सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Tuesday, 14 March 2023
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
: खरच आम्ही आता जगात पाचवे क्रमांकावर आहोत का?या मुलभुत सुविधा निर्माण न करता समृध्दी आणि मेट्रोच्या मागे तर लागलो. नाही ना? .त्या गोष्टी आवश्यक आहेतच पण अशा कितीतरी मुलभुत सेवा साठीअजुनही दररोज किती जणाना आपले जीव धोक्यात घालावे लागत आहेत याची मात्र नक्कीच खंत आहे🥱
धाडसी उपक्राअंतर्गत येते.
स्वातंत्र्य ची ७५वर्ष ,अमृत महोत्सव साजरा केला.
: ही तर चौथी पाचवी पिढी आहे.
ठाणे येथील फ्लेमिंगो पार्कच्या संवर्धनासाठीआराखडा तयार करण्यात येणार
विधानसभा प्रश्नोत्तरे :
ठाणे येथील फ्लेमिंगो पार्कच्या संवर्धनासाठीआराखडा तयार करण्यात येणार
- मंत्री दीपक केसरकर
मुंबई दि. 14 : ठाणे येथील फ्लेमिंगो पार्कच्या संवर्धनासाठी राज्यशासनाकडून आराखडा तयार करण्यात येणार आहे. या आराखडा समितीमध्ये निरी
संस्थेतील तज्ञांचा समावेश करुन हा आराखडा लवकरात लवकर केंद्र शासनाकडेपाठवणार असल्याची माहिती, मंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत दिली.
सदस्य आशिष शेलार यांनी ठाणे येथील खाडीला रामसर दर्जा प्राप्त झालेलाअसताना खाडीतील प्रदूषणात वाढ होत असल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केलाहोता.
मंत्री श्री. केसरकर म्हणाले, ठाणे खाडीतील प्रदूषण प्रकरणी महाराष्ट्रप्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत मुंबई महानगरपालिकेला निर्देश देण्यात आलेआहेत. मत्स्य व्यवसाय आयुक्त यांच्याकडून प्राप्त अहवालानुसार ठाणे येथील
खाडीत सोडण्यात येणाऱ्या रसायन मिश्रित पाण्यामुळे खाडीतील माशांच्यापुनरुत्पादनावर परिणाम झाल्याची कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही.
ठाणे खाडीतील प्रदूषणाबाबत मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका वलोकप्रतिनिधी यांची लवकरच बैठक बोलावून याबाबत चर्चा, उपाययोजना करण्यात
येईल.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री प्रताप सरनाईक, अतुल भातखळकर,नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, जितेंद्र आव्हाड यांनी सहभाग घेतला.
००००
अकोला जिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे लवकरच भरणार
अकोला जिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे लवकरच भरणार
- वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन
मुंबई, दि. 14 :अकोला जिल्हा रुग्णालयातील गट 'अ' व 'ब' संवर्गातील पदेमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत, तर 'क' व 'ड' संवर्गातील पदे लवकरचभरण्यात येणार आहेत. राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयात भविष्यात मनुष्यबळकमी पडणार नाही, अशी दक्षता शासन घेणार असल्याची माहिती, वैद्यकीय
शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त पदे भरण्याबाबत सदस्यअमोल मिटकरी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्रीश्री.महाजन बोलत होते. यावेळी सदस्य प्रसाद लाड यांनी उपप्रश्न उपस्थितकेला.
अकोला शासकीय रुग्णालयात मंजूर ४७६ खाटा आहेत.प्रत्यक्षात सद्यस्थितीत दुप्पट क्षमतेने हे रुग्णालय कार्यरत असून,येथील रुग्णांना याची मदत होत आहे. या रूग्णालयात गट 'अ' व 'ब' वर्गातीलपदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत, तर गट 'क' वर्गातील ९० पदेटीसीएसमार्फत आणि बाह्यस्त्रोताद्वारे ५ हजार ५६ पदांची भरती लवकरच
करण्यात येणार आहे. याचबरोबर राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयात मनुष्यबळकमी पडणार नाही यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरु असल्याची माहिती, मंत्री
श्री.महाजन यांनी यावेळी दिली.
दुर्गम भागात आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी शासन प्रयत्नशील
दुर्गम भागात आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी शासन प्रयत्नशील
- वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन
मुंबई, दि. 14 : दुर्गम आणि अतिदुर्गम भागात वैद्यकीय सुविधा
पुरविण्यासाठी राज्यात नव्याने १२ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयेउभारण्यात येत असून, त्यासंदर्भातील कामे गतीने सुरू आहेत. तसेच निवासीडॉक्टरांची सोय व्हावी यासाठी वसतिगृह बांधणे आणि जुन्या वसतिगृहांची डागडुजी करण्यात येणार आहे. यासाठी १४६ कोटी रूपयांचा निधी प्राप्त झालाअसल्याची माहिती, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी विधानपरिषदेतदिली.
राज्यातील निवासी डॉक्टरांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत सदस्य ॲड्निरंजन डावखरे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यास उत्तर देताना मंत्रीश्री. महाजन बोलत होते. यावेळी सदस्य प्रसाद लाड, महादेव जानकर यांनीउपप्रश्न उपस्थित केला.
मंत्री श्री. महाजन म्हणाले, निवासी डॉक्टरांसाठी असलेल्या 10 हजारखोल्या अपुऱ्या पडत असून, पदवी तसेच पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठीनव्याने खोल्या बांधण्यात येणार आहे. मोडकळीस आलेले जे वैद्यकीय वसतीगृह
महानगरपालिकेच्या अखत्यारित असतील अशा वसतीगृहांबाबत संबंधित संस्थानानिर्देश देण्यात येतील. तसेच राज्यात वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या
वाढणार असल्याने, वसतीगृहांची संख्याही वाढविण्यात येणार आहे. यासंबंधीतकामे गतीने पूर्ण करण्यास शासन प्रयत्नशील असल्याचे मंत्री श्री.महाजनयांनी सांगितले.
अंबरनाथ येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रस्तावित आहे. याचबरोबरसरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील वेतनही वाढविण्यात येणार असल्याचीमाहिती श्री.महाजन यांनी यावेळी दिली
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...


