Monday, 20 February 2023

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

 



दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन


मुंबई, दि. २० : मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर हे मराठी भाषेतील आद्य पत्रकार होते. दर्पण हे मराठीतले पहिले वृत्तपत्र त्यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले. त्यांच्या कार्याला वंदन व स्मृतींना उजाळा देण्यासाठी मंत्रालयात या अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


यावेळी अवर सचिव विठ्ठल भास्कर यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी यांनीही पुष्प अर्पण करून दर्पणकारांना वंदन केले.


०००


श्रीमती श्रध्दा मेश्राम/संस/



 


वृत्त क्र. 589


नवी दिल्ली येथे बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त अभिवादन


 


            नवी दिल्ली, 20 : आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती आज नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली. 


            कॉपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रभारी निवासी आयुक्त डॉ. निधी पांडे यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.


            महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक (माहिती) अमरज्योत कौर अरोरा यांच्यासह कर्मचाऱ्यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.


००००


 

दिलखुलास' कार्यक्रमात अजय भोसले यांची मुलाखत

 दिलखुलास' कार्यक्रमात अजय भोसले यांची मुलाखत


            मुंबई, दि. 20 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात जागतिक मातृभाषा दिनानिमित्ताने मराठी भाषा विभागाचे अवर सचिव अजय भोसले यांची मुलाखत 21 फेब्रुवारी रोजी प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर मंगळवार, दि. 21 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल.


                जगभरात 21 फेब्रुवारी हा दिवस आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. प्रत्येकाला आपल्या मातृभाषेचा अभिमान असतो. आपली संस्कृती आणि मातृभाषेचा जागर या दिवसाच्या निमित्ताने करण्यात येतो. भारतासारख्या विविध संस्कृती आणि भाषा असलेल्या देशात मातृभाषा दिवस बहुभाषिकतेला प्रोत्साहन देणारा ठरतो. युनेस्कोने जाहीर केलेला जागतिक मातृभाषा दिवस हा आपल्या मातृभाषेविषयी आत्मियता निर्माण करणारा आहे. त्यामुळे या दिवसाचे महत्व ओळखून श्री. भोसले यांनी मातृभाषेच्या संवर्धन, प्रचारासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिलखुलास कार्यक्रमातून दिली आहे. ही मुलाखत वरिष्ठ सहायक संचालक श्रीमती मीनल जोगळेकर यांनी घेतली आहे.


००००

खुल्या बाजारातून उभारलेल्यामहाराष्ट्र राज्य विकास कर्जाची 20 मार्चला परतफेड

 खुल्या बाजारातून उभारलेल्यामहाराष्ट्र राज्य विकास कर्जाची 20 मार्चला परतफेड


             मुंबई, दि. 20 : राज्य शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या 8.54 टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्जाच्या अदत्त शिल्लक रकमेची व्याजासह परतफेड करण्यात येणार आहे. या कर्जात गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना कर्जाची दि. 20 मार्च 2023 रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येणार आहे, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी दिली.


           या कर्जाची अदत्त शिल्लक रकमेची दिनांक 19 मार्च 2023 पर्यंत देय असलेल्या व्याजासह ही परतफेड करण्यात येईल. परक्राम्य संलेख अधिनियमाअन्वये महाराष्ट्र शासनाने उपरोक्त दिनांकास सुटी जाहीर केल्यास, राज्यातील अधिदान कार्यालय, कर्जाची परतफेड अगोदरच्या कामाच्या दिवशी करण्यात येणार आहे. या कर्जावर दि. 20 मार्च 2023 पासून व त्यानंतर कोणतेही व्याज अदा करण्यात येणार नाही.


            सरकारी प्रतिभूती विनियमाअनुसार, दुय्यम सर्वसाधारण खातेवही लेखा किंवा रोखे प्रमाणपत्र यांच्या स्वरुपातील शासकीय रोख्यांच्या नोंदणीकृत धारकाकडील मुदत समाप्ती उत्पन्नाचे प्रदान हे, इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत जमा निधीची सुविधा असलेल्या कोणत्याही बँकेतील धारकाच्या खात्यात जमा करून त्याच्या बँक खात्याचे संबंधित तपशिलांसह प्रदानादेशाद्वारे करण्यात येईल. रोख्यांच्या बाबतीतील प्रदान करण्यासाठी अशा रोख्यांचा मूळ वर्गणीदार किंवा यथास्थिती उत्तरवर्ती धारक, बँकेकडे किंवा कोषागाराकडे किंवा भारतीय स्टेट बँकेच्या शाखेच्या उप-कोषागाराकडे किंवा यथास्थिती त्यांच्या दुय्यम बँकांकडे जर त्यांना व्याज प्रदान करण्यासाठी मुखांकित करण्यात आले असल्यास त्यांची नोंदणी करण्यात आली असल्यास त्याच्याकडे त्यांच्या बँक खात्याचा संबंधित तपशील सादर करतील.


            तथापि, बँक खात्याच्या संबंधित तपशिलाच्या/इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत निधी जमा करण्याच्या आदेशाच्या अभावी नियत दिनांकास परतफेड करणे सुलभ व्हावे यासाठी, 8.54 टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज 2023 च्या धारकांनी, लोक ऋण कार्यालयात 20 दिवस अगोदर त्यांचे रोखे सादर करावेत. रोख्यांच्या मागील बाजूस "प्रमाणपत्रावरील देय मुद्दलाची रक्कम मिळाली." असे नमूद करुन ते रोखे परतफेडीसाठी सादर करावेत.


           भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या कोणत्याही सहयोगी बँकांच्यामार्फत ज्या ठिकाणी कोषागाराचे काम केले जाते त्या ठिकाणी ते रोखे रोखा प्रमाणपत्राच्या स्वरुपात असल्यास, ते संबंधित बँकेच्या शाखेत सादर करावेत आणि ते कोषागार किंवा उपकोषागार येथे सादर करू नयेत, याची विशेष नोंद घेतली पाहिजे.


            रोख्यांची रक्कम प्रदान करण्यासाठी ठिकाणे मुखांकित करण्यात आली असतील त्या ठिकाणांखेरीज अन्य ठिकाणी ज्या रोखेधारकांना रक्कम स्वीकारायची असेल, त्या रोखेधारकांनी ते रोखे नोंदणीकृत व विमाबद्ध डाकेने संबंधित लोक ऋण कार्यालयात पाठवावेत, लोक ऋण कार्यालय हे, महाराष्ट्र राज्यात शासकीय कोषागाराचे काम करणाऱ्या भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या सहयोगी बँकेच्या कोणत्याही शाखेत कोषागारात/उपकोषागारात देय असलेल्या धनाकर्षाद्वारे त्याचे प्रदान करील असे वित्तीय सुधारणा विभागाच्या सचिव शैला ए. यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.


0000


पवन राठोड/ससं/



 


Maharashtra Development Loan will be repaid at par on March 20


 


            Mumbai, 20th Feb : The outstanding balance of Maharashtra SDL, 2023 issued in terms of the Government of Maharashtra, Finance Department Notification will be repaid at par on March 20, 2023 with interest due up to and including March 19, 2023. In the event of a holiday being declared on the aforesaid date by any State Government under the Negotiable Instrument Act, 1881, the loan will be repaid by the paying offices in that State on the previous working day. No interest will accrue on the loan from and after March 20, 2023.


            2. As per sub-regulation 24 (2) and 24 (3) of Government Securities Regulations, 2007 payment of maturity proceeds to the registered holder of Government Security held in the form of Subsidiary General Ledger or Constituent Subsidiary General Ledger account or Stock Certificate shall be made by a pay order incorporating the relevant particulars of his bank account or by credit to the account of the holder in any bank having facility of receipt of funds through electronic means. For the purpose of making payment in respect of the securities, the original subscriber or the subsequent holders of such a Government Securities, as the case may be, shall submit to the Bank or Treasury and Sub-Treasury or branch of State Bank of India, where they are enfaced / registered for payment of interest, as the case may be, the relevant particulars of their bank account.


            3. However, in the absence of relevant particulars of bank account / mandate for receipt of funds through electronic means, to facilitate repayment on the due date, holders of 8.54% Maharashtra SDL, 2023 should tender their securities at the Public Debt Office, 20 days in advance. The securities should be tendered for repayment, duly discharged on the reverse there of as under:-


"Received the Principal due on the Certificate".


            4. It should be particularly noted that at places where the treasury work is done by a branch of the State Bank of India, the securities, if they are in the form of Stock Certificates, should be tendered at the branch of the bank concerned and not at the Treasury or Sub-treasury.


            5. Holders who wish to receive payment at places other than those where the securities have been enfaced for payment should send them duly discharged to the Public Debt Office concerned by Registered and Insured Post. The Public Debt Office will make payment by issuing a draft payable at any Treasury / Sub-Treasury or branch of State Bank of India conducting Government Treasury work in the State of Maharashtra.



पंचमहाभूत बोध’ प्रयोगाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली भरभरुन दाद

 पंचमहाभूत बोध’ प्रयोगाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली भरभरुन दाद.


पंचतत्वांच्या संरक्षणाची मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांसमवेत घेतली शपथ


            कोल्हापूर, दि. 20 : कणेरी मठ येथे पंचमहाभूत लोकोत्सव अंतर्गत पंचतत्वांच्या संरक्षणाचा संदेश देणाऱ्या 'पंचमहाभूत बोध' या प्रयोगाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरभरुन दाद दिली.


               काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या संकल्पनेतून निर्माते - दिग्दर्शक विजू माने यांनी तयार केलेल्या या प्रयोगाचे (कलाकृती) मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. अवघ्या 20 मिनिटांमध्ये 50 कलाकारांच्या सहभागातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रभावीपणे दिल्याबद्दल मुख्यमंत्री श्री. शिंदे व उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले. पंचतत्त्वांचे सृष्टीसाठीचे महत्व, त्यांच्यावर होत असलेले परिणाम, पंचमहाभूतांच्या संरक्षणासाठी मानवी जीवनशैलीत अपेक्षित असलेल्या बदलांचा संदेश 'पंचमहाभूत बोध' प्रयोगातून देण्यात आला. यावेळी काडसिद्धेश्वर स्वामीजींनी 'पंचमहाभूत संरक्षणाची शपथ' उपस्थितांना दिली.


                स्क्रीन, लेझर शो, नृत्य, नाट्य व स्पेशल इफेक्ट (अग्नी, वारा, पाऊस)चा वापर करुन तयार करण्यात आलेला हा राज्यातील पहिलाच संदेशपर प्रयोग असल्याची माहिती निर्माते - दिग्दर्शक श्री. माने यांनी दिली.


मुख्यमंत्री, उप-मुख्यमंत्र्यांनी केली विविध स्टॉलची पाहणी


            कणेरी मठ येथील श्री क्षेत्र सिद्धगिरी मठातर्फे आयोजित 'सुमंगलम् पंचमहाभूत' या लोकोत्सवात उभारण्यात आलेल्या विविध लोकोपयोगी स्टॉलची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली .


            कार्यक्रमस्थळी आगमन झाल्यानंतर, महसूल विभागातर्फे उभारण्यात आलेल्या स्टॉलचे दिप प्रज्वलन तर पर्यावरण व वातावरणीय बदल आणि प्रदूषण नियत्रंण मंडळाच्या स्टॉलचे फित कापून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते औपचारिकरित्या उद्घाटन करून, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या व्हॅनला हिरवा झेंडा दाखविला. हवामान बदलाचे परिणाम, कारणे व उपाय या अनुषंगाने या स्टॉलवर माहिती देण्यात येणार आहे. तर महसूल विभागाच्या स्टॉलवर विविध दाखले, फेरफार, नोंदणी आदींची सविस्तर माहिती या ठिकाणी नागरिकांकरिता उपलब्ध आहे. या स्टॉलच्या उभारणीबद्दल मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्री यांनी समाधान व्यक्त केले.


            यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, भय्याजी जोशी, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, विभागीय आयुक्त सौरभ राव, विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, योगेश जाधव, हिंदुराव शेळके, माजी आमदार अमल महाडिक व सुरेश हळवणकर, समरजितसिंह घाटगे, विश्वस्त उदय सावंत, संतोष पाटील तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


००००



बाळशास्त्री जांभेकरांच्या जनहितकारकच्या पत्रकारितेचा वारसा पुढे न्यावा

 बाळशास्त्री जांभेकरांच्या जनहितकारकच्या पत्रकारितेचा वारसा पुढे न्यावा


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


            सिंधुदुर्गनगरी, दि. 20 : मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक, आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचा वारसा पुढे नेण्याचे काम पत्रकारांनी करावे. त्यांच्या स्मरणार्थ उभारण्यात येणारे पत्रकार भवन पत्रकारांना प्रेरणा व ऊर्जा देणारे ठरेल. या ज्ञान मंदिराचे पावित्र्य जतन करुन बाळशास्त्री जांभेकरांच्या जनहितकारक पत्रकारितेचा वारसा पुढे न्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.


            आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवनाचे उद्घाटन तसेच कोनशिला अनावरण करुन बाळशास्त्री जांभेकर यांच्या पुतळ्यास केंद्रीय मंत्री श्री. राणे यांनी पुष्पहार अर्पण केला. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दूरदृश्यप्रणालीद्वारे शुभेच्छा दिल्या. यानंतर जिल्हा नियोजन समिती नवीन सभागृहात झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री श्री. राणे बोलत होते.


पत्रकार भवन मराठी पत्रकारांना प्रेरणा देणारं, ऊर्जा देणारं ठरेल - मुख्यमंत्री


            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दूरदृश्य प्रणालीद्वारे शुभेच्छा देताना म्हणाले, आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण मधून मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली. सामाजिक सुधारणेवर भर दिला. त्यांचे स्मारक मराठी पत्रकारांना प्रेरणा, ऊर्जा देणारं ठरेल. ज्ञान मंदिर बनवून त्याचं पावित्र्यं जतन करावे. जांभेकरांचा वारसा पुढे नेण्याचे काम पत्रकारांना करायचे आहे. हे स्मारक त्यासाठी प्रेरणा आणि स्फूर्ती देणारे ठरेल. भविष्यातही शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.


पत्रकारांसाठी हक्काचे व्यासपीठ – केंद्रिय मंत्री नारायण राणे


            केंद्रीय मंत्री श्री. राणे म्हणाले, आज राज्यभरातील पत्रकारांसाठी एक हक्काचे दालन सज्ज झाले आहे. या स्मारक व भवन उभारण्यामागे सर्व पत्रकारांचे योगदान आहे. आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मारक प्रेरणदायी ठरेल. पत्रकारितेत त्यांनी सांगितलेले पावित्र्य जोपासावे, समाजाला प्रेरणा देऊन, समाजाचे प्रबोधन करुन समाजाच्या विकासाचे, प्रगतीचे विषय हाताळले जातील, लिहिले जातील, असे काम पत्रकारांनी करावे. आपला जिल्हा देशात समृद्ध जिल्हा म्हणून ओळखला जावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.


            आपला पेशा पत्रकारितेचा आहे, त्याच पावित्र्य टिकवणे हा आपला धर्म आहे. आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी विधायक, विकासात्मक कार्यकर्तृत्वाची ऊर्जा मराठी पत्रकारितेतून दिली आहे. समाज प्रबोधन होऊन समाजाच्या विकासाचे प्रगतीचे विषय पत्रकार भवनातून हाताळले जावेत, अशी अपेक्षा केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केली.


            शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री यांनीही दूरदृश्य प्रणालीद्वारे शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर हे महाराष्ट्राचे भूषण आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला पत्रकार भवनाची आवश्यकता होती ती आता साकार झाली आहे. पुढील काळातही पत्रकार भवनाबाबत सर्वतोपरी मदत शासनाच्या माध्यमातून केली जाईल. पत्रकार भवनामध्ये सुसज्ज ग्रंथालय होण्यासाठी मराठी भाषा विभागाच्या माध्यमातून पुस्तके दिले जातील.


            आमदार नितेश राणे, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर यांनीही शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्यासह विविध प्रसार माध्यमांतील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


00000



मराठा महायोद्धा बाजीराव

: मराठा महायोद्धा बाजीराव 

नर्मदेच्या भयाण वाळवंटात फिरून फिरून अगदी वैतागून

गेलो होतो आम्ही… रणरणत ऊन भाजून काढत होतं…

उष्ण हवा तर सतत वाहत होती…कुठे निवाऱ्याला

सावली सापडत नव्हती…

आमच्या गाडीचा ड्रायव्हर मूळचा इंदोरचा पण त्याने

देखील कधी गाडी इतक्या आत आणली नव्हती…

शोध होता तो एकाच गोष्टीचा… पण ती देखील कुठे आहे

कोणालाच माहित नव्हती…

आणि ही अशी परिस्थिती फक्त ‘हिंदुस्तानातच आपल्यावर येऊ शकते..


१५ मे २००९ च्या लोकमत मधील एका लेखाने खाड्कन डोळे उघडले आमचे…

हा लेख होता श्रीमंत बाजीराव पेशव्यांवर....


त्या लढवय्या पेशव्याच्या समाधीच्या अस्तित्वाचा!

बाजीराव पेशव्यांचा अकाली मृत्यू झाला हे आम्हाला माहित

होतं…

पण त्यांची समाधी कुठे असेल हा साधा विचारच आम्ही केला नाही! कसा करणार?

शाळेतील इतिहासाच्या पुस्तकात दोन पानात संपवलेला बाजीराव

खरोखर किती मोठा होता हे

आम्हाला कोण सांगणार? ‘लढवय्या पेशवा’ पेक्षा

‘बाजीराव – मस्तानी’ ह्या प्रकरणाला जास्त महत्व

देऊन महाराष्ट्रातील जनतेनेच

ह्या पेशव्याच्या कर्तृत्वाला दाबून टाकले!


ह्या मर्द गड्याचा पराक्रम सांगावा तो तरी किती!


"जो गती भयी गजेंद्र की, वही गती हमरी आज

बाजी जात बुंदेल की , बाजी रखियो लाज!"


बुन्देलखंडचा राजा छत्रसाल ह्याने मोहम्मद बंगश ह्या मोगल सरदारा खिलाफ बाजीरावाची मदत मागितली.

संदेश पोहोचला तेव्हा बाजीराव जेवत होते.

असे म्हणतात की हातातला घास तसाच ठेवून बाजीराव

उठले आणि थेट घोड्यावरून मोजक्या स्वारानिशी निघाले.

बाकीचे सैन्य त्यांना नंतर येऊन मिळाले.


“ उशीर केल्यामुळे छत्रसाल पराजित झाले तर

इतिहास हेच म्हणेल की बाजीराव जेवत होते म्हणून

उशीर झाला!"


ह्याला म्हणतात मराठी बाणा! 


ह्या कृत्यानंतर बाजीरावाने

बंगाशाला पराभूत तर केलेच, पण छात्रासालाच्या राज्याचा १/३ हिस्सा जहागीर म्हणून मिळवला…

आणि मराठी तितुका बुन्देल्खंडी फडकला!!


अशा ह्या पराक्रमी पेशव्याची समाधी रावेरखेडी नावाच्या एका गावात आहे असे आम्हाला कळते काय

आणि ती लवकरच नर्मदेच्या पाण्याखाली जाणार

असल्याचे कळते आणि तिचा शेवटचा दर्शन घ्यावा म्हणून आम्ही लगेच निघतो काय… सगळं अगदी घाईघाईत घडलं…

इंदोरहून गाडी घेऊन आम्ही निघालो ते थेट सनावादला नर्मदा ओलांडली…मनात एक विचार येऊन गेला..

जेव्हा मराठ्यांनी नर्मदा ओलांडली तेव्हा नावांचा पूल

बांधून ओलांडली होती…आज आम्ही सिमेंटच्या पुलावरून ती ओलांडली…


घोड्यांच्या टापांनी हादरून

उठणारा हा परिसर आज रेल्वे आणि गाड्यांच्या आवाजाने भरून गेला होता!


बडवाह! मध्य प्रदेशातील एक छोटासा जिल्हा! ह्या जिल्ह्यात कुठेतरी लपल होत रावेरखेड़ी! सुमारे पंधरा मिनिटे एक खडबडीत रस्त्यावरून आमच्या इंडिका आम्ही

बळजबरी नेली तेव्हा एक कच्चा रास्ता लागला…. आणि नंतर लागल ते एक छोट गाव! 

हेच रावेरखेड़ी असणार असा आम्ही एक अंदाज़ बांधून घेतला! अगदी कोणीही न सांगता चुकीचे अंदाज़ बांधणे व ते बरोबर आहेत अशी स्वतःची समजूत घालण्यात आम्ही

पटाईत!

गावात आम्ही आमच्या अस्खलीत हिंदी मध्ये

विचारल,

"इधर कोई समाधी है क्या?"


" सचिन तेंडुलकर १००वी सेंच्युरी कधी मारणार?"

असा प्रश्न विचारल्यावर समोरचा कसा क्लीन बोल्ड

होतो अगदी तशीच अवस्था तिथल्या ग्रामस्थांची झाली!

कोणालाच माहित नाही! मग मूळ मुद्द्यावर आलो,

"ये रावेरखेड़ी किधर है? ये नहीं है क्या?" रावेरखेड़ी हे गाव समोरचा नाला ओलांडून पलिकडे आहे असे कळले व आम्ही पुढे निघालो…

पण पुढच्या गावी देखील हेच चित्र…समाधी कुठे आहे

कुणालाच ठाऊक नहीं…आता करायचे काय… मग विचारले की बाबा नदी किधर है? आणि त्या दिशेने आम्ही कूच केली…

ह्या गावातून जाताना एक गोष्ट मात्र ध्यानी आली…


गावातील घरांचे दरवाजे एकदम जुन्या पद्धतीचे… भक्कम लाकडाची बांधणी आणि सुन्दर नक्षीकाम... जणू बाजीराव पेशव्यांच्या काळी बांधलेली घर

असावीत!


सुमारे ३०० वर्षांपूर्वी ते देखिल ह्याच रस्त्याने घोड़दौड़ करीत नर्मदा तीरी आपल्या छावणीत गेले असतील!

अचानक अवतीभवती सेना सागर उभा राहिला....

सरदारांचे डेरे, सैनिकांची चाललेली धावपळ आणि

आपल्या डे-यात मसलती करीत बसलेला एक

दिमाखदार मराठी तरुण! महाराष्ट्राला महाराष्ट्राबाहेर

नेणारा हाच तो......

बाजीराव!


गरुडाची भेदक नजर, पिळदार मिश्या, तोंडावर किंचित

स्मित, कमावलेल मजबूत शरीर आणि तितकीच मजबूत

विचारशक्ती!

कुशल व्यवस्थापक, अजिंक्य योद्धा आणि आकर्षक

व्यक्तिमत्व असा हा सर्वगुणसम्पन्न मराठ्यांचा

पंतप्रधान!........असो!

तर आम्ही समाधी शोध चालू ठेवला..असे करता करता गाव संपल! पुढे नुसती सपाट जमीन!

डोक्यावर अंड फोडल असता तर त्याचा हाफ-फ्राय तयार होइल इतकं भाजून काढणार ऊन!!

आता काय करायच ह्या विचारत असताना एक

उजवीकडे शेड दिसली! शेतीच्या कामासाठी

वापरली जात होती बहुदा! म्हट्ल पाहू इथे विचारून!

भात्यातील शेवटचा बाण उरलेला तो मारून पाहू!

असे म्हटले आणि मी गाडीतुन उतरलो!


पुढे लिहिण्या अगोदर एक वस्तुस्थिति सांगतो! ह्याची

जाणीव त्या दिवशी झाली!

आपल्या मध्ये का कोण जाणे आपल्याच इतिहासाबद्दल एक कमालीचा न्यूनगंड असतो!

आणि त्याच्या जोडीला असते ती कमालीची उदासीनता!

आपल्यालाच आपला इतिहास माहित नसतो आणि आपण तो जाणूनदेखील घेत नहीं! भारताबाहेर कोणाला इथले पराक्रमी माहित असेल अशी आपण अपेक्षा ठेवत नाही. तीच गोष्ट आमच्याबाबतीत खरी ठरली!


महाराष्ट्राबाहेर मराठ्याला ओळखत कोण? म्हणून

आम्ही कधीच, "पेशवा बाजीराव की समाधी कहा है?"

असे विचारले नाही! का कोण जाणे! अगदी नकळत ही

गोष्ट घडली खरी! असो!

मग मी त्या शेड पाशी गेलो आणि एक माणसाला विचारल, "इधर कोई समाधी है क्या?"

"मुझे पता नाही साहब, दादासाहब से पूछो!", असे

म्हणताच एक माणूस आतून बाहेर आला!


हा माणूस म्हणजे दादासाहब!

नाव दादासाहब पण त्याच दिसण अगदी उलट! एकदम

बारीक, दाढ़ीची खुंट वाढलेली

आणि साधारण उंचीचा हा माणूस ‘दादासाहब’ ह्या

खिताबाला साजेसा बिलकुल नव्हता! मी म्हट्ल, " दादासाहब, इधर कोई समाधी है क्या?"

आपल्या लुंगीला हाथ पुसत त्याने उत्तर दिले....


"समाधी? पेशवा सरकार की समाधी? वो….."


पुढचे शब्द मी ऐकलेच नाहीत जणू!!

पेशवा सरकार!

पेशवा सरकार!!!

इतका मान! इतका आदर!! 


ते देखील पुण्याहून शेकडो

मैल दूर ह्या उजाड़ रावेरखेड़ी मध्ये!! आश्चर्य! 


मी अक्षरशः बावरुन गेलो आणि नकळत डोळ्याच्या

कडा पाणवल्या!

ज्या महाराष्ट्र देशासाठी हा बाजीराव लढ़ला तिथे

देखील त्याला इतका मान नाही!

महाराष्ट्रात बाजीराव कोण आहे हे देखील माहित नसलेली लोक राहतात आणि माहीत असला तरी.......

"अरे तो का बाजीराव – मस्तानी वाला?" असे प्रश्न

विचारणारे महारथी देखील आहेत!


आपल्या इतिहासाची काय किम्मत करतो आपण हे

निर्लज्जपणे सांगणारे आपण कुठे आणि ह्या नर्मदेच्या वाळवंटात उभा असलेला हा

गावठी ‘दादासाहब’ कुठे !


मन विषण्ण झालं! आपल्या मराठीपणाची थोडी का

असेना लाज वाटली! जणू ह्या ‘दादासाहब’ ने नकळत

आमच्या अस्मितेचा पोकळ फुगा त्याच्या दोन शब्दांनी फोडला होता. एक सणसणीत चपराकच गालावर पडली होती!


कोण कुठली इंग्लंडची राणी पण तिला आपली लोकं,

क्वीन एलीझबेथ म्हणतात. अमेरिकेसारखा स्वार्थी देश,

पण त्याच्या राष्ट्रपतीला आपण प्रेसिडेंट ओबामा म्हणतो! जसं कि हा भारताचाच प्रेसिडेंट आहे! पण जेव्हा आपल्याच देशातील वीरांना आदर देण्याची पाळी येते तेव्हा आपली जीभ जड होते!


शिवाजी, संभाजी, बाजीराव अशी राजरोस पणे आपण नावे घेतो! तेव्हा कुठे जातो हा मराठीचा अभिमान?

कुठे जाते आपली मराठी अस्मिता? आणि हा कोण

कुठला ‘दादासाहब’! त्याला काय घेणं देणं नसताना

इतका आदर करतो मराठ्यांच्या पेशव्यांचा....

पेशवा सरकार!!


ह्या नंतर आम्हाला समाधी सापडली देखील आणि

आम्ही ती पाहून देखील आलो! महाराष्ट्राच्या महान पुत्राला वंदन केले आणि नर्मदेच्या पात्रातील जुन्या घाटावर जाऊन स्नान करून आलो! तिथे काही अवशेष आहेत ते पाहिले, ३०० वर्षे मागे जाण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आणि परत निघालो!

परत येताना मी विचारांच्या अधीन झालो होतो! ते नर्मदेच निळ पात्र, एका सच्च्या पण

विस्मरणात गेलेल्या योद्ध्याची त्याच्या नावाला न साजेशी अशी पण दुर्लक्षित समाधी आणि त्या वाळवंटात उभा असलेला तो ‘दादासाहब’!

बाहेर वा-यामुळे मातीचे लोळ उठले होते, आकाशात धुरळा उडाला होता. माझ्या मनात देखील असाच कल्लोळ मजला होता. दोनच शब्द मनात परत

परत ऐकू येत होते....


पेशवा सरकार!

पेशवा सरकार!!

पेशवा सरकार!!!

वाचल्या बद्दल धन्यवाद्


आज या समाधीचे दर्शन घेण्याचा योग आला 👇🏼




 

Featured post

Lakshvedhi