Thursday, 23 February 2023

आईने मोजलेच नाही.

 *


आईने मोजलेच नाही
...🤔* 



आयुष्याच्या तव्यावरती

संसाराची पोळी

भाजता भाजता

हाताला किती बसले चटके

*आईने मोजलेच नाही...🤔*


नवर्‍यासह लेकराबाळांचे 

करता करता

मोठ्यांचा मान राखता राखता

कितीदा वाकले गेले,

*आईने मोजलेच नाही...🤔*


बाळाला किती झोके

दिले,

बाळा साठी किती रात्री

जागले

*आईने मोजलेच नाही...🤔*


जरा चुकले की 

घरच्यांची,बाहेरच्यांची

किती बोलणी खाल्ली,

काळजाला किती घरं पडली,

*आईने मोजलेच नाही...🤔*


याच्यासाठी त्याच्यासाठी

आणखीही कुणासाठी

जगता जगता ,

स्वतःसाठी अशी 

किती जगले,

*आईने मोजलेच नाही...🤔*


पाखरे गेली फारच दूर

डोळा आहे श्रावणपूर

पैशाचा हा नुसता धूर

निसटून गेले कोणते सूर,

*आईने मोजलेच नाही...🙄*



🏵 *सर्व आईंना समर्पित...*🙏

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi