सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Monday, 20 February 2023
चंद्रपूर नगरीतून महाराष्ट्राच्या राज्यगीताचा शुभारंभ
चंद्रपूर नगरीतून महाराष्ट्राच्या राज्यगीताचा शुभारंभ
सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत ‘जय जय महाराष्ट्र माझा’ चा जागर
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे 350 वे वर्ष साजरे करणार
चंद्रपूर, दि. 19: सांस्कृतिक कार्य विभागाच्या पुढाकाराने कविवर्य राजा बढे लिखीत ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गिताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला व त्याची अंमलबजावणी शिवजयंतीपासून करण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने घेतला. त्यानुसार हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून या राज्यगीताचा शुभारंभ चंद्रपूर नगरीतून होत असल्याचा आपल्याला मनस्वी आनंद होत आहे, असे सांस्कृतिक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
सांस्कृतिक कार्य विभागाच्या पुढाकाराने महाराष्ट्राच्या राज्यगीताचा अधिकृत शुभारंभ झाला, असे घोषित करून मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, सामान्य प्रशासन विभागाच्या 1 फेब्रुवारी 2023 च्या शासन निर्णयान्वये, महाराष्ट्राच्या राज्यगीताची घोषणा करण्यात आली आहे. शिवजयंती हा केवळ एक उत्सव नव्हे तर छत्रपतींच्या 350 व्या राज्याभिषेकाच्या पर्वावर रयतेचे राज्य आणण्यासाठी संकल्प करण्याचा हा दिवस आहे. या राज्यगीताचा प्रत्येक शब्द पराक्रम गाजवतो, गीतामधून विरतेचा मंत्र दिसतो. जगातील सर्वात जास्त वाघ असलेल्या भुमीतून या राज्यगीताचा शुभारंभ होत आहे, याचा आपल्याला मनस्वी आनंद आहे.
‘जय भवानी...जय शिवाजी’ हे केवळ शब्द नाही तर उर्जा, उत्साह देणारे शब्द आहेत. शिवाजी महाराजांचे नाव घेतले तरी रक्तामध्ये चैतन्य निर्माण होते, वीरता जाणवते. शिवाजी महाराज या नावामध्ये एक वेगळीच शक्ती आहे. शिवाजी महाराज हे सर्वधर्माचा सन्मान करणारे राजे होते.
‘चांदा पासून बांदा’ पर्यंत आणि ‘भामरागड पासून रायगडपर्यंत’ छत्रपतींच्या राज्याभिषेकाचे 350 वे वर्ष संपूर्ण राज्यभर अतिशय उत्साहात साजरे करण्याचा आपला संकल्प आहे. एवढेच नाही तर आपल्यासाठी प्राणप्रिय व कोहीनुर हिऱ्यापेक्षाही जास्त महत्वाची असलेली शिवाजी महाराजांची ‘जगदंबा’ तलवार आणि वाघनखे इंग्लंडवरून भारतात परत आणण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. त्यासाठी इंग्लंडचे पंतप्रधान, भारत सरकारचे गृहमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार, त्यांचे आचरण भावी पिढीला माहित होण्यासाठी पुढील वर्षभरात प्रत्येक जिल्ह्यात ‘जाणता राजा’ या नाटकाचे प्रयोग नि:शुल्क सुरू करण्यात येईल. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर असलेला चित्रपट महोत्सव जिल्ह्याजिल्ह्यात करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय संग्रहालय आपण तयार करीत आहोत. शिवसाहित्य संमेलन, शिवगीत स्पर्धा लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
मंत्री श्री. मुनगंटीवार पुढे म्हणाले, शिवजयंतीनिमित्त आग्र्याला आज विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येथे 100 एकर जागेत छत्रपतींचे स्मारक करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारचे सहकार्य घेण्यात येईल. 2 जून 2023 पासून एक कोटी तरुण – तरुणी शिवभक्तांची पोर्टलवर नोंदणी करण्याचा आपला संकल्प आहे. सुर्य – चंद्र असेपर्यंत शिवाजी महाराजांचे नाव राहणार आहे. त्यामुळे जात, पात, धर्म, पंथ याच्या पलिकडे जाऊन प्रत्येकाच्या हृदयात फक्त ‘शिवबा’ च असू द्या, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते लखोटा उघडून राज्यगीताचा शुभारंभ करण्यात आला. तत्पूर्वी शिवस्मारकाला अभिवादन करून मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले. यावेळी भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण करून भगवे फुगे आकाशात सोडण्यात आले. जगदंबा ढोल – ताशांच्या निनादात ‘जय भवानी...जय शिवाजी’ चा जागर करण्यात आला. यावेळी विक्की दुपारे व विजय पारखी यांनी राज्यगीत सादर केले. प्रास्ताविक डॉ. मंगेश गुलवाडे यांनी केले, तर कार्यक्रमाचे संचालन रवी गुरनुले यांनी केले.
सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव.
सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य शोभायात्रा संपन्न.
पालकमंत्री दीपक केसरकर व उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते शुभारंभ.
कोल्हापूर, दि. 19 (जिमाका): कणेरी मठावरील श्री क्षेत्र सिद्धगिरी येथील सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवांतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. दरम्यान शिवाजी पेठेतील महात्मा गांधी मैदान येथे पालकमंत्री दीपक केसरकर व उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या शोभायात्रेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी काडसिध्देश्वर स्वामीजी, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, मठाचे विश्वस्त उदय सावंत, संतोष पाटील तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
शोभायात्रेचा मार्ग महात्मा गांधी मैदान -बिनखांबी गणेश मंदिर - महाद्वार रोड- पापाची तिकटी -गंगावेश- पंचगंगा नदी असा होता. या शोभायात्रेत मोठ्या प्रमाणावर नागरिक सहभागी झाले. महात्मा गांधी मैदान येथे सुरु झालेली शोभायात्रा पंचगंगा नदी घाट येथे विसर्जित झाली.
देशभरातील चौदा राज्यांतील पारंपरिक लोकवाद्यांसह कलाकारांनी विविध कलांचे सादरीकरण केले. तसेच छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित चित्रे, त्यांचे पर्यावरण विषयक विचार यांचे प्रदर्शन हे या मिरवणुकीचे वैशिष्ट्य होते. सातारा जिल्ह्यातील गोजेगाव येथील घडशी - गुरव समाजाचे सामुदायिक तुतारी वादन पथक हे शोभायात्रेचे मुख्य आकर्षण ठरले.
२० ते २६ फेब्रुवारी दरम्यान कणेरी मठ परिसरात होणाऱ्या या पंचमहाभूत उत्सव सोहळ्यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.
000
न्यू एज्युकेशन सोसायटीचा शतक महोत्सवी सांगता समारंभ
न्यू एज्युकेशन सोसायटीचा शतक महोत्सवी सांगता समारंभ व शतसंवत्सरी स्मरणिका प्रकाशन सोहळा संपन्न
न्यू एज्युकेशन सोसायटीची वरिष्ठ महाविद्यालय सुरु करण्याची मागणी विशेष बाब म्हणून मान्.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
संकल्पाला कष्टाची जोड देवून यशाला गवसणी घाला
- केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांचा विद्यार्थ्यांसाठी संदेश
कोल्हापूर, दि. 19 (जिमाका): शिक्षण संस्था विद्यादानाचे काम करुन उज्वल भावी पिढी घडवित असल्याने अशा शिक्षण संस्थांना शासन नेहमीच मदत व सहकार्य करते. याच भावनेतून न्यू एज्युकेशन सोसायटीची वरिष्ठ महाविद्यालय सुरु करण्याची मागणी विशेष बाब म्हणून मान्य केली जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले.
न्यू एज्युकेशन सोसायटी कोल्हापूरचा शतक महोत्सवी सांगता समारंभ व शतसंवत्सरी या स्मरणिकेचे प्रकाशन केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह आणि त्यांच्या पत्नी सोनलजी शाह, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या शतक महोत्सव समिती व सल्लागार नियामक मंडळाचे कार्याध्यक्ष विनोदकुमार लोहिया यांच्यासह संस्थेचे मान्यवर पदाधिकारी, माजी विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, कोल्हापूर येथील न्यू एज्युकेशन सोसायटीने गेल्या 100 वर्षात केलेले ज्ञानदानाचे काम कौतुकास्पद आहे. संस्थेची ज्ञानदानाची चळवळ अखंड तेवत रहावी यासाठी न्यू एज्युकेशन सोसायटीने नवनवीन तंत्रज्ञानावर आधारित नवीन अभ्यासक्रम सुरू करुन विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाची सोय उपलब्ध करून द्यावी, त्यास शासन स्तरावरुन आवश्यक ते सहकार्य केले जाईल. न्यू एज्युकेशन सोसायटीने चांगल्या नि:स्वार्थी भावनेने शिक्षण क्षेत्रात ज्ञानदानाचे काम केले असल्यामुळेच संस्थेने 100 वर्षाचा यशस्वी टप्पा पूर्ण केला आहे. संस्थेचे विद्यार्थी सर्व क्षेत्रात नावलौकीक मिळवित आहेत हे संस्थेच्या व भावी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अलौकिक आहे, असे त्यांनी म्हंटले.
विद्यार्थ्यांच्या मनात परीक्षेची भीती असू नये, यासाठी देशाच्या प्रधानमंत्री महोदयांनी परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमामुळे आपणास लहानपणी ज्या शाळेत शिक्षण घेतले त्या ठिकाणी उपस्थित राहता आले. या कार्यक्रमामुळे लहाणपणीच्या आठवणी जाग्या झाल्या हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण होता, असे श्री. शिंदे यांनी सांगितले. मागील दोन वर्षात सर्व कार्यक्रम बंद होते, पण आता आपल्या शासनाने सर्व कार्यक्रम करण्यास मान्यता दिली असल्याने विविध सण, उत्सव, समारंभ आपण मोठ्या उत्साहाने व दिमाखात साजरे करत आहोत, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले.
संकल्पाला कष्टाची जोड देवून यशाला गवसणी घाला
- केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांचा विद्यार्थ्यांसाठी संदेश
विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातच जीवनाचे लक्ष निर्धारित करुन हे लक्ष्य साध्य करण्यासाठी संकल्प करावेत. संकल्पाला कष्टाची जोड देवून यशाला गवसणी घाला, असा संदेश विद्यार्थ्यांना केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी यावेळी बोलताना दिला.
केंद्रीय गृह मंत्री श्री. शाह म्हणाले, शालेय जीवनात विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार होत असतात. या संस्कारातूनच त्यांची चांगली जडण-घडण होते. यासाठी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातच छोटे-छोटे संकल्प करावेत. एखादी गोष्ट सलग 21 दिवस केल्यास त्याची सवय लागते. हीच गोष्ट 90 दिवस केल्यास त्याची शैली बनते, यासाठी लहाणपणीच छोटे-छोटे संकल्प करुन त्याच्या पूर्तीसाठी प्रयत्न करा. शिक्षण, व्यायाम व योगाला जीवनात महत्वाचे स्थान द्या, असेही श्री. शाह यावेळी बोलतांना म्हणाले.
देशाने सर्व क्षेत्रात क्रांती केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देश सर्व क्षेत्रात उल्लेखनीय काम करीत आहे. पुढील 25 वर्षात देश जगात सर्व क्षेत्रात अव्वल असेल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री श्री. शाह यांनी यावेळी व्यक्त केला.
न्यू एज्युकेशन सोसायटीने 100 वर्षात ज्ञानदानाबरोबरच खेळ, क्रीडा यासह सर्व क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमठविला आहे. संस्थेने शिक्षण क्षेत्रात चांगले काम केले असून त्यांचे लाखो विद्यार्थी आज वेगवेळ्या क्षेत्रात काम करीत आहेत. संस्था समाजाप्रती चांगले काम करीत असून माझ्या पत्नीचे शिक्षण या संस्थेत झाले याचा आपणास अभिमान वाटतो. शतक महोत्सवी सांगता समारंभ व शतसंवत्सरी या स्मरणिका प्रकाशन सोहळ्यास आपणास निमंत्रित केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री श्री. शाह यांनी संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद दिले.
केद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पत्नी सोनल शाह यांनी मनोगत व्यक्त केले. आपण ज्या शाळेत शिकलो, घडलो त्या शाळेच्या समारंभास आपणास उपस्थित राहता आले हा माझ्यासाठी गौरवाचा क्षण आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला.
न्यू एज्युकेशन सोसायटी शिक्षण संस्थेमार्फत सध्या १२ वी पर्यंतचे शिक्षण देण्यात येत आहे. संस्थेमार्फत कला, वाणिज्य, विज्ञान, कृषी, वैद्यकीय, विधी शाखेची वरिष्ठ महाविद्यालये सुरू करण्याचा मानस असून यासाठी शासन स्तरावरून मदत मिळावी, अशी अपेक्षा दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या शतक महोत्सव समिती व सल्लागार नियामक मंडळाचे कार्याध्यक्ष विनोदकुमार लोहिया यांनी प्रास्ताविकात व्यक्त केली.
हिंदवी स्वराज्य महोत्सव अंतर्गत भव्य 'महाशिव आरती' संपन्न
हिंदवी स्वराज्य महोत्सव अंतर्गत भव्य 'महाशिव आरती' संपन्न
जुन्नरच्या पर्यटन विकासासाठी पुढील दोन वर्षात १०० कोटी
- पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा
पुणे, दि.१९: जुन्नरच्या पर्यटन विकासासाठी पुढील दोन वर्षात १०० कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येतील; तसेच यावर्षीच्या हिंदवी स्वराज्य महोत्सवासारखे आयोजन यापुढे शिवजयंतीनिमित्त दरवर्षी करण्यात येईल, असे राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले.
शिवजयंतीनिमित्त राज्य शासनाकडून आयोजित हिंदवी स्वराज्य महोत्सव अंतर्गत भव्य महाशिव आरतीचे जुन्नर येथे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार प्रवीण दरेकर, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे, जिल्हा नियोजन समिती सदस्य आशा बुचके आदी उपस्थित होते.
मंत्री श्री. लोढा म्हणाले, यावर्षी शिवजयंतीला उत्साहाचे वातावरण आहे. जुन्नरच्या पर्यटन विकासासाठी या ठिकाणी कायमस्वरूपी शिवकालीन गाव उभे करण्यात येईल. पर्यटन विभागाकडून येथे कायमस्वरूपी टेन्ट सिटी उभी करु, असेही ते म्हणाले.
यावेळी हातात दिवे, पणती घेऊन शिवनेरी किल्ल्याच्या दिशेने महाशिव आरती, शिव वंदना करण्यात आली. त्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. यावेळी आमदार श्री. दरेकर, ह.भ.प. पंकज महाराज गावडे, ह.भ.प. राणा महाराज वासकर यांनी मनोगत व्यक्त केले.
000
पोवाडा
सानिका सिध्दार्थ चौरे- वय 5वर्ष Junior KG
स्वरल सिध्दार्थ चौरे - वय 9 वर्ष 3 तिसरी
चिंतामणराव केळकर विद्यालय अलिबाग
अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत
*अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत ज्यांच्या शक्तीचे, युक्तीचे, पराक्रमाचे, शौर्याचे, ध्येयाचे धडे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर अख्या जगभर शिकविले जातात असे तुम्हां आम्हा सर्वांचे उद्धारकर्ते श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा*
शुभेच्छुक : नव्या निरव देवेंद्र कोळी
Featured post
-
नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व करिअरची सुवर्णसंधी -वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ · महाराष्ट्र-बाडेन...
-
टी.एन. शेषन हे भारताचे निवडणूक आयुक्त (Chief Election Commissioner) म्हणून 1990–1996 या काळात अत्यंत कठोर, निर्भीड आणि सुधारक म्हणून ओळखले ...
-
ऑरेंज गेट बोगदा प्रकल्पाला प्रारंभ ; मुंबईच्या वाहतुकी स मोठा दिलासा मिळणार ...

