Tuesday, 14 March 2023

दुर्गम भागात आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी शासन प्रयत्नशील

 दुर्गम भागात आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी शासन प्रयत्नशील


- वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन


मुंबई, दि. 14 : दुर्गम आणि अतिदुर्गम भागात वैद्यकीय सुविधा

पुरविण्यासाठी राज्यात नव्याने १२ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयेउभारण्यात येत असून, त्यासंदर्भातील कामे गतीने सुरू आहेत. तसेच निवासीडॉक्टरांची सोय व्हावी यासाठी वसतिगृह बांधणे आणि जुन्या वसतिगृहांची डागडुजी करण्यात येणार आहे. यासाठी १४६ कोटी रूपयांचा निधी प्राप्त झालाअसल्याची माहिती, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी विधानपरिषदेतदिली.


राज्यातील निवासी डॉक्टरांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत सदस्य ॲड्निरंजन डावखरे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यास उत्तर देताना मंत्रीश्री. महाजन बोलत होते. यावेळी सदस्य प्रसाद लाड, महादेव जानकर यांनीउपप्रश्न उपस्थित केला.


मंत्री श्री. महाजन म्हणाले, निवासी डॉक्टरांसाठी असलेल्या 10 हजारखोल्या अपुऱ्या पडत असून, पदवी तसेच पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठीनव्याने खोल्या बांधण्यात येणार आहे. मोडकळीस आलेले जे वैद्यकीय वसतीगृह

महानगरपालिकेच्या अखत्यारित असतील अशा वसतीगृहांबाबत संबंधित संस्थानानिर्देश देण्यात येतील. तसेच राज्यात वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या

वाढणार असल्याने, वसतीगृहांची संख्याही वाढविण्यात येणार आहे. यासंबंधीतकामे गतीने पूर्ण करण्यास शासन प्रयत्नशील असल्याचे मंत्री श्री.महाजनयांनी सांगितले.


अंबरनाथ येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रस्तावित आहे. याचबरोबरसरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील वेतनही वाढविण्यात येणार असल्याचीमाहिती श्री.महाजन यांनी यावेळी दिली

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi