Wednesday, 15 March 2023

तांदळाचा अनधिकृत साठा सापडल्याप्रकरणीदोषींवर कडक कारवाई करणार

 तांदळाचा अनधिकृत साठा सापडल्याप्रकरणीदोषींवर कडक कारवाई करणार.

                                                                       - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

            मुंबई, दि. 15 : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील उंबरखेड येथे शासकीय धान्य साठवणुकीचा अथवा वाहतुकीचा कोणताही परवाना नसताना काळ्या बाजारात विक्रीच्या उद्देशाने ट्रक तसेच गोदामात साठा करुन ठेवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.


            सदस्य शिरीष चौधरी यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.


       उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, शासकीय धान्य साठवणुकीचा अथवा वाहतुकीचा कोणताही परवाना नसाताना काळ्या बाजारात विक्रीच्या उद्देशाने ट्रक तसेच गोदामात साठा करुन ठेवलेला 6 लाख 70 हजार 150 रुपये किमतीच्या 729 गोण्या रेशनचा तांदूळ महसूल आणि पोलिसांच्या पथकाने पकडला आहे. या प्रकरणी 16 डिसेंबर रोजी दोषींवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी आणखी काही लिंक आहे का हे तपासून घेण्यात येत आहे. या प्रकरणात जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील मेहुणबारे पोलिस ठाण्यात 20 डिसेंबर 2022 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन आरोपींना अटक करण्यात आली असून तपास सुरु आहे.


000

शिवजयंती उत्सव

 

ठाणे शहर शिवसेना

स्वाधार योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी184 कोटी रुपयांची तरतूद

 स्वाधार योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी184 कोटी रुपयांची तरतूद

                                                                       - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

            मुंबई, दि. 15 : वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने सन 2017 पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना निवास, भोजन, निर्वाहभत्ता, शैक्षणिक साहित्य व इतर आवश्यक सुविधा यासाठी आर्थिक सहाय्य देण्यात येते. यावर्षी म्हणजेच 2022-23 मध्ये 33 हजार 774 अर्ज प्राप्त झाले असून यासाठी 184 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.


       सदस्य राजेश एकडे, डॉ. राजेंद्र शिंगणे, अशोक चव्हाण, छगन भुजबळ यांनी विद्यार्थी ‘स्वाधार’ योजनेपासून वंचित असल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.


            डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ मिळण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातून 1 हजार 178 विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते. यापैकी 1 हजार 94 विद्यार्थ्यांचे अर्ज पात्र होते. पात्र अर्जापैकी आतापर्यंत 912 विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ दिला गेला असून उर्वरित 182 विद्यार्थ्यांना 31 मार्च पूर्वी या योजनेचा लाभ देण्यात येईल, असे मंत्री संजय राठोड यांनी विधानसभेत सांगितले.

रोजगार

मांआमदार, अतुल भाखळकर  यांचेकडून प्रसारित             गरजू तसेच बेरोजगार युवक आणि युवतींना मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने आपण कांदिवली पूर्व विधानसभेतील प्रमोद महाजन मैदान येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन केले असल्याची माहिती आमदार अतुल भातखळकर यांनी दिली. शनिवार, दि. १८ मार्च रोजी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून याचा लाभ इच्छुकांनी घ्यावा, असे आवाहनही आ. भातखळकर यांनी केले आहे.


या मेळाव्याबाबत माहिती देताना आ. भातखळकर म्हणाले, रोजगाराची गरज असलेल्या बेरोजगार तरुणांसाठी ही मोठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या मेळाव्यात विविध नामांकित कंपन्यांचा सहभाग असेल. त्यामुळे चांगल्या आणि प्रतिष्ठीत कंपन्यांमध्ये नोकरी उपलब्ध होणार आहे. याशिवाय विविध प्रकारचे प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. आर्य चाणक्य नगर येथील प्रमोद महाजन मैदानात सकाळी ९ वाजता मेळाव्यास प्रारंभ होणार आहे. या संधीचा लाभ गरजूंनी घ्यावा, असेही आ. भातखळकर म्हणाले.


नामांकित उद्योग, कंपन्यांना नोकरीची संधी, कौशल्य विभागाच्या माध्यमातून प्रशिक्षण, स्टार्टअप व उद्योजकता यासाठी मार्गदर्शन, अप्रेंटिसशिप रोजगारासाठी नोंदणी, बायोडाटा कसा लिहावा, मुलाखत कशी द्यावी याचे प्रशिक्षण तसेच स्वयंरोजगार मार्गदर्शन आणि विविध कर्ज योजनांची माहितीही यावेळी देण्यात येणार आहे. मेळाव्यासाठी https://jobfair.mysba.globalsapio.com/ या लिंकवरून ऑनलाईन नाव नोंदणी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

जीवन ऐसे

 

👌🌹☘️🌼☘️🌺☘️🌻☘️🌸☘️👌

            *निरोगी मन चमकदार, तजेलदार असते. ते शांत आणि आनंदी असते. त्याच्याकडे स्पष्टता, तजेलदारपणा आणि धारदारपणा असतो आणि त्यामुळे आपण स्पष्ट, तर्कशुद्ध विचार करु शकतो. त्याच्याकडे काळजी आणि दुसर्याचा विचार करण्याची क्षमता असते. त्याच्याकडे इतरांविषयी दयाळूपणा आणि कनवाळूपणा असतो आणि तो नैसर्गिकपणे उफाळून येतो. इतरांच्या आनंदाचे आणि दुःखाचे पडसाद या मनात पडतात. इतर लोकांचे चांगले चालले असेल तर त्याला आनंद होतो. इतरांच्या कामगिरीमुळे आणि कर्तबगारीमुळे, श्रेष्ठत्वामुळे त्याला अतिशय उत्साह आणि आनंद वाटतो. ते सहजासहजी विचलित होत नाही. ते स्थिर असते.*
           *तुमच्यापैकी किती जणांना तुमच्या मनात ही लक्षणे निर्माण होत असल्याचे आढळते?*
            *जर तुम्हाला ती दिसत नसतील तर तुम्ही थोडे काळजीपूर्वक वागले पाहिजे.*

👌🌹☘️🌼☘️🌺☘️🌻☘️🌸☘️👌

🌞 *प्रकाशाने अंधार भेदला जातो.* 🌞

🙏🌹☘️🌼☘️🌺☘️🌻☘️🌸☘️🙏









हसून हसून

 


बाधित होणाऱ्या मच्छिमार व्यावसायिकांनानुकसान भरपाई देणार

 बाधित होणाऱ्या मच्छिमार व्यावसायिकांनानुकसान भरपाई देणार.


- उदय सामंत


            मुंबई, दि. १४ : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत शिवडी ते न्हावाशेवा या २२ कि.मी. लांबीचा मुंबई पारबंदर प्रकल्प हाती घेतला आहे. सदर मुंबई पारबंदर प्रकल्पाच्या समुद्रातील सुमारे १६ कि.मी. लांबीच्या बांधकामामुळे पुलाच्या दोन्ही बाजूकडील अंदाजे ७५० मी. अंतरापर्यंतच्या मासेमारी व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे जायका व मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त प्रकल्प अभ्यासातून निदर्शनास आले. त्यानुषंगाने बाधित होणाऱ्या मच्छिमार व्यावसायिकांना नुकसान भरपाई देण्याचे धोरण ठरविण्यात आल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.


            याबाबत विधानसभा सदस्य महेश बालदी यांनी लक्षवेधी मांडली होती.


            मंत्री श्री.सामंत म्हणाले, पात्र अर्जापैकी 6525 पात्र लाभार्थींना नुकसान भरपाई देण्याकरता एमएमआरडीएद्वारे 190.60 कोटी इतकी रक्कम पात्र लाभार्थींना 60 :20 :20 या प्रमाणात वितरित करावयाची आहे त्यानुसार 4116 लाभार्थींना शंभर टक्के तर १७५७ लाभार्थींना पहिल्या टप्प्यात ६० % अशा एकूण 5873 लाभार्थींना बँक खात्यात डीबीटी द्वारे 172.41 कोटी इतकी रक्कम वितरित केली असून उर्वरित रक्कम वितरित करावयाची कार्यवाही चालू असल्याचे श्री सामंत यांनी सांगितले.


            एम एम आर डी ए व सिडको यांच्या ट्रान्स हार्बर लिंक ब्रिज बांधकामामुळे प्रभाव क्षेत्रात येणाऱ्या गव्हाण ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गावांमध्ये विकास कामे हाती घेण्याबाबत संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीत गव्हाण व न्हावा गावातील ग्रामस्थांना जिल्हा परिषदेमार्फत पुरवण्यात येत असलेल्या सुविधा व्यतिरिक्त ग्रामपंचायतीला आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांसाठी पाच कोटी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता तो सात कोटी देण्यात येणार असल्याचे मंत्री श्री सामंत यांनी सांगितले.


            या चर्चेत विधानसभा सदस्य अस्लम शेख,अजय चौधरी, प्रशांत ठाकूर, मंदा म्हात्रे यांनी सहभाग घेतला.

Featured post

Lakshvedhi