Thursday, 16 March 2023

आपणच आपले घर लुटायला कसे आमंत्रण देतो?

 🙏 *आपणच आपले घर लुटायला कसे आमंत्रण देतो?* 🙏


*आपल्या जवळचीच घडलेली सत्य घटना*

( थोडजड जाईल पण हीच सत्य परिस्थिती आहे)


*शाळेत पालकसभेला गेलो होतो, तेव्हा तेथे खास पोलिस अधिकारी ही आले होते, आमची सभा भरवली गेली व त्यांनी आपले वक्तव्य मांडले , " तुमच्यापैकी कितीजण facebook वापरतात?"*

*जवळजवळ सर्वांनी आपले हात उंचावले. तेव्हा त्यांनी एका पालकाला निर्देशून म्हटले, "तुमचे fb friends किती आहेत?"*

*तो इसम ऐटीत बोलला "साहेब पाच हजार!!" जमलेले सर्व आ वासून पाहू लागले. पुढचा प्रश्न विचारला गेला, "यातल्या किती जणांना तुम्ही प्रत्यक्षात ओळखता किंवा भेटला आहात ?"* *आता मात्र त्या व्यक्तीला कसंस वाटू लागले व बोलले," फार फार तर एक हजार"*

*अधिकाऱ्यांनी त्यांना बसायला लावले व त्यांनी आपले पुढील वक्तव्य सुरु केले,*

           *"बघा, म्हणजेच चार हजार व्यक्तींचा त्यांच्याशी फक्त FB परिचय आहे. त्यावर पोलीस अधिकार बोलले आमच्या वारंवारच्या निरीक्षणात व अभ्यासातून असे आढळून आले की, दर पाच माणसांच्या मागे किमान एक criminal mind विचार असतात. आज कालच्या स्वार्थी वातावरणात जेथे काही ठिकाणी घरातल्यांवर विश्वास ठेवणे अवघड झाले आहे व आपण सहजपणे कोणाचीही friend request सहजपणे accept करतो. आणि मानसिक सुख मिळवतो*


 *काही दिवसा पूर्वी आमच्या पोलीस स्थानकात एक केस आली होती. आठ वर्षांची मुलगी बेपत्ता आहे म्हणून. खूप तपास केला व नंतर समोर एक भयंकर व धोकादायक सत्य समोर आले........... त्या मुलीचा शाळेतील पहिला दिवस होता.* *मस्तपैकी तयारी करून झाल्यावर तिच्या वडिलांनी एक मुलीचा छान फोटो काढला व FB वर टाकून लिहिलं,* *"My quite baby going to first day of school."* *चार दिवस ती मुलगी शाळेत गेली व पाचव्या दिवशी गेली ती परत आलीच नाही.* *तपासात कळले कि एक इसम शाळेत fb वरचा फोटो घेऊन आला होता व मुलीच्या घरी problem झाला आहे व त्यामुळे मी तिचा काका तिला घ्यायला आलो आहे असे म्हणून घेऊन गेला.* *अजून खोलवर detail काढल्यावर कळाले कि ही मुलगी त्यानंतरच्या चोवीस तासांच्या आत भारताबाहेर पळवली गेली.* *कारण ही criminal लोक अशी असतात की आपल्या fast साखळीने सर्व तयारी व सूत्र आधीच ready करून ठेवतात व दिवस ठरवून पळवून नेतात.*

 *त्यांनंतर नाही पैशांची मागणी आली ना कुठला फोन. तीन वर्षे झाली, ती मुलगी अजून बेपत्ता आहे.*


*पालकांनो, आता यात चुकी कुणाची? आपल्याचं एका क्षुल्लक चुकीमुळे आपण मुलगी गमावून बसलो हे त्या बापाला किती खोचत असेल.*


 *मुळात ह्या मानसिक समाधानात आपण का अपेक्षा करतो कि आपल्या फोटोवर किंवा तत्सम गोष्टीवर like मिळावं, बाहेरच्या व्यक्तींकडून कौतुक मिळावं व ते ही अंगठा दाखवून,दोन चार comments साठी????*


*ह्या भावनिक आणि मानसिक सोशल मीडिया खेळात आपण आपल्या कुटूंबाच्या व्यक्तीचं सुरक्षित्व हिरावून बसलोय का?? याला जबाबदार आपण आहोत, आपल्या सवयी, आवडी-निवडी एवढ्या विकोपाला पोहचल्या आहेत की त्याशिवाय जगणे व त्यावर नियंत्रण मिळवणे आपल्यालाच कठीण होऊन बसले आहे.*


बऱ्याच वेळा आपली घर लुटण्यासाठी आपण स्वतःहून देतो लुटारुना आमंत्रण!


-●-●-●-●-●-●-●-●-●-●-●-●-

*Fb, whtsapp, insta यावरील selfi, आम्ही इकडे चाललो, इकडे पोहचलो व ते ही proper time सांगून टाकणे* *म्हणजे चोरांना, लुटारूंना आ बैल मुझे मार सारखं होतय. सावरा अन आवरा स्वतःला.* 🤝🙏


आपले वयक्तिक आयुष्य , खाजगी मर्यादित राहुद्यात, ह्यातच सुरक्षा आहे.  


सायबर गुन्हे जनजागृती अभियान, मुंबई.


 *जागरूक व्हा, सतर्क व्हा!*

सीसीटीएनएस राबविणारे देशातील महाराष्ट्र पहिले

 सुधारित :


सीसीटीएनएस राबविणारे देशातील महाराष्ट्र पहिले


- उपमुख्यमंत्री फडणवीस

            मुंबई, दि. १५ : विविध प्रकारच्या गुन्ह्यांच्या तपासामधील गुन्हे प्रकटीकरण, गुन्ह्यांचे पर्यवेक्षण, गुन्हे प्रतिबंध करणे याकरीता सुरू केलेल्या "क्राईम ॲन्ड क्रिमीनल ट्रॅकींग नेटवर्क ॲन्ड सिस्टीम्स' (सीसीटीएनएस) राबविणारे देशातील महाराष्ट्र पहिले राज्य आहे. याची अधिक व्याप्ती वाढवून आता दुसरा टप्पा हाती घेण्यात आला आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले


            विभागनिहाय अर्थसंकल्पीय मागण्यांवर झालेल्या चर्चेला उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी विधानसभेत उत्तर दिले.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, मुंबईत अत्याधुनिक सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासाठी 1406 सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. बारामतीसाठी सीसीटीव्ही बसविण्यासाठी सुद्धा प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे. नक्षलग्रस्त भागात विकासासाठी मोठा निधी उपलब्धता करून देण्यात आला आहे.


            उद्योगाला चालना देण्यासाठी महाराष्ट्राचे नवीन लॉजिस्टिक धोरण तयार करण्यात येत आहे. स्टार्टअपसाठी कळंबोली, नवी मुंबई येथे निवासी प्रशिक्षण-संशोधन संस्था उभारण्यात येणार आहे. नवी मुंबईत जेम्स ॲन्ड ज्वेलरी पार्क उभारण्यात येणार आहे. मैत्री कक्षासाठी 48 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी व्यापार सुलभीकरण (‘इज ऑफ डूइंग बिजनेस’) यावर अधिक भर देण्यात आला आहे.


            कृषीपंपाचेही मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आले आहे. यावर्षी दीड लाख कृषी पंप देण्याचा प्रयत्न आहे. कृषी पंपाच्या वीजबीलाची थकबाकी 48 हजार 689 कोटीवर गेली आहे. यामध्ये 15 लाख 23 हजार 426 ग्राहकांनी आतापर्यंत एकही वीज बील भरले नाही. त्यांना थकीत बील भरा अशा सूचना नाही तर चालु बील भरण्यासाठी विनंती करण्यात आली आहे. ऊर्जा विभागात रिक्त जागा भरण्यासाठीची कार्यवाही सुरू केली. फीडर योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.


            तांत्रिक व वाणिज्य खाणी कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. नदीजोड प्रकल्प हाती घेण्यात येत आहेत. मुख्यमंत्री रोजगार योजना पुन्हा सुरू करण्यासाठी 501 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे,अशी माहिती उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली.

शुुद्ध पाणी-

 *शुुद्ध पाणी-*


प्रत्येक व्यक्तीने आपल्या घरातील पाण्याच्या टाकीत जांभुळाच्या लाकडाचा तुकडा ठेवावा, त्यासाठी एक रुपयाही खर्च होत नाही आणि नफा म्हणजे नफाच. तुम्हाला फक्त जांभुळाचे लाकूड घरी आणायचे आहे आणि ते पूर्णपणे स्वच्छ करून पाण्याच्या टाकीत टाकायचे आहे. यानंतर तुम्हाला पाण्याची टाकी पुन्हा स्वच्छ करण्याची गरज भासणार नाही.


बोट, खूप कमकुवत असताना जांभुळाचे लाकूड तळाशी का ठेवतात माहीत आहे कां ?


भारतातील विविध नद्यांमध्ये प्रवाशांना एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर नेणाऱ्या बोटीच्या तळाशी जांभळाचे लाकूड लावले जाते. जे जांभुळ पोटाच्या रुग्णांसाठी घरगुती आयुर्वेदिक औषध आहे, ज्याच्या लाकडाचा उपयोग दात जंतूमुक्त आणि मजबूत बनवण्यासाठी केला जातो, त्याच जांभुळाचे लाकूड बोटीच्या खालच्या पृष्ठभागावर का लावले जाते, हा प्रश्न आहे. तेही जेव्हा जांभुळाचे लाकूड खूप कमकुवत असते, जाड लाकूड हाताने तोडता येते. कारण नदीकाठी त्याच्या वापराने नद्यांचे पाणी पिण्यायोग्य राहते.

खरे तर जांभुळाचे लाकूड हे चमत्कारिक लाकूड आहे हे फार कमी लोकांना माहीत आहे. पाण्याखाली असतांना ते खराब होत नाही. उलट त्यात चमत्कारिक गुण आहे. जर ते पाण्यात बुडवले तर ते पाणी शुद्ध करते आणि पाण्यात कचरा साचण्यास प्रतिबंध करते. ज्या पूर्वजांना आपण निरक्षर समजतो त्यांनी नद्या स्वच्छ ठेवण्यासाठी आणि नाव मजबूत ठेवण्यासाठी इतका प्रभावी आणि सोपा उपाय शोधला हे किती आश्चर्यकारक आहे


*700 वर्षांनंतरही विहिरीच्या पायथ्याशी जांभुळाचे लाकूड खराब झालेले नाही...*


जांभूळाचे लाकडाच्या चमत्कारिक परिणामाचे पुरावे नुकतेच सापडले आहेत. देशाच्या राजधानीत वसलेल्या निजामुद्दीनच्या पायरीची विहीर साफ केली असता त्याच्या पायथ्याशी जांभुळाचे लाकडाची रचना आढळतात. भारतीय पुरातत्व विभागाचे प्रमुख श्री केएन श्रीवास्तव यांनी सांगितले की, संपूर्ण पायरी जांभळाच्या लाकडी संरचनेच्या वर बांधण्यात आली होती. कदाचित त्यामुळेच 700 वर्षांनंतरही या पायरीचे पाणी गोड आहे आणि कोणत्याही प्रकारचा कचरा आणि घाण यामुळे या पायरीचे पाणी स्रोत बंद झालेले नाहीत. तर 700 वर्षांपासून कोणीही स्वच्छता केली नव्हती.


*तुमच्या घरात जांभुळाचे लाकडाचा वापर...* 


जर तुम्ही तुमच्या छतावरील पाण्याच्या टाकीत जांभुळाचे लाकूड ठेवले तर तुमच्या पाण्यात शेवाळ कधीच बसणार नाही पाण्याचे शुद्धीकरण 700 वर्षे सुरू राहील. तुमच्या पाण्यात अतिरिक्त खनिजे सापडतील आणि त्याचा TDS शिल्लक राखला जाईल. म्हणजेच जांभूळ आपले रक्त शुद्ध करण्याबरोबरच नदीचे पाणीही शुद्ध करते आणि निसर्गही स्वच्छ ठेवते


 कृपया नेहमी लक्षात ठेवा की जगातील सर्व राजे, राजेशाही आणि सध्याचे अब्जाधीश श्रेष्ठ जे त्यांच्या आरोग्याची काळजी घेतात. जांभुळाचे लाकडापासून बनवलेल्या ग्लासात पाणी पित होते.

 

डॉ. प्रमोद ढेरे,


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*

_*(कॉपी पेस्ट)*_

*_आरोग्य आणि समर्थ social foundation च्या मधुमेह मुक्ति व व्यसनमुक्ती कार्याची नवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आजच जॉईन व्हा आम्हाला_🙂*

*_join होण्यासाठी 7875481853 ह्या नंबर वर Join Me असा what's up मेसेज करा_*

*किंवा लिंक वरून join व्हा 👇🏼*


https://chat.whatsapp.com/EhMKvkbMCEAHxigeFg0tTR

स्वयंभू बंदेश्र्ववरमंदिर


 

बार्टी’मार्फत पात्र सर्व विद्यार्थ्यांनाअधिछात्रवृत्ती देण्याबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय.

 बार्टी’मार्फत पात्र सर्व विद्यार्थ्यांनाअधिछात्रवृत्ती देण्याबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय.


-मंत्री संजय राठोड


            मुंबई, दि. 15 : अनुसूचित जाती प्रवर्गातील संशोधक विद्यार्थ्यांना बार्टी मार्फत फेलोशिप देऊन संशोधनास चालना देण्यात येते. यासाठी महाराष्ट्रातून 200 विद्यार्थ्यांची निवड केली जाते. पात्र सर्व विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती मिळावी, अशी मागणी होत आहे. याबाबत सर्व बाबी तपासून लवकरच धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री संजय राठोड यांनी सांगितले.


            ‘बार्टी’मार्फत पात्र सर्व विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती मिळावी या अनुषंगाने सदस्य महादेव जानकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देतांना मंत्री श्री.राठोड यांनी ही माहिती दिली.


            मंत्री श्री.राठोड यांनी सांगितले की ‘बार्टी’ने 2013 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती सुरु केली आहे. याबरोबरच विविध योजना आणि कार्यक्रम ‘बार्टी’मार्फत राबविण्यात येत आहेत. सारथी आणि महाज्योती या संस्थांनी सर्व पात्र विद्यार्थ्यांना एम फिल व पी एच डी करीता अधिछात्रवृत्ती देण्याचा निर्णय घेतला. याचधर्तीवर ‘बार्टी’ ने सर्व पात्र विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती देण्याची मागणी होत आहे. या बाबत बार्टीने शासनास प्रस्ताव सादर केला आहे.


            याबाबत शासन लवकरच निर्णय घेईल, असेही मंत्री श्री. राठोड यांनी यावेळी सांगितले.


            अधिछात्रवृत्ती पात्र विद्यार्थ्यांकडून प्रबंध अप्राप्त असल्याचे लक्षात आले आहे. या अनुषंगाने ऑनलाईन निरीक्षण (मॉनिटरिंग) करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही मंत्री श्री.राठोड यांनी सांगितले.


            या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य प्रवीण दरेकर, भाई जगताप यांनी सहभाग घेतला.

मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसराचाबृहत आराखडा लवकरच अंतिम करणार

 मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसराचाबृहत आराखडा लवकरच अंतिम करणार


- मंत्री शंभुराज देसाई.

            मुंबई, दि. १५ : मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसराचा बृहत आराखडा तयार करण्यासाठी प्राप्त सूचना व सुधारणा यांचा विचार करून सल्लागारामार्फत संकल्पनात्मक बृहद आराखडा प्राधिकरणास दोन पर्यायासह सादर करण्यात आला आहे. लवकरच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व मुंबई विद्यापीठामार्फत संकल्पचित्र तयार करण्यात येणार असल्याची माहिती, मंत्री शंभुराज देसाई यांनी विधान परिषदेत दिली.


            मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसराचा आराखडा तयार करण्यास विलंब होत असल्याबाबत सदस्य सुनील शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री श्री.देसाई बोलत होते.


            मंत्री श्री.देसाई म्हणाले की, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत डीडीएफ मेसर्स यांना सल्लागार म्हणून नेमले होते. १ कोटी १२ लक्ष ७० हजार इतक्या रकमेच्या कामाचा करारनामा केला आहे. अद्यापर्यंत पाच लक्ष रूपयेच अदा करण्यात आले आहेत. ॲकॅडमिक ब्लॉकसाठी ३० टक्के, प्रशासकीय ब्लॉकसाठी १० टक्के, खेळासाठी १८ टक्के, विद्यार्थी निवासी करिता १० टक्के, संशोधनाकरिता १२ टक्के, शिक्षक निवासासाठी ५ टक्के, रस्ते आणि इतर वापराकरता १५ टक्के असा एकूण १०० टक्के विनियोग दाखविण्यात आला आहे. मात्र, सल्लागारामार्फत दिलेल्या दोन पर्यायांपैकी एका पर्यायास विद्यापीठाने अद्याप संमती दिली नसल्याने विलंब झाला आहे. मात्र, लवकरच यासंदर्भात मंत्री स्तरावर बैठक घेऊन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या मंजुरीने पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री श्री.देसाई यांनी दिली.


००००

सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांमध्येआवश्यक सोयी-सुविधा देणार

 सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांमध्येआवश्यक सोयी-सुविधा देणार


- मंत्री संजय राठोड


            मुंबई, दि. १५ :- सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांसाठी पिण्याचे स्वच्छ पाणी, ग्रंथालय, संगणक कक्ष, जेवण, स्वच्छता गृह, सीसीटीव्ही अशा विविध सुविधा असणे अपेक्षित आहे. यासंदर्भात आलेल्या तक्रारींची दखल घेऊन राज्यातील ४४१ शासकीय वसतिगृहांची तत्काळ तपासणी करण्याची मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती, मंत्री संजय राठोड यांनी आज विधान परिषदेत दिली. 


            विद्यार्थ्यांना सोयी सुविधा देण्यात कसूर केल्याप्रकरणी आतापर्यंत ४९ वसतिगृहांतील गृहपालांवर कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.


            शासकीय वसतिगृहांमध्ये अनियमितता झाल्याबाबत सदस्य प्रवीण दरेकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री श्री.राठोड बोलत होते.


            मंत्री श्री. राठोड म्हणाले की, राज्यात ४४१ शासकीय वसतिगृहात ३ हजार ३५८ विद्यार्थी असून, त्यांना विविध सोयी सुविधा देण्यात येतात. मात्र, प्राप्त तक्रारीनुसार ५४ वसतिगृहांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ४९ वसतिगृहांत तक्रारीत तथ्य आढळून आले. सर्व गृहपालांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे. २८ गृहपालांवर विभागीय चौकशी सुरू आहे, तर पाच गृहपालांना निलंबित करण्यात आले आहे. या वसतीगृहांतील भोजन ठेकेदाराविरूद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, वसतिगृहांतील प्रवेशित विद्यार्थ्यांचा निर्वाह भत्ता, शैक्षणिक साहित्य इत्यादी अदा करण्याबाबत कार्यवाही करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.


             ज्या तालुक्यात वसतिगृहांची आवश्यकता आहे तेथे नव्याने वसतिगृह उभारण्यासाठी सकारात्मक विचार करण्यात येईल. ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळत नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना असून, याअंतर्गत वसतिगृहाप्रमाणेच सोयी सुविधा देण्यात येत असल्याची माहितीही मंत्री श्री.राठोड यांनी यावेळी दिली.


यावेळी सदस्य निरंजन डावखरे, अभिजित वंजारी, अनिकेत तटकरे यांनी उपप्रश्न उपस्थित केले होते.


000

Featured post

Lakshvedhi