Thursday, 13 April 2023

डोळ्यांची काळजी घ्या,

 *डोळ्यांची काळजी घ्या*

*माझ्या मित्राच्या डोळ्यांची* *शस्त्रक्रिया झाली. त्याला डॉक्टरांनी सांगितलेली पथ्य…*


1) डोळा मारायचा नाही,


2) कशावरही डोळा ठेवायचा नाही,


3) डोळ्यात डोळा घालून पहायचं नाही,


4) दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळं पाहायचं नाही, वर डोळे करायचे नाहीत.


5) दुसऱ्याच्या डोळ्यात अंजन घालायचं नाही,


6) डोळे भरून पहायचं नाही,


7) कानाडोळा करायचा नाही,


8) डोळ्यातले भाव वाचायचे नाहीत,


9) डोळे वटरायचे नाहीत,


आणि सर्वात महत्वाचं


*10) बायकोने डोळे वटारून पाहिलं तर तिच्या डोळ्याला डोळा भिडवायचा नाही,*


नाही तर परिणाम वाईट होऊ शकतात व पुन्हा ऑपरेशन करण्याची वेळ येईल.


*जागतिक नेत्रदान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा*


😀😄😄😄🤣🤣🤣

Wednesday, 12 April 2023

वडाळी वन परिक्षेत्रातील अतिक्रमित ज‍मिनीच्या हक्कांबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा

 वडाळी वन परिक्षेत्रातील अतिक्रमित ज‍मिनीच्या

हक्कांबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा

- वन मंत्री सुधीर मुनगंटीवार

 

            मुंबईदि. 12 : अमरावती जिल्ह्यात वडाळी येथे असलेल्या पुनर्वसित लोकांना वन विभागाच्या जमिनीवर असलेल्या घराबाबत मालकी हक्क मिळण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात यावा असे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

            अमरावती वनविभागअंतर्गत वडाळी वनपरिक्षेत्रातील संजय गांधी नगर नं. 2 नावाने ओळखल्या जाणाऱ्या अतिक्रमीत झोपडपट्टीबाबत बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार रवी राणाअमरावती महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. प्रवीण अष्टीकरवन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

            सार्वजनिक उपयोगिता असेल, तर जमिनीवरील अतिक्रमण हटविले जाते. मात्र, केंद्र सरकारकडे असलेल्या जमिनीबाबतचे निर्णय तसेच अतिक्रमण काढण्याबाबत केंद्र सरकार स्तरावर निर्णय होतात. त्यामुळे अमरावती - वडाळी येथील वनजमिनीबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे नव्याने पाठविण्यात यावा.

            मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले कीअमरावती वन विभागअंतर्गत वडाळी परीक्षेत्रातील मौजा वडाळी येथील राखीव वन सव्हें नंबर 84 मधील 2.911 हेक्टर या क्षेत्रावर प्रथम 279 अतिक्रमकांनी अतिक्रमण करुन घरे बांधली आहेत. अमरावती वनविभागाच्या अभिलेखानुसार वनक्षेत्रावर अतिक्रमण केल्याबाबत 279 अतिक्रमकाविरुद्ध वन गुन्हे जारी करण्यात आले आहेत. हे वन गुन्हे जारी करताना विखुरलेल्या स्थितीत कच्च्या झोपड्या या क्षेत्रावर अस्तित्वात होत्या. तथापि, आजमितीस येथील रहिवासी संख्या 279 पेक्षा जास्त असून संपूर्ण 5.2609 हे. क्षेत्रावर अतिक्रमण आहे. त्यामध्ये काही पक्की घरे बांधलेली आहेत. या क्षेत्रात रस्तेनाल्यासार्वजनिक जागा यांचा समावेश आहे.

००००

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री अन्न, नागरी पुरवठा विभागाच्या लाभार्थींशी

 मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री अन्न, नागरी पुरवठा विभागाच्या

लाभार्थींशी गुरुवारी साधणार संवाद

 

            मुंबई, दि. 12 : अन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनाच्या लाभार्थींशी मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत गुरुवार १३ एप्रिल २०२३  रोजी सायंकाळी ४.३० वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे संवाद साधणार आहेत.

         "आनंदाचा शिधा" संचाचे वितरण, राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान (बोनस)शिवभोजन थाळी या योजनांसदर्भात लाभार्थींना या शिधाजिन्नसांचे वितरण होत आहे किवा कसेरास्तभाव दुकानांमार्फत योजनेचा लाभ घेताना अडचणी तसेच समस्या येत असल्यास त्या जाणून घेणे, धान उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया, संवादासाठी निवडण्यात आलेल्या योजना यासंदर्भात लाभार्थींशी संवाद साधणार आहेत.

            वरील योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थींपैकी प्रत्येक जिल्ह्यातील सुमारे ५० लाभार्थी संबंधित जिल्हा कार्यालयातील NIC च्या Video Conference केंद्रात उपस्थित  राहणार आहेत तसेच जिल्ह्यातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी देखील याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. उपस्थित लाभार्थींपैकी निवडक लाभार्थींशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री संवाद साधणार आहेत, अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत प्रसिद्धीस देण्यात आली आहे.

निलगिरी तेलाचे आश्चर्यचकीत फायदे !!*

 *निलगिरी तेलाचे आश्चर्यचकीत फायदे !!* 


अनेक प्रकारचे तेल आहेत ज्याचा उपयोग त्वचा आणि केसांसाठी तसेच आरोग्यासाठी केला जातो. पण, एक विशिष्ठ प्रकारचे तेल आहे जे तूमच्या प्रत्येक समस्येवर फायदेशीर ठरू शकते. त्या तेलाचे नाव आहे निलगिरी तेल.


निलगिरीच्या तेलामध्ये जिवाणूरोधक, कवक रोधक आणि रोग प्रतिबंधक तसेच अँटिव्हायरस, सुज, अंगदुखी आणि सर्दी खोकला यावर उपयुक्त ठरणारे गुण आहेत. जे की अशा समस्यांवर इलाज करणाऱ्या औषधांसाठी चांगले घटक मानले जातात.


याच तेलाचे काही आश्चर्यचकीत करणारे फायदे जाणून घेऊयात.


हिवाळ्यातील समस्यांसाठी निलगिरीचे तेल लाभदायक आहे. हे तेल सर्दी, पडसं, खोकला, नाक वाहत राहणे, गळ्यामध्ये होणारी खिचखिच, अस्थमा, ब्रोंकाइटिस आणि साईंसायटीसच्या इलाजासाठी मदत करते.


प्रवास झाल्याने किंवा जास्त चालल्याने पाय खूप सुजतात. अशावेळी झोपण्यापूर्वी पायाच्या तळव्यावर नीलगिरीच्या तेलाचा मसाज करावा.याने सुज कमी येते आणि दुखणेही कमी होते.


ज्यांना झोप येत नाही, ज्यांना निद्रानाशाचा त्रास आहे, अशा लोकांसाठी निलगिरी तेल एखाद्या चमत्कारासारखेच आहे. कारण, तेल लावताच तूम्हाला शांत व गाढ झोप लागते.


पायाच्या दुखण्यावर आता गोळी खाण्याची गरज नाही. पाय आणि गुडघे पाठदुखीवर निलगिरी तेल फायद्याचे ठरते. डोळ्यांची नजर कमजोर झाली असेल तर त्यावरही हे तेल कमालीचे गुणकारी ठरत आहे.


जर नीलगिरीचे तेल छातीवर लावले, तर ते जडपणाची समस्या दूर करते. यामुळे शरीराला ऑक्सिजन अधिक चांगल्या प्रकारे मिळू शकेल. त्याच्या अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांमुळे ते फुफ्फुसातील जळजळ आणि संसर्ग दूर करण्यासाठी देखील मदत करते.


डोकेदुखी, थकवा किंवा तणाव झाल्यास त्या तेलाचे दोन थेंब कपाळावर लावा आणि हलक्या हातांनी पसरवा. यानंतर, काही काळ झोपा. भरपूर विश्रांती घ्या. अरोमा थेरपीमध्ये देखील हे तेल वापरले जाते.


*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

*डॉ. प्रमोद ढेरे,*


*माहिती आवडल्यास शेअर करायला विसरू नका. धन्यवाद 🙏🏻*


_*(

अरे संसार संसार, गाऊन आता आधार


 

तांदळाच्या.. पाण्याचे.. पेजेचे.. आरोग्यदायि फायदे*

 *तांदळाच्या.. पाण्याचे.. पेजेचे.. आरोग्यदायि फायदे*



१) तांदळाच्या पेजेत काळे मीठ टाकुन प्यायल्यास भूक वाढते.

२) तांदळाच्या पेजेत मध मिसळून प्यायल्याने एनर्जि मिळते. थकवा दूर होतो.

३) तांदळाचि पेज व गूळ एकत्रित करून प्यायल्यास

 रक्ताचि कमतरता दूर होते.

४) तांदळाच्या पेजेत लिंबूचा रस टाकल्याने पोटाच्या समस्या दूर होतात.

५) तांदळाच्या पेजेत दहि टाकून प्यायल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.

६) केळे व तांदळाचि पेज एकत्र करून प्यायल्याने जुलाब बंद होतात, 

७) तांदळाच्या पेजेत तूप मिसळून प्यायल्याने वजन वाढते.

८) तांदळाच्या पेजेत मीठ व जीरे मिसळून प्यायल्यास

 डायजेशन सुधारते.

९) भाताच्या पेजेत कार्बोहायड्रेटस् चे प्रमाण अधिक असते त्यामूळे उर्जा मिळते बाहेर जातांना पिउन जावे दिवसभर ताजेतवाने वाटते.

१०) वायरल संसर्गाने उलट्या, मळमळ होत असेल तर जेवणाऐवजि पेज घ्यावि, आजारपणात आलेली कमजोरि दूर होते.

११) उच्च रक्तदाब कमी होतो ः। तांदळाचे पाणी घेतल्यास हाय ब्लडप्रेशर कमि होते. कारण यात पोटँशिअम मुबलक प्रमाणात असते.

१२) तांदळच्या पाण्याने चेहरा धुतल्यास तजेलदार, मूलायम होतो, काळे डाग निघून जातात.

१३) केसांकरता उत्तम टाँनिक आहे. याच्या पाण्याने केस धुतल्यास कोंडा निघून जातो, केस रेशमि, चमकदार, व मजबूत होतात. रूक्षता निघून जाते

 दुतोंडि केसांचि समस्या दूर होते, कारण यात मुबलक विटामिन, मिनरल असतात.

१४) तांदळाच्या पाण्याचे नियमित सेवन केल्यास कँसरच्या पेशि आटोक्यात राहतात.

१५) तांदळाच्या पाण्यात फायबर भरपूर प्रमाणात असल्याने मेटाबाँलिज्म वाढते, पचनक्रिया सुरळित चालते. त्यामुळे आरोग्य चांगले राहते.

२६) डायरियात डिहायड्रेशन होते अश्या वेळि तांदळाचि पातळ पेज प्यायला द्यावि. ताकद येते.

१७) सर्दि, पडसे, ताप, वायरल इंनफेक्शन मध्ये

 तांदळाचे पाणि प्यायल्यास प्रतिकारशक्ति वाढून हे आजार दूर होतात.




*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा

*

जाखमाता मंदिर, नारंगी, रामराज अलिबाग रायगड सोहळा


 

Featured post

Lakshvedhi