Thursday, 23 March 2023

निमखाऱ्या पाण्यातील मत्स्यसंवर्धनासाठी 'सीबा' करार ठरेल मैलाचा दगड

 निमखाऱ्या पाण्यातील मत्स्यसंवर्धनासाठी 'सीबा' करार ठरेल मैलाचा दगड


                               -मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार.

            मुंबई, दि २२ : महाराष्ट्रामध्ये निमखाऱ्या पाण्यातील मत्स्य संवर्धनाच्या दृष्टीने तसेच मत्स्यव्यवसाय क्षेत्रात रोजगार आणि उद्योग वाढीसाठी केलेला 'सीबा'करार मैलाचा दगड ठरेल असा विश्वास वन, मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.


            विधानभवन येथे मंगळवारी मत्स्य विभाग,महाराष्ट्र शासन आणि सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रॅकिश वॉटर अँक्वाकल्चर (CIBA ) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव अतुल पाटणे आणि सीबा चेन्नई चे संचालक कुलदीप कुमार, वैज्ञानिक पंकज पाटील हे उपस्थित होते.


            श्री. मुनगंटीवार म्हणाले की, देशाला फार मोठा सागरी किनारा लाभला असून मच्छीमार बांधवांसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केंद्रात विशेष करुन मत्स्यव्यवसाय मंत्रालय स्थापन केले. केंद्र सरकारच्या आय सी ए आर या सर्वोच्च संस्थेअंतर्गत काम करणाऱ्या सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रॅकिश वॉटर अँक्वाकल्चर सोबत करार झाल्याचा विशेष आनंद होत आहे. राज्यातील सातारा, सांगली, अकोला आणि अमरावती या भागातील खारपान पट्टय़ातील मत्स्यसंवर्धनाचे प्रश्नदेखील यामुळे सोडविण्यास मदत होणार आहे.


            नवीनतम तंत्रज्ञानाचा वापर करुन विविध प्रकारचे मत्स्यवीज निर्माण करणे, पालन, संसाधनांचा उपयोग करून घेणे यासाठी ही संस्था राज्याला मार्गदर्शन करणार आहे. मच्छीमार बांधवांच्या कल्याणासाठी राज्य शासन कटिबद्ध असून या सरकारने डिझेल परतावा, जाळीचे अनुदान , मच्छी मार्केट अश्या अनेक विषयांवर सकारात्मक तोडगा काढला असल्याचे श्री. मुनगंटीवार म्हणाले.


            केंद्र सरकारच्या मत्स्यसंपदा योजनेत निमखाऱ्या पाण्यातील मत्स्यपालन याकडे लक्ष वेधण्यात आले आहे असे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रॅकिश वॉटर अँक्वाकल्चरचे संचालक श्री कुलदीप कुमार यांनी यावेळी सांगितले.


 

पनवेल तालुक्यातील शिरढोण येथील पाणीपुरवठा योजना

 पनवेल तालुक्यातील शिरढोण येथील पाणीपुरवठा योजना

जलजीवन मिशनमधून पूर्ण करणार

- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील


            मुंबई, दि. 21 : राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत रायगड जिल्ह्यातील शिरढोण (ता. पनवेल) येथील नळपाणीपुरवठा योजनेस सन 2017 मध्ये मंजुरी देण्यात आली होती. मात्र, त्यानंतर कोरोना काळात ही योजना रखडली. आता पुन्हा जलजीवन मध्ये ही योजना समाविष्ट करण्यात आली असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.


            विधानपरिषदेत सदस्य जयंत पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या तासात हा प्रश्न उपस्थित केला होता.


            मंत्री श्री. पाटील म्हणाले की, कोरोनामुळे काम थांबल्यानंतर यातील कंत्राटदाराचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे जेवढे काम झाले होते, त्यासंदर्भातील देयक संबंधितांना अदा करण्यात आले. त्यानंतर जल जीवन मिशनमध्ये ही योजना समाविष्ट करण्यात आली असून 2023 अखेर पर्यंत ती पूर्ण केली जाईल, असे त्यांनी सांगितले.  


००००

कडु निंब**

 🌾** कडु निंब**🌾


     ,, हिंदूंचे नविन वर्ष हे,, गुढिपाडव्या,, पासून सुरू होते. चैत्र महिन्यात झाडांना नविन पालवी फुटते आणि उन्हाच्या कडाका जाणवतो. शरिरात उष्णता निर्माण होते, नाना आजार होतात. 

     तेव्हा अश्या आजारांचे प्रमाण कमी व्हावे म्हणून , प्रतिकारशक्ति वाढावि, म्हणून, आपले नविन वर्ष , आरोग्यपूर्ण जावे म्हणून आपल्या पूर्वजांनि पाडव्याला,, कडुनिंबाचे महत्व सांगितले आहे.

       यादिवशि आंघोळिच्या पाण्यात डहाळि टाकून स्नान करतात.( कडुनिंबाचि पाने, मीठ, जीरे, हिंग, ओवा, चिंच गूळ घालून चटणि सेवन करावे.) ती पाने खाउनच दिवसाचि सुरवात करतात. मग बघू या तर इतरहि फायदेः.. अंगात मुरलेलि उष्णता, कडकि कमि करते, रोगप्रतिकार शक्ति वाढवते,

      🌾 गोवर, कांजण्या, घामोळ्या, डोळे येणे , यावर गुणकारि आहे. आवळ्याचे चूर्ण व नीमपत्ति एकत्र करून खाल्ल्यास पित्त कमि होते,( जखमा भरून काढण्यासाठी नीमपत्तिचा लेप लावतात, दारूहळद व ज्येष्ठमध एकत्र करून)..

      रक्तशुद्धिकरता ५/६ पाने चावून खावित सकाळी, याच्या काड्यांनि दात घासल्यास दातातलि किड मरते,, तोंडाचे सर्व विकार बरे होतात. मधूमेह असणार्यांनि कडुनिंबांच्या पंचांगांचा काढा करून प्यावा. नीम तेलाने मालिश केल्यास ,सांधेदूखि कमि होते.

    🌾 त्वते संबंधि सर्व प्रकारच्या विकारांवर गुणकारि.

 चेहर्यावरचे डाग, मुरूमे, पुरळ, लेप लावल्यास जातात.

 कफ, खोकलि, दमा, यांवर खुप लाभदायक. शरिरातिल पि. एच. चा स्तर नियंत्रणांत ठेऊन अल्सरवर मात करता येते. शर्करा नियंत्रित राहते, हे इंसूलिनचे काम करीत असते.

     🌾. कडूनिंबाचि पाने उकळुन थंड करून चेहरा धुवावा, स्वच्छ होतो, कांति नितळ होते. मलेरियाचे डास भटकत नाहि. जिथे कडुनिंबाचे झाड असते,

  केसांना खुप पोषक आहे . ,, लेप लावल्यास काळे राहतात, गळत नाहि, कोंडा होत नाही..

    कानात रस टाकल्यास कर्णविकार सर्व बरे होतात.

 नीम तेलाचे ५,६ थेंब रात्रि झोपतांना दुधातून घेतल्यास घाम येणे, जळजळ, होणे,पोटात, हे बंद होते. 

  🌾 निंबोणिचे चूर्ण बनवून १, २ ग्रँम घेतल्यास अपचन होत नाही, आतडि मजबुत होतात. उन्हाळ्यात उष्माघात झाल्यास , कडूनिंबाचे पंचांग, ( पाने, फुले, फळे, साल, मूळ) याचे चूर्ण घ्यावे.

     विंचवाच्या दंशावर गुणकारि आहे. विषाचा प्रभाव कमी होतो.. ताप कमि होतो, निमरसामूळे, परदेशात देखील एडस्, कँसर, अश्या आजारावर बरे होण्याची औषधे तयार होत आहे.महिन्यातील दहा दिवस निमरस घेतल्यास ,,ह्रुदयरोग बरा होतो,, याच्या रसामूळे मंदाग्नि होत नाही, पचन क्रिया बरि होते. कफदोष, पित्तदोष, बरे होतात..


          आयुर्वेद अभ्यासक..... सुनिता सहस्रबुद्धे...

   🌾 तर असा हा कडूनिंब म्हणजे एक दवाखाना च आहे असे म्हटले तरि चा लेल...🌾🌾🌾...


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*





Wednesday, 22 March 2023

नुकसानीचे युद्धपातळीवर पंचनामे पूर्ण करून लवकरच भरपाईची घोषणा करणार

 नुकसानीचे युद्धपातळीवर पंचनामे पूर्ण करून लवकरच भरपाईची घोषणा करणार


                                                -कृषीमंत्री अब्दुल सत्तार

            धुळे, दि. २२ : अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे राज्यातील काही जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, यात धुळे जिल्हाही आहे. जिल्ह्यातील एकही नुकसानग्रस्त शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही, तसेच येत्या दोन दिवसात युद्धपातळीवर पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना पिकनिहाय योग्य भरपाईची घोषणा अधिवेशन काळातच दोन्ही सभागृहात केली जाईल, असा विश्वास राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज येथे शेतकऱ्यांना दिला.


            धुळे तालुक्यातील आनंदखेडे, साक्री तालुक्यातील काळटेक, सिरबेन, शिंदखेडा तालुक्यातील बेटावर या गारपीटग्रस्त व अवकाळीग्रस्त भागातील नुकसानग्रस्त शेतांची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा देताना कृषीमंत्री श्री. सत्तार बोलत होते. यावेळी आमदार मंजुळाताई गावित, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी एस. डी. मालपुरे, तहसिलदार गायत्री सैंदाणे, सतिश महाले यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.


            यावेळी बोलताना कृषिमंत्री श्री. सत्तार म्हणाले, कांदा, मका, गहू, बाजरी, पपई, कलिंगडासह फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कुठल्याही परिस्थितीत नुकसानग्रस्त शेतकऱ्याला मदत मिळाली पाहिजे ही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भुमिका आहे. त्यासाठी अधिवेशन काळातच नुकसानीचा आढावा घेवून पिकनिहाय समाधानकारक भरपाई देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

सहा महिन्यात १२ हजार कोटींची सर्वाधिक मदत


            गेल्या सहा महिन्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सुमारे १२ हजार कोटींची मदत शासनाने केली आहे. आत्तापर्यंतच्या कुठल्याही सरकारने एवढी मदत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केलेली नाही. यावेळीही शेतकऱ्यांना मदत करताना शासन एनडीआरएफ च्या निकषापेक्षा अधिक दराने मदत करू इच्छिते, असेही यावेळी कृषीमंत्री श्री. सत्तार यांनी सांगितले.

एक लाख ३९ हजार हेक्टरवर नुकसानीचा अंदाज


            यावेळीच्या गारपीट व अवकाळी पावसामुळे सुरूवातीला १३ हजार हेक्टर, नंतर ४० हजार हेक्टर व आत्ताच्या क्षणाला सुमारे १ लाख ३९ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज असल्याचेही यावेळी कृषिमंत्र्यांनी सांगितले.

आंदोलनात असूनही कर्मचाऱ्यांनी केले पंचनामे


            धुळे, नंदुरबार जिल्ह्यात शासकीय कर्मचाऱ्यांनी संपाच्या आंदोलन काळातही शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे केले असल्याची सकारात्मक बाब खुद्द शेतकऱ्यांनीच आपल्याला सांगितले असल्याचे सांगून शेतकऱ्यांप्रती सर्वांच्या भावना संवेदनशील असल्याचे सांगून कर्मचाऱ्यांचे कौतुकही यावेळी कृषिमंत्र्यांनी केले.

अधिवेशनात भरपाईची घोषणा करणार


            धुळ्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनीही यापूर्वीच नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन जिल्हा प्रशासनाशी आणि शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांचेशी चर्चा करून


महसूल व कृषी विभागामार्फत तात्काळ पंचनामे करणेबाबत यापूर्वीच प्रशासनाला आदेश दिले असून पंचनामे झाल्यानंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पिकनिहाय नुकसानीचा आढावा घेवून शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाईची घोषणा करणार आहेत, असेही कृषिमंत्री श्री. सत्तार यांनी सांगितले.

थेट बांधावर जावून पाहणी


            आनंदखेडे, काळटेक, सिरबेन, बेटावर आदि ठिकाणी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिवसभर कृषिमंत्री श्री. सत्तार यांनी पाहणी केली.


 

पवनमुक्तासन*

 *पवनमुक्तासन*


पोटातील वायू 💨आणि अपचन यामध्ये पवनमुक्तासन कां गरजेचे आहे?

भारतात एक जुनी म्हण प्रचलित आहे, जर एखाद्याचा मेंदू 🧠 आणि पोट निरोगी असेल तर ती व्यक्ती ऐश्वर्यसंपन्न होय. थोडक्यात एखाद्याचे मन शांत असेल आणि पोट निरोगी असेल तर ती व्यक्ती तंदुरुस्त आणि समाधानी ☺️ असते. तेंव्हा हे दोन्ही संलग्न असल्याने पचन संस्था निरोगी आणि मजबूत असणे गरजेचे आहे आणि त्यासाठी पोटातील वायू सरण्यासाठी आणि पचन ठीक होण्यासाठी *पवनमुक्तासन* गरजेचे आहे.


*पवनमुक्तासनाचे फायदे*


हे आसन सहसा पोटातील 🫃🏻 हवा बाहेर काढण्यासाठी केले जाते. यासोबतच हे आसन शरीरात साचलेली अशुद्धता दूर करण्यासाठीही अतिशय फायदेशीर आहे. याशिवाय पवनमुक्तासन करण्याचे अनेक फायदे आहेत.


🔰 *गॅस दूर करण्यात फायदेशीर :*

 पवनमुक्तासन करण्याचा सर्वात मोठा फायदा हा आहे की, हे आसन दररोज केल्याने पचनक्षमता तर सुधारतेच शिवाय, पोटातील गॅसेसची 💨समस्या ही दूर होते.

  

🔰 *महिलांसाठी लाभदायी :*

 हे एक असे आसन आहे की, जे महिलांनी 👩🏻जरुर करायला हवे. विशेष करुन गर्भाशयाची समस्या असलेल्या महिलांना हे आसन करण्याचा सल्ला 🗣️दिला जातो. हे आसन गर्भाशयाशी निगडीत असलेल्या समस्या दूर करण्यात मदत करते. शिवाय हे आसन स्त्रियांच्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायी आहे.


🔰 *कंबरदुखीवर सहाय्यक :*

 जर तुम्हाला सियाटिकाची समस्या असेल किंवा तुमची कंबर दुखत असेल, स्लिप डिस्कचा त्रास 😖 जाणवत असेल तर तुम्ही पवनमुक्तासनचा सराव नियमितपणे करायला हवा.

  

🔰 *आर्थरायटिसमध्ये फायदेशीर :*

 हे आसन अ‍ॅसिडिटी, सांधेदुखी 🦵🏻 आणि हृदयाच्या समस्यांनी त्रस्त असलेल्या लोकांसाठीही फायदेशीर आहे. 


*पोटाची नको असलेली चरबी कमी करण्यासाठी पवनमुक्तासन देखील खूप उपयुक्त आहे.*


🔰 *आतड्यांसाठी फायदेशीर :* पवनमुक्तासन केल्याने आतड्यांची कार्ये अधिक सक्रिय होतात आणि हे आसन अनेक विकारांपासून 🦠 आतड्यांना दूर ठेवण्यात मदत करते. याशिवाय हे आसन केल्याने यकृतही आपले काम योग्य प्रकारे करते.


*पवनमुक्तासन कधी करू नये जर तुम्हाला खालील अवस्था अथवा आजार असतील तर पवनमुक्तासन करू नये:*


▪️उच्च रक्तदाब, हृदयविकार, पित्त, हार्निया, स्लीपडिस्क, वृषणविकार, मासिक पाळीचा त्रास, मानेचे व पाठीचे विकार आणि गरोदरपणातील दुसऱ्या तिमाहीपासून करू नये.


( *संकलन:* आर्या देव) 


🤗 *माहिती आवडल्यास इतरांशी जरूर शेअर करा.*)


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


*

पाऊलवाट

 वाघा ची मावशी म्हणल्या जाणाऱ्या मांजरीच्या 4 ऐवजी 2च पाऊलखुणा उमटतात हे माहीत आहे का ? त्याचे मागचे पाय त्याच जागी जातात जिथे त्यांचे पुढचे पाय पाउल ठेवतात. म्हणुनच या वॉकला कॅट वॉक म्हणतात.. 😊 👆🏽Video पहा.. आश्चर्यचकित करणारी वस्तुस्थिती..


चारा छावणी प्रलंबित अनुदानाबाबत मुख्य सचिवांच्या समितीच्या अहवालानंतर निर्णय

 चारा छावणी प्रलंबित अनुदानाबाबत मुख्य सचिवांच्या समितीच्या अहवालानंतर निर्णय


- मंत्री दादाजी भुसे


            मुंबई दि. 21 :- सोलापूर जिल्हातील चारा छावण्या प्रलंबित अनुदान मागणी प्रस्तावासंदर्भात निर्णय घेण्यासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा निर्णय आल्यानंतर निधी उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल, असे मंत्री दादाजी भुसे यांनी विधानपरिषदेत सांगितले.


            सदस्य जयंत पाटील यांनी या संदर्भात लक्षवेधी उपस्थित केली होती.


            मंत्री श्री भुसे यांनी सांगितले की, सोलापूर जिल्ह्यातील चारा छावण्यांच्या प्रलंबित अनुदान मागणी बाबतचे प्रस्ताव संबंधितांकडून जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर यांना सादर करण्यात आलेले आहेत. परंतू अनेक त्रुटी अहवालात आढळून आल्या आहेत. त्यामुळे राज्य कार्यकारी समितीच्या निर्णयाचे तंतोतंत पालन करून तहसिलदार कार्यालयाने अनुदान मागणी केली नाही, असे जिल्हाधिकारी, कार्यालय सोलापूर यांनी कळविले आहे. त्याबाबतची पडताळणी करण्याची कार्यवाही जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर यांच्या स्तरावर सुरू आहे. जिल्हाधिकारी सोलापूर, यांचेकडून याबाबतचा सुधारित प्रस्ताव प्राप्त होताच, सदर प्रस्ताव मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील राज्य कार्यकारी समितीच्या बैठकीमध्ये निर्णयार्थ ठेवून पात्र चारा छावणींची देयके अदा करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत पुढील कार्यवाही लवकरच करण्यात येईल, असे मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.


            सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण येथील चारा छावण्यांच्या प्रलंबित अनुदानाबाबत अहवाल मागवून निधी देण्याबाबत पुढील कार्यवाही करण्यात येईल, असेही मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.


            या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य महादेव जानकर यांनी सहभाग घेतला.


०००

Featured post

Lakshvedhi