Friday, 14 April 2023

महाराष्ट्र भूषण कार्यक्रमानिमित्त १५ व १६ एप्रिल रोजी खारघरमधील वाहतुकीत बदल

 महाराष्ट्र भूषण कार्यक्रमानिमित्त १५ व १६ एप्रिल रोजी खारघरमधील वाहतुकीत बदल

ठाणेदि. १४: नवी मुंबईतील खारघर येथे होणाऱ्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमानिमित्त दि. १५ एप्रिल २०२३ रोजी १४.०० वाजेपासून ते दि. १६ एप्रिल २०२३ च्या रात्रौ २३.०० वाजेपर्यंत  खारघरमधील ग्रामविकास भवन ते ओवेगाव चौक ते सिडको फुटबॉल मैदान चौक ते मेट्रो ब्रिज खालून बी. डी. सोमणी स्कुल चौक ते जयकुमार सर्कल ते गुरुव्दारा चौक पर्यंतचा रस्ता संपूर्णपणे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. फक्त कार्यक्रमाच्या ठिकाणी पार्किंग ठिकाणावरून अनुयायी यांना घेवून येणारे वाहन - बस यासाठी हा रस्ता खुला राहणार असून इतर वाहने पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार असल्याचे वाहतूक पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी कळविले आहे.

अ) प्रवेश बंद:-

दिनांक १५/०४/२०२३ रोजी १४.०० वाजे पासून ते दिनांक १६/०४/२०२३ च्या रात्रौ २३.०० वाजेपर्यंत ग्रामविकास भवन ते ओवेगाव चौक ते सिडको फुटबॉल मैदान चौक ते मेट्रो ब्रिज खालून बी. डी. सोमानी स्कुल चौक ते जयकुमार सर्कल ते गुरुव्दारा चौक पर्यंतच्या रस्त्यावर नमुद कार्यक्रम संपेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना पूर्णवेळ प्रवेश बंदी असणार आहे.

 ब) पर्यायी मार्ग:-

२) ग्रामविकास भवन ने ग्रीन हेरीटेज चौक ते मुर्ती चौकविनायक सेठ चौक मार्गे पापडीचा पाडातळोजा मार्गे इच्छित स्थळी जातील. २) आरएएफ तळोजा कडून पापडीचा पाडा मार्गेविनायक सेठ चौकमुर्वी गांव चौक मार्गे इन्च्छीत स्थळी जातील.

(३) ओवेगावातील रहिवाशी ओवेगाव चौक ते पापडीचा पाडा मार्गे तळोजा किंवा खारघर येथून इच्छित स्थळी जातील.

ही अधिसूचना कार्यक्रमाच्या ठिकाणी पार्किंग ठिकाणावरून अनुयायी यांना येवुन येणारी वाहने / बस या करिता खुला राहील अशा वाहनांना लागू असणार नाही. तसेच अग्निशमन दलपोलीसरूग्णवाहिका व अत्यावश्यक सेवेतील सर्व वाहनांना लागू असणार नाहीअसे श्री काकडे यांनी कळविले आहे.

000

चेहर्याचि त्वचा ओघळल्यास, ढिलि पडल्यास.. घरगुति उपायः*

 *चेहर्याचि त्वचा ओघळल्यास, ढिलि पडल्यास.. घरगुति  उपायः*



१)  काँफिः    दोन वा तीन चमचा खोबरेल तेल घेउन त्यात  एक कप  ब्राउन शुगर, एक चमचा दालचिनि पावडर ,  व एक कप काँफि पावडर टाकून सर्व एकत्र करून चेहर्याला  लावून खालून वरच्या दिशेला पंधरा मिनिटे चोळावे. मग कोमट पाण्याने धुऊन टाका.

२)  टोमँटोः    टोमँटोत  अस्ट्रिंजंट मुबलक असतं तेव्हा याचा रस काढून तो चेहर्याला नेहमिच लावत राहा.

३)  अंडेः।   अंड्याचा पांढरा भाग त्वचेला कसाव आणतो. तेव्हा अंड्याच्या पांढर्या भागात मध मिसळून ते अर्धा तास लावून ठेवावे. वनंतर धुवा आठवड्यातून

 एकदा करा.

३)  काकडिः।  काकडि किसून लगदा करा व तो चेहर्याला लावून ठेवा.

४) तुरटिः  हे खुपच इफेक्टिव्ह अस्ट्रिंजंट आहे आंघोळिनंतर याला चेहर्यावर दोन मिनिटे चोळावे त्वचेत कसाव येतो.

५)  केळः  केळाने त्वचा घट्ट होते

 स्मँश करून व थोडे मध टाकून  लावावे नंतर धुवा.

६)   फिश आँईलः  याच्या कँपँसूल फोडून त्याने मालिश करा चेहर्यावर .

७)  बदाम आँईलः याने चेहर्याचि मालिश करा नेमाने

८) कोरफड जेलः याने त्वचा घट्ट होते. नेमाने याचा जेल लावावा.

९) मुलतानि मातिः याने कसाव येतो. तैव्हा हि लावून नंतर धुवावे.

१०)  स्ट्राँबेरि, मध व दही एकत्र करून लेप लावा नंतर धुवावा.

.. वरिल सर्वच उपाय  चांगले आहे


 सुनिता सहस्त्रबुद्धे


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



हसू आलं का

 संशयाची हद्द झाली


राव.....


.


.


.


नवऱ्याची बायपास सर्जरी झाल्यानंतर बायकोने सर्जनला एकच प्रश्न केला... .


.


.


.


यांच्या ❤हृदयात कोणी दुसरी🙆 होती का हो?!!!


😜😜😜


डॉक्टरसुद्धा अतरंगी पोहोचलेला (पुण्याचा).....


म्हणाला.... "तिलाच तर बायपास केली आहे आता !!"


😝😛

भारतीय प्रेस परिषदेची शोध समिती

 भारतीय प्रेस परिषदेची शोध समिती

१७१८ एप्रिल रोजी मुंबई दौऱ्यावर

 

            मुंबईदि. १३ : भारतीय प्रेस परिषदेच्या शोध समितीची बैठक १७ व १८ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ११.३० वाजेपासून सह्याद्री अथितीगृह, मुंबई येथे होणार आहे. न्यायमूर्ती श्रीमती रंजना प्रकाश देसाई अध्यक्षस्थानी असतील. या बैठकीत पत्रकारितेशी निगडित विविध ३६ प्रकरणांवर सुनावणी होईल. ही सुनावणी माध्यमे आणि सर्व सामान्य नागरिकांसाठी खुली राहीलअसे भारतीय प्रेस परिषदेतर्फे कळविण्यात आले आहे.


कुक्कुटपालन व्यवसायाच्या वृद्धीसाठी धोरणात्मक निर्णय घेणार

 कुक्कुटपालन व्यवसायाच्या वृद्धीसाठी धोरणात्मक निर्णय घेणार

- पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

महाराष्ट्र अंडी समन्वय समितीची (एमईसीसी) स्थापना करणार असल्याची माहिती

 

            मुंबई, दि. १३ : कुक्कुटपालन व्यवसायात वृद्धी व्हावीतो शेतकरी हिताचा व्हावा या दृष्टीने आणि महाराष्ट्र अंडी समन्वय समितीची (एमईसीसी) स्थापना करण्याच्या अनुषंगाने सर्वंकष विचार करून अहवाल सादर करावा. त्याचा सकारात्मक विचार करून राज्य शासन धोरणात्मक निर्णय घेणार असल्याचे महसूलपशुसंवर्धनदुग्ध व्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

            मंत्री श्री.विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय कुक्कुटपालन समन्वय समितीची आढावा बैठक मंत्रालयात आज आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस विभागाचे प्रधान सचिव जे.पी गुप्ताआयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांच्यासह कुक्कुटपालन शेतकरी आणि संबंधित कंपनीचे प्रतिनीधी उपस्थित होते.

            मंत्री श्री.विखे-पाटील म्हणाले कीएनईसीसीप्रमाणे एमईसीसी स्थापन करण्यात येईल का याबाबत सर्वंकष अहवाल सादर करण्यात यावा. कुक्कुटपालन हा देखील शेतीव्यवसाय समजण्यात यावा. तसेचहैदराबाद शासनाप्रमाणे कमी दरात कुक्कुटपालकांना कमी दरात पीक देता देणेकोल्ड स्टोरेजसाठी अनुदानपोल्ट्री शेड बांधकामावरील मालमत्ता कर रद्द करणेपोल्ट्री व्यवसायासाठीचे वीज बील शेती पंपाच्या दराप्रमाणे आकरणेशालेय पोषण आहारात अंड्यांचा समावेश करणेअंड्यांसाठी उत्पादन खर्चावर आधारित एमएसपी दर प्रणाली ठरविणे या विषयासंदर्भात कंपनी आणि शेतकऱ्यांनी एकत्रित चर्चा करूनसर्वंकष प्रस्ताव पाठवावा. कुक्कुटपालन शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी शासन सकारात्मक विचार करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

            यावेळी केंद्र सरकारच्या नवीन धोरणाची प्रभावी अंमलबजावणी व्यवसाय वाढीचे शुल्क हे उत्पादन किमतीच्या २५ टक्के देण्याबाबतच्या सूचना संबंधित कंपनींना मंत्री श्री.विखे पाटील यांनी दिल्या.

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासंदर्भात हरकती,आक्षेप कळविण्याचे आवाहन

 शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासंदर्भात हरकती,आक्षेप कळविण्याचे आवाहन

 

            मुंबईदि. १३ : क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठीत शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी मागविण्यात आलेल्या प्रस्तावांचा प्राथमिक छाननी गुणांकन तक्ता प्रकाशित करण्यात आलेला आहे. या प्राथमिक छाननी गुणांकन तक्त्यातील माहितीसंदर्भात आक्षेप अथवा हरकती असल्यास  १५ एप्रिल २०२३ पर्यंत क्रीडा व युवक सेवा संचालनालयाला कळविण्याचे आवाहन मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने केले आहे.

            राज्य शासनाच्या क्रीडा विभागामार्फत राज्यातील उत्कृष्ट खेळाडूंना प्रतिष्ठेचा असलेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यात क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यासाठी राज्य शासनामार्फत "शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कारउत्कृष्ठ क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार", "शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू) शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार" "शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू)" असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

            शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराकरिता प्राप्त झालेल्या प्रस्तावांचा प्राथमिक छाननी केलेला गुणांकन तक्ता एकुण गुणांकनासह क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर "पुरस्कार" या टॅबमध्ये प्रकाशित करण्यात आलेला आहे.

            प्राथमिक छाननी गुणांकन तक्त्यानुसार नमूद केलेल्या माहितीसंदर्भात आक्षेप अथवा हरकती असल्यास त्या दि. १३ ते १५ एप्रिल २०२३ या कालावधीमध्ये संचालनालयाच्या desk14.dsys-mh@gov.in या ई मेल आयडीवर विहीत नमुन्यात कळविण्यात यावेत. याबाबतचा विहीत नमुना संचालनालयाच्या https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील "ताज्या बातम्या" या टॅब मध्ये प्रकाशित करण्यात आलेला आहे.

            शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी मागविण्यात आलेल्या हरकती अथवा आक्षेपांचे निराकरण / स्पष्टीकरण दि. १५ ते १७ एप्रिल २०२३ या कालावधीमध्ये संचालनालयाच्या संकेतस्थळावर "पुरस्कार" या टॅबमध्ये प्रसिध्द करण्यात येईल.

            क्रीडा संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणारा अहवाल हा प्राथमिक छाननी अहवाल असूनतो अंतिम नाहीअसे मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

०००

आनंदाचा शिधा’ उपक्रमामुळेसर्वसामान्यांच्या आयुष्यात आनंद

 आनंदाचा शिधा’ उपक्रमामुळेसर्वसामान्यांच्या आयुष्यात आनंद

 - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

      मुंबईदि. १३ : ‘आनंदाचा शिधा’ उपक्रम सर्वसामान्यांच्या आयुष्यात आनंद देणारा ठरेल. हे काम खरे तर खूप मोठे असून हा उपक्रम राबविताना सर्वांचे सहकार्य आवश्यक आहेअसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

            वर्षा निवासस्थान येथे अन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनाच्या लाभार्थींशी संवाद साधण्यासाठी उपस्थित कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी अन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण, अन्न नागरी पुरवठा विभागाचे सचिव विजय वाघमारेनियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कान्हूराज बगाटेविभागाचे अधिकारीराज्यातील सर्व जिल्ह्यातील निवडक ५० लाभार्थी जिल्हाधिकारी कार्यालयातील एनआयसीच्या दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की,  राज्य शासनाने लोकहिताचे विविध निर्णय घेतले आहेत. अनेक रखडलेले प्रकल्प मार्गी लागले आहेत. ‘आनंदाचा शिधा’ चे वितरण हा उपक्रम सुरू करण्यात आला. दिवाळीत याचे वाटप केले तेव्हा त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. आता देखील गुढीपाडवाभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आनंदाचा शिधा वितरण करण्यात येत आहे. हा शिधा संच वेळेत मिळावा यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहेत. १०० टक्के साहित्य जिल्ह्यांना पोहोचले आहेयातील शिधा संचचे ७० टक्के लाभार्थ्यांनी उचल केली आहे. उर्वरित साहित्य वाटप करण्यात यावे यासाठी प्रशासनाने कार्यवाही गतीने करावी.

            मुख्यमंत्री म्हणाले कीशेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. काही ठिकाणी गारपीटअवकाळी पाऊस पडत आहे. आम्ही सर्वजण शेतकऱ्यांची दुःख जाणून घेत आहोत. त्यासाठी प्रभावी उपाययोजना देखील करत झालेल्या नुकसानाचे पंचनामे देखील करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे काम करत आहोत.  केंद्र सरकारच्या धर्तीवर असलेली पी. एम. किसान योजना तशीच राज्य शासनाने ही ‘नमो सन्मान’ योजनाही सुरू केली आहे. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी १८०० रुपये देत आहोत. नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात सर्व घटकांसाठी निर्णय घेण्यात आले आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

आनंदाचा शिधा जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील

-अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण

            अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री श्री. चव्हाण म्हणाले कीराज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा वेळेत पोहोचविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. आत्तापर्यंत एक कोटी ५८ लाख जनतेपर्यंत हा शिधा पोहोचलेला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून उपक्रम राबविण्याचा निर्णय झाला असून त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आनंदाचा शिधाराज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान (बोनस)शिवभोजन थाळी पारदर्शकपणे आणि प्रभावीपणे राबवल्या जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज लाभार्थ्यांना मुख्यमंत्री यांच्याशी संवाद साधता येत आहे ही आनंदाची गोष्ट आहे, असेही मंत्री श्री. चव्हाण म्हणाले.

‘आनंदाचा शिधा’ मुळे आनंद मिळाला

लाभार्थ्यांनी दिली प्रतिक्रिया

            ‘आनंदाचा शिधा’मुळे आम्हाला बाजारभावापेक्षा कमी किमतीत वस्तू उपलब्ध होत असून आमच्यासाठी ही खूपच आनंदाची गोष्ट आहे. कितीही रांगा असल्या, तरी शिवभोजन घेतल्याशिवाय आम्ही जात नाही, अशी बोलकी प्रतिक्रिया लाभार्थ्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना व्यक्त केली. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी अकोलाहिंगोलीठाणेभंडाराछत्रपती संभाजीनगरवाशिममुंबई शहर व मुंबई उपनगर, जळगाव या जिल्ह्यातील लाभार्थ्यांची दूरदृश्य प्रणाली द्वारे संवाद साधला. तसेच या योजनांच्या बाबतीत जिल्हास्तरावर सुरू असलेल्या कार्यवाहीची माहिती घेतली.

            प्रातिनिधिक स्वरुपात मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्या हस्ते"आनंदाचा शिधा" संचाचे वितरण ही लाभार्थ्यांना यावेळी करण्यात आले.

Featured post

Lakshvedhi