Monday, 27 March 2023

आरोग्य संदेश

 हिवाळा व उन्हाळ्यात त्वचेवर रँश आल्यास, एलोवेरा ज्यूस लावावा,

  आणि पोटातून हि घ्यावा..


(2) कोकम बटर हे आयुर्वेदिक शाँपला मिळतं ते गरम करून त्वचेला लावावे नरम पडेल व रँश जाईल


(३) शुद्ध खोबरेल तेल त्वचेला लावावे

 तसेच शुद्ध तूप गायिचे लावावे।।


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठीlakshvedhimm. blogspot.com जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*





आहार सेवनाविषयीचे नियम

 📌 आहार सेवनाविषयीचे नियम 📌


🍎अन्न नेहमी ताजे व गरम जेवावे.असे अन्न स्वादिष्ट तर असतेच शिवाय लवकर व चांगले पचते.फारच थंड वा फारच गरम अन्न मात्र कधीच खाऊ नये.


🍎अगदी कोरडे अन्न वा तेलातुपाने नुसते माखलेले अन्न खाऊ नये.अगदी कोरडे अन्न म्हणजे रुक्ष अन्न खावयास तर त्रास होतोच पण पचावयास देखील त्रास होतो.


🍎अन्नाचे प्रमाण भूक व पचनशक्ती यांच्या अनुमानाने योग्य तेवढे जर ठेवले तर त्रिदोषांना कोठेही न बिघडवता तीनही दोषांचे योग्य असे पोषण करण्यास ते सक्षम ठरते.


🍎भूक लागल्याशिवाय जेवू नये.भूक लागणे हे आधीचे जेवण पचले आहे असे समजण्याचे साधन आहे.


🍎आधी खाल्लेले अन्न नीट पचल्याखेरीज जेवू नये.अन्यथा अन्नपाचक रसांना,आतड्यांना ताण येतो व पचनसंस्था बिघडते.


🍎दोन परस्परविरोधी अशा प्रकारचे अन्न एकाच वेळी व एकामागून एक असे खाऊ नये.अशाने रोगाला आमंत्रण मिळते.


🍎अस्वच्छ जागी बसून जेवू नये.याने जंतुसंसर्ग वाढतो.


🍎खूप भराभर असे जेवू नये.अशाने ठसका लागण्याचा संभव निर्माण होतो व अन्नाचा तिटकारा वाटण्याची शक्यता निर्माण होते.


🍎अति सावकाश रेंगाळत देखील जेवू नये.असे केल्यास जेवण तर गार होतेच शिवाय पचन मंदावते,भूक नीट भागत नाही व जेवणाचे समाधान होत नाही.


🍎जेवताना टीव्ही, मोबाईल,लॅपटॉप,व्हिडीओ गेम्स हे काटेकोरपणे टाळावे.यामुळे जेवणात लक्ष राहत नाही.


🍎यासाठी जेवणासारखी अत्यंत महत्वाची गोष्ट पूर्णपणे लक्ष देऊन स्वतःसाठी काय योग्य आणि काय अयोग्य याचा विचार करून प्रसन्न मनाने करावी.


📚संदर्भ-- डॉक्टर मी काय खाऊ?


📝माहिती संकलन👇

डॉ.स्वाती पाटील





जीरे... 👇*

 *जीरे... 👇*


   आपल्या देशात मसाल्याच्या पदार्थांना विशेष महत्त्व आहे.मसाले हे केवळ स्वाद वाढवत नाही तर, ते स्वास्थपूर्ण देखील आहे.जिरे शरिराच्या सर्व अवयवांसाठि खुप फायदेशीर आहे. आपण बघूया यांचे गुणकारी फायदे

    हाताला खुप घाम येत असेल तर जीरे पाण्यात उकळवावे.व थंड करा दिवसातून दोन तीन वेळा हे पाणी प्यावे. आराम पडेल., ३ग्राम जिरे व १५ग्राम फटकि फडक्यात बांधून गुलाबपाणी यात भिजत ठेवा. डोळे दुखल्यास किंवा लाल झाले तर त्यावर ही पुरचुंडी ठेवा. आराम मिळतो., जिर्यात थोडे व्हिनेगर घालून खाल्ल्यास न थांबणारी उचकि थांबते. रोज एक चिमूटभर कच्चे जिरे खाल्ल्यास अॅसिडिटि मुळापासून नष्ट होते.मधूमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी एक छोटा चमचा जीरे दिवसातून दोन वेळा पाण्यासोबत घ्या. नक्कीच फायदा होईल.जिर्यात गूळ घालून त्याच्या गोळ्या बनवून खाव्यात मलेरिया वर रामबाण औषध आहे.जिर्यात लिंबाचा रस व सैंधव मीठ घालून यांचे सरबत घ्यावे. मळमळ आणि उलटि आल्यासारखे वाटणे बंद होते., दह्यात भाजलेल्या जिर्याचे चूर्ण घालून खाल्ल्यास. जूलाब, डायरिया. बरा होतो.जिर्यात विटामिन ई भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे सर्व प्रकारचे त्वचा विकार बरे होतात..


               

  अतिशय रुचकर व पाचक म्हणून जिरे काम करते. अजिर्ण, व अपचन झाल्यास एक वाटी गोडसर ताकात जिरेपूड घालून घेतल्यास आराम मिळतो.लहान मुलांना नेहमी जंत होतात तेव्हा त्यांना १ग्रामजिरेपूड, १ग्राम वावडिंग गुळासह दिल्यास उपयोग होतो... स्त्रियांना श्वेतप्रदरचा त्रास असतो व पाळितहि अतिस्राव होतो, अशा वेळी जिरेपूड, खडिसाखर तांदळाच्या धुवणासोबत दिल्यास फायदा होतो.. तांदूळ.४_५ वेळा धुवून जे पाणी राहतं त्याला तांदळाचे धुवण म्हणतात.

    शरिरात साठलेलि उष्णता व कडकि यावर रोज एक चमचा भरून जिर्याचे चूर्ण घ्यावे. फायदा होतो.धने व जीरे याचि पावडर साखरेबरोबर घेतल्यास पित्ताचा त्रास होत नाही.जेवणानंतर गॅसेसमूळे पोट जड वाटत असेल तर जिरं व ओवा चावून खावे. उपयोग होतो.जिर्याचे नियमित सेवन केल्यास वजन कमी होते. जिर्यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे हाडे मजबूत होतात.ज्याना अनिद्रेचा त्रास आहे. शांत झोप येत नाही त्यांनी एक केळं कुस्करून त्यात भाजलेले जिरे पूड घालावी व खावे याने शांत झोप लागते..जिर्यात नैसर्गिक रित्या लोह भरपूर प्रमाणात असते. तेव्हा रोज याचे सेवन करावे.. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी जिरं मोलाचे कार्य करते. नियमितपणे जीरे पावडर खाल्ल्यास हळूहळू स्मरणशक्ती वाढते.जिरे मानसिक ताण कमी करते तेव्हा रोज एक चमचा जिरे पूड लिंबाच्या सरबतात टाकून घ्यावे.. जिरे रक्ताचे कोलेस्टेरॉल देखील सुधारते. एका अभ्यासातून पुढे आले आहे की ७५ मिलिग्राम जिरं दररोज आठ वेळा घेतल्यास अपायकारक रक्त ट्रायग्लिसेराईड कमी होते.. आणि बर्याच रुग्णांमध्ये दीड महिन्यात आॅक्सिडिझाइड..,,बॅड,, एलडीएल कोलेस्टेरॉल चे प्रमाण सुमारे ..१०% कमी झाले...


     तेव्हा वरील फायदे बघता आपण या मौल्यवान मसाल्याचा वापर आपल्या दैनंदिन आहारामध्ये करून आरोग्य नेहमीच चांगले ठेऊ शकतो..


 सुनिता सहस्रबुद्धे..


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी lakshvedhimm.blogspot.com जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*




_*

रुपयाची गोष्ट

 *इंग्लंड वरून भारतात डॉ.वेलबी चे एक कमिशन आले होते.या कमिशनने रूपायाच्या विनिमयाचा दर ठरवायचा होता. यासाठी जगभरातील अर्थ शास्त्रज्ञाना निमंत्रीत केले होते आणि त्यांची या विनिमयाच्या दराबद्दल

मांडलेली मते ऐकली,

शेवटचे मत डाॅ.बाबासाहेब मांडणार होते, इतक्यात डॉ.वेलबी बाबासाहेबांना म्हणाले, डॉ.आंबेडकर,मी जगातील प्रसिध्द विद्वान अर्थ शास्त्रज्ञांची मते

व संदर्भ ऐकली आहेत तेंव्हा आपले मत मला ऐकण्याची अवश्यकता आता वाटत नाही!

यावर बाबासाहेब नम्र व शांतपणे म्हणाले, डॉ.वेलबी आपण ज्या विद्वान व प्रसिध्द अर्थ शास्त्रज्ञांची जी मते व संदर्भ ऐकलेत त्या विद्वान व प्रसिध्द अर्थ शास्त्रज्ञानी ज्या पुस्तकातील हे संदर्भ सांगितले त्या पुस्तकांचा मी लेखक आहे.

त्या पुस्तकांतील काही भाग लिहिणे अजुन बाकी आहे. तो मीच पुर्ण करू शकतो ! 

हे ऐकुन डॉ. वेलबी खाली उतरले बाबा साहेबांच्या हातात हात घालून माफी मागितली व रूपायाच्या विनिमयाचा दर ठरवण्याचे काम बाबासाहेबांवर सोपवले.

जगाने भारताने त्यांच्या ज्ञानाला स्विकारले . जय हो

राष्ट्रीय संरक्षण अकादमीबाबत पर्यटन विभागासोबत लवकरच बैठक घेणार

 राष्ट्रीय संरक्षण अकादमीबाबत पर्यटन विभागासोबत लवकरच बैठक घेणार


- मंत्री अतुल सावे


             मुंबई, दि. 25 : “नायगाव येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय संरक्षण अकादमी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अकादमीबाबत पर्यटन विभागासोबत लवकरच बैठक घेणार आहे”, असे मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत सांगितले.


            विधानसभा सदस्य छगन भुजबळ यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.


            मंत्री श्री. सावे म्हणाले की, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव सातारा जिल्ह्यातील मौजे नायगाव येथे महाज्योती संस्थेमार्फत मुलीकरिता निवासी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यास 24 कोटी रुपयांचा निधी महाज्योती संस्थेस उपलब्ध करून देण्यात आला आहे. ही जागा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या ताब्यात असून जागा हस्तांतरणाची कार्यवाही चालू आहे.


            यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी सहभाग घेतला.

उन्हाळ्यात डास 🦟 खूप चावतात, रात्रीची झोप 🤯 उडाली

 🙋🏻‍♀️ *उन्हाळ्यात डास 🦟 खूप चावतात, रात्रीची झोप 🤯 उडाली? घरच्याघरी करा १ सोपा उपाय, पळवा डास 🦟🦟🦟🦟*


उन्हाळा ⛱️ सुरू झाला की नकळत डासांची 🦟 संख्या वाढायला लागते आणि एरवी संध्याकाळच्या 🌄 वेळी येणारे डास 🦟 दिवसाही चावायला लागतात. घराच्या 🏡आजुबाजूला असलेला कचरा, गवत 🎋 आणि पाण्याची डबकी यांमुळे दिवसा आणि रात्रीही वेगवेगळ्या प्रकारचे डास 🦟 आपल्या कानाशी👂🏻सतत गुणगुणत असतात. डास 🦟 चावले की आपल्याला आपल्याला नकळत त्याठिकाणी खाज सुटते. मग तिथे खाजवल्यानंतर लाल फोड येतो, त्याची आग 🔥 होते आणि आपली चिडचिड 😫 व्हायला लागते. इतकेच नाही तर डास 🦟 चावल्याने डेंगी, चिकनगुन्यासारखे गंभीर आजारांचे प्रमाणही 📈 वाढल्याचे मागील काही वर्षात आपण पाहत आहोत.


डास 🦟 हे केवळ झाडं 🌳, साचलेले पाणी किंवा कचरा यांमुळेच वाढतात असं नाही. तर हवेतील दमटपणामुळेही 🏝️ डासांचे प्रमाण वाढू शकते. याबरोबरच माश्यांचे 🐝 प्रमाणही या दिवसांत वाढलेले असते.


💁🏻‍♀️ यावर उपाय म्हणून आपण घरात इलेक्ट्रीक कॉईल किंवा आणखी काही उपाय करतो. पण त्यामध्ये असणारे रासायनिक घटक आरोग्यासाठी चांगले असतेच ❌ असे नाही. लहान मुले 👶🏻👧🏻 किंवा ज्येष्ठ नागरीकांना 👨🏻‍🦳👵🏻 त्याच्या उग्र वासाने 😤 त्रास होण्याची शक्यता असते. अशावेळी घरच्या घरी करता येतील असे नैसर्गिक उपाय करता आले तर? म्हणूनच घरात उपलब्ध असणाऱ्या गोष्टींचा वापर करुन डासांपासून 🦟 सुटका करुन घेण्याचा सोपा उपाय आज आपण पाहणार आहोत. 


१. एका ताटलीमध्ये एक गोलाकार स्टँड 🫕 ठेवा. 


२. त्यामध्ये ८ ते १० कडूनिंबाची पाने 🌿, २ तमालपत्र 🍃 आणि ४ लवंगा घाला. 


३. यामध्ये कापूर आणि मोहरीचे तेल 🥄 घाला. 


४. काडेपेटीची काडी लावून ती त्यामध्ये ठेवून द्या.


५. या मिश्रणाचा धूर होईल आणि एकप्रकारचा वासही 😤 येईल. 


६. घरात सगळीकडे आपण धूप ज्याप्रमाणे फिरवतो त्याप्रमाणे ही ताटली फिरवा. 


७. या नैसर्गिक गोष्टींमुळे डास 🦟 निघून जातात आणि हवा ♻️ शुद्ध होण्यास मदत होते.      


*माहिती आवडल्यास इतरांशी जरूर शेअर करा.* 🤗


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺



उंच माझा झोका

 🙏🏻🔏


वयाच्या 57 व्या वर्षी अमिताभ बच्चन हे दिवाळखोर झाले होते.

*वयाच्या 80 व्या वर्षी त्यांची संपत्ती 3190 कोटी आहे..!*


Think.. पून्हा पून्हा वाचा.


👍👍👍👍👍👍👍

११ ऑक्टोबर 2022. अमिताभ ८० वर्षांचा झाला, तरी त्याला 'अहो-जाहो' करणं अशक्य आहे. जग एवढं बदललं नेहरू गेले, मोदी आले. साधी थिएटर गेली, मल्टिप्लेक्स आली. आता तर सिनेमा मोबाइलवर आला. टांगेवाला *मर्द* गेला आणि ओला, उबेर टॅक्सी आली. कारखाना मालक आणि कामगार यांच्यातल्या *'नमक'* चा संदर्भ बदलला. तरीही अमिताभ नावाचा *'सिलसिला'* सुरूच आहे. या चमत्कारानं आपलंच डोकं जड होतं. तरी, नवरत्न तेलानं मसाज करायला हा आहेच हजर! 


आज ऐंशीव्या वर्षीही अमिताभ पहाटे पाचला उठून सकाळी आठला सेटवर हजर असतो. आजही दिग्दर्शकांच्या सूचनांबरहुकुम काम करत असतो. अमिताभचे समकालीन काळाच्या पडद्याआड गेले. जे आहेत, ते उपकारापुरते उरले. पण, अमिताभ आहेच. कोण्या पन्नाशीतल्या बाल्कीला अमिताभसाठीच *'चिनीकम'* करावा वाटतो किंवा *'पा'* मध्ये अमिताभला लहान मूल करावे वाटते. 'मी भूमिकेसाठी अमिताभची निवड नाही केली, तर अमिताभसाठी भूमिका निवडली', असं बाल्की सांगतो. चाळीशीतल्या नागराज मंजुळेला, ऐंशी वर्षांच्या अमिताभनं आपल्या सिनेमात काम नाही केलं, तर आपल्याला *'मोक्ष'* मिळणार नाही, असं वाटतं. शूजित सरकारलाही अमिताभ हवा असतो आणि करण जोहरलाही. 

काय आहे हे? 


*सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, अमिताभ संपला नाही कारण, तो थांबला नाही. तो साचला नाही.* "आमच्यावेळी असं होतं!", असं माणसं दिवसातला निम्मा वेळ म्हणू लागली की ती संपतात. आपली मुलं-बाळं रांकेला लागली की आपल्या आयुष्याची इतिकर्तव्यता झाली, असं जे मानतात, ते अकाली म्हातारे होतात! सकाळी वॉक, दुपारी एक पोळी, रात्री ग्लासभर दूध एवढंच ज्यांचं आयुष्य होतं, ते त्या शेड्यूलचे गुलाम होतात. तेही ८० वर्षे फीट जगतात, पण केंव्हाच संपून गेलेले असतात. 


अमिताभ संपला नाही. कारण, त्याच्या त्या *'ॲंगी यंग मॅन'* रूपा प्रमाणेच तो सदैव कार्यरत राहिला. अपघात, आजारपणं, दुखणी त्याच्यामागे कमी नाहीत. कौटुंबिक ताण, पोराबाळांची चिंता नाही, असं नाही. उद्योगधंद्याचं तर पार दिवाळं निघालं. राजकारणात अपयशी ठरला. तरी तो उभा राहिला. धावत राहिला. अमिताभ हा अभिनेता वा माणूस म्हणून थोर आहे, असे माझे मत अजिबात नाही. पण, हे जे आहे ते का आहे? काय आहे? ते नाकारून कसे चालेल? अमिताभचा जादुई आवाज, अमिताभचा करिष्मा, कवीचा मुलगा असलेल्या अमिताभची साहित्याची समज, त्याचा आवाका, त्याची खोली हे कसं नाकारणार? रूढ अर्थानं अमिताभकडं ना चेहरा, ना ॲक्शन हीरोची शरीरसंपदा पण, अमिताभ हा अमिताभच असतो. त्याचे डोळे, त्याचे नाक, त्याचा चेहरा, त्याची उंची, त्यांचे शरीर असं सुटं सुटं करून चालत नाही. या सगळ्याचा म्हणून जो एकत्रित परिणाम आहे, तो अभूतपूर्व आहे. *तो अमिताभ आहे!*


परवा लॉ कॉलेज रस्त्यावरच्या बरिस्तात कॉफी पित होतो. पलिकडच्या टेबलवर एक वयोवृद्ध जोडपं बसलं होतं तर, दुस-या टेबलवर काही तरूण मुलं-मुली बसली होती. म्हातारा-म्हातारी पेन्शनपासून टेन्शन आणि मुलीच्या लग्नापासून ते फॉरेन टूरपर्यंत बरंच बोलत होते. तिकडं पोरं एक्झामपासून ते आयपीएल पर्यंत ब-याच गप्पा ठोकत होते. दोन्ही टेबलवरून दोन नावं मात्र सारखी ऐकू येत होती - *अमिताभ बच्चन आणि शरद पवार* हे म्हातारे कॉलेजात होते, तेव्हा शरद पवार आमदार झाले, तर अमिताभच्या 'आनंद'नं लक्ष वेधून घेतलं. किती उन्हाळे-पावसाळे पाहिले, पण हे दोघं आहेतच. पवारांचा पक्ष हरेल. अमिताभचा सिनेमा पडेल. पण, ते आहेत. 


*"सध्या काय करताय?" असं विचारल्यावर पवार परवा एका मुलाखतीत म्हणाले होते- "सेल्फी काढायला शिकतोय!"*

हेच ते कारण आहे, ज्यामुळं माणसं ऐंशीव्या वर्षीही कार्यमग्न असतात. बाकी, *तुम्हालाही नसतील, अशा व्याधी, अशी आजारपणं, अशा समस्या, असे ताण, असे प्रश्न त्यांच्या वाट्याला आहेत,* पण, 'ॲंग्री यंग मॅन'ला डोक्यावर घेणा-यांची नातवंडं कॉलेजात जाऊ लागली, तरीही हा 'यंग मॅन' अमिताभ आहेच आणि पवार ३८व्या वर्षी मुख्यमंत्री झाले, तेव्हा पवारांविषयी बोलणा-यांना आज त्यांची नातवंडं शरद पवारांविषयी सांगू लागली आहेत! 


हे दोन्ही 'बच्चन' आजही कार्यरत आहेत, पण ते दोघेच नाहीत. तिकडे ८५ व्या वर्षी आमचे *भालचंद्र नेमाडे* नव्या प्रकल्पावर अहोरात्र काम करताहेत. त्यांच्या लिहिण्याने नव्या मुलांना आजही झपाटून टाकताहेत. त्याच वयाचे *रतन टाटा* ही पहाटे पाचला उठून दिवस सुरू करताहेत. 


शुभ्रा गुप्ता म्हणते ते खरंय. 

अमिताभच्या घरावर एकच पाटी आहे - 

*"Work in Progress!"*

अमिताभला 'हॅपी बड्डे' म्हणणं म्हणजे अखंड, अविरत, अव्याहत अशा कार्यमग्नतेचं सेलेब्रेशन आहे! *अमिताभ एका रात्रीत जन्माला येत नाही. तो अव्याहत कामातून, कार्यमग्नतेतून, अविचल निष्ठेतून 'अमिताभ' होत असतो.*


हे *'अमिताभपण'* लक्षात घ्यायला हवं. *अविरत चालणं* हा अमिताभचा *'पासवर्ड'* आहे. 

म्हणून, चालत राहा. 

मुक्काम आणि मोक्षाच्या आशा करू नका. 

पडद्यावर धावणारा अमिताभ आठवा आणि तसेच *पॅशनेटली धावत रहा, चालत रहा, अविरत कार्यरत रहा.*

तुम्हीही *अमिताभ बच्चन* व्हाल! 

 👍🏻

Featured post

Lakshvedhi