*चिवळिचि भाजि...घोळ..*
.... उन्हाळ्यात शरिरातील उष्णता वाढते अशा वेळी आपण आहारात बदल करून हा त्रास कमी करू शकतो.. अशीच एक उपयोगी भाजि आहे.. चिवळि👇
.. चिवळिचे औषधि गुणधर्म... या वनस्पतीच्या बिया मुत्रपिंडावर सूज आल्यास, किंवा युरिन साफ होत नसेल तर वाटून मग पाण्यात मिसळून , गाळून घ्यावे. त्रास दूर होतो.
. तसेच रक्तपित्त झाले असेल तर. जसे नाकाचा घोळणा फुटणे, कफातून रक्त येणे, दातातून रक्त येणे, असा त्रास होत असेल तर, चिवळि भाजिचा ताजा रस काढून घ्यावा. याने आराम मिळतो
.. कुठेही मार लागला किंवा ठेच लागली तर, सूज कमी होण्यासाठी चिवळिचि भाजिवाटून याचा लेप तिथे लावल्यास वेदना व सूज कमी होते.
...हि भाजी अतिशय थंड असल्याने मूळव्याधीवर उपयुक्त आहे याच्या रूग्णांनी नियमितपणे चिवळिचि भाजि खाल्ल्यास मूळव्याध बरि होते.
.चिवळिचि भाजि हि शीतल, ग्राहि,. शोथहारक, व रक्तशुद्ध करते, तळपायाची आग होणे, डोळे जळजळ करणे, हे त्रास बरे होतात.उन्हाळ्यात लहान बाळांना उष्णतेमुळे त्रास होतो, अशा वेळी यांना
चिवळिच्या भाजित गुंडाळून ठेवले तर त्यांना बरं वाटतं. आणि अंगावर घामोळे येत नाही
.....
... एकूण च . उन्हाळ्यात उष्णतेचा त्रास न होण्यासाठी हि भाजी नियमितपणे आहारात ठेवावि..
सुनिता सहस्रबुद्धे.....
*⭕️
No comments:
Post a Comment