Thursday, 23 February 2023

मुख्यमंत्री फेलोशिप 2023 - अर्ज करण्याची अंतिम मुदत 2 मार्च पर्यंत

 मुख्यमंत्री फेलोशिप 2023 - अर्ज करण्याची अंतिम मुदत 2 मार्च पर्यंत.

            मुंबई, दि. 22 : युवकांना राज्य शासनासोबत काम करण्याची संधी देणाऱ्या मुखमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून, विद्यार्थ्यांना 2 मार्च 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. राज्याच्या विकासात योगदान देण्याची इच्छा असणाऱ्या तरुण व होतकरू मुलामुलींना या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. 


       युवकांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव देत त्यांच्यातील ऊर्जा, धाडस, कल्पकता आणि तंत्रज्ञानातील गती यांचा उपयोग करून प्रशासकीय प्रक्रियांना गती देणे, नाविन्यपूर्ण संकल्पना राबविणे हा मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाचा उद्देश आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून युवकांनाही धोरण निर्मिती, नियोजन, कार्यक्रमांची अंमलबजावणी या संदर्भात महत्त्वपूर्ण अनुभव मिळतो, त्यांच्या ज्ञानाच्या व अनुभवाच्या कक्षा रुंदावतात. या 2015 ते 2020 या कालावधीत या कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी झाल्यानंतर त्यात खंड पडला होता. लोकाग्रहास्तव हा कार्यक्रम आता पुन्हा सुरु करण्यात येत आहे. 


मुख्यमंत्री फेलोशिप 2023 साठी अर्ज करण्यासाठी वय 21 ते 26 वर्षे, ६० टक्के गुणांसह पदवी व एक वर्षाचा कामाचा अनुभव असे किमान निकष आहेत. ऑनलाईन परीक्षा, निबंध व मुलाखत अशा त्रिस्तरीय चाचणीच्या माध्यमातून गुणवत्तेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. आलेल्या अर्जांमधून 60 युवक मुख्यमंत्री फेलो म्हणून निवडले जातील. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाच्या विविध विभाग व राज्यभरातील विविध कार्यालयांमध्ये हे फेलो वर्षभर काम करतील. 


आयआयटी, मुंबई व आयआयएम, नागपूर हे या कार्यक्रमाचे अकॅडेमिक पार्टनर आहेत. या दोन्ही संस्थांद्वारे सार्वजनिक धोरणासंबंधातील विविध विषयांचा अभ्यासक्रम फेलो पूर्ण करतील. त्यासाठी त्यांना आयआयटी, मुंबई व आयआयएम, नागपूर यांचेकडून स्वतंत्र पदव्युत्तर पदविका प्रमाणपत्र देण्यात येईल. 


               मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची तपशीलवार माहिती http://mahades.maharashtra.gov.in/FELLOWSHIP या संकेतस्थळावर उपलब्ध असून अधिक माहितीसाठी cmfellowship-mah@gov.in या ईमेल वर किंवा ८४११९६०००५ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधता येईल. 

००

Chief Minister Fellowship २०२३ - last date of application is २nd March

The application process for the Chief Minister Fellowship Program commences, The program offers a unique opportunity to youth to work with the government. The last date for the application is 2nd March 2023. Chief Minister Mr. Eknath Shinde and Deputy Chief Minister Mr. Devendra Fadnavis have appealed to the budding youth to participate in the program and contribute to the development of the state . 


 The objective of the Chief Minister Fellowship Program is to offer youth an opportunity to work with government administration and to utilise their energy, courage, creativity and techno savviness to give momentum to the administrative processes and to implement the innovative initiatives. The program offers the youth an important experience in policy making, planning and implementation. It helps them in broadening their knowledge and exposure. The Chief Minister Fellowship Program was implemented during the period 2015 to 2020, after which it was discontinued. Now considering the public demand for the program, it is being relaunched again. 


            Age between 21 to 26 years, graduation with minimum 60% marks and full time work experience of a year are the basic criteria for the application. The fellows are selected on the basis of merit through on-line examination, essays and personal interviews. 60 candidates will be selected as CM Fellows from the received applications. They will work with various departments and offices of the government under the guidance of senior officers.


            IIT Bombay and IIM Nagpur are the academic partners of the Chief Minister Fellowship 2023. The fellows will be required to complete the curriculum on various aspects of public policy designed by these two organisations, for which they will receive a Post Graduate Diploma Certificate from IIT Bombay or IIM Nagpur.


            Details of Chief Minister Fellowship Program are available on website: http://mahades.maharashtra.gov.in/FELLOWSHIP 


Email id: cmfellowship-mah@gov.in or helpline number 8411960005 can be used in case of any queries.





संत गाडगे बाबांना राज्यपाल बैस यांचे अभिवादन

 संत गाडगे बाबांना राज्यपाल बैस यांचे अभिवादन


            मुंबई, दि. २३ : संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी राज्यपालांच्या पत्नी रामबाई बैस यांनी देखील संत गाडगेबाबांच्या प्रतिमेला अभिवादन केले.


            राजभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.


००००


Maharashtra Governor Bais pays tribute to Sant Gadge Baba


            Mumbai 23 : Governor Ramesh Bais accompanied by Smt. Rambai Bais offered floral tributes to the portrait of Sant Gadge Baba on the occasion of Gadge Baba's birth anniversary at Raj Bhavan, Mumbai.


            Officers and staff of Raj Bhavan and police personnel were present.


0000



 


वृत्त क्र. 627


 


संत गाडगेबाबा महाराज यांना जयंतीनिमित्त

 मंत्रालयात अभिवादन

            मुंबई, दि. 23 : संत गाडगेबाबा महाराज यांना जयंतीनिमित्त आज मंत्रालयात अभिवादन करण्यात आले. सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव विकास खारगे, प्रधान सचिव तथा अतिरिक्त पोलिस महासंचालक ब्रिजेश सिंग यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


            यावेळी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी यांनीही पुष्प अर्पण करून गाडगेबाबा यांना अभिवादन केले.


000



एमआयडीसीच्या धर्तीवर एफआयडीसी सुरू होणार!

 एमआयडीसीच्या धर्तीवर एफआयडीसी सुरू होणार!

वन, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

नागपुरात वन विकास महामंडळाचा विभागीय क्रीडा स्पर्धेचा,पुरस्कार वितरण सोहळा थाटात संपन्न.

नागपूर : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) राज्याच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासात मोठी भर घातली आहे. याच धर्तीवर आता फॉरेस्ट इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कार्पोरेशन (एफआयडीसी) सुरू करण्यात येणार आहे. या माध्यमातून वन आधारित उद्योगांना चालना देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नागपुरात केली.

वन विकास महामंडळाच्या विभागीय क्रीडा स्पर्धेच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर वन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विकास गुप्ता, मुख्य महाव्यवस्थापक संजीव गौर, मुख्य वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, प्रादेशिक व्यवस्थापक सुमित कुमार, विभागीय व्यवस्थापक ए. आर. प्रवीण, नागपूरचे उपवनसंरक्षक भरतसिंह हाडा आदी उपस्थित होते.

पुरस्कार वितरणानंतर बोलताना ना. मुनगंटीवार म्हणाले की, क्रीडा स्पर्धा व्यक्तीमधील निकोपतेला चालना देते. वन विकास महामंडळाच्या विभागीय क्रीडा स्पर्धांनी ही निकोपता कर्मचाऱ्यांना शिकवली आहे. लवकरच वन विभागाच्या आणि वन विभाग विरुद्ध वन विकास महामंडळ अशा विभागीय क्रीडा स्पर्धा घेण्यात येतील. एफडीसीएम केवळ वन क्षेत्राच्या विकासासाठीच काम करीत नाही तर वन विभागातील कर्मचाऱ्यांना एखाद्या कुटुंबाप्रमाणे मानत त्यांच्याही सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र काम करीत आहे. एफडीसीएम केवळ एक महामंडळ नसून एखाद्या कुटुंबासारखे आहे. वन विकास महामंडळातील खेळाडूंनी सर्वच स्पर्धांमध्ये यश मिळावावे. वन विकास महामंडळातील खेळाडूंचे कौतुक यासाठी करावे लागेल की विदर्भातील उष्णतामान जास्त असतानाही ते मैदानी खेळांमध्ये प्राविण्य प्राप्त करीत आहेत. एफडीसीएमच्या खेळाडूंचा चपळता व कार्यकर्तृत्वाच्या बाबतीत चित्ता असा उल्लेख करीत ना. मुनगंटीवार यांनी उपस्थित खेळाडुंना शुभेच्छा दिल्या.


क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय काम करायचे असेल तर शारीरिक स्वास्थ्यही तितकेच महत्वाचे आहे. खेळांसोबत सांस्कृतिक कार्यक्रम देखील महत्वाचे आहे. त्यामुळे वन विकास महामंडळाने सांस्कृतिक महोत्सव देखील घ्यावे, असे आवाहन ना. मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. वन विकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांवर मोठी जबाबदारी आहे. राज्यातच नव्हे तर देशात वन हे एक नंबरला कायम ठेवण्याचे मोठे आव्हान सर्वांपुढे आहे.

राज्यातील वनक्षेत्रात मोठी वाढ

महाराष्ट्रातील वन क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. नुकत्यात आलेल्या राष्ट्रीय सर्वेक्षणातून ही बाब पुढे आली आहे. २ हजार ५५० वर्ग किलोमीटरचे वनक्षेत्र महाराष्ट्रात वाढले आहे. मँग्रेाजमध्येही १०२ वर्ग किलोमीटरची वाढ झाली आहे. त्यामुळेच केंद्रीय अर्थसंकल्पीय भाषणात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मँग्रोजची संकल्पना देशभरात राबविण्याची घोषणा केली, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 

आधुनिक ड्रोन शेती कृषी महोत्सवाचे आकर्षण

 आधुनिक ड्रोन शेती कृषी महोत्सवाचे आकर्षण

 * बीडच्या मराठमोळ्या खाद्यसंस्कृतीचा कृषी प्रदर्शनात तडका; खवय्यांना बचतगटांच्या गावरान जेवणाचीही मेजवानी


* आज दुपारी मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन


बीड प्रतिनिधी : छत्रपती संभाजी महाराज मल्टिपर्पज ग्राउंडवर पार पडणाऱ्या पाच दिवशीय बीड जिल्हा कृषी महोत्सवात शेतकऱ्यांसाठी आधुनिक ड्रोन शेतीचे तंत्रज्ञान आणि प्रात्यक्षिक पाहावयाला मिळणार आहे. त्याचबरोबर बीडच्या विशेष खाद्य संस्कृतीला अनुभवण्यासाठी या महोत्सवात गावरान मेजवानीला तडका देण्याकरिता महिला बचतगटाचे स्टॉल सज्ज झाले आहेत.  


दि. २४ ते २८ फेब्रुवारी २०२३ दरम्यान बीड जिल्हा कृषी महोत्सव पार पडणार असून त्याची सुरुवात आज दुपारी मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर होणारआहे. बीड जिल्हा कृषी महोत्सव २०२३ च्या भव्य कार्यक्रम मंडपाचे आणि स्टॉलचे काम पूर्णत्वास आले आहे. या महोत्सवाचे या ऐतिहासिक बीड जिल्हा कृषी महोत्सवाचे साक्षिदार होण्यासाठी आणि आपल्या शेती तंत्रज्ञानाला विज्ञानाची जोड देण्यासाठी शेतकऱ्यांनी उपस्थिती लावण्याची गरज आहे. या महोत्सवात प्रगत शेतीच्या ज्ञान- तंत्रज्ञानासोबत अत्याधुनिक ड्रोन शेती यंत्राचे प्रात्यक्षिक तसेच ड्रोन शेतीचे महत्व, त्याचे फायदे या संदर्भात माहिती मिळणार आहे. विविध विकसित शेती औजारासोबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन या महोत्सवात होणार आहे. विशेष करून बीडची अस्सल मराठमोळी गावरान जेवणाची चव देखील या महोत्सवात चाखायला मिळणार आहे. प्रथमच बीडच्या मराठमोळ्या खाद्यसंस्कृतीचा तडका बीडकरांना आणि इतर खवय्यांना अनुभवायला मिळणार असून बचतगटांच्या गावरान जेवणाची मेजवानी सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे. लोप पावत चाललेल्या खाद्यसंस्कृतीला पुनर्जीवित करण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने याचे आयोजन केले आहे.


या कृषी प्रदर्शन,पशु प्रदर्शन,परिसंवाद/ चर्चा सत्र, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री व्यवस्था, शेतकरी सन्मान समारंभ, अत्याधुनिक कृषी अवजारे प्रदर्शन, शेतकरी उत्पादक कंपनी व सेंद्रिय शेती गट उत्पादित धान्य, फळे, फुले, भाजीपाला हे प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण असणार आहे. या महोत्सवाला मोठ्या संख्येने शेतकरी बांधवानी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरीकर, आत्माचे प्रकल्पसंचालक सुभाष साळवे यांनी केले आहे.



चौकट



प्रदर्शनात जिभेला तृप्त करणारे पदार्थ


बीड जिल्ह्याच्या खाद्यसंस्कृतीचे एक विशेष म्हणजे पुरणपोळी. कोणत्याही मराठी सणावाराच्या वेळी घराघरात बनणारा पदार्थ म्हणजे पुरणपोळी. हा पदार्थ जितका दिसायला व खायला चांगला, तितका तो करायला कठीण. या संमेलनात पुरणपोळीसह, दही धपाटे, पिठलं- भाकरी, चुलीवरची जेवण इ. जिभेला तृप्त करणारे खाद्य पदार्थ प्रदर्शनाची विशेष मेजवानी आहे.








पेट्रोल डिझेलच्या कमी वितरणाबद्दलपाच पेट्रोल पंप धारकांवर खटला

 पेट्रोल डिझेलच्या कमी वितरणाबद्दलपाच पेट्रोल पंप धारकांवर खटला


संपूर्ण महाराष्ट्रात पेट्रोल पंप धारक व किरकोळ दूध विक्रेते यांची तपासणी मोहीम.

               मुंबई, दि. 22 : संपूर्ण महाराष्ट्रात पेट्रोल पंप धारक व किरकोळ दूध विक्रेत्यांची नियंत्रक, वैध मापन शास्त्र, महाराष्ट्र राज्य या विभागामार्फत तपासणी मोहिम पार पडली. या तपासणी दरम्यान ५७९ पेट्रोल पंपधारक व २५४ किरकोळ दूध विक्रेत्यांची तपासणी करून ०५ पेट्रोल पंप धारकांवर पेट्रोल डिझेलच्या कमी वितरणासाठी, तर २४ पेट्रोल पंप धारकांवर वजने मापे विहित मुदतीमध्ये पडताळणी व मुद्रांकन न केल्यामुळे खटले नोंदविण्यात आले. १७ पंप धारकांना वितरणात अनियमितता आढळून आल्याने संबंधित तपासणी अधिकाऱ्यांद्वारे परिशिष्ट १० प्रमाणे नोटीस बजावण्यात आल्या या त्रुटी सात दिवसांच्या आत पूर्तता करण्याचे निर्देश देण्यात आले.


               आवेष्टित दुधाबाबत एकूण २५४ आस्थापनांच्या तपासणी दरम्यान छापील किरकोळ विक्री किमतीपेक्षा (सर्व करांसहीत) अधिक दराने विक्री करणाऱ्या ३१ आस्थापनांवर वरील अधिनियम व नियमानुसार कारवाई करण्यात आली. तसेच सदर आस्थापनेद्वारा वापरात असलेले वजन व मापे विहित मुदतीत फेरपडताळणी व मुद्रांकन न केल्यामुळे तसेच इतर उल्लंघनाबाबत ७२ खटले नोंदविण्यात आले.संपूर्ण मोहिमेत वैध मापन शास्त्र अधिनियम, २००९ तसेच त्या अंतर्गत महाराष्ट्र वैध मापन शास्त्र (अंमलबजावणी) नियम, २०११ तसेच वैध मापन शास्त्र (आवेष्टित वस्तु) नियम, २०११ मधिल तरतुदींच्या उल्लंघनाबाबत एकूण १२५ खटले नोंदविण्यात आले.


        पेट्रोल व डिझेलच्या वाढते दर तसेच दुधाच्या वाढत्या किंमतीमुळे ग्राहकांची फसवणूक होण्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाल्याने ग्राहक हितार्थ नियंत्रक, वैध मापन शास्त्र, महाराष्ट्र राज्य, तथा अपर पोलिस महासंचालक, डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांच्या निर्देशाद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात पेट्रोल पंप धारक व किरकोळ दूध विक्रेत्यांची विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली.


फसवणूक होवू नये यासाठी खबरदारी घ्यावी - डॉ. रवींद्र कुमार सिंगल


             ग्राहकांच्या हितार्थ ही मोहीम राबविण्यात आली असून व्यापाऱ्यांद्वारे ग्राहकांची फसवणूक होणार नाही. तसेच व्यापाऱ्यांकडून ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून ग्राहकांनी कोणतीही वस्तू, वजन अथवा मापाने खरेदी करीत असताना ते कमी दिले जात नाही ना याची दक्षता घ्यावी. प्रमाणित वजन व मापानेच वस्तू खरेदी करावी.


            आवेष्टित वस्तु छापील किरकोळ विक्री किमतीपेक्षा (सर्व करांसहीत) अधिक दराने विक्री करणे गुन्हा आहे. आवेष्टित वस्तूंवर वस्तूचे सामान्य नाव, उत्पादक/ आयतदार / आवेष्टक यांचे नाव व पत्ता, निव्वळ वजन/ माप, उत्पादित/ आवेष्टित / आयातीत केल्याचा महिना व वर्ष, किरकोळ विक्री किमत (सर्व करांसहीत). ग्राहक सेवा दूरध्वनी क्रमांक व ई-मेल इ. माहिती घोषित करणे बंधनकारक आहे. व्यापाऱ्यांकडून ग्राहकांची फसवणूक होत असल्यास, तशी तक्रार वैध मापन शास्त्र यंत्रणेच्या https://www.vaidhmapan.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर करण्याचे आवाहन केलेले आहे.

एमबीए/एमएमएस सामाईक प्रवेश परीक्षेची ऑनलाईन नोंदणी सुरू.

 एमबीए/एमएमएस सामाईक प्रवेश परीक्षेची ऑनलाईन नोंदणी सुरू.

            मुंबई, दि. 22 : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत तंत्रशिक्षण विभागांतर्गत एमबीए/एमएमएस या सामाईक प्रवेश परीक्षेची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया दि. २३ फेब्रुवारी २०२३ पासून सुरू होणार आहे. ही नोंदणी प्रक्रिया दि. ४ मार्च २०२३ पर्यंत सुरू राहणार आहे.


            शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करीता घेण्यात येणाऱ्या एमबीए/एमएमएस या व्यावसायिक पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महा- एमबीए/एमएमएस सीईटी २०२३ ही परीक्षा दिनांक १८ मार्च २०२३ व १९ मार्च २०२३ रोजी घेण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी https://mbacet2023.mahacet.org या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.



आईने मोजलेच नाही.

 *


आईने मोजलेच नाही
...🤔* 



आयुष्याच्या तव्यावरती

संसाराची पोळी

भाजता भाजता

हाताला किती बसले चटके

*आईने मोजलेच नाही...🤔*


नवर्‍यासह लेकराबाळांचे 

करता करता

मोठ्यांचा मान राखता राखता

कितीदा वाकले गेले,

*आईने मोजलेच नाही...🤔*


बाळाला किती झोके

दिले,

बाळा साठी किती रात्री

जागले

*आईने मोजलेच नाही...🤔*


जरा चुकले की 

घरच्यांची,बाहेरच्यांची

किती बोलणी खाल्ली,

काळजाला किती घरं पडली,

*आईने मोजलेच नाही...🤔*


याच्यासाठी त्याच्यासाठी

आणखीही कुणासाठी

जगता जगता ,

स्वतःसाठी अशी 

किती जगले,

*आईने मोजलेच नाही...🤔*


पाखरे गेली फारच दूर

डोळा आहे श्रावणपूर

पैशाचा हा नुसता धूर

निसटून गेले कोणते सूर,

*आईने मोजलेच नाही...🙄*



🏵 *सर्व आईंना समर्पित...*🙏

Featured post

Lakshvedhi