Wednesday, 22 February 2023

कला का री







 

जिवन गाणे










 

वेळ महत्वाची

 



कौशल्य विकासाबरोबरच विद्यार्थ्यांच्याज्ञानाच्या कक्षा विस्तारण्यास होईल मदत

 मॅनहटन कम्युनिटी कॉलेज समवेत करार

कौशल्य विकासाबरोबरच विद्यार्थ्यांच्याज्ञानाच्या कक्षा विस्तारण्यास होईल मदत  


- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर.

            मुंबई, दि. 21 :- मॅनहटन कम्युनिटी कॉलेज बरो सोबतच्या करारामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण कमी खर्चात उपलब्ध होणार असून कौशल्य विकासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा विस्तारण्यास आणि रोजगार उपलब्ध होण्यास देखील निश्चितच मदत होईल, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.


            शालेय शिक्षण विभाग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवीत आहे. याअंतर्गत जागतिक दर्जाच्या नामांकित शिक्षण संस्थांसोबत करार करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र आणि न्यूयॉर्क येथील सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क मॅनहटन कम्युनिटी कॉलेज बरो यांच्यादरम्यान परस्पर शैक्षणिक सहकार्य विकसित करण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर यांच्या उपस्थितीत मंगळवारी सामंजस्य करार करण्यात आला.


            या करारानुसार पात्र विद्यार्थ्यांना बरो ऑफ मॅनहटन कम्युनिटी कॉलेज ऑफ द सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क (बीएमसीसी) मध्ये केवळ 20 टक्के शुल्कात उच्च दर्जाचे शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थांना आणि विद्यार्थ्यांना विदेशात शिक्षण व प्रशिक्षणास प्रोत्साहन दिले जाणार आहे. त्याचबरोबर संशोधन, अध्यापन, अभ्यासक्रम आदी क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढविले जाणार आहे.


            शालेय शिक्षण विभाग आणि मॅनहटन कम्युनिटी कॉलेज बरो यांच्यादरम्यान झालेल्या या करारावर शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल यांनी, तर मॅनहटन कम्युनिटी कॉलेज बरोच्या वतीने शिक्षण विभागाचे अध्यक्ष अँथनी मुनरो यांनी स्वाक्षरी केली. मंत्री श्री. केसरकर यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या या कराराप्रसंगी मॅनहटन कम्युनिटी कॉलेज बरोचे उपाध्यक्ष संजय रामदत, शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक डॉ.कैलास पगारे, राजभवन येथील उपसचिव प्राची जांभेकर आदी उपस्थित होते.


00

केंद्रीय जहाज व परिवहन मंत्र्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

 केंद्रीय जहाज व परिवहन मंत्र्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

महाराष्ट्रातील बंदर, नौकानयन, सागरमाला प्रकल्प वेळेत पूर्ण करावेत

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


महाराष्ट्रात दीड वर्षांत सुरू होणार रो-रो सेवेचे चार प्रकल्प.

            मुंबई, दि. 21 : केंद्रीय जहाज व परिवहन मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी राज्यातील बंदर, नौकानयन, सागरमाला या प्रकल्पांबाबत चर्चा झाली. केंद्र आणि राज्य शासनामार्फत महाराष्ट्रातील प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासंदर्भात यावेळी सविस्तर चर्चा झाली.


            वर्षा निवासस्थानी झालेल्या या बैठकीस केंद्रीय जहाज व परिवहन सचिव सुधांश पंत, मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष राजीव जलोटा, जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी, मुंबई मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सैनी आदी अधिकारी उपस्थित होते.


            लोथल येथे साकारत असलेल्या राष्ट्रीय सागरी वारसा संकुल प्रकल्पामध्ये महाराष्ट्राचे दालन असावे आणि त्याठिकाणी शिवकालीन आरमार विषयी चित्रमय प्रदर्शनासाठी राज्य शासनामार्फत सर्वतोपरी साहाय्य करण्यात येईल, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.


            राज्यात सागरमाला अंतर्गत सुरू असलेले प्रकल्प वेळेत पूर्ण करतानाच नवीन प्रकल्पांसाठी राज्य शासनाकडून मागणी करण्यात येईल. महाराष्ट्रात पुढील दीड वर्षांत रो-रो सेवेचे चार प्रकल्प सुरू करण्यात येतील त्यामध्ये मुंबई ते मोरा, मुंबई ते काशीद, मुंबई ते दिघी, मुंबई ते रेवस कारंजा यांचा समावेश आहे.


            रो-रो सेवेसाठी बंकर फ्यूलला लावला जाणारा वॅट कमी करण्यात यावा तसेच जुन्या प्रवासी बोटींचे अद्ययावतीकरण करण्यात यावे, पर्यावरणपूरक बोटींची समावेश याविषयी देखील चर्चा करण्यात आली.



सांगली जिल्ह्यातील रेल्वेशी संबंधित विविध विषयांवर

 सांगली जिल्ह्यातील रेल्वेशी संबंधित विविध विषयांवर

केंद्रीय रेल्वे मंत्र्याशी सकारात्मक चर्चा


- कामगार तथा सांगली जिल्ह्याचे पालक मंत्री सुरेश खाडे.

            नवी दिल्ली, दि. 21 : सांगली जिल्ह्यातील रेल्वेशी संबंधित विविध विषयांवर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्व‍िनी वैष्णव यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती, राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालक मंत्री सुरेश खाडे यांनी दिली.


            येथील संचार भवनात श्री खाडे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत सांगली जिल्ह्यात रेल्वेशी संबंधित विषयांवर चर्चा केली असून संबंधित निवेदनेही श्री. खाडे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री यांना यावेळी दिले.


            यामध्ये सांगली जिल्ह्यातील अराग-मिरज येथे रेल्वे अंडर ब्रिज (RUB) असा रेल्वेचा प्रस्ताव असून यासाठीचे कंत्राट देण्याकरीता निविदा काढण्यात आली आहे. या प्रक्रियेला रद्द करून या ठिकाणी रेल्वे ओव्हर ब्रिज बांधण्यात यावे, अशी मागणी श्री. खाडे यांनी केंद्रीय मंत्री श्री. वैष्णव यांच्याकडे केली. केंद्रीय रेल्वे मंत्री श्री. वैष्णव यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन सर्वेक्षण करण्याबाबतचे तत्काळ निर्देश दिले, असल्याचे श्री खाडे यांनी सांगितले. 


            यासह सांगली जिल्ह्यातील येरळा नदीवरील रेल्वेच्या जागेतील रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीचे रस्ते रेल्वे विभागाकडून बांधावे, अशी मागणीही केली. सांगली येथील रेल्वे स्थानकाचे शेड अपूर्ण असून ते पूर्ण व्हावे. याशिवाय सीएसटीएम कोल्हापूर-तिरूपती महालक्ष्मी एक्सप्रेस ही रोज चालणारी गाडीचे नुतनीकरण व्हावे. काही गाडयांचा थांबा सांगली रेल्वे स्थानकांवर व्हावा. सांगली आणि परिसरातील लोकांची अधिक प्रवास असलेल्या स्थानकांपर्यंत नवीन रेल्वे गाडया सुरू करण्याची मागणी श्री खाडे यांनी यावेळी केली.


मिरजमध्ये ‘क्रीडा संकुल’ची केंद्रीय क्रीडा मंत्री यांच्याकडे मागणी


            मिरज येथे क्रीडा संकुल असावे असे निवेदन आज सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. खाडे यांनी केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे दिले. खेलो इंडिया अंतर्गत मिरज येथे क्रीडा संकुलाची मागणी श्री. खाडे यांनी केंद्रीय क्रीडा मंत्री यांच्याकडे केली. केंद्रीय क्रीडा मंत्री श्री. ठाकूर यांनी याबाबत लवकर सकारात्मक निर्णय घेऊ, अशी माहिती बैठकीनंतर श्री खाडे यांनी दिली.


00000

दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या मंत्रीमंडळ व शासनाच्या इतर महत्वाच्या निर्णयांची माहिती.

 दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या मंत्रीमंडळ व शासनाच्या इतर महत्वाच्या निर्णयांची माहिती.

            मुंबई, दि. 21 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात गेल्या आठवड्याभरातील शासनाने घेतलेले महत्त्वाचे निर्णय व मंत्रीमंडळ निर्णयांची माहिती देण्यात आली आहे. राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर' या ॲपवर बुधवार दि. 22 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत हा कार्यक्रम प्रसारित होईल.


            वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील, वरिष्ठ सहायक संचालक मीनल जोगळेकर यांनी मंत्रीमंडळ निर्णयांची माहिती दिलखुलास कार्यक्रमातून दिली आहे.



Featured post

Lakshvedhi