Sunday, 26 March 2023

अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील नाट्यगृहे सुसज्ज करणार..!

 अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील नाट्यगृहे सुसज्ज करणार..!


सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा निर्धार


रंगभूमी दिननिमित्त राज्यातील सर्व रंगकर्मीना दिल्या शुभेच्छा.

        मुंबई, दि. 26 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित् राज्यातील 52 नाट्यगृहे सर्व सोयीसुविधांसह सुसज्ज व्हावेत, रसिक प्रेक्षक आणि नाट्य कलावंत यांचा विचार करुन मराठी नाट्य चळवळ मोठी व्हावी, यासाठी राज्याचा सांस्कृतिक विभाग कटिबद्ध असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगून जागतिक रंगभूमी दिननिमित्त राज्यातील सर्व रंगकर्मी तसेच या क्षेत्रात काम करणारे अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक व रंगभूमीशी नातं असलेल्या सर्वांना सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुभेच्छा दिल्या.


            श्री. मुनगंटीवार म्हणाले की, येणाऱ्या काळात नाट्य मंदिराचे नाट्यचित्र मंदिर करता येईल का याबाबत नाट्यगृह बांधताना किंवा नूतनीकरण करताना तज्ञ लोकांचा सल्ला घेण्यात येणार आहे.यासाठी ज्येष्ठ रंगकर्मी प्रशांत दामले यांनी तज्ञ मार्गदर्शक म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे ही अत्यंत आनंदाची बाब आहे.


            राज्यातील नाट्य गृहांची स्थिती आणि उद्भवणाऱ्या अडचणी याबाबत बैठकी घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. 52 पैकी रविंद्र नाट्य गृह सांकृतिक विभागाकडे असून इतर सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांकडे आहेत. यासंदर्भातील अडचणी दूर करुन नाट्यगृह अधिक उत्तम व आदर्श करण्याच्या दृष्टीने सूचना देऊन यासंदर्भातील तज्ञ व कलावंत यांच्यासोबत देखील चर्चा झाली. नाट्यगृहात सोलर व्यवस्था व्हावी यासाठी विभागाचे प्रयत्न सुरु आहेत. नाट्य चळवळ सुरू राहावी याकरिता राज्यातील नाट्यगृह आधुनिक करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. नाट्यगृहाचे आधुनिकीकरण करताना नाट्यगृहांमध्ये सोलर, एअर कंडीशन व्यवस्था, साऊंड सिस्टीम, नाट्यगृहाच्या खुर्च्या, मेकअप रूम, प्रकाश व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, प्रसाधनगृह, पार्किंग या सगळया बाबींचा समावेश असणे आवश्यक असल्याचे श्री. मुनगंटीवार म्हणाले.


            कोरोनाच्या काळात मराठी नाटक आणि कलावंत यांच्यावर देखील इतर क्षेत्रांप्रमाणे आर्थिक संकट कोसळले. आता हे क्षेत्र रुळावर येऊ लागले आहे, तरी देखील मुंबईतील नाट्यगृहे जून 2023 पर्यंत सवलतीच्या दरात उपलब्ध व्हावी यासाठी मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त इकबालसिंग चहल यांच्याशी चर्चा केली आहे. अल्प दरात हौशी कलावंतांना नाट्यगृह उपलबद्ध व्हावेत असाही प्रयत्न असणार आहे. नाट्य स्पर्धेच्या परीक्षकांना मानधनात वाढ करण्याचा निर्णय आणि स्पर्धेतील विजेत्या संघातील प्रत्येक कलाकाराला प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.


0000

उन्हाळ्याच्या सुट्टीची तयारी झाली का?


 उन्हाळ्याच्या सुट्टीची तयारी झाली का?


सुट्टीची मुलांची तयारी सुरू झाली असेलच. त्यासाठी ‘भवताल’नेही नियोजन केले आहे. त्याची सुरूवात म्हणून १० वर्षांच्या पुढील मुला-मुलींसाठी भंडारदरा येथे विशेष नेचर-कॅम्प होणार आहे.


विशेष आकर्षण

• भंडारदरा धरणाजवळ तंबूमध्ये मुक्काम

• महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसुबाई शिखरावर ट्रेक

• जगप्रसिद्ध सांधण घळीला भेट

• प्रसिद्ध अमृतेश्वर मंदिर

• रात्रीच्या वेळचा साहसी ट्रेल

• वनस्पती-मुंग्या-दगड यांच्या गोष्टी

• आदिवासी जीवनाची ओळख

• निसर्गाशी जोडणारे अनेक उपक्रम...


चार दिवसांचे भरगच्च नियोजन, अर्थातच निसर्ग-पर्यावरण तज्ज्ञांसोबत !


एक्साइटिंग नेचर कॅम्प @भंडारदरा


४ ते ७ मे २०२३ (तीन मुक्काम - चार दिवस; केवळ ३० सहभागी)


तपशील व नावनोंदणीसाठी लिंक:

https://bhavatal.com/Ecocamp/Bhandardara


मार्गदर्शन


• श्री. अभिजित घोरपडे

(पर्यावरण व भूविज्ञान अभ्यासक)


• डॉ. महेश गायकवाड

(निसर्ग व वन्यजीव अभ्यासक)


शुल्क

रु. ७,८०० / प्रति व्यक्ती

(पुणे ते पुणे; सर्व समावेशक)


अधिक माहितीसाठी:

९५४५३५०८६२ / ९९२२०६३६२१/ ९९२२४१४८२२

कोथिंबीर, कांदा, लसूण यांचे आरोग्यासाठी मोठे फायदे !

 *कोथिंबीर, कांदा, लसूण यांचे आरोग्यासाठी मोठे फायदे !!*


https://chat.whatsapp.com/K4DuEzqiAazB1CS5PY0O75



लसूण, कांदा, कोथिंबीर हे बहुतेक कुटुंबाच्या खाण्यात नेहमीच असते. सुदृढ आरोग्यासाठी त्या तिन्ही पदार्थांचे मोठे फायदे आहेत. पण, अतिसेवन केल्यास त्याचे तोटे देखील होऊ शकतात.


हृदयविकार, न्यूमोनिया, मुतखडा, अशक्तपणा, उच्च रक्तदाब, श्वसनाचे विकार, मधुमेह, क्षयरोग अशा विविध आजारांवर तिन्ही पदार्थ निश्चितच लाभदायक आहेत.


*कोथिंबीर :* 


*१. पचनशक्ती वाढते -* 


कोथिंबीर पोटाच्या समस्या दूर करून पचनशक्ती वाढवते. ताज्या कोथिंबीरच्या पानांना ताकासोबत प्यायल्याने अपचन, मळमळीच्या समस्यांपासून आराम मिळतो. कोथिंबीर, हिरवी मिरची, नारळ आणि अदरकची चटणी बनवून खाल्ल्याने, अपचनामुळे पोटात होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळतो. तसेच अर्ध्या ग्लास पाण्यात दोन चमचे कोथिंबीर टाकून प्यायल्याने देखील पोटदुखीपासून आराम मिळतो.


*२. अशक्तपणा होईल दूर -* 


जर तुम्हाला खूप थकल्यासारखे, अशक्त वाटत असेल किंवा चक्कर येत असतील. तर दोन चमचे कोथिंबीरीच्या रसामध्ये दहा ग्राम मिश्री (खडीसाखर) आणि अर्धी वाटी पाणी मिसळून सकाळ- संध्याकाळ प्यायल्याने थकवा, अशक्तपणा कमी होतो.


*३. श्वासाचे रोग होतील दूर -* 


कोथिंबीर श्वासासंबंधी रोगांना दूर करण्यासाठी खूप फायदेशीर असते. खोकला, दमा किंवा श्वास घेण्यास त्रास होत असल्यास कोथिंबीर आणि मिश्री (खडीसाखर) समान प्रमाणात मिळवून बारीक करा. हे मिश्रण एक चमचा भाताच्या पाण्यात मिळवून रोग्याला पाजा. काही दिवस नियमीत असे केल्याने आराम मिळेल.


*४. मुतखडा, दृष्टी सुधारते -* 


कोथिंबीर रक्तातील इन्सुलिनचे प्रमाण नियंत्रित करते. कोथिंबिरीचे सेवन मूत्रपिंडासाठी देखील खूप फायदेशीर आहे. मूत्रपिंडातील दगड अर्थात मुतखड्याच्या समस्या असलेल्यांनी कोथिंबीर पाण्यात उकळून सकाळी रिकाम्या पोटी प्या. हळूहळू मूत्रमार्गाने मुतखडा बाहेर निघून जातो. हिरवी कोथिंबीर शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी होऊन चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते. दृष्टी कमकुवत असलेल्यांनी निश्चितपणे कोथिंबिरीचे सेवन करावे. हिरव्या कोथिंबीरमध्येही गाजराप्रमाणे व्हिटामिन 'ए' भरपूर असल्याने त्याचा डोळ्यांसाठी खूप फायदा होतो.


*कांदा :* 


*१. रोग प्रतिकारकशक्ती वाढते -* 


कांदा शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करतो. यामध्ये फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन-सी असे अनेक गुण असतात, जे शरीराला निरोगी बनवण्यास तसेच इम्युनिटी वाढविण्यास मदत करतात. पचनाच्या समस्यांवर कांद्याचे सेवन फायदेशीर ठरू शकते. पचनक्रिया मजबूत करण्यासाठी आणि पोट निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही कांदा सलादच्या स्वरूपात खाऊ शकता.


*२. कॅन्सरपासून होईल बचाव -* 


कांद्यामध्ये अँटी कॅन्सर गुण देखील असतात. ते शरीरात कर्करोगाच्या पेशी वाढण्यापासून रोखत नाहीत तर त्यांचा नाशही करतात. अनेक अभ्यासांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, जे कांदा खातात त्यांना कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा धोका कमी असतो.


*३. हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात -* 


जर एखाद्याला उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर त्याने कच्चा कांदा खाल्ला पाहिजे. हृदयाशी संबंधित आजारांमध्येही कांद्याचे सेवन फायदेशीर ठरते. यामुळे हार्ट अटॅकचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होतो.


*४. लोहाची कमतरता भरून निघेल -* 


कांद्याला लोह, फोलेट आणि पोटॅशियमचा उत्कृष्ट स्रोत मानला जातो. कांदा खाल्ल्याने शरीरातील लोहाची कमतरता दूर केली जाऊ शकते. कांद्यामध्ये अँटी एलर्जिक, अँटी ऑक्सिडेंट सारखे गुण असतात, जे शरीराचे अनेक प्रकारच्या इंफेक्शपासून संरक्षण करण्यास मदत करते.


*लसूण :* 


१. डांग्या खोकला, रक्त दोष, घटसर्प, बहिरेपणा, कुष्ठरोग, संधिवात, मुळव्याध, यकृताचे आणि पित्ताशयाचे विकार यावर लसूण गुणकारी आहे. कामोत्तेजना कमी झालेल्यांनाही लसणाचा उपयोग होतो. श्वास मोकळा होण्यासाठी एक लसूण पाकळी गरम करून किंचित मीठ लाऊन खावी. दमा कमी होण्यासाठी एक पेला गरम पाण्यात दोन चमचे मध आणि १० थेंब लसूण रस घ्यावा. झोपण्यापूर्वी ३ लसूण पाकळ्या दुधात उकळून घेतल्याने दमा रात्री त्रास देत नाही.


२. न्यूमोनिया नाहीसा होण्यासाठी एक लिटर पाण्यात एक ग्रॅम लसूण आणि २५० मि.ली. दूध घालून उकळवावे. पाव हिस्सा करावे. हे दूध दिवसातून तीन वेळा घ्यावे. क्षयरोगासाठी लसूण दुधात उकळून घ्यावे, असे आयुर्वेदात सांगितले आहे. लसूण पौष्टिक, वीर्यवर्धक, उष्ण, पाचक, मलनिस्सारक आहे. मुरुमे आणि मोड्या (पिंपल्स) कमी होण्यासाठी लसूण नियमित चेहऱ्यावर चोळावा. नायटा, इसब झालेल्या त्वचेवर लसूण चोळल्याने रोग बरा होतो.


३. रक्तवाहिन्यांवरील दाब, ताण कमी होतो. नाडीचे आणि हृदयाचे ठोके कमी पडतात. लसणाचे सहा थेंब चार चमचे पाण्यातून दोन वेळा घेतल्याने उच्च रक्तदाब नियंत्रित राहतो. वाढलेला रक्त दाब कमी होण्यासाठी लसूण, पुदिना, जिरे, धने, काळी मिरी आणि सैंधव मिठाच्या चटणीचे सेवन करावे.


४. लसणाच्या नियमित वापराने रक्तवाहिन्यांतील साचलेले कोलॅस्टेरोल निघून जाते. रक्तवाहिन्या कडक व कठीण होत नसल्याने हृदयाचा झटका येण्याची संभावना कमी होते. हृदयाचा झटका आल्याबरोबर पाच सहा कच्च्या लसूण पाकळ्या चावून खाल्ल्याने 'हार्ट फेल'चा धोका टळतो.


५. आहारात लसणाचा सातत्याने वापर केल्यास कर्करोगाची शक्यता कमी होते. कारण लसूण कर्करोगाच्या पेशींना वाढू देत नाही. कर्करोगामध्ये नियमित लसणाचे सेवन करत राहिल्याने पांढऱ्या पेशींची वाढ होऊन कर्करोगाच्या पेशींची वाढ ३९ टक्क्यांनी कमी होते.


*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

*डॉ. प्रमोद ढेरे,*


*माहिती आवडल्यास शेअर करायला विसरू नका. धन्यवाद 🙏🏻*



Om शांती ओम

 


वेस्ट फूड

 स्वतःच्या पैशाची पाणीपुरी विकत घेतली तर थाळीतले पाणी सुद्धा पितात... आईसक्रिम घेतली तर झाकण सुद्धा चाटुन जातात... भाजलेले शेंगदाणे घेतले तर टरफल सुद्धा सोडत नाहीत... मग... कुणाच्या लग्न समारंभात जेवायला गेल्यावर अन्न का वाया घालवतात? त्या अन्नासाठी कुणाच्यातरी बापाने उभे आयुष्य कष्ट करुन घालवलेलं असु शकते... म्हणून हात जोडून विनंती आहे की... "मावेल जेव्हढे पोटात, तेव्हढेच घ्यावे ताटात...!"

कृपया अन्न वाया घालवू नका 🌾🌾🙏🙏🙏


मशिद आणि दर्ग्यांच्या जागांवरील अतिक्रमणाबाबत मोजणी करून हद्द निश्चित करणार

 मशिद आणि दर्ग्यांच्या जागांवरील अतिक्रमणाबाबत

मोजणी करून हद्द निश्चित करणार

- मंत्री शंभूराज देसाई

            मुंबई, दि. 25 : मशिद आणि दर्गा यांच्या जागांवर सरकारी कार्यालये वा इमारतींचे अतिक्रमण झालेले नाही. मशिद आणि दर्गा यांच्याजवळ सरकारी कार्यालये असल्याने त्यांच्या हद्दी जवळ असल्याने काही तक्रारी असतील, तर संबंधित ठिकाणी जागेची मोजणी करून हद्दी निश्चित करण्यात येतील, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत सांगितले.


            सदस्य अबू आजमी यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.


            अहमदनगर शहरातील मशिद व दर्ग्यांच्या जागांसंदर्भात अतिक्रमण झालेले नाही, असे मंत्री श्री.देसाई यांनी स्पष्ट केले.


००००

कर्नाटका पॉवर कॉर्पोरेशनबरोबर लवकरच बैठक घेणार

 कर्नाटका पॉवर कॉर्पोरेशनबरोबर लवकरच बैठक घेणार


- मंत्री दादाजी भुसे


            मुंबई, दि.25: कर्नाटक राज्याला वीज निर्मितीसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील जमिनी अधिग्रहीत करुन कोळसा उत्खननाकरिता देण्यात आल्या आहेत. कर्नाटका पॉवर कॉर्पोरेशन हे काम करीत असून काही प्रश्न प्रलंबित असल्याने लवकरच या विषयाबाबत बैठक घेण्यात येईल, असे बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत सांगितले.


            सदस्य किशोर जोरगेवार यांनी कोळसा उत्खननाकरिता घेण्यात आलेल्या जमिनी आणि त्यांना मिळणारा मोबदला या कामांबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती.


            मंत्री श्री.भुसे म्हणाले की, कर्नाटका पॉवर कॉर्पोरेशनबरोबर 15 डिसेंबर 2016 रोजी करार करण्यात आला आहे. अनेक वर्षांपासून येथील शेतकऱ्यांच्या जमिनीला मिळालेला मोबदला याबाबत तक्रारी असल्याने यासंदर्भात लवकरच एक सविस्तर बैठक घेण्यात येईल.



Featured post

Lakshvedhi