Sunday, 26 February 2023

वणवा

.                       *वणवा*
*डोंगरांना वणवे लावणाऱ्यांना हा फोटो दाखवा, त्यांच्या मनामध्ये मुक्या पशुपक्षांविषयी जराशी संवेदना जागी झाली तरं निसर्गाचे भले होईल ...*
*वणवा नका लावू आणि कोणी लावत असेल तर लावू देऊ नका ...*
*ऐकत नसेल तर किंवा कुठे वणवा लागलेला दिसला तर १९२६ या टोल फ्री नंबर वर माहिती द्या.* 🚔✊👊

देशाच्या प्रगतीत महाराष्ट्राचा हिस्सा अग्रेसर ठेवण्याचा प्रयत्न-

 देशाच्या प्रगतीत महाराष्ट्राचा हिस्सा अग्रेसर ठेवण्याचा प्रयत्न- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


            मुंबई दि. 25 : महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलीयन इकॉनॉमी करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. त्यात महाराष्ट्र 1 ट्रिलीयन इकॉनॉमी देऊन देशाच्या प्रगतीत महाराष्ट्राचा क्रमांक अग्रेसर ठेवेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.


            मुंबईतील हॉटेल ग्रँड हयात येथे एबीपी नेटवर्कच्या “आयडियाज ऑफ इंडिया समिट 2023” (Ideas of India Summit 2023) पर्व दुसरे कार्यक्रमास मुख्यमंत्री श्री. शिंदे उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.


            या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, गेल्या 8 महिन्यांत आमच्या शासनाने अनेक महत्वपूर्ण आणि विकासाला चालना देणारे निर्णय घेतले. समृध्दी महामार्ग, मुंबई मेट्रो, मुंबईतला सागरी महामार्ग, आपला दवाखाना, मुंबईतल्या सीवेज ट्रीटमेंट प्लांट भूमिपूजन यासह 5 हजार किलोमीटरचे एक्सप्रेस कंट्रोल हायवे विकसित करण्याचे प्रकल्प सुरु करण्यात आले आहेत.


            रस्ते,रेल्वे आणि समुद्री मार्ग बनवून केवळ देशालाच नाही तर जगाला अनुकरणीय असे परिवहन योजना आणण्यात महाराष्ट्र पुढे राहील. समृद्धी महामार्ग, मेट्रो रेल्वे,कोस्टल रोड आणि एमटीएचएल मार्ग हे महाराष्ट्राच्या विकासाची भाग्यरेषा बनतील, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.


            राज्याच्या विकासासाठी केंद्र सरकारचे चांगले सहकार्य मिळत आहे. केंद्र सरकारकडून यंदाच्या अर्थसंकल्पात 13हजार 539 कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्रतील रेल्वे विकासासाठी मिळाला आहे. दावोस येथे झालेल्या परिषदेत विविध उद्योग समुहांशी 1 लाख 55 हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. त्यातून दीड लाख रोजगार निर्मिती होत आहे. याशिवाय ‘मित्रा’ समितीची स्थापना, आर्थिक सल्लागार समितीची स्थापना करण्यात आली आहे. यामुळे येणाऱ्या काळात महाराष्ट्रात सर्वच क्षेत्रात अधिक गुंतवणूक वाढीसाठी प्रयत्न होणार आहेत. कौशल्य विकासाबरोबरच पायाभूत सोयी सुविधा यांच्या निर्मितीवर भर देण्यात आला असून महाराष्ट्रतील प्रत्येक जिल्ह्याच्या विकासासाठी रोडमॅप तयार करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी सांगितले.


एबीपी नेटवर्कच्या श्रीमती रुबिका यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची मुलाखत घेतली.


000

Saturday, 25 February 2023

ढोल ताशांच्या निनादात आणि ज्ञानोबा...तुकाराम या गजरात

 ढोल ताशांच्या निनादात आणि ज्ञानोबा...तुकाराम या गजरात

17 व्या कामगार साहित्य संमेलनाचा ग्रंथ दिंडीने शुभारंभ


पालकमंत्री डॉ सुरेश खाडे यांच्याहस्ते ग्रंथ पालखीचे पूजन.

          सांगली दि. 24 (जि.मा.का.) : ढोल ताशांच्या निनादात आणि ज्ञानोबा... तुकाराम.. जय जय राम कृष्ण हरी..... गजरात 17 व्या कामगार साहित्य संमेलनाचा शुभारंभ ग्रंथ दिंडीने करण्यात आला. मिरज येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ग्रंथ दिंडीस प्रारंभ झाला. कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.सुरेश खाडे आणि कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल यांच्याहस्ते ग्रंथ पालखीचे पूजन करण्यात आले. तत्पूर्वी पालकमंत्री डॉ सुरेश खाडे व अन्य मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले.


            छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या वेशभूषा करून सहभागी झालेले युवक आणि संबळ वाद्य वाजवणारी गौरी वायचळने ग्रंथ दिंडीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. डोक्यावर तुळस कट्टा, हाती ब्रेल लिपीत लिहिलेली ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा व मुखाने ज्ञानोबा... तुकाराम .. जय..जय राम... कृष्ण हरी... असा हरी नामाचा गजर करीत ग्रंथ दिंडीत सहभागी झालेले कै. सु.धा. घोडावत या अंध शाळेच्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. ग्रंथ दिंडीत अंध शाळेच्या विद्यार्थ्यांच्या चमू सोबत वासुदेवानेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कामगार साहित्य संमेलनानिमित्त काढण्यात आलेली ही ग्रंथ दिंडी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सुरुवात होऊन सराफ कट्टा, लक्ष्मी मार्केट, महापालिका कार्यालय, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर प्रवेशद्वार या मार्गावरून बालगंधर्व नाट्यमंदिर पर्यंत काढण्यात आली. ग्रंथ दिंडीत पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे आयुक्त रविराज इळवे यांच्यासह मान्यवर पदाधिकारी व कामगार विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते.


           ग्रंथ दिंडी बालगंधर्व नाट्यमंदिर येथे पोहोचल्यानंतर विं. दा. बालमंच, डॉ.शंकरराव खरात ग्रंथ दालन आणि लोकशाहीर पट्टे बापूराव कविता भिंतीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.


०००००




 


                                                                                                                       



राज्यपालांच्या दुरस्थ उपस्थितीत स्वारातीम विद्यापीठाचा रौप्य महोत्सवी दीक्षांत समारंभ संपन्न

 राज्यपालांच्या दुरस्थ उपस्थितीत स्वारातीम विद्यापीठाचा रौप्य महोत्सवी दीक्षांत समारंभ संपन्न


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, कमल किशोर कदम डि.लीट.ने सन्मानित.

          मुंबई, दि. 24 : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा 25 वा दीक्षांत समारंभ राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांच्या दुरस्थ उपस्थितीत विद्यापीठ परिसर येथे संपन्न झाला.


          दीक्षांत समारंभामध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे माजी शिक्षण मंत्री कमलकिशोर कदम यांना डि.लीट. ही मानद पदवी देऊन सन्मानित करण्यात आले.


            कार्यक्रमाला होमी भाभा राष्ट्रीय संस्थेचे कुलपती तसेच राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर हे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.


            डी.लिट. पदवी मिळाल्याबद्दल नितीन गडकरी व कमलकिशोर कदम यांचे अभिनंदन करताना यंदापासून लागू होत असलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून विद्यापीठांना गतकाळातील नालंदा, तक्षशिला विद्यापीठांप्रमाणे पुनश्च प्रतिष्ठा प्राप्त करण्याची संधी उपलब्ध झाली असल्याचे राज्यपालांनी सांगितले.


            स्नातकांनी आपल्या देशातील भाषा, संस्कृती व परंपरा यांच्या सोबतच इतर देशांच्या भाषा व संस्कृतीचे अध्ययन करावे तसेच तंत्रशिक्षण व व्यावसायिक प्रशिक्षणासोबत परीक्षा व मूल्यमापन पद्धतीमध्ये देखील बदल व्हावे अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.  


            हरित विद्यापीठ, स्वच्छ विद्यापीठ, जलसंधारण, वृक्षारोपण आदी उपक्रमांच्या माध्यमातून स्वारातीम देत असलेल्या योगदानाबद्दल विद्यापीठाचे अभिनंदन करताना देशाला ज्ञानाधिष्ठित जागतिक महासत्ता बनविण्याची सर्वाधिक मोठी जबाबदारी विद्यापीठांवर असल्याचे राज्यपालांनी सांगितले. पेटंट मिळविण्याच्या दृष्टीने केलेल्या संशोधनामुळे स्वारातीम हे देशातील महत्वाचे विद्यापीठ ठरले असल्याचे राज्यपालांनी सांगितले. विद्यापीठ केवळ पदव्या प्रदान करणारी संस्था नसून समाज व राष्ट्र निर्मितीकरिता जबाबदार नागरिक निर्माण करणारी संस्था असल्याचे त्यांनी सांगितले. ऑनलाईन शिक्षणाचा लाभ शिक्षणापासून वंचित लोकांना तसेच महिलांना होऊ शकतो असे सांगताना त्यांनी ऑनलाईन शिक्षणाचा पुरस्कार केला.


            "गरजेनुसार संशोधन झाल्यास सामाजिक परिवर्तन घडेल" - नितीन गडकरी


             नवसृजन, उद्यमशीलता यांच्या माध्यमातून ज्ञानाचे रूपांतरण आर्थिक संपदेमध्ये झाले पाहिजे असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केले. ज्ञानासोबत विनम्रता व शालीनता आली पाहिजे हे सांगताना त्यांनी अभिनेते अमिताभ बच्चन व उद्योगपती रतन टाटा यांच्या विनम्र स्वभावाचे उदाहरण दिले. उत्तम समाज निर्मितीसाठी नीतिमूल्ये आवश्यक आहे असे सांगताना स्नातकांनी प्रतिकूल विचारांचा सन्मान करण्यास शिकले पाहिजे असे त्यांनी सांगितले. जलसुरक्षेसाठी जलसंवर्धन तसेच समुद्रात जाणारे पाणी अडवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. 'अन्नदाता शेतकरी' हा ऊर्जादाता झाला पाहिजे असे सांगून गरजेनुसार संशोधन झाल्यास सामाजिक परिवर्तन घडेल असे त्यांनी सांगितले. युवकांनी रोजगारामागे न लागत संपदा निर्माण करणारे उद्योजक व्हावे असे त्यांनी सांगितले.


डॉ अनिल काकोडकर


            विद्यार्थ्यांच्या वैचारिक कक्षा रुंदावणे, सामाजिक व आर्थिक समस्यापूर्ती करणे तसेच समाजातील विषमता दूर करणे अशा तीन स्तरांवर मानव सक्षमीकरणाचा विचार झाला पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. अनिल काकोडकर यांनी आपल्या दीक्षांत भाषणात केले. देशाची गणना पुढारलेल्या देशांमध्ये व्हावी यासाठी दरडोई उत्पन्न वाढवावे लागेल व त्यासाठी उद्योजकतेला चालना तसेच ग्रामीण भागात शेतीबरोबर नवीन संधी निर्माण कराव्या लागतील असे त्यांनी सांगितले. 


            यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले आणि प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके तसेच विविध विभागांचे अधिष्ठाता, प्राध्यापक व स्नातक विद्यार्थी उपस्थित होते.


००००


 


25th Convocation of the Swami Ramanand Teerth Marathwada University


 


Governor confers Honorary D.Litt. on Nitin Gadkari & Kamalkishor Kadam


      Mumbai 24 :Governor and Chancellor of state universities Ramesh Bais presided over the 25th Annual Convocation of the Swami Ramanand Teerth Marathwada University (SRTMU), Nanded through online mode.


      The degree of Honorary Doctor of Letters (D.Litt.) was conferred on Union Minister of Road Transport and Highways Nitin Gadkari and former Maharashtra Education Minister Kamalkishor Kadam.


      Chancellor of the Homi Bhabha National Institute and Chairman of Rajiv Gandhi Science and Technology Commission Dr. Anil Kakodkar delivered the Convocation address through online mode.


      Dr. Udhav Bhosle, Vice Chancellor of SRTMU, Dr. Jogendrasingh Bisen, Pro Vice Chancellor, Dr. Sarjerao Shinde, Registrar, Dr. Digambar Netke, Director of Board of Examinations and Evaluation, Deans of various faculties, teachers and graduating students were present.


०००



ये जिवन हैं







 

विधानभवनात मराठी भाषा गौरवदिनी साहित्याची ज्ञानयात्रा

 विधानभवनात मराठी भाषा गौरवदिनी साहित्याची ज्ञानयात्रा

ज्ञानपीठ सन्मानित साहित्यकृतींचे अभिवाचनाने संस्मरण.

            मुंबई, दि. २५ : कुसुमाग्रज तथा वि.वा.शिरवाडकर यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस "मराठी भाषा गौरव दिन" म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषेची गौरवशाली परंपरा जपण्यासाठी व तिचे संवर्धन करण्यासाठी मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून विधानमंडळातील मराठी भाषा समितीतर्फे ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या मराठी लेखकांच्या साहित्यावर आधारित "मराठी साहित्याची ज्ञानयात्रा" या कार्यक्रमाचे आयोजन सोमवार, दिनांक २७ फेब्रुवारी, २०२३ रोजी दुपारी ३.०० ते ५.०० यावेळेत मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई येथे करण्यात आले आहे. वि.स.खांडेकर, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, भालचंद्र नेमाडे या ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या मराठी लेखकांच्या साहित्यकृतींचे अभिवाचनाद्वारे संस्मरण यावेळी करण्यात येईल.


            हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे.


            मराठी भाषेची, मराठी साहित्याची उंची वाढविणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त साहित्यकृतींचे अभिवाचन या कार्यक्रमात सुप्रसिध्द अभिनेते डॉ. गिरीश ओक, लीना भागवत हे करतील. नचिकेत देसाई, धनश्री देशपांडे आणि अभिषेक नलावडे हे याप्रसंगी कविता गायन करतील. विधानमंडळातील या कार्यक्रमाच्या संयोजनाची जबाबदारी मिती क्रिएशन्स सांभाळत आहे. या कार्यक्रमास दोन्ही सभागृहांचे सन्माननीय सदस्य, पत्रकार, साहित्यप्रेमी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन विधानमंडळाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत आणि मराठी भाषा समितीचे उप सचिव विलास आठवले यांनी केले आहे.



अन्न व औषध प्रशासन विभागाचे स्नेह संमेलन संपन्न

 अन्न व औषध प्रशासन विभागाचे स्नेह संमेलन संपन्न

अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कलागुणांच्या प्रदर्शनाचे


 अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी केले कौतुकl.

            मुंबई, दि. 24 : अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी हे आपल्या कामांसोबत इतर कला गुणांमधे प्रवीण आहेत हे खरच कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार अभिनेत्री मृणाल देव-कुलकर्णी यांनी काढले.


            अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे आयोजित वार्षिक स्नेह संमेलनाच्या बक्षीस समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून त्या उपस्थित होत्या. त्यावेळी त्या बोलत होत्या.


            यावेळी आयुक्त अभिमन्यू काळे, सह आयुक्त चंद्रकांत थोरात, भूषण पाटील, शैलेश आढाव, दुष्यंत भामरे, शशिकांत केकरे, दयानंद अवशंक यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


            अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने थ्रो बॉल, क्रिकेट, बुद्धिबळ, गोळाफेक, कॅरमसह संगीत खुर्ची आणि अंताक्षरी यासारखे खेळ आयोजित केले होते. या खेळांमधील विजेत्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले.


            यावेळी गुणवंत पाल्यांचे सत्कार देखील करण्यात आले. राज्यभरातील अधिकारी व कर्मचारी या स्पर्धांमध्ये सहभागी झाले होते. अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री संजय राठोड यांच्या प्रेरणेने, सचिव डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात आणि आयुक्त श्री. काळे यांच्या संकल्पनेतून हे वार्षिक स्नेह संमेलन आयोजित करण्यात आले होते.


००००

Featured post

Lakshvedhi