवन करू शकता.
*मीठाचे पाणी :*
पाण्यात सैंधव मीठ मिसळून प्या. सैंधव मीठ मिसळलेले पाणी प्यायल्याने आतडे चांगल्या प्रकारे स्वच्छ होतात. सैंधव मीठ मिसळलेले पाणी पिण्याने आतडे स्वच्छ होण्यास मदत होते. एक ग्लास कोमट पाण्यात दोन छोटे चमचे सैंधव मीठ मिसळून ते सेवन करा, आतड्यांची स्वच्छता चांगली होईल. हे पाणी हळूहळू सेवन करा.
*लिंबाचा रस :*
लिंबाचा रस सेवन करा. लिंबाचा रस, व्हिटॅमिन सी समृद्ध, आम्लता दूर करते आणि पचन सुधारते. हा रस पोटात लपलेले हानिकारक बॅक्टेरिया मारते. याचे सेवन केल्याने आतडे चांगल्या प्रकारे स्वच्छ होतात.
*संकलन-*
*निसर्ग उपचार तज्ञ*
*डॉ. प्रमोद ढेरे,*
*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*
Friday, 14 April 2023
अग्निशमन सेवा सप्ताहाचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन
अग्निशमन सेवा सप्ताहाचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन
राज्याला सुसज्ज, प्रशिक्षित व आधुनिक अग्निशमन दल असणे आवश्यक
मुंबई, दि. १४ : शहरांची लोकसंख्या वाढत आहे. मुंबई शहर ऊर्ध्व दिशेने वाढत आहे. उद्योगविश्व देखील झपाट्याने वाढत आहे. अशावेळी सर्व प्रकारच्या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी राज्याला सुसज्ज, पुरेसे मनुष्यबळ असलेले व प्रशिक्षित असे आधुनिक अग्निशमन दल असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.
महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयातर्फे आयोजित अग्निसेवा सप्ताह तसेच अग्निसेवा दिनाचे उद्घाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 14) राजभवन येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी राज्यपालांच्या हस्ते मुंबई फायर ब्रिगेड तसेच राज्य अग्निशमन सेवेतील 13 अधिकाऱ्यांना व जवानांना 'राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदके' प्रदान करण्यात आली, तसेच अग्निशमन कर्मचारी कल्याण निधी संकलन मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस मुंबई अग्निशमन दलाची स्थापना झाली, त्यावेळी शहराची लोकसंख्या केवळ 10-12 लाख होती. आज शहराची लोकसंख्या किमान पंधरा पटीने वाढली आहे. मुंबईची लोकसंख्या आज अनेक देशांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे शहराला सशक्त व आंतरराष्ट्रीय दर्जाचे अग्निशमन दल असणे आवश्यक आहे, असे राज्यपालांनी सांगितले.
सोसायटी व उद्योगांचे नियमित 'फायर ऑडिट' करण्याची सूचना
मुंबईसारख्या शहरांमध्ये आगीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी शाळांना तसेच गृहनिर्माण संस्थांना सहभागी केले पाहिजे तसेच गृहनिर्माण संस्था व उद्योग संस्थांचे नियमित 'फायर ऑडिट' केले गेले पाहिजेत असेही राज्यपालांनी सांगितले.
अग्निशमन सेवा कर्मचारी कल्याण निधीला योगदान देण्याचे राज्यपालांचे आवाहन
समाजाच्या विकासामध्ये अग्निशमन सेवा दलाची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगून राज्यपालांनी राज्यातील नागरिकांना अग्निशमन सेवा कर्मचारी कल्याण निधीला अधिकाधिक योगदान देण्याचे आवाहन केले. या निधीचा उपयोग अग्निशमन सेवा कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी करण्यात येतो.
राज्यपालांच्या हस्ते यावेळी मुंबई अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी संजय मांजरेकर यांचेसह देवेंद्र पोटफोडे, मुख्य अग्निशमन अधिकारी, पुणे महानगर पालिका, प्रशांत रणपिसे, माजी मुख्य अग्निशमन अधिकारी, पुणे महानगरपालिका, किरण गावडे, माजी मुख्य अग्निशमन अधिकारी, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, यशवंत जाधव, उपमुख्य अग्निशमन अधिकारी, मुंबई अग्निशमन दल, कैलास हिवराळे, माजी उपमुख्य अग्निशमन अधिकारी मुंबई अग्निशमन दल, विजयकुमार पाणिग्रही, माजी उपमुख्य अग्निशमन अधिकारी, मुंबई अग्निशमन दल, संजय पवार, प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी, मालेगाव महानगरपालिका, नाशिक, धर्मराज नाकोड,सहायक स्टेशन अधिकारी, नागपूर महानगरपालिका, राजाराम केदारी, लिडिंग फायरमन, पुणे महानगरपालिका, सुरेश पाटील, लिडिंग फायरमन, मुंबई अग्निशमन दल, संजय म्हामुणकर, लिडिंग फायरमन मुंबई फायर ब्रिगेड व चंद्रकांत आनंददास, फायरमन, पुणे महानगरपालिका यांचा 'राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक' देऊन सत्कार करण्यात आला.
सुरुवातीला महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालक संतोष वारिक यांनी राज्यपालांच्या पोशाखावर अग्निशमन सेवा चिन्ह अंकित केले. त्यानंतर राज्यपालांनी अग्निशमन कर्मचारी कल्याण निधीला आपले योगदान देऊन अग्निशमन सप्ताहाचे औपचारिक उद्घाटन केले. मुंबई अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी संजय मांजरेकर यांनी आभारप्रदर्शन केले.
000
Maharashtra Governor launches Fire Services Week; appeals people to donate to Fire Services Personnel Welfare Fund
The Governor of Maharashtra Ramesh Bais inaugurated the Fire Service Week and launched the Maharashtra Fire Services Personnel Welfare Fund Raising Campaign by making his donation to the Flag Fund at Raj Bhavan Mumbai on Fri (14 April).
The Governor also presented the President's Fire Service Medals and Scrolls to 13 Fire Officers and leading firemen from Mumbai and other parts of the State on the occasion.
Speaking on the occasion the Governor stressed the need to create a modern, well-equipped, well-staffed and modern Fire Fighting Force for Mumbai and the State. The Governor also called for conducting regular fire audits of housing societies and industrial establishments.
The Governor appealed to the citizens to donate generously to the Fire Services Personnel Welfare Fund which is used for the welfare of family members of fire services personnel.
Director of Maharashtra Fire Services Santosh Warick affixed the Fire Service Flag on the apparel of the Governor.
The Governor presented the President's Fire Service Medals to Sanjay Manjrekar, Chief Fire Officer from Mumbai Fire Brigade, Devendra Potphode, Chief Fire Officer from P.M.R.D.A. Pune, Prashant Ranpise, Ex.Chief Fire Officer, Pune Municipal Corporation, Pune, Kiran Gawde, Ex. Deputy Chief Fire Officer, Pimpri-Chinchwad Municipal Corporation, Yeshwant Jadhav,Dy.Chief Fire Officer Mumbai, Kailash Hiwrale, Ex.Dy.Chief Fire Officer Mumbai Fire Brigade, Vijaykumar Panigrahi, Ex.Dy.Chief Fire Officer, Sanjay Pawar, In Charge Chief Fire Officer, Malegaon Municipal Corporation, Dharmaraj Nakod, Assistant Station Officer from Nagpur Municipal Corporation, Rajaram Kedari, Leading Fireman Pune Municipal Corporation, Suresh Patil, Leading Fireman Mumbai Fire Brigade, Sanjay Mhamunkar, Leading Fireman Mumbai Fire Brigade, and Chandrakant Anandas, Fireman, Pune Municipal Corporation. CFO Mumbai Fire Brigade Sanjay Manjarekar proposed vote of thanks.
The Fire Service Day is commemorated on 14th April to remember the fire services personnel who lost their lives in the devastating fire caused by the explosions in the Mumbai Dock Explosion in the year 1944.
000
महाराष्ट्र भूषण कार्यक्रमानिमित्त १५ व १६ एप्रिल रोजी खारघरमधील वाहतुकीत बदल ठाणे, दि. १४: नवी मुंबईतील खारघर येथे होणाऱ्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमानिमित्त दि. १५ एप्रिल २०२३ रोजी १४.०० वाजेपासून ते दि. १६ एप्रिल २०२३ च्या रात्रौ २३.०० वाजेपर्यंत खारघरमधील ग्रामविकास भवन ते ओवेगाव चौक ते सिडको फुटबॉल मैदान चौक ते मेट्रो ब्रिज खालून बी. डी. सोमणी स्कुल चौक ते जयकुमार सर्कल ते गुरुव्दारा चौक पर्यंतचा रस्ता संपूर्णपणे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. फक्त कार्यक्रमाच्या ठिकाणी पार्किंग ठिकाणावरून अनुयायी यांना घेवून येणारे वाहन - बस यासाठी हा रस्ता खुला राहणार असून इतर वाहने पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार असल्याचे वाहतूक पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी कळविले आहे. अ) प्रवेश बंद:- दिनांक १५/०४/२०२३ रोजी १४.०० वाजे पासून ते दिनांक १६/०४/२०२३ च्या रात्रौ २३.०० वाजेपर्यंत ग्रामविकास भवन ते ओवेगाव चौक ते सिडको फुटबॉल मैदान चौक ते मेट्रो ब्रिज खालून बी. डी. सोमानी स्कुल चौक ते जयकुमार सर्कल ते गुरुव्दारा चौक पर्यंतच्या रस्त्यावर नमुद कार्यक्रम संपेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना पूर्णवेळ प्रवेश बंदी असणार आहे. ब) पर्यायी मार्ग:- २) ग्रामविकास भवन ने ग्रीन हेरीटेज चौक ते मुर्ती चौक, विनायक सेठ चौक मार्गे पापडीचा पाडा, तळोजा मार्गे इच्छित स्थळी जातील. २) आरएएफ तळोजा कडून पापडीचा पाडा मार्गे, विनायक सेठ चौक, मुर्वी गांव चौक मार्गे इन्च्छीत स्थळी जातील. (३) ओवेगावातील रहिवाशी ओवेगाव चौक ते पापडीचा पाडा मार्गे तळोजा किंवा खारघर येथून इच्छित स्थळी जातील. ही अधिसूचना कार्यक्रमाच्या ठिकाणी पार्किंग ठिकाणावरून अनुयायी यांना येवुन येणारी वाहने / बस या करिता खुला राहील अशा वाहनांना लागू असणार नाही. तसेच अग्निशमन दल, पोलीस, रूग्णवाहिका व अत्यावश्यक सेवेतील सर्व वाहनांना लागू असणार नाही, असे श्री काकडे यांनी कळविले आहे नवी मुंबईत 15 एप्रिल ते 16 एप्रिलपर्यंतजड अवजड वाहनांना प्रवेश बंद ठाणे, दि. 14: नवी मुंबईतील खारघर येथे राज्य शासनामार्फत रविवारी होणाऱ्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमानिमित्त दि. 15 एप्रिल ते 16 एप्रिल या काळात नवी मुंबईतील वाहतुकीत बदल करण्यात आले असून सर्व प्रकारच्या जड व अवजड वाहनांना या काळात प्रवेश बंद करण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी कळविली आहे. नवी मुंबईतील खारघर येथे होणाऱ्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमासाठी राज्यातील विविध जिल्हयातून व इतर राज्यातून खारघर येथील कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहने जाणार व येणार आहे. त्यामुळे या काळात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तसेच आयुक्तालय क्षेत्रातील सर्व रस्त्यावरील वाहतुक सुरळीत व सुरक्षित रहावी याकरीता दि. 15 एप्रिल 2023 रोजी दु. 14.00 वा. ते दि. 16 एप्रिल 2023 रोजी रात्रौ 23.00 वा. पर्यंतच्या कालावधीत नवी मुंबई आयुक्तालय क्षेत्रात सर्व जड - अवजड वाहनाच्या येण्यास व जाण्यास बंदी घालण्यात आल्याची माहिती नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील वाहतुक शाखेचे उपायुक्त तिरुपती काकडे यांनी कळविली आहे. वाहतुकीतील बदल पुढीलप्रमाणे दि. १५ एप्रिल २०२३ रोजीच्या दु. १४.०० वाजेपासून ते दिनांक १६ एप्रिल २०२३ च्या रात्री २३.०० वा. पर्यंत नवी मुंबई आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात खालील नमुद मार्गावरून येणाऱ्या व जाणाऱ्या जड अवजड वाहनांना पूर्णपणे प्रवेश बंदी करण्यात आली आहे. १. ठाणे जिल्ह्यातून ऐरोली टोल नाका, तसेच विटावाकडुन ठाणे बेलापुर रोडने तसेच शिळफाटयाकडुन महापे व तळोजा कडुन जुना मुंबई पुणे महामार्गाने नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत येणा-या व जाणा-या जड अवजड वाहनाना प्रवेश बंदी करण्यात येत आहे. २. मुंबई शहराकडून सायन पनवेल महामार्गावरील वाशी टोल नाका व पूर्व द्रुतगती मार्गानि ऐरोली टोल नाका मार्गे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत येणा-या व जाणा-या जड अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. ३. गोवा महामार्गाने खारपाडा टोलनाका मार्गे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत येणा-या व जाणा-या जड- अवजड वाहनाना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. ४. पुणे मुंबई महामार्ग व पुणे मुंबई द्रुतगती महामार्गाने कोनफाटा पळस्पे सर्कल शेडुग टोल नाका मार्गे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत येणा-या व जाणा-या जड अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. ५. जेएनपीटी बंदर, उरण पनवेल येथील सर्व सीएफएस एमटीयार्ड, व इतर आस्थापना यांच्याकडुन गव्हाणफाटा, दास्तानफाटा तसेच पनवेल टी पॉईट मार्गाने सायन-पनवेल मार्गावर नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत येणा-या व जाणा-या जड अवजड वाहनाना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. ६. नवी मुंबई आयुक्तालय अंतर्गत असलेल्या सर्व रस्त्यांवर जड अवजड वाहनाना पूर्णपणे प्रवेश बंदी करण्यात येणार आहे. तसेच सदरची वाहतुक नियंत्रण अधिसुचना ही अत्यावश्यक सेवेतील जट-अवजड वाहनाना लागू असणार नाही, असे श्री काकडे यांनी कळविले आहे. 0000 महाराष्ट्र भूषण कार्यक्रमानिमित 15 व 16 एप्रिल रोजी नवी मुंबईतील कोपरा ब्रिजजवळील वाहतुकीत बदल नवी मुंबई, दि. 14 : नवी मुंबईतील खारघर येथे होणाऱ्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमानिमित्त दि. 15 एप्रिल 2023 रोजी 14.00 वाजेपासून ते दि. 17 एप्रिल 2023 च्या सकाळी 10.00 वाजेपर्यंत खारघर येथील कोपरा ब्रिज खालील अंडर पासमधून स्वर्ण गंगा चौकाकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आला असून या मार्गावरील वाहने हिरानंदानी ब्रिज सिग्नल वरुन युटर्न घेऊन कोपरा ब्रिज जवळील कटने डावीकडे वळून स्वर्णगंगा चौकातून पुढे से.35 कडील नियोजित वाहनतळाकडे जातील, असे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील वाहतूक उपायुक्त तिरुपती काकडे यांनी कळविले आहे. वाहतुकीतील बदल पुढील प्रमाणे अ) प्रवेश बंद:- दिनांक 15 एप्रिल 2023 रोजी 14.00 वाजे पासून ते दिनांक 17 एप्रिल 2023 च्या सकाळी 10.00 वाजेपर्यंत मुंबई –पुणे मार्गावरील कोपरा अंडर पास वरुन स्वर्णगंगा चौकाकडे जाणारा रस्ता नमुद कार्यक्रम संपेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना पूर्णवेळ प्रवेश बंदी असणार आहे. ब) पर्यायी मार्ग:- 1) पुणे- मुंबईकडुन स्वर्णगंगा चौकाकडे जाणारी वाहने कोपरा ब्रिज चढून हिरानंदानी ब्रिज खालील सिग्नल येथून यु टर्न घेऊन परत कोपरा ब्रिजकडे जावून कोपरा ब्रिज जवळील डावीकडील कटने स्वर्णगंगा चौकाकडे जावून पुढे इच्छित स्थळी जातील. ही अधिसूचना अग्निशमन दल, पोलीस, रूग्णवाहिका व अत्यावश्यक सेवेतील सर्व वाहनांना लागू
महाराष्ट्र भूषण कार्यक्रमानिमित्त १५ व १६ एप्रिल रोजी खारघरमधील वाहतुकीत बद
ठाणे, दि. १४: नवी मुंबईतील खारघर येथे होणाऱ्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमानिमित्त दि. १५ एप्रिल २०२३ रोजी १४.०० वाजेपासून ते दि. १६ एप्रिल २०२३ च्या रात्रौ २३.०० वाजेपर्यंत खारघरमधील ग्रामविकास भवन ते ओवेगाव चौक ते सिडको फुटबॉल मैदान चौक ते मेट्रो ब्रिज खालून बी. डी. सोमणी स्कुल चौक ते जयकुमार सर्कल ते गुरुव्दारा चौक पर्यंतचा रस्ता संपूर्णपणे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. फक्त कार्यक्रमाच्या ठिकाणी पार्किंग ठिकाणावरून अनुयायी यांना घेवून येणारे वाहन - बस यासाठी हा रस्ता खुला राहणार असून इतर वाहने पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार असल्याचे वाहतूक पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी कळविले आहे.
अ) प्रवेश बंद:-
दिनांक १५/०४/२०२३ रोजी १४.०० वाजे पासून ते दिनांक १६/०४/२०२३ च्या रात्रौ २३.०० वाजेपर्यंत ग्रामविकास भवन ते ओवेगाव चौक ते सिडको फुटबॉल मैदान चौक ते मेट्रो ब्रिज खालून बी. डी. सोमानी स्कुल चौक ते जयकुमार सर्कल ते गुरुव्दारा चौक पर्यंतच्या रस्त्यावर नमुद कार्यक्रम संपेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना पूर्णवेळ प्रवेश बंदी असणार आहे.
ब) पर्यायी मार्ग:-
२) ग्रामविकास भवन ने ग्रीन हेरीटेज चौक ते मुर्ती चौक, विनायक सेठ चौक मार्गे पापडीचा पाडा, तळोजा मार्गे इच्छित स्थळी जातील. २) आरएएफ तळोजा कडून पापडीचा पाडा मार्गे, विनायक सेठ चौक, मुर्वी गांव चौक मार्गे इन्च्छीत स्थळी जातील.
(३) ओवेगावातील रहिवाशी ओवेगाव चौक ते पापडीचा पाडा मार्गे तळोजा किंवा खारघर येथून इच्छित स्थळी जातील.
ही अधिसूचना कार्यक्रमाच्या ठिकाणी पार्किंग ठिकाणावरून अनुयायी यांना येवुन येणारी वाहने / बस या करिता खुला राहील अशा वाहनांना लागू असणार नाही. तसेच अग्निशमन दल, पोलीस, रूग्णवाहिका व अत्यावश्यक सेवेतील सर्व वाहनांना लागू असणार नाही, असे श्री काकडे यांनी कळविले आहे
नवी मुंबईत 15 एप्रिल ते 16 एप्रिलपर्यंतजड अवजड वाहनांना प्रवेश बंद
ठाणे, दि. 14: नवी मुंबईतील खारघर येथे राज्य शासनामार्फत रविवारी होणाऱ्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमानिमित्त दि. 15 एप्रिल ते 16 एप्रिल या काळात नवी मुंबईतील वाहतुकीत बदल करण्यात आले असून सर्व प्रकारच्या जड व अवजड वाहनांना या काळात प्रवेश बंद करण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी कळविली आहे.
नवी मुंबईतील खारघर येथे होणाऱ्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमासाठी राज्यातील विविध जिल्हयातून व इतर राज्यातून खारघर येथील कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहने जाणार व येणार आहे. त्यामुळे या काळात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तसेच आयुक्तालय क्षेत्रातील सर्व रस्त्यावरील वाहतुक सुरळीत व सुरक्षित रहावी याकरीता दि. 15 एप्रिल 2023 रोजी दु. 14.00 वा. ते दि. 16 एप्रिल 2023 रोजी रात्रौ 23.00 वा. पर्यंतच्या कालावधीत नवी मुंबई आयुक्तालय क्षेत्रात सर्व जड - अवजड वाहनाच्या येण्यास व जाण्यास बंदी घालण्यात आल्याची माहिती नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील वाहतुक शाखेचे उपायुक्त तिरुपती काकडे यांनी कळविली आहे
वाहतुकीतील बदल पुढीलप्रमाणे
दि. १५ एप्रिल २०२३ रोजीच्या दु. १४.०० वाजेपासून ते दिनांक १६ एप्रिल २०२३ च्या रात्री २३.०० वा. पर्यंत नवी मुंबई आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात खालील नमुद मार्गावरून येणाऱ्या व जाणाऱ्या जड अवजड वाहनांना पूर्णपणे प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
१. ठाणे जिल्ह्यातून ऐरोली टोल नाका, तसेच विटावाकडुन ठाणे बेलापुर रोडने तसेच शिळफाटयाकडुन महापे व तळोजा कडुन जुना मुंबई पुणे महामार्गाने नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत येणा-या व जाणा-या जड अवजड वाहनाना प्रवेश बंदी करण्यात येत आहे.
२. मुंबई शहराकडून सायन पनवेल महामार्गावरील वाशी टोल नाका व पूर्व द्रुतगती मार्गानि ऐरोली
टोल नाका मार्गे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत येणा-या व जाणा-या जड अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
३. गोवा महामार्गाने खारपाडा टोलनाका मार्गे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत येणा-या व जाणा-या जड- अवजड वाहनाना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
४. पुणे मुंबई महामार्ग व पुणे मुंबई द्रुतगती महामार्गाने कोनफाटा पळस्पे सर्कल शेडुग टोल नाका मार्गे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत येणा-या व जाणा-या जड अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. ५. जेएनपीटी बंदर, उरण पनवेल येथील सर्व सीएफएस एमटीयार्ड, व इतर आस्थापना यांच्याकडुन गव्हाणफाटा, दास्तानफाटा तसेच पनवेल टी पॉईट मार्गाने सायन-पनवेल मार्गावर नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत येणा-या व जाणा-या जड अवजड वाहनाना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
६. नवी मुंबई आयुक्तालय अंतर्गत असलेल्या सर्व रस्त्यांवर जड अवजड वाहनाना पूर्णपणे प्रवेश बंदी करण्यात येणार आहे
तसेच सदरची वाहतुक नियंत्रण अधिसुचना ही अत्यावश्यक सेवेतील जट-अवजड वाहनाना लागू असणार नाही, असे श्री काकडे यांनी कळविले आहे.
0000
महाराष्ट्र भूषण कार्यक्रमानिमित 15 व 16 एप्रिल रोजी नवी मुंबईतील कोपरा ब्रिजजवळील वाहतुकीत बदल
नवी मुंबई, दि. 14 : नवी मुंबईतील खारघर येथे होणाऱ्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमानिमित्त
दि. 15 एप्रिल 2023 रोजी 14.00 वाजेपासून ते दि. 17 एप्रिल 2023 च्या सकाळी 10.00 वाजेपर्यंत खारघर येथील कोपरा ब्रिज खालील अंडर पासमधून स्वर्ण गंगा चौकाकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आला असून या मार्गावरील वाहने हिरानंदानी ब्रिज सिग्नल वरुन युटर्न घेऊन कोपरा ब्रिज जवळील कटने डावीकडे वळून स्वर्णगंगा चौकातून पुढे से.35 कडील नियोजित वाहनतळाकडे जातील, असे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील वाहतूक उपायुक्त तिरुपती काकडे यांनी कळविले आहे.
वाहतुकीतील बदल पुढील प्रमाणे
अ) प्रवेश बंद:-
दिनांक 15 एप्रिल 2023 रोजी 14.00 वाजे पासून ते दिनांक 17 एप्रिल 2023 च्या सकाळी 10.00 वाजेपर्यंत मुंबई –पुणे मार्गावरील कोपरा अंडर पास वरुन स्वर्णगंगा चौकाकडे जाणारा रस्ता नमुद कार्यक्रम संपेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना पूर्णवेळ प्रवेश बंदी असणार आहे.
ब) पर्यायी मार्ग:-
1) पुणे- मुंबईकडुन स्वर्णगंगा चौकाकडे जाणारी वाहने कोपरा ब्रिज चढून हिरानंदानी ब्रिज खालील सिग्नल येथून यु टर्न घेऊन परत कोपरा ब्रिजकडे जावून कोपरा ब्रिज जवळील डावीकडील कटने स्वर्णगंगा चौकाकडे जावून पुढे इच्छित स्थळी जातील.
ही अधिसूचना अग्निशमन दल, पोलीस, रूग्णवाहिका व अत्यावश्यक सेवेतील सर्व वाहनांना लागू
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...



