मांआमदार, अतुल भाखळकर यांचेकडून प्रसारित गरजू तसेच बेरोजगार युवक आणि युवतींना मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने आपण कांदिवली पूर्व विधानसभेतील प्रमोद महाजन मैदान येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन केले असल्याची माहिती आमदार अतुल भातखळकर यांनी दिली. शनिवार, दि. १८ मार्च रोजी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून याचा लाभ इच्छुकांनी घ्यावा, असे आवाहनही आ. भातखळकर यांनी केले आहे.
या मेळाव्याबाबत माहिती देताना आ. भातखळकर म्हणाले, रोजगाराची गरज असलेल्या बेरोजगार तरुणांसाठी ही मोठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या मेळाव्यात विविध नामांकित कंपन्यांचा सहभाग असेल. त्यामुळे चांगल्या आणि प्रतिष्ठीत कंपन्यांमध्ये नोकरी उपलब्ध होणार आहे. याशिवाय विविध प्रकारचे प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. आर्य चाणक्य नगर येथील प्रमोद महाजन मैदानात सकाळी ९ वाजता मेळाव्यास प्रारंभ होणार आहे. या संधीचा लाभ गरजूंनी घ्यावा, असेही आ. भातखळकर म्हणाले.
नामांकित उद्योग, कंपन्यांना नोकरीची संधी, कौशल्य विभागाच्या माध्यमातून प्रशिक्षण, स्टार्टअप व उद्योजकता यासाठी मार्गदर्शन, अप्रेंटिसशिप रोजगारासाठी नोंदणी, बायोडाटा कसा लिहावा, मुलाखत कशी द्यावी याचे प्रशिक्षण तसेच स्वयंरोजगार मार्गदर्शन आणि विविध कर्ज योजनांची माहितीही यावेळी देण्यात येणार आहे. मेळाव्यासाठी https://jobfair.mysba.globalsapio.com/ या लिंकवरून ऑनलाईन नाव नोंदणी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment