Monday, 3 April 2023

निस्तबध.

 


हार्ट अटॅक पासून दूर राहा

 *हार्ट अटॅक पासून दूर राहा* 


*हार्ट अटॅक ची काही लक्षणे-* 

तुम्हाला हार्ट अटॅकची काही लक्षणे ही माहित असायला हवीत, जेणेकरून तुम्ही खूप जास्त सतर्क राहू शकता. थकवा येणे, झोप कमी लागणे, आंबट ढेकर येणे, सतत चिंता सतावणे, ह्रदयाची धडधड वाढत जाणे, हातांमध्ये कमजोरी जाणवणे किंवा जडपणा जाणवणे,अंगदुखी,पाठ दुखी, विसरभोळेपणा सुरु होणे, दिसायला कमी लागणे, कमी भूक लागणे, हात पायांना मुंग्या येणे, रात्री श्वास घेताना समस्या निर्माण होणे या सर्व गोष्टी म्हणजे हार्ट अटॅकची लक्षणे असू शकतात. ही दिसू लागल्यावर लगेच डॉक्टरांशी संपर्क साधावा.


*हार्ट अटॅकची कारणे-* 

लक्षणे तर आपण पाहिली पण हार्ट अटॅक नक्की कशामुळे येऊ शकतो जे जाणून घेणे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. लठ्ठपणा, मधुमेह, हाय कोलेस्टेरॉल, हाय बिपी, धुम्रपान, मद्यपान, हाय फॅट डायट ही सर्व हार्ट अटॅकची कारणे ठरू शकतात. त्यामुळे तुम्ही या सर्व कारणांकडे लक्ष दिले पाहिजे. शक्य तितके जास्त हेल्दी जगा, हेल्दी खा आणि तंदुरुस्त रहा. यामुळे तुम्हाला असलेला हार्ट अटॅकचा धोका खूप जास्त कमी होऊ शकतो आणि तुम्ही अधिक काळ निरोगी आयुष्य जगू शकाल.


*स्वत:चा कसा बचाव करावा ?* 

आता तुमच्या मनात हा प्रश्न आला असेल की स्वत:ला हार्ट अटॅक पासून वाचवावे कसे? सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमचे हृदय सुरक्षित राखायचे असेल तर आहारावर लक्ष द्या. सध्या धकाधकीच्या काळात हेल्दी आहाराकडे लक्ष राहत नाही आणि हेच हार्ट अटॅकला आमंत्रण ठरू शकते. शिवाय तुम्हाला धुम्रपान आणि मद्यपानाची सवय असेल तर ही सवय सोडा. कोणत्याही प्रकारे धुम्रपान आणि मद्यपानाचे समर्थन करता येणार नाही. त्यामुळे निरोगी सवयी आत्मसात करा आणि स्वत:चा हार्ट अटॅक पासून बचाव करा.


*संकलन-* 

*डॉ. प्रमोद ढेरे,


*⭕️

अलभ्य लाभ नेत्र सुख

 सुरत मधील डी. खुशालभाई ज्वेलर्स ने राम मंदिराच्या चांदीच्या प्रतिकृती बनवल्या आहेत. 


डी. खुशालभाई ज्वेलर्स चे मालक दीपक चोकसी यांनी सांगितलं की राम मंदिर भारतीय संस्कृती चे एक प्रतीक आहे त्यामुळे आम्ही मंदिराच्या चांदीच्या प्रतिकृती बनवण्याचा विचार केला.सध्या अयोध्या मधील मार्केट मध्ये या चांदीच्या प्रतिकृतीची तुफान चर्चा सुरु आहे.


रामनवमी उत्सवाचे औचित्य साधून त्यांनी राम मंदिराच्या चांदीच्या वेगवेगळ्या आकारातील चार प्रतिकृती बनवल्या आहेत ज्या अत्यंत सुंदर असून त्यांनी अयोध्येतील मार्केट मध्ये खूप कौतुकाची लूट केली आहे. यातील सर्वात छोट्या चांदीच्या प्रतिकृती चे वजन सहाशे ग्रॅम असून सर्वात मोठ्या प्रतिकृतीचे वजन तब्बल पाच किलो आहे. 


जेव्हापासून या मंदिरांच्या प्रतिकृतीची वार्ता अयोध्येमध्ये समजली तेव्हापासून भाविकांनी खूप मोठ्या संख्येत या मंदिरांच्या प्रतिकृतीची मागणी वाढत जातं आहे. 

आपल्या श्रीराम मंदिर बनून तयार झालेल्या वर्षाची आठवण आणि श्रीरामांप्रती असलेल्या प्रेमासाठी या प्रतिकृती आपल्या घरातील देव्हाऱ्यात ठेवण्यास अनेक लोकं उत्सुक आहेत. 


जय श्री राम!🙏🚩


जय हिंद!🇮🇳

-जयसिं


ग मोहन 🚩

जिंदगी

 *बर चाललंय आयुष्यात, हे आपण कोणालाही सांगू शकतो. पण खरं काय चाललंय आपल्या आयुष्यात, हे सांगायला जवळचाच माणूस लागतो.*   

 ________❤️_______

         *शुभ सकाळ*🔆🐾🔆🔆🐾🔆🐾🔆🐾🔆        

          *"देवाने प्रत्येकाच आयुष्य*

            *कसं छान पणे रंगवलय.*

          *आभारी आहे मी देवाचा*

            *कारण माझं आयुष्य*

                *रंगवताना देवाने ..*

         *तुमच्यासारख्या माणसांचा*

       *रंग माझ्या आयुष्यात भरलाय"*

         ❤ 💖 😍 💖 

*माणसाच्या मुखात गोडवा...*


       *मनात प्रेम...*

   *वागण्यात नम्रता...*

         *आणि*


*हृदयात गरीबीची जाण असली की...*


*बाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडत जातात...!*


 🌻🌹🌻

: 🕉️🕉️🕉️

*तुम्ही चांगले आहात की वाईट हा विचार कधीच करू नका.*

*कारण लोकांना गरज पडली की तुम्ही चांगले आणि*

*गरज संपली की वाईट.*

                *शुभ दिन*

चिवळिचि भाजि...घोळ..*

 *चिवळिचि भाजि...घोळ..*


.... उन्हाळ्यात शरिरातील उष्णता वाढते अशा वेळी आपण आहारात बदल करून हा त्रास कमी करू शकतो.. अशीच एक उपयोगी भाजि आहे.. चिवळि👇


.. चिवळिचे औषधि गुणधर्म... या वनस्पतीच्या बिया मुत्रपिंडावर सूज आल्यास, किंवा युरिन साफ होत नसेल तर वाटून मग पाण्यात मिसळून , गाळून घ्यावे. त्रास दूर होतो.


. तसेच रक्तपित्त झाले असेल तर. जसे नाकाचा घोळणा फुटणे, कफातून रक्त येणे, दातातून रक्त येणे, असा त्रास होत असेल तर, चिवळि भाजिचा ताजा रस काढून घ्यावा. याने आराम मिळतो

.. कुठेही मार लागला किंवा ठेच लागली तर, सूज कमी होण्यासाठी चिवळिचि भाजिवाटून याचा लेप तिथे लावल्यास वेदना व सूज कमी होते.

...हि भाजी अतिशय थंड असल्याने मूळव्याधीवर उपयुक्त आहे याच्या रूग्णांनी नियमितपणे चिवळिचि भाजि खाल्ल्यास मूळव्याध बरि होते.


.चिवळिचि भाजि हि शीतल, ग्राहि,. शोथहारक, व रक्तशुद्ध करते, तळपायाची आग होणे, डोळे जळजळ करणे, हे त्रास बरे होतात.उन्हाळ्यात लहान बाळांना उष्णतेमुळे त्रास होतो, अशा वेळी यांना

 चिवळिच्या भाजित गुंडाळून ठेवले तर त्यांना बरं वाटतं. आणि अंगावर घामोळे येत नाही

.....

... एकूण च . उन्हाळ्यात उष्णतेचा त्रास न होण्यासाठी हि भाजी नियमितपणे आहारात ठेवावि..


 सुनिता सहस्रबुद्धे.....


*⭕️

येथील बुर्ज खलिफा टॉवरवर, रामनवमीच्या दिवशी श्रीरामाचे चित्र

 🌹🌹जगातील सर्वात उंच टॉवर, दुबई येथील बुर्ज खलिफा टॉवरवर, रामनवमीच्या दिवशी श्रीरामाचे चित्र झळकविण्यात आले, किती अभिमानाची गोष्ट आहे आम्हा हिंदूंसाठी,एका मुस्लिम राष्ट्रात हे घडते, साऱ्या जगाचं लक्ष असते 🌹🌹


Sunday, 2 April 2023

स्वछ सर्वेक्षणच्या नावाखाली नवी मुंबई मनपाचा करोडोंचा घोटाळा

 स्वछ सर्वेक्षणच्या नावाखाली नवी मुंबई मनपाचा करोडोंचा घोटाळा  

झालेल्या कामांच्या चौकशीसाठी ई डी (ED) विभागाला देणार निवेदन 


अधिक माहितीसाठी :- 9321804481 / 8689861548 श्री.योगेश महाजन 


नवी मुंबई :- ‘स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत होणाऱ्या रंगरंगोटीच्या झालेल्या कामांचे टेंडर काढून त्या द्वारे लाखोंचा भ्रष्टाचार होत असल्याची बाब सामाजिक कार्यकर्ते योगेश महाजन यांनी मनपा आयुक्त व शहर अभियंता यांच्या निदर्शनास आणून दिली. तर अश्या प्रकारे टेंडर काढण्यात येऊ नये अशी निवेदनाद्वारे मागणीही केली होती.त्या मागणीनंतरही तीन ठिकाणी झालेल्या कामांचे टेंडर काढण्यात आले.सदर बाब महाजन यांनी आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या निदर्शनास आणून दिली असता त्यांनी चौकशी करण्याच्या सूचना दिल्या.तरीही झालेल्या कामांचे टेंडर काढण्याचे कामे सुरूच असल्याने आता पर्यंत झालेल्या सर्व कामांची चौकशी करून त्यात दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी ई डी (ED) विभागाकडे करणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते योगेश महाजन यांनी दिली.

                  गत वर्षी झालेल्या ‘स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत करोडोंचा घोटाळा झाला असल्याची बाब निदर्शनास आली होती.त्यानंतर त्यात सुधारणा होणे गरजेचे असतांना पुन्हा या वर्षी होणाऱ्या ‘स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत २०२३ मध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा होत असल्याची बाब समोर आली आहे.यावर मनपा आयुक्त राजेश नार्वेकर सह संबंधित अधिकारीही गप्प असल्याने या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी ई डी (ED) विभागाकडे लेखी तक्रार करणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते योगेश महाजन यांनी दिली. ठाणे - बेलापूर रोड (टी बी आर) विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा प्रकार समोर येत असून जी कामे अगोदरच झाली आहेत त्याचे टेंडर मात्र आता काढण्यात येत आहे.(टी बी आर) विभागाअंतर्गत येणाऱ्या तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, रबाळे व ऐरोली अश्या पाच रेल्वे स्टेशनवर काही महिन्यांपूर्वी रंगरंगोटीची कामे करण्यात आली आहेत.तरीही काही दिवसांपूर्वी ऐरोली रेल्वे स्टेशन परिसरातील विविध ठिकाणी भिंतीस रंगरंगोटी करून सुशोभीकरण करण्यासाठी ३०,६५,४५२/- रुपयांचे टेंडर काढण्यात आले आहे.सदरील टेंडर हे रद्द करून इतर टेंडर काढू नये असे लेखी निवेदन १६ मार्च २०२३ रोजी मनपा आयुक्त व शहर अभियंता यांना देण्यात आले.यावर झालेल्या टेंडर ची चौकशी करण्याऐवजी पुन्हा २०/०३/२०२३ रोजी तुर्भे रेल्वे स्टेशन परिसरातील विविध ठिकाणी भिंतीस रंगरंगोटी करून सुशोभीकरण करण्यासाठी २९,१४,९७२ /- रुपयांचे टेंडर काढण्यात आले,घणसोली रेल्वे स्टेशन परिसरातील विविध ठिकाणी भिंतीस रंगरंगोटी करून सुशोभीकरण करण्यासाठी २५,९७,९७६ /- रुपयांचे टेंडर काढण्यात आले तर कोपरखैरणे रेल्वे स्टेशन परिसरातील विविध ठिकाणी भिंतीस रंगरंगोटी करून सुशोभीकरण करण्यासाठी ३०,६५,४५२ /- रुपयांचे टेंडर काढण्यात आले आहे.अत्यंत घाईघाईत हे टेंडर काढण्यात आले असून ते भरण्यासाठी आणि उघडण्यासाठी फक्त सात दिवसांचा अवधी देण्यात आला आहे.सूचना देऊनही (TBR) विभागात मोठ्या प्रमाणात करोडोंचे टेंडर काढण्यात येत असल्याने अधिकारी व ठेकेदार हे कोणालाच जुमानत नसल्याची बाब निदर्शनास येत आहे.सामान्य नागरिकांचा कररूपी मिळणारा पैसा जर अधिकारी व ठेकेदार लुटून खात असतील तर कश्याला ‘स्वच्छ सर्वेक्षण हवे असा प्रश्न महाजन यांनी उपस्थित केला आहे. यामुळेच (टी बी आर) विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष सोनावणे यांना तत्काळ निलंबित करून झालेल्या कामाची चौकशी करून करोडोंचे बिनकामी टेंडर तत्काळ रद्द करावे अशी मागणी योगेश महाजन यांनी केली आहे.त्याचबरोबर ‘स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत होणारा करोडोंचा भ्रष्टाचार पाहता आतापर्यंत झालेल्या सर्व ‘स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत झालेल्या कामांची ई डी (ED) विभागाकडून कारवाई होणे गरजेचे आहे अशी प्रतिक्रिया यावेळी महाजन यांनी व्यक्त केली आहे.


Featured post

Lakshvedhi